Saturday, May 2, 2026
Google search engine
Home Blog Page 23

चंद्रपूर जिल्ह्यातून वणी शहरात बेकायदेशीर वाळू तस्करीचा धक्कादायक प्रकार उघड , एका टिपीवर वाहनांच्या दिवसाला ८ ते १० ट्रिपा ; GPRS तपासणीची मागणी

0

News Today

वणी (प्रतिनिधी) – चंद्रपूर जिल्ह्यातील कोळशी (ता. कोरपना), पिंपरी (ता. भद्रावती) व स्वीट कोसारा (ता. वरोरा) या घाटांमधून मोठ्या प्रमाणावर बेकायदेशीर वाळू उपसा व तस्करी सुरू असल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. नुकतेच हर्रास करण्यात आलेले घाट असूनही, घाट धारक नदीच्या पात्रात प्रोक्लेमअधीन यंत्राच्या सहाय्याने वाळू उपसा करत असल्याचे निदर्शनास आले आहे.

वरील वाळू घाटावरून वणी (जि. यवतमाळ) येथे येण्यासाठी केवळ  २ तासापेक्षा कमी कालावधी लागतो, या वाळूच्या प्रवासासाठी एकाच वाहनावर दिवसातून तब्बल ८ ते १० ट्रिप लावण्यात येत असल्याचे उघडकीस येत आहे. वाली भरून निघालेल्या वाहनाला नाशिक जिल्ह्यातील वणी  येथे पोहचण्यासाठी २४ तास कालावधीनदेवून ते वाळूचे वाहन  वणी जि. यवतमाळ येथे खाली करून लगेच घाटावर जावून वारंवार वाळू भरून खाली करीत आहे. विशेष म्हणजे, या सर्व ट्रिप ‘नाशिक वणी’ येथून निघाल्याचे दर्शवणाऱ्या Online टिपी दाखवून वाहतूक सुरू आहे.

हे सर्व वाळू वाहतूक करणारे वाहननाना नियमानुसार GPRS प्रणाली लावणे अनिवार्य आहे. आणि सर्व वाळूच्या टिपी online असल्याने त्या वाहनांचे GPRS तपासणे गरजेचे झाले आहे. दररोज एकाच परवान्यावर ८ ते १० ट्रिप वाळू उपसा करीत असूनही, त्यांच्या हालचालींची कोणतीही पडताळणी प्रशासनाकडून होत नाही, ही बाब अधिकच संशयास्पद आहे. वणी शहरासाठी येणाऱ्या काही वाहनांच्या टिपीवर २ तास तर काही वाहनांच्या टिप्यावर २४ तास वेळ नमूद आहे. २४ तास नमूद आलेल्या वाहनांच्या टिप्यावर वारंवार वाळूच्या ट्रिपा मारल्या जात आहे.

यासंदर्भात चंद्रपूर येथील जिल्हाधिकाऱ्यांनी कठोर कारवाईची भूमिका घ्यावी अशी मागणी केली आहे. यात तपासण्यासाठी महत्वाचे खाली मुद्देनिहाय चौकशीची गरज निर्माण झाली आहे. 

१. सर्व वाहनांचे GPRS डेटा तपासून त्यांच्या प्रत्यक्ष ट्रिप व वेळांची पडताळणी करण्यात यावी.

२. नदी पात्रात सुरू असलेल्या बेकायदेशीर वाळू उपशावर तातडीने बंदी आणावी.

३. हर्रास झालेले घाट असूनही सुरू असलेल्या उपशावर कठोर कारवाई करण्यात यावी.

४. Online टिपीचा गैरवापर रोखण्यासाठी ती प्रणाली अधिक पारदर्शक करण्यात यावी.

या वाळू तस्करीमुळे शासनाच्या महसुलाला मोठा फटका बसत असून, पर्यावरणाचा ऱ्हासही वेगाने होत आहे. त्यामुळे महसूल व पोलीस प्रशासनाने तातडीने लक्ष घालून दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.

वणी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या शेड बांधकाम निविदेत चलाखीचा डाव? वाचा सविस्तर वृत्त

0

ऑनलाईन टेंडर व टेंडर नोटीसवर वेगवेगळ्या तारखा, सुट्टीचे दिवस निवडून निविदा प्रक्रियेत अपारदर्शकता; मर्जीतील कंत्राटदारासाठी रचला घाट?

