Thursday, July 30, 2026
Google search engine
Home Blog Page 22

वणीतील दामले नगरमध्ये सार्वजनिक शौचालयाची दयनीय अवस्था – आरोग्यावर गंभीर परिणाम

0

News Today 

वणी (प्रतिनिधी) – वणी शहरातील दामले नगर भागात असलेल्या सार्वजनिक शौचालयाची अवस्था अत्यंत दयनीय झाली असून, नागरिकांच्या आरोग्याला मोठा धोका निर्माण झाला आहे. दलित वस्तीत असलेल्या या शौचालयाचा वापर परिसरातील गोरगरीब नागरिक करतात, मात्र सध्या याठिकाणी स्वच्छतेचा पूर्ण अभाव असून, संपूर्ण मानवी मलमूत्र उघड्यावर येत आहे. या दुर्गंधीमुळे परिसरातील जनजीवन त्रस्त झाले आहे. याकडे नगर परिषदेने तातडीने लक्ष देण्याची जोरदार मागणी होत आहे.

शौचालयाच्या गटार व्यवस्थेचा पूर्णत: अपकार झालेला असून, सांडपाणी थेट शहरातील पाणीपुरवठा करणाऱ्या जलसाठ्यात मिसळत आहे. त्यामुळे संपूर्ण वणी शहरातील नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या दूषित पाण्याचा वापर केल्यास पाणीजन्य आजारांचा फैलाव होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

दामले नगर परिसरातील रहिवाशांनी वारंवार तक्रारी करूनही नगर परिषद दुर्लक्ष करीत आहे. या भागातील रहिवासी हे आर्थिकदृष्ट्या दुर्बल आहेत आणि मुख्यत्वे कामगार, महिला, लहान मुले यांचा येथे वावर असतो. अशा अवस्थेत त्यांच्या मूलभूत स्वच्छता सुविधांकडे दुर्लक्ष होणे ही गंभीर बाब आहे.

नागरिकांची मागणी:

१.त्वरित शौचालयाची दुरुस्ती करावी.

२. सांडपाणी आणि मलनिःसारण यंत्रणा योग्य रितीने कार्यान्वित करावी

३. स्वच्छता अभियान अंतर्गत नियमित स्वच्छता आणि देखभाल होणे आवश्यक.

४. आरोग्य विभागाने परिसरात तपासणी करून उपाययोजना कराव्यात.

दामले नगरमधील ही परिस्थिती केवळ स्थानिक समस्या राहिलेली नसून, संपूर्ण वणी शहरासाठी ती आरोग्याच्या दृष्टिकोनातून गंभीर बाब बनली आहे. प्रशासनाने या समस्येकडे गांभीर्याने लक्ष देऊन तात्काळ उपाययोजना करणे आवश्यक आहे. अन्यथा जनआंदोलन उभारण्याचा इशारा येथील नागरिकांनी दिला आहे.

 

वणी कृषी बाजार समितीच्या शेड बांधकाम निविदेतील अपारदर्शकतेवर जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत चौकशीचे आदेश

0

News Today दि. २७ जून:
वणी कृषी उत्पन्न बाजार समितीने शेड बांधकामासाठी काढलेल्या निविदा प्रक्रियेत झालेल्या अनियमितता आणि अपारदर्शकतेवर आता जिल्हा नियोजन समितीच्या पातळीवरून कारवाईची प्रक्रिया सुरू झाली आहे. वणी विधानसभेचे आमदार संजय देरकर यांनी काल (२६ जून) पार पडलेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत सदर प्रकरणावर ठोसपणे आवाज उठवत सभागृहाचे लक्ष वेधले.

