Tuesday, July 28, 2026
Google search engine
Home Blog Page 3

राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे अडचणीत? ११४७ एकर जमिनीचा दावा; व्हिडिओ व्हायरलमुळे राज्यात खळबळ

0

दिलीप भोयर News Today

मुबई:- महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या एक धक्कादायक व्हिडिओ चर्चेचा विषय ठरत आहे. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या नावावर कामठी मतदारसंघात तब्बल 1147 एकर जमीन असल्याचा दावा या व्हिडिओमध्ये करण्यात आला आहे. या दाव्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून सोशल मीडियावरही याची जोरदार चर्चा सुरू आहे.

या व्हिडिओमध्ये मंत्री बावनकुळे यांच्या पत्नी सौ. ज्योती, मुलगा संकेत आणि मुलगी पायल यांच्या नावाने ही जमीन असल्याचा आरोप करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, शेतकऱ्यांना कर्जमाफीसाठी गाडी किंवा बंगला नसावा अशी अट मांडणाऱ्या मंत्र्यांवरच आता प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

ही पोलखोल केल्याचा दावा रामेश्वर शिवाजी दरेकर यांनी केला आहे. त्यांनी “बोल बिंदास बोल” या कार्यक्रमातून हा व्हिडिओ सादर करत गंभीर आरोप केले आहेत. यापूर्वीही त्यांनी शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर बावनकुळे यांच्या विधानाविरोधात आवाज उठवला होता. त्यानंतर त्यांच्यावर गुन्हाही दाखल करण्यात आला होता, अशी माहिती समोर येत आहे.

दरेकर यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, “शेतकरी पुत्र घाबरत नाही, तो लढतो,” आणि त्यांनी पुन्हा एकदा सरकारला थेट आव्हान दिले आहे. या प्रकरणात पांडुरंग विठ्ठलराव डक मांडकीकर यांच्यावतीनेही गुन्हा दाखल केल्याची चर्चा आहे.

दरम्यान, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे या प्रकरणाकडे लक्ष देण्याची मागणी केली जात आहे. व्हिडिओमध्ये दाखवलेले पुरावे सत्य आहेत का, याची अधिकृत चौकशी होणे गरजेचे असल्याची मागणी विविध स्तरातून होत आहे.

सध्या या प्रकरणात नेमकी वस्तुस्थिती काय आहे, याबाबत अधिकृत भूमिका समोर आलेली नाही. मात्र, सोशल मीडियावर व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाल्यामुळे जनतेत संभ्रम आणि संताप दोन्ही भावना दिसून येत आहेत.

आता या आरोपांवर मंत्री बावनकुळे किंवा सरकारकडून काय प्रतिक्रिया येते, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

बघा व्हिडिओची लिंक

https://www.facebook.com/share/v/1Arn17eEgJ/

टीप – वणी न्यूज टुडे कोणतीही पुष्टी करीत नाही

पंढरपूर येथे सर्वांगीण सुसंस्कार शिबीराचे आयोजन

0

     २ मे २०२६ पर्यंत नाव नोंदणीची अंतिम तारीख

News Today 

पंढरपूर (प्रतिनिधी) – विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण व्यक्तिमत्व विकासासाठी ग्रामगीता तत्वज्ञान सक्रिय दर्शन मंदिर, सांगोला रोड, पंढरपूर येथे दिनांक ५ मे ते २० मे २०२६ या कालावधीत सर्वांगीण सुसंस्कार शिबीर २०२६ आयोजित करण्यात आले आहे. या शिबिरामध्ये १२ ते २० वयोगटातील मुला-मुलींना सहभाग घेता येणार आहे.

या शिबिरात ध्यान, प्रार्थना, योग-प्राणायाम, ग्रामगीता व भगवद्गीता अभ्यास, व्यक्तिमत्व विकास, पर्यावरण रक्षण, लाठी-काठी, कराटे, भजन, संगीत, वादनकला तसेच वैदिक गणित यांसारख्या विविध उपक्रमांचा समावेश करण्यात आला आहे. विद्यार्थ्यांमध्ये शिस्त, नम्रता, सेवाभाव आणि सामाजिक जाणीव निर्माण करण्याचा या शिबिराचा उद्देश आहे.