News Today

वणी, ता. १६ जून:
वणी कृषी उत्पन्न बाजार समितीने शेड बांधकामासाठी काढलेल्या निविदा प्रक्रियेत संशयास्पद पद्धतीने केलेल्या बदलांमुळे तीव्र संताप व्यक्त होत आहे. निविदा प्रक्रियेत पारदर्शकता राखण्याऐवजी समितीने ऑनलाईन टेंडर व टेंडर नोटीसवर वेगवेगळ्या तारीखा, तसेच सुट्टीचे दिवस निवडून अनेक कंत्राटदारांना अडचणीत टाकले. यामुळे निविदा मर्जीतील कंत्राटदाराला मिळवून देण्याचा ठरवून केलेला डाव असल्याचा आरोप होत आहे.

निविदा प्रक्रिया कशी होती?
१४ जून २०२५ (शनिवार, सुट्टीचा दिवस) रोजी शेड बांधकामासाठी निविदा प्रसिद्ध करण्यात आली.

या दिवशी ऑनलाईन प्रक्रिया सुरू झाली.

१६ जून २०२५ रोजी, दुपारी १२ वाजेपर्यंत, ऑनलाईन निविदा जमा करण्याची अंतिम मुदत होती. परंतु ह्या ऑनलाईन निवेदेसोबत जोडलेल्या टेंडर नोटीसमध्ये निविदा दाखल करण्याची अंतिम मुदत ही ३०जून २०२५ रोजच्या सायंकाळी ५ वाजेपर्यंत ही नमूद असून निविदा उघडण्याची तारीख १ जुलै २५ रोजी सकाळी ११ वाजता अशी स्पष्ट नमूद आहे. तसेच सदरच्या निविदेची रक्कम रुपये ४३११७७८/- इतकी आहे. व याकरिता कंत्राटदाराला पात्रतासिद्धतेसाठी विविध प्रकारची कागदपत्रे सक्षम यंत्रणेकडून साक्षांकित व प्रमाणित स्वरूपाचे जोडायचे आहे.

यात केवळ दोन दिवसांचा कालावधी देण्यात आला, तोही शनिवार आणि रविवार या सुट्टीच्या दिवशी.

या प्रक्रियेमुळे स्थानिक ठेकेदारांना पुरेसा वेळ मिळाला नाही. अचानक आणि अपारदर्शक नियोजनामुळे अनेकांना शंका आहे की, ही योजना मर्जीतील कंत्राटदारासाठी आखण्यात आली होती.

कंत्राटदारांची नाराजी
काही स्थानिक कंत्राटदारांनी सांगितले की, “शेड बांधकामाच्या निविदेसाठी फारच कमी वेळ देण्यात आला. शनिवार व रविवार या सुट्टीच्या दिवशी कार्यालयीन कामकाज शक्य नसते. हे सर्व पाहता हे ठरवून केले गेलेले नियोजन आहे.”

अजून एका ठेकेदाराने स्पष्टपणे सांगितले, “ऑनलाईन आणि ऑफलाईन प्रक्रिया एकाचवेळी सुरू न करता वेगळ्या तारखा ठेवल्या गेल्या. यामागे काहीतरी काळं कारस्थान आहे.”

राजकीय सावली?
बाजार समितीवर काही राजकीय व्यक्तींचा प्रभाव असल्याच्या चर्चा आहेत. याच पार्श्वभूमीवर असा आरोप होत आहे की, “शेड बांधकामाचे काम खास मर्जीतील कंत्राटदारालाच मिळावे म्हणून नियम वाकवले गेले.”

प्रशासनाची भूमिका
समितीचे सचिव झाडे यांना विचारणा केली असता, त्यांनी सांगितले की, मी बाहेर आहे चौकशी करून सांगतो, मात्र, ही भूमिका समाधानकारक न वाटता अधिक संशयास्पद ठरत आहे.

