Monday, October 12, 2026
Google search engine
HomeNewsयवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निवडणूक: वणी विभागातून महाविकास आघाडी समर्थित किरण...

यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निवडणूक: वणी विभागातून महाविकास आघाडी समर्थित किरण देरकर, सुनील कातकडे आणि राजू एलटीवार विजयी!

News Today 

यवतमाळ: जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक पदासाठी काल पार पडलेल्या निवडणुकीत वणी विभागातून महाविकास आघाडी समर्थित उमेदवारांनी दणदणीत विजय मिळवला आहे. यात सौ. किरण संजय देरकर मारेगाव, सुनील कातकडे वणी, आणि  राजू एलटीवार झरिजामनी हे विजयी घोषित झाले आहेत.

यवतमाळ येथे सुरू असलेल्या मतमोजणीत वणी विभागातील एकूण ६८ मतदारांपैकी तिन्ही विजयी उमेदवारांना प्रत्येकी तब्बल ४० च्या आसपास मते मिळाल्याची माहिती समोर आली आहे. महाविकास आघाडीच्या पॅनेलने वर्चस्व राखत या मतदारसंघात आपला विजय सुनिश्चित केला. या निवडणुकीत वणी विधानसभेचे आमदार संजय देरकर यांनी परिश्रम घेतले होते. 

मतमोजणी केंद्राबाहेर विजयी उमेदवारांच्या समर्थकांनी मोठा उत्साह दाखवत गुलाल उधळून आणि जल्लोष करत विजयाचा आनंद साजरा केला. बँकेच्या सत्ताकारणात महाविकास आघाडीच्या या विजयामुळे राजकीय वर्तुळात मोठे वजन निर्माण झाले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Today News

Most Popular

Visitor Counter