💬 आमदार संजय देरकर यांनी मांडलेले मुद्दे
आमदार देरकर यांनी सादर केलेल्या माहितीप्रमाणे, सदर निविदा १४ जून २०२५ रोजी (शनिवार – सुट्टीचा दिवस) प्रकाशित करण्यात आली. त्यानंतर ऑनलाईन आणि ऑफलाईन निविदा प्रक्रियेसंदर्भात भिन्न तारीखा नमूद करण्यात आल्या. विशेष म्हणजे, केवळ दोन दिवसांचा कालावधी (शनिवार‑रविवार) दिला गेला, जो नियमानुसार अपुरा व अन्यायकारक आहे.

“या निविदा प्रक्रियेचा संपूर्ण उद्देशच मर्जीतील ठेकेदाराला लाभ देण्याचा होता,” असा आरोप त्यांनी केला.

👥 उपस्थित मान्यवरांची प्रतिक्रिया
या बैठकीत जिल्हा नियोजन समितीचे अध्यक्ष व जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड, खासदार प्रतिभा धानोरकर (चंद्रपूर), खासदार संजय देशमुख (यवतमाळ-वाशिम), जिल्हाधिकारी विकास मीना, सर्व आमदार, तसेच विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

🏛️ चौकशीचे आदेश
सदर आरोपांवर तत्काळ दखल घेत पालकमंत्री संजय राठोड यांनी जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था यवतमाळ यांना चौकशीचे आदेश दिले असून संबंधित अधिकाऱ्यांवर योग्य ती कारवाई करून जिल्हाधिकाऱ्यांकडे अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले.

निविदा प्रक्रिया कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सचिवामार्फत राबवण्यात आली असल्याने सचिव चौकशीच्या घेऱ्यात येण्याची शक्यता प्रबळ झाली आहे.

🔍 स्थानिकांची प्रतिक्रिया
स्थानिक व्यापारी, ठेकेदार व शेतकरी वर्गामध्ये संतापाची लाट असून, “सार्वजनिक निधीचा गैरवापर करून केवळ काही खास कंत्राटदारांना लाभ मिळवून देण्यासाठीच हा डाव आखण्यात आला,” असा आरोप मोठ्या प्रमाणावर केला जात आहे.

📌 निष्कर्ष
सदर प्रकरण हे स्थानिक प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्न उपस्थित करणारे असून आता राजकीय प्रतिनिधी आणि प्रशासकीय यंत्रणा यांचे लक्ष वेधले गेले आहे. योग्य ती चौकशी होऊन संबंधित दोषींवर कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.

मे. जे. पी. इंटरप्रायजेस, मुंबई या कंत्राटदारास सार्वजनिक बांधकाम विभागाकडून काळ्या यादीत

0

News Today

नागपूर, दि. २७ जून २०२५:
नागपूर:- सार्वजनिक बांधकाम विभागाने मे. जे. पी. इंटरप्रायजेस, मुंबई या कंत्राटदार कंपनीविरुद्ध महत्त्वपूर्ण कारवाई करत, संबंधित कंत्राटदारास एक वर्षासाठी काळ्या यादीत टाकण्याचा निर्णय घेतला आहे. ही कारवाई विभागाने १८ जून २०२५ रोजी निर्गमित केलेल्या शासन निर्णयाच्या आधारावर करण्यात आली आहे.

या संदर्भात मुख्य अभियंता, सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक विभाग, नागपूर यांनी सादर केलेल्या प्रस्तावास मान्यता देत शासनाने हा निर्णय जाहीर केला आहे. कंत्राटदाराच्या कामकाजामध्ये आढळलेल्या अनियमितता, कार्यात होणारा विलंब अथवा इतर कारणास्तव ही नामुष्कीची कार्यवाही करण्यात आली आहे, असे समजते.

शासन निर्णयानुसार, कंत्राटदार मे. जे. पी. इंटरप्रायजेस, मुंबई यांना शासन पत्र निर्गमित केलेल्या दिनांकापासून पुढील एक वर्षासाठी काळ्या यादीत ठेवण्यात येणार आहे. काळ्या यादीतील असलेल्या कालावधीत या कंत्राटदारास सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत कोणतेही नवीन कंत्राट देण्यात येणार नाही.

