Thursday, December 12, 2024
Google search engine
Home Blog Page 2

आ. संजय देरकर यांचा जिल्हा कंत्राटदार संघटने कडून सत्कार

0

News Today
वणी :- येथील नवनिर्वाचित लोकप्रिय आमदार संजय देरकर यांचा यवतमाळ जिल्हा कंत्राटदार संघटनेच्या वतीने आज ता. २९ रोजी सकाळी १० वाजता आ. देरकर यांचे निवासस्थानी सत्कार करण्यात आला.


यावेळी जिल्हा कंत्राटदार संघटनेचे अध्यक्ष प्रवीण उंबरकर, रमेश सुंकुरवार, देवेंद्र सातपुते, अंजू राजूरकर, संजय लोणारे, गजानन नघते, निखिल काळे, राजू रच्चेवार आदी उपस्थित होते.

सोमवार पासून सहा जिनिंगवर होणार सीसीआयची कापूस खरेदी, आ. देरकरांच्या आदेशाचे पालन

0

जिनिंग मध्येच होणार ऑनलाईन नोंदणी, युद्ध पातळीवर खरेदीच्या हालचालीना वेग

Nees Today 

दिलीप भोयर

वणी :- येथील शासकीय कापूस खरेदी येत्या सोमवार पासून तब्बल सहा जीनिंगवर सुरू होणार आहे. व त्याच ठिकाणी शेतकऱ्यांची ऑनलाईन अत्यावाध प्रणालीची पूर्तता करण्यात येणार आहे. यासाठी सीसीआय व कृषी उत्पन्न बाजार समितीकडून युद्ध पातळीवर काम चालू असल्याची माहिती कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव झाडे व सीसीआयचे केंद्र प्रमुख हेमंत कुमार ठाकरे यांनी दिली आहे. आमदार संजय देरकर यांच्या दणक्या नंतर यंत्रणा कामी लागली आहे.

काल तारीख २७ रोजी वणी विधानसभेचे आमदार संजय देरकर यांनी कृषी उत्पन्न बाजार समिती व सीसीआयच्या अधिकाऱ्याना सोबत घेवून बैठक घेतली. यात कापूस खरेदीबाबत अत्यावध प्रणालीसाठी लागणारे टोकण बंद करून सरळ कापूस खरेदी करून तिथेच त्यांची अत्यावध नोंदणी करण्यासाठी ठरले होते. असे अधिकाऱ्यांनी देखील मान्य केले.

वणी येथे केवळ ३ जीनिंग मध्ये सीसीआयची कापूस खरेदी सुरू होती. तर केवळ २ संगणकावर कृ.ऊ. बा.स. मध्ये अत्यावध ( ऑनलाईन ) नोंदणी सुरू होती. त्यासाठी अगोदर शेतकऱ्यांना ऑनलाईन नोंदणीकरिता टोकण देण्यात येत होते. टोकण घेवूनही शेतकऱ्यांची अत्यावध ( ऑनलाईन ) नोंदणी प्रलंबित पडत होती. शेतकऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत होता.

हा त्रास कमी करण्यासाठी आमदार संजय देरकर यांनी टोकण पद्धत बंद करण्याचे सुचवले व सीसीआय सोबत करारनामा झालेल्या सर्व जिंनिंगमध्ये कापूस खरेदी करण्यासाठी यंत्रणा सज्ज करण्यासाठी आदेशित केले होते. यावरून आज तारीख २८ रोजी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतकर्यांचा ऑनलाईन नोंदणीसाठी अतिरिक्त दोन सेंटर सुरू करण्यात आले आहे. असे चार सेंटरवर नोंदणी सुरू झाली आहे.

सीसीआय कडून वणी येथील एस.बी., महाविरा, साईकृपा, राजा, गुलाब, नगरवाला अश्या ६ जिनिंग धारकांकडून कापूस खरेदीसाठी करारनामा करण्यात आला आहे. परंतु केवळ आळीपाळीने ३ जीनिंगमध्ये खरेदी सुरू होती. ती आता सोमवार पासून ६ ही केंद्रावर खरेदी सुरू करणार आहे. दररोज ४०० ते ५०० वाहने कापूस खरेदी केल्या जाणार आहे. त्यासाठी युद्ध पातळीवर सीसीआय व कृ.ऊ.बा.स. कडून व्यवस्था करणे सुरू आहे.