शिबिराचे अध्यक्ष प्रा. जनार्दन देठे असून सचिवपदी दिलीप भाऊ भोयर कार्यरत आहेत. शिबिराचे प्रमुख सेवकरामदादा असून मार्गदर्शनासाठी गजानन घुमनर (गुरुजी), राजुजी घुमनर (गुरुजी), अभिराज पवार, कु. नंदिनी ठेंगणे, कु. दिव्यानी बोढे हे योग व प्राणायाम शिक्षक म्हणून कार्यरत आहेत.

संगीत व बौद्धिक मार्गदर्शनासाठी सेवकरामदादा, गजानन घुमनर, ह.भ.प. केसाळे दादा, ह.भ.प. गुलाबरावजी महाराज, दिनकर उघडे, बाळासाहेब वाळके यांचे सहकार्य लाभणार आहे. तसेच संगीतकार म्हणून डॉ. कल्पेश कांबळे यांचे मार्गदर्शन लाभणार आहे.

शिबिराच्या आयोजनात सुरेंद्र नावडे (पुणे), सुधीर गायकवाड, जामदार महाराज (बेलवाडी), अॅड. राजाभाऊ व्यवहारे, चंपत पाचभाई, आण्णासो पवार, महादेव फरफार, मंगलाताई बोबडे, दिग्विजय, दिनकर उपबळे, भिमराव डोके, कृष्णात पवार, नंदकुमार पवार, दत्ता गाडे, सरसे साहेब, पेटकर, विनोद दादा विधाते, माणिक दादा दुकरे, नगरकर काकाजी आदींचे सहकार्य लाभत आहे.

शिबिरासाठी प्रवेशाची अंतिम तारीख २ मे २०२६ असून व्यवस्थापन फी ५०० रुपये ठेवण्यात आली आहे. शिबिरादरम्यान सहभागी विद्यार्थ्यांना जेवण व नाश्ता मोफत देण्यात येणार आहे.

पालकांनी आपल्या पाल्यांना या शिबिरात सहभागी करून त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी संधी उपलब्ध करून द्यावी, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.

यवतमाळ जिल्हास्तरीय कृषी प्रदर्शनात आमदार संजय देरकर यांची मृगझरी शेतकरी उत्पादक कंपनीच्या स्टॉलला भेट

0

News Today 

यवतमाळ येथे आयोजित करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय कृषी प्रदर्शनाला संजय देरकर (वणी विधानसभा क्षेत्राचे विद्यमान आमदार) यांनी उत्स्फूर्त भेट दिली. या भेटीदरम्यान त्यांनी मृगझरी शेतकरी उत्पादक कंपनीच्या स्टॉलला भेट देऊन कंपनीकडून उत्पादित करण्यात येणाऱ्या विविध कृषी उत्पादनांची सविस्तर माहिती जाणून घेतली.

आमदार संजय देरकर यांनी कंपनीच्या कार्यपद्धतीबद्दल, शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या सुविधा तसेच उत्पादनांच्या गुणवत्तेबद्दल विशेष रस दाखवला. त्यांनी शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या माध्यमातून ग्रामीण भागातील शेतकऱ्यांचे आर्थिक सक्षमीकरण कसे साध्य होऊ शकते, याबाबत सकारात्मक मत व्यक्त केले.

या प्रसंगी BTM बनसोड तसेच कृषी सहाय्यक कुडमेथे उपस्थित होते. त्यांनीही कंपनीच्या उपक्रमांची माहिती देत शेतकऱ्यांच्या प्रगतीसाठी अशा प्रदर्शनांचे महत्त्व अधोरेखित केले.