याबाबतचा परिपत्रक क्रमांक २७ दिनांक २० जून २०२५ रोजी नागपूर येथून निर्गमित करण्यात आला असून, तो मुख्य अभियंता, प्रादेशिक विभाग ५, नागपूर यांच्या स्वाक्षरीने प्रसारित करण्यात आला आहे. सर्व संबंधित प्रादेशिक विभाग, अधीक्षक अभियंता व कार्यकारी अभियंत्यांना या निर्णयाची माहिती देण्यात आली असून, त्यांनी आपल्या कार्यक्षेत्रात आवश्यक ती कार्यवाही करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

शासनाच्या या निर्णयामुळे सार्वजनिक बांधकाम क्षेत्रात पारदर्शकता व उत्तरदायित्व वाढण्यास मदत होणार आहे, असे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. ही कारवाई इतर कंत्राटदारांसाठी देखील एक इशारा ठरणार असून, शासनाकडून अशा प्रकारच्या चुकीच्या कामकाजास सहनशीलता दाखवली जाणार नाही, हे स्पष्ट झाले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या संघटनात्मक मजबुतीसाठी वणी येथे रविवारी २९ जूनला उच्चस्तरीय बैठक

0

News Today 

वणी (प्रतिनिधी): राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार गट)च्या जिल्हाध्यक्षा वर्षाताई निकम यांच्या अध्यक्षतेखाली व प्रदेश उपाध्यक्ष तथा जिल्हा निरीक्षक अफजल फारुकी यांच्या प्रमुख उपस्थितीत वणी, मारेगाव आणि झरी-जामनी तालुक्यांची संयुक्त आढावा बैठक घेण्यात येणार आहे. ही बैठक रवीवार, दिनांक २९ जून २०२५ रोजी दुपारी ३ वाजता वणी येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित करण्यात आली आहे.

या बैठकीस जिल्हा युवा शाखेचे जिल्हाध्यक्ष अध्यक्ष राहुल कानारकर, जिल्हाकार्याध्यक्ष संकेत टोने, महिला प्रतिनिधी नलिनी ठाकरे, प्रदेश संघटन सचिव रज्जाक पठाण, कामगार सेलचे प्रदेश उपाध्यक्ष आबीद हुसेन, सामाजिक न्याय विभागाचे प्रदेश संघटन सचिव विजय नगराळे यांच्यासह तालुक्यांतील विविध पदाधिकारी, कार्यकर्ते आणि हितचिंतक मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत.

बैठकीदरम्यान संघटनात्मक घडामोडी, स्थानिक प्रश्न, आगामी निवडणुका, पक्षवाढीची दिशा आणि युवकांचे सक्षमीकरण यावर सविस्तर चर्चा होणार आहे. ही बैठक पक्ष संघटनेच्या बळकटीसाठी अत्यंत महत्त्वाची असून कार्यकर्त्यांच्या सक्रिय सहभागातून पुढील दिशा निश्चित केली जाणार आहे.

या पार्श्वभूमीवर, सर्व तालुकाध्यक्ष, शहराध्यक्ष, विभाग प्रमुख, सर्कल प्रमुख, शाखा प्रमुख तसेच सेलचे महिला व पुरुष तालुकाध्यक्ष व शहराध्यक्ष यांनी आपल्या कार्यकारिणीसह उपस्थित राहावे, असे आवाहन वणी विधानसभा अध्यक्ष दिलीप भोयर यांनी केले आहे. या बैठकीला यशस्वी करण्यासाठी विधानसभेचे माजी अध्यक्ष सूर्यकांत खाडे, वणी तालुकाध्यक्ष प्रवीण खारकर, मारेगाव तालुकाध्यक्ष भारत मत्ते, झरि जामनी तालुकाध्यक्ष प्रमोद थेरे, वणी शहराध्यक्ष विनोद ठेंगणे, रामदासजी पखाले आदी परिश्रम घेत आहे.