ऑनलाईन नोंदणीसाठी लागणारे टोकण पद्धत आज पासून बंद करण्यात आली आहे. परंतु ऑनलाईन पद्धत करणे अनिवार्य आहे. आज रोजी १२९ वाहने सीसीआयने खरेदी केल्या असून ५ वाहने यार्डात थांबली होती. ती देखील घेण्यात येईल अशी माहिती सीसीआय व कृ.ऊ.बा.स. चे सचिव अ. का. झाडे यांनी दिली आहे.

ऑनलाईन नोंदणी करणे अनिवार्य आहे.

सीसीआयकडून कापूस खरेदीसाठी ऑनलाईन नोंदणीसाठी कृषी उत्पन्न बाजार समितीकडून टोकण देण्यात येत होते. आणि दररोज केवळ ५० वाहने कापूस खरेदी केल्या जात होते. ते टोकण बंद करून सरळ खरेदी सुरू असलेल्या केंद्रावर ऑनलाईन करून कापूस भरलेली वाहने काटा करून पावती देण्यात येणार आहे. कापसाचा चुकारा जमा करण्यासाठी ऑनलाईन नोंदणी करणे अनिवार्य आहे. त्यासाठी आधारकार्ड, लिंक असलेले बँक खाते पुस्तक, ७/१२ व २०२४ -२५ चे पेरावे पत्रक असणे गरजेचे आहे. त्याच बरोबर ज्यांच्या नावाने ७/१२ आहे ते किंव्हा त्यांच्या रक्त मासातील व्यक्ती उपस्थित असणे अनिवार्य आहे.

शेतकऱ्यांना आवाहन

शेतकऱ्यांमध्ये संभ्रम पसरविण्यात येत आहे की, ऑनलाईन पद्धत बंद केली आहे. तसे नसून ऑनलाईन पद्धतीसाठी लागणारे टोकण बंद केले आहे. परंतु विरोधांना आमदार संजय देरकर यांनी शेतकऱ्यांच्या हिताचे केलेले कार्य पचनी पडत नसल्याने चुकीच्या पद्धतीने अफवा पसरवून संभ्रम तयार करून शेतकर्यांनी दिश्या भूल करीत आहे. त्यावर कोणीही लक्ष देवू नये असे आवाहन शेतकरयांना करण्यात आले आहे.

दणका…सीसीआयला थेट कापूस खरेदी करायचे आदेश, आ. संजय देरकरांनी शेतकऱ्यांना केले टोकण मुक्त

0

News Today 

दिलीप भोयर

वणी :- येथील सीसीआय कडून खरेदी करण्यात येत असलेल्या कापसाची टोकण पद्धत बंद करून थेट कापूस खरेदी करण्याचे आदेश आमदार संजय देरकर यांनी कृषी उत्पन्न बाजार समितीला आज ता. २७ रोजी सकाळी ११ वाजता बाजार समितीच्या सभागृहात सर्व शेतकऱ्यांच्या उपस्थितीत दिले असून सर्व शेतकऱ्यांनी आपला कापूस मार्केट यार्डमध्ये आणण्यासाठी आवाहन केले आहे. या निर्णयाने वणी विधानसभा क्षेत्रातील शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

वणी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सीसीआयची शासकीय कापूस खरेदी हमी भावाने सुरू झाली आहे. परंतु टोकण पद्धतीने शेतकऱ्यांना मोठा मनस्ताप होत होता. याबाबतची माहिती आमदार संजय देरकर यांना मिळताच त्यांनी मुंबई वरून घरी न येता सरळ कृषी उत्पन्न बाजार समिती गाठली असता टोकणसाठी रांगेत असलेल्या शेतकऱ्यांना बघून त्यांनी शेतकऱ्यांचे होत असलेले हाल बघून समितीचे सचिव झाडे, सीसीआय केंद्र प्रमुख हेमंत ठाकरे, सोयाबीन खरेदी व्यवस्थापक प्रकाश पचारे, आणि उपस्थित शेतकऱ्यांची सभागृहात बैठक घेतली.

शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या कापूस खरेदीसाठी असलेल्या अडचणीची संबंधितांकडून आढावा घेतला व ही चालू असलेल्या टोकण पद्धतीची अजिबात गरज नाही. ती तत्काळ बंद करावी आणि सरळ सरळ शेतकऱ्यांना मार्केट यार्ड मध्ये शेताचा ७/१२, आधार लिंक असलेले बँक पुस्तकं, आणि २०२४ – २५ चे पेरवे पत्रक सोबत घेवून कापूस बोलवण्यात यावा असे आदेश देताच सर्व शेतकऱ्यांनी टाळ्या वाजवून त्यांचा निर्णयाचे स्वागत गेले.