या भेटीमुळे मृगझरी शेतकरी उत्पादक कंपनीच्या कार्याला प्रोत्साहन मिळाले असून स्थानिक शेतकऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

धुरामुळे शेत उद्ध्वस्त, नुकसानभरपाई नाही तर आमरण उपोषण!” – शेतकऱ्याचा इशारा

0

News Today 

वणी:- यवतमाळ जिल्ह्यातील झरी जामणी तालुक्यातील अडेगाव येथील शेतकरी अंकित शंकर डोहे यांनी परिसरातील औद्योगिक प्रदूषणाविरोधात तीव्र भूमिका घेतली असून, नुकसानभरपाई न मिळाल्यास आमरण उपोषण करण्याचा इशारा प्रशासनाला दिला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गणेशपूर व ईशान्य कल्सी परिसरातील डोलोमाईट कंपन्यांमुळे मोठ्या प्रमाणावर धूर आणि धूळ निर्माण होत आहे. विशेषतः EXCELLO FIN LEA LIMITED CHILAI DOLOMITE MINES CHILAI आणि ईशान्य कल्सी कंपनीमधून निघणाऱ्या प्रदूषणामुळे परिसरातील शेतीचे गंभीर नुकसान होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.

अंकित डोहे यांच्या मते, कंपनीतून निघणारा धूर थेट शेतांवर परिणाम करत असून पिके नष्ट होत आहेत. तसेच कंपनीच्या वाहतुकीमुळे उडणारी धूळ शेतात साचत असल्याने जनावरांनाही त्रास सहन करावा लागत आहे. यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान दिवसेंदिवस वाढत आहे.

या पार्श्वभूमीवर संबंधित कंपन्यांवर तात्काळ कारवाई करून दरवर्षी नुकसानभरपाई देण्याची मागणी करण्यात आली आहे. अन्यथा, ८ दिवसांच्या आत मागण्या पूर्ण न झाल्यास २ एप्रिल २०२६ रोजी सकाळी ११ वाजता ईशान्य कल्सी कंपनीच्या गेटसमोर आमरण उपोषणास बसण्याचा इशारा देण्यात आला आहे.

या प्रकरणाकडे जिल्हा प्रशासन काय भूमिका घेते, याकडे आता संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

यवतमाळात ९ मार्च रोजी राष्ट्रवादी काँग्रेसची जिल्हास्तरीय कार्यकर्ता बैठक

0

News Today

यवतमाळ : शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने जिल्हास्तरीय कार्यकर्ता बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. ही बैठक ९ मार्च रोजी दुपारी १ वाजता शासकीय विश्रामगृह, यवतमाळ येथे पार पडणार आहे.

या बैठकीचे अध्यक्षस्थान राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब गाडे पाटील भूषविणार आहेत. जिल्ह्यातील पक्ष संघटना अधिक मजबूत करण्याच्या दृष्टीने या बैठकीला विशेष महत्त्व दिले जात आहे.

बैठकीमध्ये पक्ष बळकटीकरण, जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांची तयारी तसेच संघटन बांधणी या महत्त्वाच्या विषयांवर सविस्तर चर्चा केली जाणार आहे. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांनी सक्रियपणे काम करावे, याबाबत मार्गदर्शनही करण्यात येणार आहे.

या बैठकीसाठी सर्व विधानसभा अध्यक्ष, तालुकाध्यक्ष, शहराध्यक्ष तसेच पक्षाचे प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन पक्षाच्या वतीने करण्यात आले आहे.

वणीत “नमो उद्यान”योजनेवर श्रेयवादासाठी बोदकुरवरांचे घाणेरडे राजकारण? — स्व प्रसिद्धीसाठी लाजिरवाणा प्रयत्न उघड, सर्वत्र उमटला टीकेचा सूर