मोठी दुर्घटना;- हिवरधरा येथील ‘D-Lite केमिकल प्रा. ली.’ कंपनीचे छत कोसळले; आणि आठ मजूर…

0

News Today (प्रतिनिधी)

वणी :- तालुक्यातील हिवरधारा येथे असलेल्या D-Lite केमिकल प्रायव्हेट लिमिटेड या चुना प्रक्रिया करणाऱ्या कंपनीत काल (२४ जून) रात्री ९ वाजण्याच्या सुमारास छत कोसळून झालेल्या भीषण दुर्घटनेत एका महिला कामगाराचा जागीच मृत्यू झाला असून आठ जण जखमी झाले आहेत. यातील एक महिला गंभीर जखमी आहे. कंपनी ‘सूर्या सेम’ नावाचे चुना उत्पादन तयार करते.

मृत महिलेचे नाव कु. गंगा सुगवीर कंवर (वय २०, रा. पेरीटोला, ता. राजनांदगाव, छत्तीसगड) असे असून, गंभीर जखमी महिलेचे नाव मीना आत्राम (वय ४५, रा. मोहदा, ता. वणी) आहे. उर्वरित जखमींमध्ये तीन महिला व तीन पुरुषांचा समावेश आहे. सर्व जखमींवर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

विशेष म्हणजे, मागील चार वर्षांत ही दुसऱ्यांदा अशा प्रकारची छत कोसळण्याची घटना आहे. या घटनेने कामगार सुरक्षेच्या बाबतीत कंपनीच्या गंभीर दुर्लक्षित धोरणांचा पर्दाफाश केला आहे. अद्याप कोणत्याही जबाबदार अधिकाऱ्याविरुद्ध कारवाई करण्यात आलेली नाही, हे विशेष.

कामगारांच्या सुरक्षेसाठी कोणतीही ठोस उपाययोजना न करता, फक्त तुटपुंजी मदत देऊन मृतांच्या कुटुंबीयांचे तोंड बंद करण्याचा प्रयत्न कंपनीकडून केला जात आहे, अशी स्थानिकांची संतप्त प्रतिक्रिया आहे. कामगार संघटनांनी या घटनेचा तीव्र निषेध करत दोषींवर फौजदारी कारवाईची मागणी केली आहे., कामगारांच्या सुरक्षेसाठी ठोस व दीर्घकालीन उपाययोजना राबविणे आता अत्यावश्यक बनले आहे.

fjhgjkjggkjg

0

fjhgjkjggkjgfjhgjkjggkjgfjhgjkjggkjgfjhgjkjggkjgfjhgjkjggkjgfjhgjkjggkjgfjhgjkjggkjgfjhgjkjggkjgfjhgjkjggkjgfjhgjkjggkjgfjhgjkjggkjgfjhgjkjggkjgfjhgjkjggkjgfjhgjkjggkjgfjhgjkjggkjgfjhgjkjggkjgfjhgjkjggkjgfjhgjkjggkjgfjhgjkjggkjgfjhgjkjggkjgfjhgjkjggkjgfjhgjkjggkjgfjhgjkjggkjgfjhgjkjggkjgfjhgjkjggkjgfjhgjkjggkjgfjhgjkjggkjgfjhgjkjggkjgfjhgjkjggkjgfjhgjkjggkjgfjhgjkjggkjgfjhgjkjggkjgfjhgjkjggkjgfjhgjkjggkjgfjhgjkjggkjgfjhgjkjggkjgfjhgjkjggkjgfjhgjkjggkjgfjhgjkjggkjgfjhgjkjggkjgfjhgjkjggkjgfjhgjkjggkjgfjhgjkjggkjgfjhgjkjggkjgfjhgjkjggkjgfjhgjkjggkjgfjhgjkjggkjg

वरूणराजाच्या कृपेसाठी सामूहिक प्रार्थना – विजय बाबू चोरडिया यांच्याकडून वणीतील गरीबांना प्रसाद वाटप