त्याच बरोबर सोयाबीनची खरेदी संथगतीने सुरू असल्याने त्यांना दररोज १०० वाहने खरेदी करण्याचे सुचवले असून आज पासून त्या पद्धतीने सुरू करण्याचे सुचवले. सोयाबीनला शासनाचा हमी भाव ४८९२ मिळत आहे. तसेच कापसाला ७५२१ मिळत असून सीसीआय व कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नियोजन काही त्रुटी असल्याने शेतकऱ्यांना त्याचा मानसिक त्रास होत आहे. तरी शेतकऱ्यांना कोणताही त्रास न होता सुलभ व्यवस्थेने कापूस व सोयाबीन खरेदी करण्यात यावे अश्या सूचना आमदार संजय देरकर यांनी दिले.त्यामुळे शेतकऱ्यांना होत असलेला मानसिक त्रास कमी होणार आहे.

आ. संजय देरकर हे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दाखल होतच समितीचे सचिव यांनी शाल श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देवून त्यांचे स्वागत केले. यावेळी झरि कु.ऊ.बा.स.चे सभापती राजीव कसावार, सुनील कातकडे, संजय निखाडे, प्रशांत पाचभाई, दिलीप भोयर, शरद ठाकरे, देवराव धांडे, सुधीर थेरे माजी सभापती संतोष कुचनकर, प्रवीण खानझोडे, सतीश वऱ्हाटे, घनश्याम पावडे, अजय कवरासे, मंगेश पचाभाईयांचेसह अनेक शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

कायरच्या विवेकानंद विद्यालयात “संविधान दिवस” उत्साहात साजरा

0

News Today 
वणी :- कायर येथील विवेकानंद विद्यालयात 26 नोव्हेंबर हा दिवस” संविधान दिवस” म्हणून साजरा करण्यात आला.

शासनाचे परिपत्रकान्वये 26 नोव्हेंबर ते 6 डिसेंबर 2024 पर्यंत या कालावधीत संविधान सप्ताह साजरा करनेचे दृष्टीने आज दिनांक 26 नोव्हेंबर 2024 रोजी भारतीय सनविधानास 75 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने अमृत महोत्सव वर्ष म्हणून साजरा करण्यात येत आहे.
आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष विवेकानंद विद्यालयाचे मुख्याध्यापक सुरेंद्र इखारे हे होते. प्रमुख पाहुणे म्हणून जेष्ठ अध्यापक मधुकर घोडमारे , सहायक शिक्षिका सोनाली भोयर, सहायक शिक्षक रविकांत गोंडलावार उपस्थित होते.


याप्रसंगी भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे प्रतिमेचे पूजन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मधुकर घोडमारे यांनी केले. तसेच विद्यालयातील विद्यार्थिनी कु प्रणाली ताजने, आयशापठाण, साजिया शेख, मीनाक्षी उपरे, श्रुती बोरूले यांनी भारतीय संविधानावर आधारित स्लोग्न तसेच तिन्ही भाषांमध्ये भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन केले व संविधानाचे महत्व मनोगतातून व्यक्त केले.


अध्यक्षीय भाषणातून सुरेंद्र इखारे म्हणाले की संविधानाचे महत्व अनेक स्तरावर असून हे संविधान देशाच्या विकासात आणि नागरिकांच्या जीवनाच्या गुणवत्तेत महत्वपूर्ण भूमिका बजावते. त्यामुळे संविधान हे एक जिवंत दस्तऐवज आहे असे प्रतिपादन केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रविकांत गोंडलावार यांनी केले तर आभार सोनाली भोयर यांनी मानले . कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी शाळांनायक मयूर खुटेमाटे, क्रीडांनायक रोहन मडावी, प्रयोगशाळा परिचर मधुकर कोडापे, शिपाई दिलीप कानंदस्वार, आकाश बोरूले यांनी सहकार्य केले.

संविधान दिनानिमित्त आ. संजय देरकर यांचेकडून चैत्यभूमीवर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन

0

News Today 

दिलीप भोयर

वणी :- आज तारीख २६ नोव्हेंबर रोजी भारतीय संविधान दिन असल्याने वणी विधानसभेचे नवनिर्वाचित लोकप्रिय आमदार संजय देरकर यांनी चैत्यभूमी मुंबई येथे जावून भारतीय संविधानाचे शिल्पकार बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले. संविधानाच्या दिनाचे महत्त्व समजून वणीतील आमदारकीच्या इतिहासामधील चैत्यभूमीवर जाणारे संजय देरकर हे पहीले आमदार ठरले अशी चर्चा मतदार संघातील संविधानप्रेमी जनतेत सुरू झाली आहे.

