Thursday, October 15, 2026
Google search engine
HomeNewsकॅन्सरग्रस्त अलका कुरुमकर यांच्या उपचारासाठी आर्थिक मदतीचे आवाहन

कॅन्सरग्रस्त अलका कुरुमकर यांच्या उपचारासाठी आर्थिक मदतीचे आवाहन

श्री गुरुदेव सेवा मंडळाच्या वतीने विवेक महाराज कुरुमकर यांच्या कुटुंबाला मदतीचा हात देण्याचे आवाहन

News Today 

वडगाव (ता. मूर्तिजापूर, जि. अकोला) : श्री गुरुदेव सेवा मंडळाचे निष्ठावंत सेवक विवेक महाराज कुरुमकर यांच्या पत्नी सौ. अलका विवेक कुरुमकर यांना कॅन्सरचे निदान झाले असून, त्यांच्या उपचारासाठी मोठ्या आर्थिक मदतीची आवश्यकता आहे. कुटुंबाची आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने उपचारांचा खर्च उचलणे कठीण होत आहे. त्यामुळे समाजातील दानशूर व्यक्ती, सेवाभावी संस्था आणि नागरिकांनी पुढे येऊन मदत करावी, असे भावनिक आवाहन करण्यात आले आहे.

विवेक महाराज कुरुमकर हे गेल्या पंधरा वर्षांपासून कीर्तन व प्रबोधनाच्या माध्यमातून समाजसेवा करीत आहेत. तसेच सुसंस्कार शिबिरांच्या माध्यमातून मुलांवर चांगले संस्कार घडविण्याचे कार्य ते करतात. मोझरी येथील अध्यात्म गुरुकुल गुरुकुंज येथेही ते दरवर्षी सुसंस्कार शिबिरात शिक्षक म्हणून सेवा देतात.

मात्र, त्यांच्या कुटुंबावर सध्या मोठे संकट ओढवले आहे. त्यांच्या पत्नी अलका कुरुमकर यांना कॅन्सर झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर डॉक्टरांनी शस्त्रक्रिया आणि पुढील उपचारांसाठी मोठा खर्च सांगितला आहे. अशा कठीण प्रसंगी विवेक महाराज यांना आर्थिक मदतीची आणि समाजाच्या आधाराची गरज आहे.

मदतीसाठी संपर्क :
मोबाईल क्रमांक : 9881974033
नाव : विकेश रामेश्वर कुरुमकर

मदत करू इच्छिणाऱ्या नागरिकांनी वरील क्रमांकावर संपर्क साधावा. आपल्या ऐपतीनुसार दिलेली छोटीशी मदतही या कुटुंबासाठी मोठा आधार ठरू शकते. अलका ताईंना उपचार मिळून त्या लवकर बऱ्या व्हाव्यात, यासाठी सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

“माणुसकीच्या नात्याने संकटात सापडलेल्या कुटुंबाच्या पाठीशी उभे राहूया आणि मदतीचा हात देऊया.”

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Today News

Most Popular

Visitor Counter