0

 

पेरणीनंतर पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट; समाजसेवक विजयबाबू चोरडिया यांचा वणीत आध्यात्मिक आणि सामाजिक उपक्रम

News Today 

वणी | २२ जून २०२५
राज्यात अनेक भागांमध्ये पेरणीनंतर पाऊस गायब झाल्याने शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढावले आहे. या पार्श्वभूमीवर, वरूणराजाला प्रसन्न करण्यासाठी आणि गरीब, गरजू नागरिकांना मदत करण्याच्या उद्देशाने, विजय बाबू चोरडिया यांनी कमान चौक, वणी येथे प्रसाद वाटपाचा उपक्रम राबवला.हा कार्यक्रम २२ जून रोजी सकाळी ११ वाजता पार पडला.

विजय चोरडिया हे सामाजिक कार्यात नेहमीच पुढे असून, त्यांनी वणीतील शेकडो गरजू नागरिकांमध्ये प्रसादाचे वाटप केले. या उपक्रमाच्या माध्यमातून उपस्थितांनी पावसासाठी सामूहिक प्रार्थनाही केली.
शेतकऱ्यांचे हाल लक्षात घेता, या प्रकारच्या आध्यात्मिक व सामाजिक उपक्रमांची गरज अधिकच जाणवते, असे मत अनेकांनी व्यक्त केले.

विजय बाबू चोरडिया म्हणाले, “राज्यातील शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत आहे. आमचा हा प्रयत्न देवाच्या चरणी साकडे घालण्यासाठी आहे, जेणेकरून वेळेवर पाऊस पडेल आणि शेतकऱ्यांचे संकट दूर होईल. या उपक्रमाने विजय बाबू चोरडिया यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. 

वणी नगरपरिषदेकडून बेकायदेशीर झाडतोड; पर्यावरणप्रेमींचा तीव्र निषेध, रस्ता बांधकाला कोणाचाही विरोध नाही

0

उपविभागीय अधिकारी यांचेकडे कारवाईसाठी निवेदन 

News Today 

वणी, ता. २३ जून – वणी शहरातील नांदेपेरा मार्गावरील रस्ते रुंदीकरणाच्या कामाच्या पार्श्वभूमीवर वणी नगरपरिषदेकडून झाडांची बेकायदेशीर तोड करण्यात आल्याचा गंभीर आरोप पर्यावरणप्रेमींनी केला आहे. महाराष्ट्र (शहरी भागांतील) झाडांचे संरक्षण अधिनियम, 1975 अंतर्गत आवश्यक असलेल्या प्रक्रिया न पाळता ही झाडतोड करण्यात आल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

या प्रकरणी उपविभागीय अधिकारी , वणी यांच्याकडे तात्काळ चौकशी व कारवाईची मागणी करणारे निवेदन देण्यात आले आहे. निवेदनात नमूद केल्याप्रमाणे, झाडतोडीपूर्वी ‘झाड संरक्षण समिती’कडून कोणतीही परवानगी घेण्यात आलेली नाही, तसेच परिसरात कोणतीही सार्वजनिक सूचना न प्रसिद्ध करता ही कृती गुपचूप करण्यात आली आहे.

याशिवाय, नागरिकांच्या हरकती व सूचनांसाठी कोणताही खुला कालावधी न देता, पर्यायी वृक्षलागवडीचा आराखडा न सादर करता केलेली झाडतोड ही कायद्याचे उल्लंघन असून पर्यावरणीय समतोल धोक्यात आणणारी आहे, असे पर्यावरण कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे.

या पार्श्वभूमीवर, भविष्यात अशा बेकायदेशीर कारवायांना आळा बसावा यासाठी सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांना स्पष्ट मार्गदर्शक सूचना देण्यात याव्यात व निर्णय प्रक्रियेत नागरिकांचा सक्रिय सहभाग सुनिश्चित करण्यात यावा, अशीही मागणी करण्यात आली आहे.

