Wednesday, October 14, 2026
Google search engine
HomeNewsराष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) आक्रमक; शेतकऱ्यांसाठी बोअरवेल बंदी उठविण्याची राजू वांढरे...

राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) आक्रमक; शेतकऱ्यांसाठी बोअरवेल बंदी उठविण्याची राजू वांढरे यांची मागणी

वणी तहसीलदारांना निवेदन; दुष्काळी परिस्थितीत शेतकऱ्यांना दिलासा देण्याचे आवाहन

वणी, प्रतिनिधी : दुष्काळसदृश परिस्थितीमुळे शेतकरी संकटात सापडले असून, सिंचनासाठी पाण्याची उपलब्धता हा गंभीर प्रश्न बनला आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना स्वतःच्या शेतात नवीन बोअरवेल घेण्यास घालण्यात आलेली बंदी तत्काळ उठविण्यात यावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार गट) चे वणी तालुकाध्यक्ष राजू बापुराव वांढरे यांनी केली आहे. यासंदर्भात वांढरे यांच्या नेतृत्वाखाली तहसीलदार, वणी यांना निवेदन सादर करण्यात आले.

वणी तालुक्यातील शेतकरी अनियमित पाऊस, पाण्याची कमतरता, नापिकी, वाढता उत्पादन खर्च आणि शेतीमालाला मिळणारा अपुरा भाव अशा विविध समस्यांचा सामना करीत आहेत. सिंचनासाठी पाणी उपलब्ध नसल्याने पिके वाचविणे कठीण होत असून, शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होत आहे. अशा वेळी नवीन बोअरवेल घेण्यावरील बंदीमुळे शेतकऱ्यांच्या अडचणींमध्ये आणखी भर पडत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

शेतकऱ्यांच्या हिताचा विचार करून शासनाने या बंदीचा तातडीने फेरविचार करावा. भूजल उपलब्धता, पर्यावरणीय संतुलन आणि लागू असलेल्या कायदेशीर तरतुदींच्या अधीन राहून शेतकऱ्यांना नवीन बोअरवेल घेण्यास परवानगी द्यावी. तसेच दुष्काळी परिस्थिती लक्षात घेऊन सिंचनासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली.

शेतकरी हा देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा असून, त्याच्या शेतीला पाणी उपलब्ध होणे ही काळाची गरज आहे. त्यामुळे प्रशासनाने शेतकऱ्यांच्या समस्यांकडे गांभीर्याने लक्ष देऊन त्यांना दिलासा देणारा निर्णय घ्यावा, असे आवाहन राजू वांढरे यांनी केले.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे वणी विधानसभा अध्यक्ष दिलीप भोयर आणि रामदासजी पखाले उपस्थित होते. शेतकऱ्यांच्या न्याय्य मागण्यांसाठी पक्षाच्या वतीने पाठपुरावा करण्यात येणार असल्याची भूमिका यावेळी मांडण्यात आली.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Today News

Most Popular

Visitor Counter