मागील २ दिवसापासून वणीचे लोकप्रिय आमदार संजय देरकर हे मुंबई येथे जावून आहे. त्यांनी मुबई येथे जाताच हिंदूहृदय सम्राट शिवसेना प्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृती स्थळाला भेट देवून त्यांना अभिवादन केले. त्याच बरोबर मातोश्रीवर जावून उद्धव ठाकरे यांची भेट घेतली.

मुंबई येथील २६/११ च्या आतंकवादी हल्यातील शहीद झालेल्या स्मृती स्थळाला देखील आ. देरकर यांनी भेट देवून सर्व शहिदांना मानवंदना अर्पण केली आहे. भारतीय संविधान दिनाचे औचित्य साधून चैत्यभूमीवर जावून भारतीय संविधानाला व डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करणारे आमदार संजय देरकर हे पहिले आमदार ठरले आहे.

तर स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस अभिवादन केल्याने वणी विधानसभेतील संविधानप्रेमी व शिवप्रेमी जनतेमध्ये एक आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. यावेळी त्याचसोबत जिल्हा संपर्क प्रमुख राजेंद्र गायकवाड, उपजिल्हाप्रमुख संजय निखाडे, दीपक कोकास,  डॉ. विवेक गोफने, सुधीर थेरे, शरद ठाकरे, आदी उपस्थित होते.

कर्करोगग्रस्त वैद्यकीय मदतीसाठी भूमी पुत्राचे सढळ हस्ते मदत करण्यासाठी आवाहन

0

News Today 

विजय नाचरे

रत्नागिरी:- तवसाळ (बाबारवाडी) गावचा सुपुत्र कु. ऋतिक संतोष येद्रे हे हाडांचा कर्करोग (Sarcoma Bones Cancer) या आजाराने ग्रस्त आहे. त्यांची आर्थिक परिस्थिती अत्यंत हालाखीची आहे. त्यांना तुमच्या सर्वांच्या मदतीची गरज आहे. 

ऋतिक हा सामान्य घरातून असून आज वर त्याला ह्या गोष्टीला सामोरे जाताना असंख्य गोष्टींना सामोरे जावे लागतेय. तरी त्यावर पी. डी. हिंदुजा नॅशनल हॉस्पिटल आणि मेडिकल री-सर्च सेन्टर येथे उपचार करण्यात येणार आहेत.

त्याच्या उपचारांसाठी ढोबळ खर्च पाहता पहिल्या किमो थेरपी आणि किमो पोर्ट साठी किमान १ लाख ६० हजार रुपये खर्च अपेक्षित आहे. (त्यापेक्षा ही अधिक) त्यांनतर त्याला १० केमो देण्यात येणार आहेत तर त्याचा एकूण खर्च १४ लाखांपर्यन्त आहे आणि त्याच बरोबर शेवटी सर्जरी त्यासाठी कमीतकमी ६ ते ७ लाख खर्च येणार आहे (डॉक्टरांच्या सल्यानुसार) त्याच बरोबर गोळ्या औषधांचा खर्च असा जवळपास १८ लाखांपर्यन्तचा खर्च होत आहे.

कु. ऋतिक हा केवळ २३ वर्षांचा असून एवढ्या मोठ्या आजाराला तो झुंझ देणार आहे. आयुष्यामध्ये सकारात्मक विचाराने बघायच्या वेळेस त्याला एवढ्या मोठ्या आजाराने ग्रासले आहे. त्यामुळे त्याची प्रकृती खालावत चाललेली आहे.

या आव्हानात्मक काळात मार्गक्रमण करीत असताना, तुमच्या सर्वांच्या मदतीची गरज त्याला आणि त्याच्या संपूर्ण कुटुंबाला आहे.

*मदत करण्यासाठी बँक डिटेल्स खालीलप्रमाणे:*
Bank Name – Bank of india
A/c Number – 143818210000330
Branch – Abloli (Guhagar, Ratnagiri)
A/c Holder Name – Rutik Santosh Yedre
IFSC – BKID0001438

अधिक माहितीसाठी आणि Gpay नंबर :
+91 72180 14772 (Gpay)

साहेब…..तुमच्या डोळ्यातील अश्रू बघून फार अस्वस्थ झालो,माजी आ. बोदकुरवार यांना दिलीप भोयर यांचं सांतवंनपर खुलं पत्र

0

 

 साहेब, आमच्या डोळ्यातील अश्रू पण तुमच्यामुळेच आले होते….