रस्त्या बांधकामाला कोणाचाही विरोध नाही
वणी नांदेपेरा या मार्ग नव्याने बांधल्या जात आहे. या रस्ता बांधकामाला कोणत्याही नागरिकांचा विरोध नाही. वृक्ष तोड न करता राज्यातील अनेक शहरामध्ये रस्ता बांधकाम केले आहे. तसेच जे वृक्ष आज हिरवीगार छाया देत आहे. ते वृक्ष शहरातील वृक्ष संवर्धन समितीने मोठ्या परिश्रमाने लागवड करून त्याचे संगोपन केले आहे. आज या वृक्षाची स्थिती जे आहे त्यासाठी मागील १५ ते २० वर्षाचे कष्ट आहे. ते वृक्ष असे विकासाच्या नावाखाली तोड करीत असेल आणि पर्यावरणाचा ऱ्हास करीत असेल तर हे खपवून घेतल्या जाणार नाही. काही लोक रस्त्याला विरोध म्हणून अफवा पसरवत आहे अश्या संधिसाधू लोकांपासून नागरिकांनी सावधान रहावे असे आवाहन सागर मुने यांनी केले.

कामगारांसोबत थेट संवाद साधत आमदार संजय देरकर यांनी दिला स्वावलंबनाचा मंत्र

0

दिनांक: २३ जून २०२५ | News Today 

 वणी :- विधानसभा क्षेत्रातील जनतेशी थेट संवाद साधण्याच्या आपल्या खास शैलीमुळे ओळखले जाणारे वणीचे आमदार संजय निलकंठराव देरकर यांनी आज (२३ जून) रोजी सकाळी १० वाजताच्या सुमारास तुटी कमान चौक परिसरात मिळेल तेवढं काम करून उदरनिर्वाह करणाऱ्या मिस्त्री, हमाल, फेरीवाले, लहानसहान हातगाडीधारक व कामगार बांधवांशी संवाद साधला.

हातातल्या कामामधून वेळ काढत आमदारांनी कामगारांशी संवाद साधला. त्यांच्या अडचणी ऐकून घेतल्या व त्यावर त्वरित उपाय देण्याचा प्रयत्न केला. खास बाब म्हणजे, त्यांनी कामगार बांधवांना स्वतःचे युनिट किंवा छोटं व्यवसायिक गट स्थापन करण्याचा सल्ला दिला. शासनाच्या विविध योजना – जसे की मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजना, प्रधानमंत्री मुद्रा योजना, व कौशल्य विकास कार्यक्रम – यांचा लाभ घेण्यासाठी नोंदणीकृत युनिट असणं आवश्यक असल्याचे त्यांनी समजावले.

“फक्त मजुरीवर जगणं ही वेळची गरज असू शकते, पण स्वतःचा व्यवसाय सुरू केल्यास भविष्यात आर्थिक स्थैर्य आणि आत्मसन्मान मिळेल. त्यासाठी मी स्वतः मार्गदर्शन करायला तयार आहे,” असा ठाम विश्वास आमदारांनी व्यक्त केला.

या संवादामुळे अनेक कामगारांना आपला व्यवसाय सुरू करण्याची प्रेरणा मिळाली. काहींनी लगेचच नोंदणी प्रक्रियेबाबत विचारणा केली.

स्थानिक नागरिकांनी आमदारांच्या या भूमिकेचं स्वागत केलं असून, “फक्त घोषणा नव्हे, तर जमिनीवर उतरून संवाद साधणारा आमदार मिळणं ही मोठी बाब आहे,” असं मत काही नागरिकांनी व्यक्त केलं.

प्रमुख मुद्दे:

कामगारांना युनिट स्थापन करण्याचा सल्ला

शासन योजनांची माहिती आणि त्या मिळवण्याचे मार्गदर्शन

स्थानिक स्वावलंबनाच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल

प्रत्यक्ष मैदानात उतरून कामगारांशी थेट संवाद

कामगारांसोबत थेट संवाद साधल्याने कामगारांना एक नवीन ऊर्जा मिळाली असून कामगारांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले. 