0

News Today 

दिलीप भोयर

वणी:- वणी, मारेगाव आणि झरी येथे “नमो उद्यान” योजनेसाठी प्रत्येकी ₹१ कोटी असा एकूण ₹३ कोटी निधी राज्य शासनाने मंजूर केला. योजना राज्य शासनाची, निधी शासनाचा आणि अंमलबजावणी प्रशासनाकडून — हे सर्व स्पष्ट असताना माजी आमदार बोदकुरवार कडून या निर्णयाचे श्रेय घेण्याचा आटापिटा सुरू असल्याची चर्चा रंगली आहे. ही योजना राज्य शासनाची असून स्व प्रसिद्धीसाठी हा लाजिरवाणा प्रयत्न केल्याने सर्वत्र टीकेचा सूर उमटत आल्याची चर्चा ऐकायला येत आहे. त्यामुळे भाजपची प्रतिमा चांगलीच मल्लिन होत असल्याने वरिष्ठांनी अश्या प्रकारावर बोदकुरवरांचे चांगलेच कान टोचल्याचे बोलल्या जात आहे.

योजना शासनाची… मग श्रेय कोणाचे?

“नमो उद्यान” ही महाराष्ट्र शासनाची अधिकृत योजना आहे. नगरपरिषद व नगरपंचायतींसाठी हरित उद्याने विकसित करण्याचा निर्णय शासनाने घेतला आणि निधीही शासनानेच मंजूर केला.
अशा परिस्थितीत माजी आमदारांचा अधिकृत निर्णयप्रक्रियेत कोणताही अधिकार नसताना पोस्टरबाजी करून श्रेय लाटण्याचा प्रयत्न करीत आहे. यामुळे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचेवर डोक्याला हात लावण्याची वेळ निर्माण झाली आहे. माजी आमदार बोदकुरवार यांना आभार मानायचे असेल तर राज्य सरकारचे मानायला हवे होते. स्वतःचे आभार मानून प्रसिद्धीचा लाजिरवाणा प्रयत्न उघड पडला आहे.

 विद्यमान आमदार देरकरांविषयी व्देष?

राजकीय वर्तुळात अशीही चर्चा आहे की हा प्रकार केवळ विकासाच्या नावाखालील प्रसिद्धीचा खेळ नसून विद्यमान आमदार संजय देरकर यांच्याविषयीचा व्देष व्यक्त करण्याचा अप्रत्यक्ष प्रयत्न आहे का?
कारण, मतदारसंघात शासनाच्या योजनेचे श्रेय स्थानिक पातळीवर विद्यमान आमदारांना मिळू नये, यासाठीच ही घाईगडबड सुरू आहे का? असा सवाल उपस्थित होतो.

बोदकुरवारांचा प्रसिद्धीसाठी हपापलेपणा?

निधी मंजुरीचे अधिकृत श्रेय शासनाचे असताना स्वतःचे फोटो लावून आभार प्रदर्शन करणे म्हणजे जनतेच्या डोळ्यात धूळफेक करण्याचा प्रकार नाही का?
हा केवळ प्रसिद्धीसाठी हपापलेला केविलवाणा प्रयत्न आहे का? असा संतप्त सवाल नागरिक विचारत आहेत.

 जनतेचा सूर काय? नागरिकांचे स्पष्ट मत आहे 

“विकासाचे काम स्वागतार्ह आहे. पण शासनाच्या योजनेचे श्रेय स्वतःकडे वळवण्याचा प्रयत्न करणे ही जनतेची दिशाभूल आहे.”“नमो उद्यान”मुळे शहरांचे सौंदर्य वाढणार, हरित क्षेत्र विकसित होणार — हे निश्चित. मात्र विकासाच्या नावाखाली श्रेयवादाचे राजकारण करून मतदारांची दिशाभूल करणे योग्य ठरणार नाही.
जनतेला हवा आहे पारदर्शक विकास… नुसती पोस्टरबाजी नव्हे!

प्रेस वेलफेअरचा करंडक सलग चवथ्यांदा स्वर्णलीलाने पटकाविला

0

News Today 
वणी:- प्रेस वेल‌फेअर असोशिएशन द्वारा आयोजीत आंतर शालेय समुह नृत्य स्पर्धेचा करंडक याहीवर्षी स्वर्णलीला इंटरनॅशनल स्कुलने पटकाविला. सलग चवथ्या वर्षी स्वर्णलीला स्कूलने ही कामगीरी केली.

