News Today
दिलीप भोयर
वणी:- वणी, मारेगाव आणि झरी येथे “नमो उद्यान” योजनेसाठी प्रत्येकी ₹१ कोटी असा एकूण ₹३ कोटी निधी राज्य शासनाने मंजूर केला. योजना राज्य शासनाची, निधी शासनाचा आणि अंमलबजावणी प्रशासनाकडून — हे सर्व स्पष्ट असताना माजी आमदार बोदकुरवार कडून या निर्णयाचे श्रेय घेण्याचा आटापिटा सुरू असल्याची चर्चा रंगली आहे. ही योजना राज्य शासनाची असून स्व प्रसिद्धीसाठी हा लाजिरवाणा प्रयत्न केल्याने सर्वत्र टीकेचा सूर उमटत आल्याची चर्चा ऐकायला येत आहे. त्यामुळे भाजपची प्रतिमा चांगलीच मल्लिन होत असल्याने वरिष्ठांनी अश्या प्रकारावर बोदकुरवरांचे चांगलेच कान टोचल्याचे बोलल्या जात आहे.
योजना शासनाची… मग श्रेय कोणाचे?
“नमो उद्यान” ही महाराष्ट्र शासनाची अधिकृत योजना आहे. नगरपरिषद व नगरपंचायतींसाठी हरित उद्याने विकसित करण्याचा निर्णय शासनाने घेतला आणि निधीही शासनानेच मंजूर केला.
अशा परिस्थितीत माजी आमदारांचा अधिकृत निर्णयप्रक्रियेत कोणताही अधिकार नसताना पोस्टरबाजी करून श्रेय लाटण्याचा प्रयत्न करीत आहे. यामुळे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचेवर डोक्याला हात लावण्याची वेळ निर्माण झाली आहे. माजी आमदार बोदकुरवार यांना आभार मानायचे असेल तर राज्य सरकारचे मानायला हवे होते. स्वतःचे आभार मानून प्रसिद्धीचा लाजिरवाणा प्रयत्न उघड पडला आहे.

विद्यमान आमदार देरकरांविषयी व्देष?
राजकीय वर्तुळात अशीही चर्चा आहे की हा प्रकार केवळ विकासाच्या नावाखालील प्रसिद्धीचा खेळ नसून विद्यमान आमदार संजय देरकर यांच्याविषयीचा व्देष व्यक्त करण्याचा अप्रत्यक्ष प्रयत्न आहे का?
कारण, मतदारसंघात शासनाच्या योजनेचे श्रेय स्थानिक पातळीवर विद्यमान आमदारांना मिळू नये, यासाठीच ही घाईगडबड सुरू आहे का? असा सवाल उपस्थित होतो.
बोदकुरवारांचा प्रसिद्धीसाठी हपापलेपणा?
निधी मंजुरीचे अधिकृत श्रेय शासनाचे असताना स्वतःचे फोटो लावून आभार प्रदर्शन करणे म्हणजे जनतेच्या डोळ्यात धूळफेक करण्याचा प्रकार नाही का?
हा केवळ प्रसिद्धीसाठी हपापलेला केविलवाणा प्रयत्न आहे का? असा संतप्त सवाल नागरिक विचारत आहेत.

जनतेचा सूर काय? नागरिकांचे स्पष्ट मत आहे
“विकासाचे काम स्वागतार्ह आहे. पण शासनाच्या योजनेचे श्रेय स्वतःकडे वळवण्याचा प्रयत्न करणे ही जनतेची दिशाभूल आहे.”“नमो उद्यान”मुळे शहरांचे सौंदर्य वाढणार, हरित क्षेत्र विकसित होणार — हे निश्चित. मात्र विकासाच्या नावाखाली श्रेयवादाचे राजकारण करून मतदारांची दिशाभूल करणे योग्य ठरणार नाही.
जनतेला हवा आहे पारदर्शक विकास… नुसती पोस्टरबाजी नव्हे!