News Today
दिलीप भोयर

वणी :- भाजपाचे माजी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार आपल्या अनपेक्षित पराभवाने प्रचंड खचले. कार्यकर्त्यांना संबोधित करताना ते कमालीचे भावूक झाले होते. त्यांच्या डोळ्यातील घरंगळणारे अश्रू बघून मी स्वतः फार अस्वस्थ झालो.

साहेब, अश्रूंची किंमत तेव्हाच कळते जेव्हा ते आपल्या डोळ्यात येते. हेच अश्रू तुम्ही दुसऱ्यांच्या डोळ्यातून पाडले नसते तर आज हे अश्रू तुमच्या डोळ्यात आले नसते. डोळ्यातील अश्रू सांगून जातात की आपल मन या पराभवाने किती दुःखी झाल आहे. यावरून आपणास हे खुल सांत्वन पत्र आहे.

सन्माननीय संजीवरेड्डी बोदकुरवार साहेब तुम्ही २०१४ ला प्रथम आमदार झाले. सर्वांना आनंद झाला आमदार झाल्या नंतर जो काही विकास मतदारसंघात केला. त्या बद्दल देखील दुमत नाही. आपण लोकप्रतिनिधी आहात म्हणजे तुमच्या मतदार संघातील सर्व मतदारांचे व जनतेचे प्रतिनिधी आहात.

सर्वांच्या सुख दुःखात तुम्ही प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सहभागी होणे ही लोकप्रतिनिधी म्हणून तुमची जबाबदारी असते. एक काळजी वाहू लोकप्रतिनिधींची ती जबाबदारी पार पाडायला पाहिजे. आपण ती पाडली यात काहीही शंका नाही.

तुम्ही सर्व जनतेचे लोकप्रतीनिधी असताना तुमच्यात एक न्यूनगंड तयार झाला की मी केवळ भाजपाचे प्रतिनिधित्व करीत आहे. जो कोणी व्यक्ती भाजपाच्या विरोधात बोलत असेल किंव्हा त्यांच्या चुकीच्या धोरणाला विरोध करीत असेल तर त्या व्यक्तीचा संविधानाने दिलेला अधिकार आहे. परंतु तुम्ही आणि तुमचे चेलेचपाटे काटेकोरपणे काटा काढण्याच्या दृष्टीकोनातून काम करायचे. हे जनता खुल्या डोळ्यांनी बघत होती हो साहेब….

आपण ज्या देशात व राज्यात किंवा गावात आहोत त्या ठिकाणी लोकशाही नावाची एक प्रणाली आहे. ज्यात आपले अभी व्यक्ती स्वतंत्र या देशातील संविधानाने सर्वांना दिले आहे. अनेक लोकांच्या मनात भीती असते. तर कोणी दुसरे काय म्हणेल म्हणून, बोलून दाखवत नव्हते. तर काही लोक आपल्याला काय करायचे आहे. म्हणून दुर्लक्ष देखील करीत होते. पण सारेच गप्प बसतील असे होत नाही. लोकशाहीमध्ये मतभेद असतील आणि ते राहतात याला कोणी नाकारू शकत नाही. मतभेद किंवा विरोध नसेल तर ती लोकशाही असूच शकत नाही.

जेव्हा अनेक गावातील सरपंच जेव्हा तुमच्याकडे गावातील समस्या घेवून यायचे तेव्हा तुम्ही त्यांच्या गळ्यात भाजपचा शेला टाकल्याशिवाय विकास कामे देत नव्हते. अहो साहेब त्यांच्या मनाचा थोडा तरी विचार करायचा असता ना त्यांनी गावच्या विकासासाठी आपले अंतर्मन मारून ते तुमच्या हाताने स्वताच्या गळ्यात शेला टाकून घेत होते. तेव्हा त्यांच्या हृदयातून अश्रू धारा असायच्या त्या कधीच तुम्हाला दिसल्या नाही. किंवा त्यांच्या अश्रूंची किंमत तुम्हाला कळू शकली नाही. असे एक नाही तर अनेक उदाहरण आहे. जे तुमच्या डोळ्यासमोर घडत असताना तुम्ही बघू शकले नाही.