नागरिकांचा सवाल
स्थानिक व्यापारी व शेतकऱ्यांनी विचारले की, “जर सार्वजनिक निधी वापरून उभारण्यात येणारा शेड मर्जीतील लोकांच्या हातात जाणार असेल, तर ही सामान्य जनतेची फसवणूक नाही का?”

निष्कर्ष:
शेड बांधकामाच्या निविदा प्रक्रियेत अपारदर्शकता, अल्प कालावधी व सुट्टीच्या दिवशी निविदा प्रक्रिया सुरू करून मर्जीतील ठेकेदारांना संधी देण्याचा प्रकार अतिशय गंभीर आहे. यासंदर्भात उच्चस्तरीय चौकशी करून संबंधित जबाबदारांवर कारवाई करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे.

सरकारी यंत्रणांची उत्तरदायित्व जपणारी भूमिका हीच लोकशाहीची खरी ताकद आहे — आणि ती आता कठोरपणे सिद्ध करावी लागणार आहे.

वणीत वाळू तस्करीचा महापूर: कोरपना कोळशी घाटात प्रोक्लेमने बेकायदेशीर वाळू उपसा

0

News Today 

वणी:- वणीत कोळशाच्या काळ्या धंद्याने आधीच बदनाम झालेल्या कोरपना परिसरातून आता वाळू तस्करीचा महापूर उसळला आहे. पर्यावरणाचे नियम धाब्यावर बसवत, राजकीय आशीर्वादाच्या छायेखाली प्रोक्लेम मशीनद्वारे कोळशी घाटातील नदीपात्रातून वाळू उपसली जात आहे. उपसा केलेल्या वाळूची तस्करी वणी शहरात मोठ्या जोमात सुरू आहे.

दिवसाढवळ्या सुरू असलेल्या या बेकायदेशीर वाळू उपशामुळे नद्यांचे स्वरूप बदलत असून, पर्यावरणीय तोल ढासळत आहे. स्थानिक प्रशासनाने डोळेझाक केल्याने हायवा व टिप्परद्वारे दिवसरात्र वाळूची वाहतूक निर्बंधाविना सुरू आहे. हे सर्व कोळशाच्या काळ्या धंद्यात गुंतलेल्या तथाकथित स्थानिक राजकीय प्रभावशाली मंडळींच्या छत्रछायेखाली चालत असल्याचा आरोप आहे.

कोरपना परिसरातील नागरिकांनी अनेक वेळा तक्रारी केल्या असल्या, तरी अद्याप ठोस कारवाई झाली नसल्यामुळे लोकांमध्ये नाराजी पसरली आहे. शासन व प्रशासनाच्या निष्क्रियतेमुळे कोरपना तालुका पर्यावरण हानीच्या उंबरठ्यावर पोहोचला आहे.

स्थानिकांची मागणी:

बेकायदेशीर वाळू उपसा त्वरित थांबवण्यात यावा

दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी

कोरपना परिसरात पर्यावरण रक्षणासाठी स्वतंत्र पथक तैनात करण्यात यावे

या बेकायदेशीर वाळू तस्करीमुळे परिसराच्या जैवविविधतेवर घातक परिणाम होण्याची शक्यता असून, वेळेत कारवाई न झाल्यास भविष्यात गंभीर संकट निर्माण होऊ शकते.

मॅजिक पेनचा वापर 

एकाच रॉयल्टीवर मॅजिक पेनने मोडतोड करून अनेकदा वाळू वाहतूक करीत असल्याची माहिती समोर येत आहे. तरी महसूल विभागाने या बाबीकडे लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे.

केदारनाथ येथून परतताना हेलिकॉप्टर अपघात: सात जणांचा दुर्दैवी मृत्यू, त्यात २३ महिन्यांच्या चिमुरडीसह वणीतील एकाच कुटुंबातील तिघांचा समावेश

0

News Today 

वणी : केदारनाथ यात्रेहून परतणाऱ्या भाविकांचे हेलिकॉप्टर रुद्रप्रयाग जिल्ह्यातील गौंरीकुंड परिसरात आज तारीख १५ जून रोजी सकाळी ६ वाजताच्या सुमारास अपघातग्रस्त झाले. या भीषण अपघातात हेलिकॉप्टरमधील सर्व सात प्रवाशांचा मृत्यू झाला असून, मृतांमध्ये एका केवळ २३ महिन्यांच्या बालिकेचाही समावेश आहे. या बालिकेसह तिचे आई वडील हे वणीतील कुटुंब असल्याने शहरात शोककळा पसरली आहे.