प्रेस वेलफेअर असोशिएशन प्रजासत्ताक दिनाचे दिवशी दरवर्षी ही स्पर्धा आयोजीत करते. शिक्षण प्रसारक मंडळ विद्यालयाच्या प्रांगणात आयोजित या स्पर्धेत २० शाळांच्या चमुंनी बहारदार नृत्य सादर केली. स्पर्धेचे उद्‌घाटन माजी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार व ठाणेदार गोपाल उंबरकर,अध्यक्ष अनिल बिलोरीया यांचे उपस्थितीत, नगराध्यक्ष विद्या सचिन आत्राम यांनी केले.

कार्यक्रमाचे संचालन कोषाध्यक्ष तुषार अतकारे व गजानन कासावार यांनी केले.पूर्व माध्यमिक गटात प्रथम क्रमांक शिक्षण प्रसारक मंडळ विद्यालयाने ,द्वितीय क्रमांक संताजी इग्लीश मिडियम स्कुलने, तृतीय क्रमांक जनता विद्यालयाने, तर प्रोत्साहनपर बक्षिस नगर परिषद शाळा क्रमांक सातने मिळविले. माध्यमिक गटात प्रथम क्रमाक स्वर्णलीला इंटरनॅशनल स्कूलने, द्वितीय क्रमांक विवेकानंद विद्यालयाने, तृतीय क्रमांक वणी पब्लीक स्कुलने, प्रोत्साहनपर बक्षीस शिक्षण प्रसारक मंडळ विद्यालयाने पटकाविले. दिव्यांग गटात रामदेवबाबा मुक बधिर विद्यालय या शाळेच्या विद्यार्थ्यांनी न्रुत्य सादर करून वाहवाह मिळविली.

स्पर्धेदरम्यान विजय चोरडिया,संजय खाडे, किरण दिकुंडवार , विजय महाले,संजय निमकर, ,निकेत गुप्ता,दिपक मत्ते, डॉ गणेश लिमजे यांचा प्रेस वेल्फेअरतर्फे सत्कार करण्यात आला. तसेच रवि बेलुरकर यांची नगरपरिषदेच्या स्विक्रुत सदस्यपदी निवड झाल्याबद्दल असोशिएशनतर्फे सत्कार करण्यात आला आमदार संजय देरकर,शिक्षण प्रसारक मंडळाचे सहसचिव अशोक सोनटक्के यांचे हस्ते बक्षिस वितरण पार पडले. स्पर्धेचे परीक्षण प्राचार्य हेमंत चौधरी व नृत्य दिग्दर्शिका आस्था दहेकर यांनी केले.विनोद ताजने यांनी आभार प्रदर्शन केले.

स्पर्धेच्या यशस्वितेसाठी सचिव सागर बोढे, ,उपाध्यक्ष रमेश तांबे,सहसचिव जीतेन्द्र डाबरे, किशोर चवने,मंगल तेलंग,सुरज चाटे,बंडू निंदेकर,पुरुषोत्तम नवघरे,लोकेश गुंडलवार,सुनील पाटील, रज्जाक पठाण, महादेव दोडके यांनी परीश्रम घेतले.फीरता करंडक स्व ऋषी पिदूरकर यांचे स्मृती प्रित्यर्थ योगेश पिदूरकर यांनी तर पूर्व माध्यमिक व माध्यमिक गटातील विजेत्या शाळांना चषक स्व.बाळूभाऊ धानोरकर यांचे स्मृती प्रीत्यर्थ खासदार प्रतीभा धानोरकर यांचेतर्फे प्रायोजित करण्यात आली होती.

आठ दिवसांत गुटखा व तंबाखू तस्करांवर कारवाई न झाल्यास पोलिस अधीक्षकांना साडिचोडीची भेट पाठवणार , शिवसेना व युवासेना आक्रमक आमदार संजय देरकरांनी व्यक्त केला पोलिस प्रशासनावर संताप

0

News Today 

वणी :- शहर व परिसरात खुलेआम सुरू असलेल्या गुटखा व सुगंधित तंबाखू तस्करीविरोधात ठोस कारवाई होत नसल्याच्या निषेधार्थ युवासेनेने पोलीस प्रशासनाविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून २६ जानेवारी रोजी युवासेनेच्या वतीने वणी पोलीस ठाण्यासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. हे आंदोलन युवासेना उपजिल्हा प्रमुख अजिंक्य शेंडे यांच्या नेतृत्वाखाली पार पडले.