अहो साहेब अतिक्रमणाच्या नावाखाली गोरगरीब रोज मजूरी करणाऱ्यास लोकांवर देखील तुम्ही क्रूरदुष्टी टाकली हो. का तर ते मुस्लिम आहे म्हणून त्यांचा द्वेष करणे आणि त्यांच्या रोजगारावर बुलडोजर चालवणे हे योग्य नव्हतं हो साहेब. त्या रोजगारावर त्याची त्याच्या लेकराबाळाच्या पोटाची खळगी असते हो साहेब. त्यावर त्यांचे सर्व कुटुंबाचा उधार निर्वाह चालत असतो. त्यात मुलांचं शिक्षण असेल, वृध्द आई वडिलांचे आजारावर उपचार असेल पत्नीची देखभाल असेल हे सर्व काही त्या रोजगारावर असते हो. ज्यावेळी त्यांची जिंदगी उध्वस्त होत होती त्यावेळी त्यांच्या घरी असलेल्या वृध्द आई वडिलांच्या डोळ्यात त्यांच्या पत्नीच्या डोळ्यात त्यांच्या मुलांच्या डोळ्यात असेच अश्रू होते हो. ते आपल्याला कधीच दिसले नाही. तेव्हा जर आपण या अश्रूंची किंमत जाणली असती तर आज हे अश्रू तुमच्या डोळ्यात आले नसते हो.

तुम्ही व्यक्तिगत मला तरी कुठ सोडलं हो, माझे ही व्यवसाय तुम्ही उध्वस्त केले. तेव्हा जनता बघत होतो हो, मी तर २०१५ मध्येच माझी पत्रकारिता सोडून छोटे मोठे व्यवसाय सुरू केले हो. की या पत्रकारितेने कुणाचे ही व्यक्तिगत नुकसान होऊ नये या उद्देशाने मी माझ्या पत्रकारितेला पूर्ण विराम दिला होता हो. पण तुम्हाला आणि तुमच्या चेल्याचपट्याना माझ्या व्यवसायाबद्दल प्रचंड खाज होत होती हो.

अनेकदा माझ्या व्यवसायाबद्दल तोंडी तक्रारी केल्यात. पण तुम्ही ही जाणीव कधी केली नाही की, माझ्या ही व्यवसायावर माझं कुटुंब आहे. त्यावेळी तुम्ही आमदारकीचा तोरा दाखवत होते. तर तुमचे चेले चपाटे पदाचा गैरवापर करीत होते. आज या चेल्यांचा ही इतिहास माझ्या जवळ जमा आहे. यांना तर मी हातच लावला नाही मात्र अजून वेळ संपली नाही, हिशोब बरोबर होणार……

असो तरी मी अनेकदा सोशल मीडियाच्या माध्यमातून सतर्क केलं देखील पण तुमच्यातला आमदरपणाचा तोरा काही कमी होत नव्हता. तुम्ही व्यक्तिगत फार चांगले आहे हो साहेब, तुमच्या व्यक्तिगत स्वभावाला कुठेच तोड नाही. परंतु जो सत्तेचा आणि आमदारकीचा अहंपणा कुठं तरी दिसत होता ते तुम्हाला कळत नव्हत. तुमचा पराभव तुमच्या अंहकाराने केला हो साहेब. तुमचा अहंकार तुमच्याशी गद्दारी करून गेला. तुम्ही स्वीकारा अथवा स्वीकारू नका पण सत्त हेच आहे.

जीवनात काही करा पण एखाद्या पत्रकाराला अजिबात डीवचू नका सारेच पत्रकार पायावर लोटांगण घालत नाही. सारेच पत्रकार पैशाच्या मागे जात नाही. हे सुध्दा धान्यात ठेवा. सर्व जनतेला जगविण्याची जबाबदारी सरकारची आहे. त्यांच्या हाताला काम देणे हे सरकारच कर्तव्य आहे. त्याच बरोबर ज्यांनी स्वयंरोजगार उभे केले असेल तर त्यांच्या रोजगाराचे संरक्षण,सुरक्षा करणे हे देखील सरकारचे कर्तव्य आहे. पण तुम्ही अक्षरशः उध्वस्त केले. ज्यावेळी कोणाचे रोजगार उध्वस्त होते ना त्यावेळी असेच अश्रू बाहेर येतात. ते जर आपल्याला त्यावेळी दिसले असते तर आज तुमच्या डोळ्यात पराभवाचे अश्रू दिसले नसते.

असो विकास कामाचे तर “जो तळे राखतो तो पाणी पितोच” त्यात काही शंका नाही. परंतु मी नाही त्यातली आणि कडी लावा आतली हे धोरण जनतेसमोर गुपीत राहत नाही. विकासाचा व्यवसाय केला की थोडाफार अहंकार वाढतो आणि तोच अहंकार माणसाला मातीत घालतो. असो तरी पण तुम्ही आमचे अगोदरही मित्र होते आजही मित्र असणार आहे. एक मित्र म्हणून तुमच्या डोळ्यातील अश्रू बघून माणुसकीच्या नात्याने मला देखील दुःख झाले, शेवटी आपण माणसे आहोत. एक दिवस आपलाही जीवाचा शेवट आहे. सोबत काहीच येणार नाही हो साहेब. बस येवढीच जान असणे गरजेचे आहे. स्वताला सावरा आणि काळजी घ्या. तुमच्या वेदनांची मला जाणीव आहे.