प्राथमिक माहितीनुसार, हेलिकॉप्टर अपघाताचे कारण खराब हवामान व कमी दृश्यमानता (visibility) असल्याचे सांगितले जात आहे. अपघाताच्या ठिकाणी मदत व शोधकार्य तातडीने सुरू करण्यात आले.

मृतांमध्ये समाविष्ट प्रवासी:

कॅप्टन राजबीर सिंह चौहान (पायलट, जयपूर), विक्रम रावत (बीकेटीसी कर्मचारी, रासी, उखीमठ), विनोद देवी (उत्तर प्रदेश, वय ६६ वर्ष), तृष्टी सिंह (उत्तर प्रदेश, वय १९ वर्ष), राजकुमार सुरेश जायसवाल (गुजरात, वय ४१ वर्ष), श्रद्धा राजकुमार जायसवाल (महाराष्ट्र), काशी जायसवाल (महाराष्ट्र, वय २३ महिने) विशेष म्हणजे, मृतांमध्ये एकाच कुटुंबातील तीन सदस्य (राजकुमार, श्रद्धा आणि काशी जायसवाल) होते. हे कुटुंब वणी जिल्हा यवतमाळ येथील आहे. अपघातामुळे त्यांच्या कुटुंबावर दुहेरी संकट कोसळले आहे.

स्थानिक प्रशासन आणि आपत्कालीन यंत्रणांनी घटनास्थळी धाव घेतली असून, संपूर्ण प्रकरणाची चौकशी सुरू आहे. यात्रेच्या सुरक्षिततेबाबत पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित झाले आहेत.

आमदार संजय देरकारांकडून शौक व्यक्त

वरील घटनेची माहिती मिळताच वणी विधानसभेचे आमदार संजय देरकर यांनी शौक संवेदना व्यक्त करून मृतकांना श्रद्धांजली अर्पण केली व जयस्वाल कुटुंबियांवर पडलेल्या दुःखाच्या डोंगरातून सावरण्यासाठी ईश्वर चरणी प्रार्थना केली यावेळी सौ. किरण देरकर उबाठा शिवसेना गटाचे जिल्हाप्रमुख संजय निखाडे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे विधानसभा अध्यक्ष दिलीप भोयर, भगवान मोहिते, आदी मान्यवरांसह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. 

कनकवाडी, वणी : नव्याने उभारल्या जात असलेल्या वाचनालयाच्या जोत्यात मातीचा वापर – दर्जाबाबत प्रश्नचिन्ह

0

News Today 

वणी (प्रतिनिधी) – नगर परिषद वणी अंतर्गत कनकवाडी परिसरात सध्या नव्याने वाचनालयाचे बांधकाम सुरू असून, या बांधकामाच्या जोत्यात मातीचा वापर होत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे दर्जाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

स्थानिक नागरिकांच्या माहितीनुसार, वाचनालय हे शिक्षण व ज्ञानप्रसाराचे महत्त्वाचे केंद्र असते. अशा ठिकाणी मजबूत व टिकाऊ इमारत आवश्यक असताना, जोत्यामध्ये सिमेंट व खडीऐवजी माती मिसळून काम चालवले जात आहे. यामुळे इमारतीच्या मजबुतीवर शंका उपस्थित केली जात आहे.

या संदर्भात संबंधित ठेकेदार व नगर परिषद अधिकाऱ्यांकडे विचारणा केली असता त्यांनी अद्याप कोणतीही स्पष्ट माहिती दिलेली नाही. मात्र, स्थानिक नागरिकांनी या अनियमिततेची चौकशी करण्याची मागणी केली आहे.

सदर वाचनालयासाठी शासनाच्या निधीतून खर्च केला जात असून, गुणवत्तेचा प्रश्न उपस्थित झाल्यामुळे सदर प्रकरणाची चौकशी होणे गरजेचे आहे. नगर परिषदेने या प्रकरणाची तातडीने दखल घ्यावी, अशी मागणी नागरिक व सामाजिक कार्यकर्त्यांकडून होत आहे.