महाराष्ट्र शासनाने कायद्याने बंदी घातलेली सुगंधित तंबाखू व गुटखा वणी शहरासह ग्रामीण भागात सर्रास विक्री होत असल्याचे चित्र असताना, पोलीस प्रशासन केवळ दिखाऊ कारवाई करून तस्करांना पाठीशी घालत असल्याचा गंभीर आरोप आंदोलकांनी केला. पंचशील नगर परिसरात सुमारे महिनाभरापूर्वी करण्यात आलेल्या कथित बनावट कारवाईतील मुख्य आरोपीला तात्काळ अटक करण्यात यावी, ही आंदोलनाची प्रमुख मागणी होती.

या आंदोलनाला शिवसेना, युवासेना तसेच विविध सामाजिक व राजकीय संघटनांचे पदाधिकारी, शिवसैनिक व युवासैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांनी पोलीस प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी करत तीव्र आक्रोश व्यक्त केला.

आमदार संजय देरकर यांच्या नेतृत्वाखाली आंदोलनस्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी व वणी पोलीस ठाण्याचे ठाणेदार यांच्याशी सविस्तर चर्चा झाली.

यावेळी आमदार देरकर यांनी पोलीस प्रशासनाला स्पष्ट शब्दांत इशारा देत सांगितले की, आठ दिवसांच्या आत गुटखा तस्करीसह सर्व प्रकारचे अवैध धंदे बंद करून संबंधित तस्करांवर कठोर कारवाई करण्यात यावी. अन्यथा पोलिस अधीक्षकांना निषेधार्थ साडिचोडीची भेट पाठवून यापेक्षा अधिक उग्र आंदोलन छेडण्यात येईल, असा ठाम अल्टीमेटम त्यांनी दिला.

पोलीस अधिकाऱ्यांनी लेखी व तोंडी स्वरूपात योग्य कारवाईचे आश्वासन दिल्यानंतर हे धरणे आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आल्याची माहिती युवासेना उपजिल्हा प्रमुख अजिंक्य शेंडे यांनी दिली.

केळापूर वकील संघ पांढरकवडा : अध्यक्षपदी ॲड. राशिद शेख, सचिवपदी ॲड. सलमान तवर

0

News Today

पांढरकवडा | प्रतिनिधी
२३ जानेवारी २०२६ रोजी केळापूर वकील संघ पांढरकवडा (२०२६–२७) च्या निवडणुकीत अध्यक्षपदी ॲड. राशिद शेख व सचिवपदी ॲड. सलमान तवर यांची निवड झाली.दरवर्षीप्रमाणे यंदाही अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव, सहसचिव, कोषाध्यक्ष व सदस्य पदांसाठी निवडणूक पार पडली.

संकल्प पॅनलकडून पहिल्यांदाच निवडणूक लढवलेले ॲड. सलमान तवर यांनी पहिल्याच प्रयत्नात विजय मिळवला. नवीन उत्साही चेहऱ्याला सदस्यांनी प्राधान्य दिले. विजयाचे श्रेय त्यांनी संकल्प पॅनल, ज्येष्ठ व कनिष्ठ वकिलांना दिले.इतर पदाधिकारी :उपाध्यक्ष : ॲड. गजानन खैरकर सहसचिव : ॲड. विशाल जोशी कोषाध्यक्ष : ॲड. सौ. शीतल जैस्वाल सदस्य : ॲड. शिवम पवार, ॲड. गोपाल महुर्ले एकूण ८२ पैकी ७९ वकिलांनी मतदान केले.