 

थाटात पार पडला ‘आरंभ इंटरनॅशनल प्रीस्कूल’चा उद्घाटन सोहळा!

0

News Today 

वणी, १८ जून २०२५ – शहरातील बालशिक्षणाच्या क्षेत्रात एक नवीन पर्व सुरू करत ‘आरंभ इंटरनॅशनल प्रीस्कूल’चा भव्य व दिमाखदार उद्घाटन सोहळा १८ जून रोजी मोठ्या उत्साहात पार पडला. अत्याधुनिक सोयी-सुविधांनी सज्ज असलेल्या या प्रीस्कूलचे उद्घाटन माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. गणेश किंद्रे यांच्या हस्ते संपन्न झाले.

कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी वणी नगर परिषदेचे मुख्याधिकारी डॉ. सचिन गाडे होते. त्यांनी आपल्या प्रेरणादायी भाषणातून बालशिक्षणातील शिस्त, संस्कार आणि शैक्षणिक संस्थांचे समाजातील योगदान यावर प्रकाश टाकला.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष श्री. अंबादास वागदरकर होते. त्यांच्यासह मा. अशोक गौरकार व मा. अरुण डवरे यांनीही कार्यक्रमाला विशेष उपस्थिती लावली. ‘आरंभ’च्या संकल्पनेचे कौतुक करत त्यांनी संस्थेच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. बालवयात दिले जाणारे मूल्य व संस्कार हेच आयुष्याचा पाया ठरतात, आणि ‘आरंभ’ ही शाळा हे कार्य प्रभावीपणे पार पाडेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

कार्यक्रमाला छत्रपती शिवाजी महाराज मॉर्निंग ग्रुपचे अध्यक्ष श्री. सुभाष बिलोरीया, श्री. अनुज मुकेवार, प्रख्यात विधिज्ञ अॅड. अमोल कळसकर, तसेच महिला योगा ग्रुपच्या योगगुरू सौ. भारती आवारी व सौ. सविता डोर्लीकर यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभली. त्यांनी शाळेच्या व्यवस्थापनाचे कौतुक करत, अशा सुरक्षित व मूल्याधारित शिक्षणसंस्थांची आजच्या काळात गरज असल्याचे सांगितले.

शाळेच्या परिसराचे आकर्षक व बालसुलभ प्रात्यक्षिकही पालकांसाठी खुले करण्यात आले होते. सुरक्षित वातावरण, अत्याधुनिक तंत्रज्ञान, प्रेमळ व प्रशिक्षित शिक्षकवर्ग, तसेच मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध दर्जेदार उपक्रम ही ‘आरंभ’ची वैशिष्ट्ये ठरली.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेचे सचिव श्री. मंगेश खामनकर यांनी केले. प्रभावी सूत्रसंचालन शिक्षिका सौ. सोनाली मोरे यांनी तर आभार प्रदर्शन सौ. पायल पुलेनवार यांनी केले. उपस्थित पालक व नागरिकांनी या उपक्रमाचे कौतुक करत, ‘आरंभ’ ही शाळा लवकरच शहरातील शिक्षण क्षेत्रात एक आदर्श ठरेल, असा विश्वास व्यक्त केला.

“छोट्या पावलांनी मोठा आरंभ!” या विचाराने प्रेरित होऊन सुरु झालेला ‘आरंभ इंटरनॅशनल प्रीस्कूल’चा प्रवास निश्चितच यशस्वी व तेजस्वी ठरेल, अशी भावना कार्यक्रमाच्या समारोपाला सर्व मान्यवरांनी व्यक्त केली. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी सौ. वैशाली घोंगे व सर्व संचालक मंडळाने विशेष परिश्रम घेतले.