याबाबत नगर परिषदेचे मुख्याधिकारी सचिन गाडे पाटील यांना विचारणा केली असता तत्काळ दखल घेऊन नगर परिषदेचे अभियंते यांना चौकशी साठी पाठविण्यात येईल अशी माहिती दिली आहे.

 

 

तेजापूर AG लाईनवरील वीज तारांची चोरी; शेतकरी अडचणीत, प्रशासनाकडून दुर्लक्ष

News Today 

तालुका प्रतिनिधी : मंगेश गोरे

कायर (ता. वणी) – तेजापूर AG लाईनवरील उपासे डीपी ते पिंपळकर यांच्या शेतापर्यंत टाकलेली वीज वाहिन्यांची संपूर्ण तार चोरट्यांनी रात्रीच्या अंधारात चोरी केली. ही घटना 7 जून 2025 च्या रात्री घडल्याचे उघड झाले असून, परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

शेतकऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, चोरटे शेतात घुसून खांबांवरील वायर कापून पळून गेले. त्यामुळे संबंधित भागातील शेतीसाठी वापरली जाणारी वीज पूर्णपणे खंडित झाली आहे. मोटारी बंद पडल्याने पिकांना पाणी मिळेनासे झाले असून, शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसण्याची शक्यता आहे.

घटनेनंतर शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला असून, चोरट्यांना तात्काळ पकडून कडक कारवाई करावी, अशी मागणी करण्यात येत आहे. विशेष म्हणजे, तेजापूर AG लाईनचे लाइनमन लेडांगे व त्यांची टीम या प्रकरणाकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप शेतकऱ्यांकडून करण्यात आला आहे. शंका व्यक्त केली जात आहे की, या चोरीमध्ये स्थानिक कर्मचारीच सामील असण्याची शक्यता नाकारता येत नाही.

लाइनमनकडे याबाबत विचारणा केली असता, “ही लाईन गेल्या काही दिवसांपासून बंद आहे, त्यामुळे त्याचा फारसा उपयोग होत नव्हता,” असे उत्तर देत त्यांनी जबाबदारी टाळण्याचा प्रयत्न केला.

संपूर्ण घटनेची चौकशी करून जबाबदार व्यक्तींवर कठोर कारवाई करावी, अशी एकमुखी मागणी संपूर्ण शेतकरी वर्गाकडून होत आहे.

राजकीय घडामोडींना वेग : स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकांची चाहूल लागली

News Today 

वणी, ता. ७ जून – राज्यातील स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकांची चाहूल लागताच राजकीय पक्षांनी जोरदार हालचाली सुरू केल्या असून उमेदवार चाचपणीसही वेग आला आहे. विशेषतः वणी विधानसभेतील जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नगर परिषदेच्या निवडणुकांकडे राजकीय वर्तुळात विशेष लक्ष लागले आहे.

सुप्रीम कोर्टाच्या अलीकडील आदेशानंतर या निवडणुकांची प्रक्रिया मार्गी लागण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे वणी विधानसभेतील ८ जिल्हा परिषद क्षेत्रे, १६ पंचायत समिती गण आणि वणी नगर परिषदेच्या निवडणुका लवकरच होण्याची शक्यता असून प्रशासनानेही तयारी सुरू केली आहे.

या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांनी गट बैठकांचे आयोजन सुरू केले असून, जनतेशी संपर्क साधण्याचे प्रयत्न अधिक तीव्र झाले आहेत. इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती, कार्यकर्त्यांच्या बैठका आणि घराघरांतून जनसंपर्क यामुळे राजकीय वातावरण तापू लागले आहे.

पक्षांतर्गत समस्यानिराकरण, स्थानिक समीकरणे आणि जातीय समतोल या बाबी लक्षात घेऊन उमेदवार निवडीसाठी काटेकोरपणे रणनीती आखली जात आहे. स्थानिक पातळीवर कार्यरत सामाजिक कार्यकर्ते, युवा नेते आणि अनुभवी माजी पदाधिकारी यांना पक्षातर्फे उमेदवारीसाठी विचारात घेतले जात आहे.

