Friday, April 24, 2026
Google search engine
HomeUncategorizedवणी विधानसभेतून विधान परिषदेसाठी नवे समीकरण? अभ्यासू चेहऱ्याची चर्चा रंगली

वणी विधानसभेतून विधान परिषदेसाठी नवे समीकरण? अभ्यासू चेहऱ्याची चर्चा रंगली

दिलीप भोयर

News Today 

वणी प्रतिनिधी — महाराष्ट्र राज्यातील विधान परिषदेच्या पाच जागांसाठी लवकरच निवडणुका होण्याची शक्यता व्यक्त होत असताना, वणी विधानसभा मतदारसंघात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. भारतीय जनता पक्षाच्या गोटात वणीतील एका अभ्यासू आणि संघटनक्षम चेहऱ्याला संधी देण्याबाबत जोरदार चर्चा सुरू असल्याचे विश्वसनीय सूत्रांकडून समजते.

या पार्श्वभूमीवर माजी जिल्हा परिषद सदस्य विजय पिदुरकर यांचे नाव विशेषतः पुढे येत आहे. पिदुरकर यांनी तब्बल दहा वर्षे प्रभावी नेतृत्व करत स्थानिक पातळीवर आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. ओबीसी समाजातील अभ्यासू व सक्रिय नेते म्हणून त्यांची प्रतिमा असून, त्यामुळेच पक्षाच्या अंतर्गत चर्चांमध्ये त्यांना प्राधान्य दिले जात असल्याचे बोलले जात आहे.

राज्यातील वरिष्ठ नेत्यांशी असलेले ज्यांचे जवळचे संबंधही त्यांच्या दावेदारीला बळ देणारे ठरत आहेत. विशेषतः केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, तसेच राज्यातील वरिष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार आणि हंसराज अहिर यांच्याशी असलेले त्यांचे निकट संबंध लक्षात घेता, पक्षाकडून त्यांना संधी देण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

दरम्यान, वणी विधानसभा क्षेत्रातून यावेळी विधान परिषदेसाठी प्रतिनिधित्व न मिळाल्यास स्थानिक पातळीवर नाराजी वाढण्याची चिन्हे दिसत आहेत. याचा आगामी निवडणुकांवर परिणाम होऊ शकतो, अशीही चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. त्यामुळे भाजप नेतृत्व कोणता निर्णय घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

एकंदरीत, वणीतील राजकारण सध्या निर्णायक टप्प्यावर असून, विधान परिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नवे समीकरण आकार घेताना दिसत आहे. पुढील काही दिवसांत याबाबतची चित्र स्पष्ट होण्याची शक्यता आहे.

त्याच बरोबर आपल्या वणी शहराच्या नगराध्यक्षपदावर असताना वणी शहराचा संपूर्ण काया पालट करणारे माजी नगराध्यक्ष युवा नेतृत्व तारेंद्र बोर्डे, संघाचे जिगरी पदाधिकारी रवी बेलुरकर, तसेच सर्वांसोबत सन्मानाने व संयमाने वागणारे दिनकर पावडे यांचे देखील नाव चर्चेत आहे. 

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Today News

Most Popular

Visitor Counter