Friday, April 17, 2026
Google search engine
HomeUncategorizedआठ दिवसांत गुटखा व तंबाखू तस्करांवर कारवाई न झाल्यास पोलिस अधीक्षकांना साडिचोडीची...

आठ दिवसांत गुटखा व तंबाखू तस्करांवर कारवाई न झाल्यास पोलिस अधीक्षकांना साडिचोडीची भेट पाठवणार , शिवसेना व युवासेना आक्रमक आमदार संजय देरकरांनी व्यक्त केला पोलिस प्रशासनावर संताप

News Today 

वणी :- शहर व परिसरात खुलेआम सुरू असलेल्या गुटखा व सुगंधित तंबाखू तस्करीविरोधात ठोस कारवाई होत नसल्याच्या निषेधार्थ युवासेनेने पोलीस प्रशासनाविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून २६ जानेवारी रोजी युवासेनेच्या वतीने वणी पोलीस ठाण्यासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. हे आंदोलन युवासेना उपजिल्हा प्रमुख अजिंक्य शेंडे यांच्या नेतृत्वाखाली पार पडले.

महाराष्ट्र शासनाने कायद्याने बंदी घातलेली सुगंधित तंबाखू व गुटखा वणी शहरासह ग्रामीण भागात सर्रास विक्री होत असल्याचे चित्र असताना, पोलीस प्रशासन केवळ दिखाऊ कारवाई करून तस्करांना पाठीशी घालत असल्याचा गंभीर आरोप आंदोलकांनी केला. पंचशील नगर परिसरात सुमारे महिनाभरापूर्वी करण्यात आलेल्या कथित बनावट कारवाईतील मुख्य आरोपीला तात्काळ अटक करण्यात यावी, ही आंदोलनाची प्रमुख मागणी होती.

या आंदोलनाला शिवसेना, युवासेना तसेच विविध सामाजिक व राजकीय संघटनांचे पदाधिकारी, शिवसैनिक व युवासैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांनी पोलीस प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी करत तीव्र आक्रोश व्यक्त केला.

आमदार संजय देरकर यांच्या नेतृत्वाखाली आंदोलनस्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी व वणी पोलीस ठाण्याचे ठाणेदार यांच्याशी सविस्तर चर्चा झाली.

यावेळी आमदार देरकर यांनी पोलीस प्रशासनाला स्पष्ट शब्दांत इशारा देत सांगितले की, आठ दिवसांच्या आत गुटखा तस्करीसह सर्व प्रकारचे अवैध धंदे बंद करून संबंधित तस्करांवर कठोर कारवाई करण्यात यावी. अन्यथा पोलिस अधीक्षकांना निषेधार्थ साडिचोडीची भेट पाठवून यापेक्षा अधिक उग्र आंदोलन छेडण्यात येईल, असा ठाम अल्टीमेटम त्यांनी दिला.

पोलीस अधिकाऱ्यांनी लेखी व तोंडी स्वरूपात योग्य कारवाईचे आश्वासन दिल्यानंतर हे धरणे आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आल्याची माहिती युवासेना उपजिल्हा प्रमुख अजिंक्य शेंडे यांनी दिली.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Today News

Most Popular

Visitor Counter