आगामी काळात निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर हे वातावरण अधिकच गडद होण्याची चिन्हे आहेत. ग्रामीण भागातील मतदारांच्या अपेक्षा आणि नगर परिषदेच्या विकासविषयक मागण्या हे या निवडणुकांतील निर्णायक मुद्दे ठरणार असल्याचे राजकीय विश्लेषकांचे म्हणणे आहे.

३७ वर्षांनी पुन्हा एकत्र आले माजी वर्गमित्र वणी येथील एस.पी.एम. हायस्कूलमध्ये १० वी ‘अ’ चा स्नेहमेळावा संपन्न

News today 

वणी :- सन् १९८७–८८ मध्ये एस.पी.एम. हायस्कूल, वणी येथून इयत्ता १० वी ‘अ’ वर्गातून शिक्षण घेतलेल्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा दिनांक २५ मे २०२५ रोजी वणी येथे उत्साहात पार पडला. ३७ वर्षांनंतर एकमेकांना भेटण्याचा आनंद या माजी विद्यार्थ्यांनी “स्नेहमेळाव्या”च्या निमित्ताने अनुभवला. या उपक्रमाची संकल्पना किरण तेलतुंबडे यांनी मांडली होती.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी विद्यार्थी मुरलीधर मुळे होते. प्रमुख पाहुणे म्हणून एस.पी.एम. हायस्कूलचे सेवानिवृत्त शिक्षक वाळके सर, गायवळकर सर, उपरे सर आणि पुखरे सर उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रगीताने झाली. त्यानंतर उपस्थित माजी शिक्षक व विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त करत जुन्या आठवणींना उजाळा दिला. या वेळी राजू तायडे, प्रकाश पडोळे, मेघा अमळकर यांनी विशेष भावना व्यक्त केल्या.

कार्यक्रमात मान्यवरांचे सत्कार करण्यात आले. तसेच माजी वर्गमित्रांनी एकत्र येत आनंदाचे क्षण साजरे केले. ‘स्नेहमेळाव्या’त विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या गीत-संगीत सादरीकरण व हास्य विनोदांनी उपस्थितांचे भरभरून मनोरंजन झाले. विविध स्पर्धांमध्ये विजेत्यांना पारितोषिके देण्यात आली.

या सोहळ्याचे उत्कृष्ट सूत्रसंचालन शिवाजी विद्यालय, कोल्हापूर येथील प्रा. डॉ. वर्षा राठोड यांनी केले. प्रमुख पाहुण्यांमध्ये डॉ. अनीता आरखे, डॉ. केशव देशपांडे, डॉ. देवरकर यांचा समावेश होता.

कार्यक्रमात सहभागी झालेल्या प्रमुख माजी विद्यार्थ्यांमध्ये किशोर सोम्याल, शिल्पा लोणारे, विलास बैद्य, छाया मोरे, मंजुषा देशपांडे, अर्पण समशेरपुरे, ज्योती तामगाडगे, नीता बुरांडे, यशवंत देवरकर, अनंता झाडे, रंजन भट, रश्मी सवर्तकर, विजय जयपुरकर, रजनी वाळके, किरण तेलतुंबडे आदींचा समावेश होता.

हा स्नेहमेळावा केवळ आठवणींचा नव्हे, तर पुन्हा एकदा जुने ऋणानुबंध दृढ करण्याचा एक सुंदर योग ठरला.

 

 

 

वणीत आरंभ इंटरनॅशनल प्री-स्कूल चा भव्य आरंभ”

News Today 

वणी :- शहरातील शिक्षण क्षेत्रात एक नवे आणि आधुनिक पाऊल उचलत आकार फाउंडेशन, वणी यांच्या पुढाकाराने उमेद पार्क, गणेशपूर येथे “आरंभ इंटरनॅशनल प्री-स्कूल” चे भव्य उद्घाटन लवकरच होणार आहे. ही शाळा प्ले ग्रुप, नर्सरी, ज्युनिअर केजी आणि सिनिअर केजी अशा सर्व प्राथमिक स्तरांवर शिक्षण पुरवणार आहे.