निवडणूक निर्णय अधिकारी ॲड. एस. एम. हुलके व सहनिरीक्षक ॲड. आकाश पिंपळे यांनी प्रक्रिया यशस्वी केली. निवडणुकीनंतर ज्येष्ठ वकिलांनी नवनिर्वाचितांचे अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या. न्यायालय परिसरात फटाके फोडून, मिठाई वाटून व गुलाल उधळून जल्लोष साजरा झाला.

मुर्धोनी व नेरड ग्रामपंचायतीतील उपोषण आंदोलनाचा तोडगा; प्रशासनाच्या लेखी आश्वासनानंतर उपोषण मागे आमदार संजय देरकरासह व इतर नेत्यांनी काढला तोडगा 

0

News Today

मुर्धोनी व नेरड ग्रामपंचायतीतील कथित गैरव्यवहाराविरोधात वणी तहसील कार्यालयासमोर सुरू असलेल्या बेमुदत आमरण उपोषण आंदोलनाचा दुसऱ्या दिवशी तोडगा निघाला. गटविकास अधिकारी किशोर गज्जलवार यांनी ठोस कारवाईचे लेखी आश्वासन दिल्यानंतर उपोषणकर्त्यांनी आंदोलन मागे घेतले.

या आंदोलनाच्या तोडग्यासाठी वणी विधानसभेचे आमदार संजय देरकर, शिवसेना (उबाठा) जिल्हा प्रमुख संजय निखाडे, शिवसेना (शिंदे गट) जिल्हा संपर्क प्रमुख विजयबाबू चोरडिया, शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे विधानसभा अध्यक्ष दिलीप भोयर, भाजपचे माजी तालुकाध्यक्ष गजानन विधाने, मनीष सुरावार, माजी सभापती सुधाकर गोरे, विनोद मोहितकर, किशोर नांदेकर, गजानन किन्हेकर, गणपत लेडांगे कॉ. अनिल घाटे  आदींनी पुढाकार घेतला. यावेळी मान्यवरांच्या हस्ते उपोषणकर्त्यांना नारळपाणी पाजून उपोषणाची औपचारिक सांगता करण्यात आली.

प्रशासनातर्फे देण्यात आलेल्या लेखी आश्वासनानुसार, मुर्धोनी ग्रामपंचायतीतील गैरप्रकारांची चौकशी दिनांक २७ जानेवारी रोजी चौकशी समितीकडून करण्यात येणार आहे. तसेच नेरड ग्रामपंचायतीची फेरचौकशी दिनांक २९ जानेवारी रोजी करण्यात येईल. या चौकशी प्रक्रियेला गटविकास अधिकारी किशोर गज्जलवार स्वतः उपस्थित राहणार असून, ज्या ग्रामसेवकांच्या कार्यकाळात गैरप्रकार घडले आहेत त्यांना चौकशीच्या दिवशी उपस्थित ठेवून प्रत्यक्ष चौकशी करून दोषींवर ठोस कारवाई करण्यात येईल, असे स्पष्ट करण्यात आले.

यावेळी नेरड गावातील संजय लेडांगे, पांडुरंग ठावरी, गणपत आमने, मनोज ठावरी, रोशन तुरनकर, बंडू झाडे, विठ्ठल लेडांगे, विठ्ठल ठावरी, बबन ठावरी, बाबाराव तुरणकर, रवींद्र तलांडे, महादेव कुमरे, गुलाब राखुंडे, सागर वैद्य, सतीश झाडे आदी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

तसेच मुर्धोनी गावातील संदीप भोयर, भारत कारडे, अजय भोयर, प्रेम उमरडेकर, मुन्ना येरेकर, नयन आवारी, ज्ञानेश्वर घुले, संदीप कार्लेकर, प्रवीण फलके आदी नागरिकही उपस्थित होते.

उपोषणाची सांगता होत असताना दोन्ही गावांतील असंख्य नागरिकांनी प्रशासनाने दिलेल्या आश्वासनाची काटेकोर अंमलबजावणी व्हावी, अशी मागणी केली. वेळेत कारवाई न झाल्यास पुन्हा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही यावेळी देण्यात आला.