तुमच्या डोळ्यातील अश्रू बघून आमच्या मनाला वेदना झाल्या हे साहजिकच आहे. आपल्याला एखादा सल्ला द्यावा इतपत मी काही मोठा नाही. परंतु आपल्याला जशा वेदना होते तशाच वेदना दुसऱ्यांना देखील होतात त्यामुळे एकमेकांच्या वेदनांची जाणीव ठेवली पाहिजे. तेव्हाच आपली माणुसकी जिवंत असते, आणि माणुसकी जिवंत असली पाहिजे. शेवटी आपण सारे मानव आहोत. ज्या देहात आपण राहतो त्या देहाची एक दिवस राख होतेच म्हणून कोणत्याही गोष्टीचा अहंकार माणसात असू नये एवढंच…आणि जर काही आमच्या माध्यमातून चूक झाली असेल तर मी व्यक्तिशः आपली दिलगिरी व्यक्त करतो. शेवटी तुम्ही वयाने आणि कर्तुत्वाने मोठे आहात.
🙏 धन्यवाद🙏

बघा व्हिडिओ..

https://youtu.be/DI8XptYGTMI?si=zfceO-0f8Mp3ftYg

आपला मित्र
दिलीप भोयर
वणी
संपादक : वणी न्युज टुडे

खा. संजय देशमुखांची भेट घेवून आ. संजय देरकर मातोश्रीकडे रवाना

0

News Today 

दिलीप भोयर

वणी :- यवतमाळ – वाशिम लोकसभा क्षेत्राचे खासदार संजय देशमुख यांची भेट घेवून आज ता.२४ रोजी वणीचे नवनिर्वाचक लोकप्रिय आमदार संजय देरकर हे यवतमाळ येथून नागपूर व नागपूर वरून मुंबई मातोश्रीवर शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे आशीर्वाद घेण्यासाठी रवाना झाले आहे.

आमदार संजय देरकर यांनी यवतमाळ येथील एका खासगी हॉटेल मध्ये खासदार संजय देशमुख यांची भेट घेतली. याभेटी दरम्यान खा. देशमुख यांनी राजकीय पटलावरची चर्चा करून महाविकास आघाडीतील काँग्रेस पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष,  मास्कवादी कम्युनिस्ट पार्टी, आम आदमी पार्टी व सर्व घटक पक्ष तथा कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांचे आभार व्यक्त केले. तसेच आमदार देरकर यांना पुढील वाटचालीच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी आमदार संजय देरकर व त्यांच्या पत्नी सौ. किरण देरकर यांचेसह संजय निखाडे, दिलीप भोयर, डॉ विवेक गोफणे, संघदीप भगत नागेश किनाके आदी उपस्थित होते.

या भेटी दरम्यान लगेच खा. देशमुख यांनी आमदार संजय देरकर यांना घेवून मुंबईला मातोश्रीवर  जायचे ठरविले व तिकडूनच ते मुंबईला रवाना झाले. उद्या ता. २५ रोजी आमदार संजय देरकर हे मुंबईला पोहचणार असून खा. संजय देशमुख यांचे सोबत मातोश्रीवर सकाळी पोहचणार आहे. त्यांचे सोबत शिवसेना पक्षाचे जिल्हा संपर्क प्रमुख राजेंद्र गायकवाड, उपजिल्हाप्रमुख संजय निखाडे, व इतर पदाधिकारी उपस्थित असणार आहे.

संपूर्ण विदर्भातून शिवसेना उबाठा गटाचे एकमेव आमदार संजय देरकर हे निवडणूक जिंकणारे उमेदवार आहे. त्यामुळे त्यांची मोठी जबाबदारी देखील वाढली आहे.

आमदार संजय देरकर आज खा. संजय देशमुखांच्या भेटीला 

0

News today 

वणी :- वणी विधानसभेचे नवनिर्वाचित लोकप्रिय आमदार संजय देरकर यांनी काल विजयाचा गुलाल उधळला आणि आज दुपारी १ वाजता ते यवतमाळ – वाशिम लोकसभा क्षेत्राचे खासदार संजय देशमुख यांच्या भेटीला यवतमाळकडे रवाना झाले आहे.