बालकांसाठी सुसज्ज आणि बालसुलभ वातावरण असलेल्या या शाळेमध्ये शिकत-शिकवत मजा करणे हा मुख्य उद्देश आहे. शिक्षणासोबतच खेळ, कला आणि भाषिक विकासावर भर देणारी ही शाळा वणीतील एकमेव बालस्नेही प्री-स्कूल ठरणार आहे.

शाळेच्या काही खास वैशिष्ट्ये:

  • सुरक्षित व आनंददायी परिसर

  • वयानुसार रचलेला नाविन्यपूर्ण अभ्यासक्रम

  • भाषिक कौशल्ये विकसित करण्यावर भर

  • मातृभाषेला प्राधान्य देणारी शिक्षणपद्धती

  • अनुभवी, सर्जनशील आणि मुलांना समजून घेणारे शिक्षक

  • क्रियाशील आणि अनुभवाधिष्ठित शिक्षणपद्धती

  • संकल्पना स्पष्ट करणाऱ्या शिक्षण प्रणालीचा अवलंब

  • शारीरिक, मानसिक आणि सामाजिक विकासावर लक्ष केंद्रित

या शाळेची आणखी एक उल्लेखनीय बाब म्हणजे लहान वयातच महापुरुषांचा आदर्श निर्माण करणे व वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित करण्यावर भर देणे.

शाळेचा नोंदणी क्रमांक 271414039001 असून, व्यवस्थापन मंडळामध्ये सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील प्रतिष्ठित व्यक्तींचा समावेश असल्यामुळे वणी परिसरात या शाळेबद्दल विशेष उत्सुकता निर्माण झाली आहे.

प्रवेशासाठी संपर्क:
📞 9960285027
📞 7972061442
📞 9595249003

आकार फाउंडेशन, वणी यांच्यावतीने सर्व पालकांना या सुवर्णसंधीचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

शासकीय आयटीआय यवतमाळच्या विद्यार्थ्यांना ऑन-जॉब ट्रेनिंगची संधी


  तुमसरे इलेक्ट्रिकल व संकल्प फाउंडेशनचा उपक्रम

News Today 

यवतमाळ – शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आय.टी.आय.) यवतमाळ येथील विजतंत्री (इलेक्ट्रिशियन) शाखेतील प्रथम वर्षातील ३५ विद्यार्थ्यांना ऑन-जॉब ट्रेनिंग अंतर्गत प्रत्यक्ष कार्यानुभव मिळणार आहे. “तुमसरे इलेक्ट्रिकल, वडगाव रोड” यांनी या विद्यार्थ्यांसाठी १५० तासांचे प्रशिक्षण उपलब्ध करून दिले आहे. हे प्रशिक्षण दिनांक ०२ जून २०२५ पासून २४ जून २०२५ पर्यंत चालणार आहे.

विद्यार्थ्यांना स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी आवश्यक असलेल्या कौशल्यांचा विकास व्हावा, यासाठी सामाजिक क्षेत्रात कार्यरत संकल्प फाउंडेशनचे शहर प्रसिद्धी प्रमुख श्री. सागर महादेवराव तुमसरे यांनी पुढाकार घेतला असून, प्रशिक्षण व्यवस्थित पार पडावे यासाठी ते विशेष प्रयत्नशील आहेत.

या उपक्रमाचे नेतृत्व आय.टी.आय.चे प्राचार्य  व्ही. जे. नागोरे व शिल्पनिदेशक जी. पी. ठोबंरे यांच्या मार्गदर्शनाखाली होत आहे. प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना अधिकृत प्रमाणपत्रही प्रदान करण्यात येणार आहे.

या प्रशिक्षण कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी सागर महादेवराव तुमसरे यांनी सांगितले की, “तुमसरे इलेक्ट्रिकलच्या पुढाकारामुळेच हे प्रशिक्षण शक्य झाले असून, विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी अशा संधी सतत उपलब्ध करून देण्याचा आमचा प्रयत्न राहील.”

कार्यक्रमास या वेळी विशाल अतकरी, पंडीत बाबळे, दर्शन शेंडे, रुशिकेश येवले आदी उपस्थित होते. प्रशिक्षणास सहभागी एकूण ३५ विद्यार्थी उपस्थित होते.