महाविकास आघाडी कडून वणी विधानसभा क्षेत्राकरिता शिवसेना (उबाठा) गटकडून संजय देरकर यांना उमेदवारी मिळवून देण्यासाठी खासदार संजय देखमुख यांचा अनमोल वाटा आहे. तसेच त्यांनी निवडणुकीच्या संपूर्ण प्रचार व जाहीर सभेकरिता वणीत येवून अत्यंत प्रभावी मार्गदर्शन केले होते. 

काल विधानसभेच्या निवडणुकीचा लागलेल्या निकालात संजय देरकर हे १५ हजाराचेवर मतांनी विजय मिळवला आहे. संजय देरकर यांना विजय मिळताच महा विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह निर्माण झाला होता. सर्व कार्यकर्ते पदाधिकारी व समाज बांधवांनी येवून आमदार संजय देरकर यांना रात्री उशिरा पर्यंत भेट घेवून शुभेच्छा दिला. तसेच आज तारीख २४ रोजी सकाळी देखील हजारो कार्यकर्त्यांनी शुभेच्छा दिला.  सर्वांच्या शुभेच्छा स्वीकारून आमदार देरकर हे खासदार संजय देशमुख यांच्या भेटीला यवतमाळ येथे रवाना झाले. 

वणीत श्रीगुरुदेव सेनेच्या मतदार जागृती अभियानाने वाढला मतदानाचा टक्का, मशालीचा विजय होईल पक्का

0

News Today 

वणी :- विधानसभा निवडणूक प्रचार काळात श्रीगुरुदेव सेनेच्या वतीने वणी तालुक्यातील गावो गावी जावून मतदार जागृती अभियान राबविल्याने मतदानाच्या टक्क्यात ऐतीहासिक ७६.८८ वाढ झाली आहे. या वाढलेल्या मतदानाचा महाविकास आघाडीला फायदा झाला असून मशालीचा विजय पक्का झाला आहे. अशी चर्चा आता वणी तालुक्यात पसरली आहे.

वणी विधानसभेची निवडणूक २० नोव्हेंबर रोजी संपन्न झाली आहे. या निवडणुकीचा निकाल अवघ्या काही तासांवर आला आहे. या निकालाची सर्वांना उत्सुकता वाढली आहे.

श्रीगुरुदेव सेना ही एक सामाजिक संघटना असून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात श्रीगुरुदेवाचा सैनिक आहे.  वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, संत गाडगे महाराज व ग्रामगीता तत्त्वज्ञान प्रचार व प्रसार करणारी ही एक सामाजिक संघटना असून या संघटनेने राज्यातील शेतकऱ्यांचे हाल अपेष्टा, वाढती महागाई, व बेरोजगारी बघून वणी विधानसभेत महाविकास आघाडीचे उमेदवार संजय देरकर यांना जाहीर पाठिंबा घोषित करून गावागावात मतदार जागृती अभियान राबविण्यात आले.

प्रबोधनातून प्रचार व भजनातून जनजागृती करण्यासाठी जाहीर समर्थन यात्रा एका रथा व्दारे काढली होती. या यात्रेला श्रीगुरुदेव सेनेचे संस्थापक अध्यक्ष दिलीप भोयर यांनी शेतकरी, शेतमजुरांच्या प्रश्नावर प्रकाश टाकून देशावर व शेतकऱ्यांवर येणाऱ्या संकटावर प्रकाश टाकला तसेच शेतकऱ्यांच्या शेत्या कश्या पद्धतीने संकटात येत असून शेती व्यवसाय धोक्यात आल्याचे दिसत आहे.

उद्योगपती वर्ग शेतकऱ्यांवर कसे संकट तयार करीत आहे. यावर जोरदार प्रकाश टाकला. व मतदारांना महाविकास आघाडीला मतदान करण्यासाठी आणि मतदानाचा हक्क बजावण्यासाठी आवाहन केले. त्यामुळे ही यात्रा प्रचंड प्रभावी ठरली की गावातील अनेक मतदारांनी उत्स्फूर्तपणे मतदानचा हक्क बजावला व आपले मतदान महाविकास आघाडीकडे वळवले.

श्रीगुरुदेव सेनेकडून तारीख ५ नोव्हेंबर ते १७ नोव्हेंबर पर्यंत ७० गावात या जाहीर समर्थन यात्रा जावून मतदार जागृती अभियान राबविले, त्यामुळे या मतदानात प्रक्रियेत मतदारांनी उत्स्फूर्तपणे मतदान केले आहे. त्यामुळे मतदानाच्या टक्क्यात वाढ झाली आहे. अशी चर्चा गावागावात होत आहे.