Wednesday, July 29, 2026
Google search engine
Home Blog Page 17

“विश्वासघात” मोदीने शेतकऱ्याला उभा गाडला हो, आयात शुल्क माफ, विदेशातून येणार भारतात कापूस, हमी पेक्षा कमी दराने होईल कापसाची खरेदी

0

मोदी सरकार कडून कापसावरील आयात शुल्क शून्य : शेतकऱ्यांचा विश्वासघात, यावर्षी कापसाचे भाव मातीमोल 

News Today 

दिलीप भोयर

वणी:- केंद्र सरकारने कापसावरील ११% आयात शुल्क शून्य करण्याचा निर्णय घेतला असून, हा निर्णय म्हणजे भारतीय शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याच्या पिकावर थेट घाला घालण्यासारखाच आहे. सरकारने वस्त्रोद्योग आणि परदेशी व्यापाऱ्यांचे हित साधले, पण शेतकऱ्यांच्या घामाला न्याय देण्याची तसदी घेतली नाही.

आज शेतकरी आधीच उत्पादन खर्चाच्या बोजाखाली दबला आहे—बियाणे, खतं, कीटकनाशकं, डिझेल, मजुरी यावर प्रचंड खर्च, शिवाय GST चा ताण. त्यावरही शेतमालाला हमीभाव नाही. 

आता जर परदेशी कापूस स्वस्त दरात भारतात आला, तर बाजारात कापसाचा दर कोसळणार हे निश्चित आहे. अशावेळी हा निर्णय म्हणजे शेतकऱ्यांच्या आत्महत्यांना सरकारने थेट आमंत्रण दिल्यासारखे आहे. शेतकऱ्यांचे उत्पन्न दुय्यम करू म्हणणारे सरकारच शेतकऱ्यांचा विश्वास घात करीत आहे. त्यामुळे यावर्षी देखील कापसाला मातीमोल किमतीत विकावा लागणार आहे. 

शेतकरी संघटनांचा आरोप आहे की, मोठ्या वस्त्रोद्योग घराण्यांना वाचवण्यासाठी हा निर्णय घेतला गेला, आणि ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या घामाला काहीही किंमत देण्यात आलेली नाही. “केंद्राने शेतकऱ्यांचा विश्वासघात केला आहे. परकीय व्यापाऱ्यांची तिजोरी भरणारे हे धोरण आम्हाला मान्य नाही,” असा संतप्त स्वर देशभर उमटू लागला आहे.

यापुढे जर हा निर्णय मागे घेतला गेला नाही, तर शेतकरी संघटनांनी रस्त्यावर उतरून भव्य आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे. कापूस उत्पादक पट्ट्यात आधीच असंतोष उसळला असून, सरकारविरोधात घोषणाबाजी सुरू झाली आहे.

👉 एक गोष्ट स्पष्ट आहे – शेतकरी जर रस्त्यावर उतरला, तर त्याचा आवाज दाबणे सरकारला अशक्य होईल. “अबकी बार भगावो , भाजपा सरकार “असा नारा शेतर्यांमध्ये लागताना दिसून येत आहे. 

🚨 हर्बल उत्पादनाच्या नावाखाली ग्राहकांची फसवणूक, नागरिकांच्या आरोग्याशी मांडला खेळ, करोडीची उलाढाल.

0

News Today

दिलीप भोयर

  • वणी:- “100% Natural” हा दावा कितपत खरा?
    आजकाल ग्राहक नैसर्गिक, हर्बल आणि रसायनमुक्त वस्तूंना प्राधान्य देतात. पण या प्रवृत्तीचा फायदा घेत काही कंपन्या आपल्या उत्पादनांवर ठळकपणे “Pure Herbal” किंवा “100% Natural” असे दावे करतात. प्रत्यक्षात उत्पादनांमध्ये हर्बल घटक असले तरी त्यात रसायनिक पदार्थांचे प्रमाण लक्षणीय आढळते. त्यामुळे चक्क ग्राहकांची फसवणूक करून त्यांच्या आरोग्याचा खेड खंडोबा मांडला आहे. या फसव्या व्यवहारात करोडो रुपयांची उलाढाल होत असून संबंधित विभाग मात्र गप्प बसल्याने नागरिकांमध्ये रोष वाढत आहे.

🦷 टूथपेस्टचे उदाहरण : पॅकेट वेगळं, वस्तुस्थिती वेगळी

बाजारातील एका टूथपेस्टवर “100% Natural” असा मोठा दावा केला गेला आहे. पण घटकांची यादी वाचल्यावर खरी गोष्ट समोर येते.

✅ हर्बल घटक (आयुर्वेदात उपयुक्त):

नीम, बबूल, मुलाठी, लवंग तेल, अजवायन अर्क, पिप्पली, वज्रदंती, हळद, पिलू, विदंग, मेंथॉल.

❌ रसायनिक घटक (आरोग्यासाठी वादग्रस्त):

Sorbitol, PEG 400, Sodium CMC, Calcium Carbonate, Hydrated Silica, Sodium Saccharin, Sodium Lauryl Sulphate (SLS), Sodium Benzoate, Purified Water.

⚠️ तज्ज्ञांचे इशारे : धोके काय आहेत?

SLS: तोंडातील कोवळ्या त्वचेवर परिणाम करून mouth ulcers निर्माण करू शकतो.
Sodium Saccharin: कृत्रिम गोडवा; संशोधनांनुसार कर्करोगाशी संभाव्य संबंध.
Sodium Benzoate: Vitamin C सोबत मिळून Benzene नावाचा कॅन्सरकारक घटक तयार होऊ शकतो.
PEG 400: पेट्रोकेमिकल बेस्ड; दीर्घकाळ शरीरात साठू शकतो.
Hydrated Silica: जास्त प्रमाणात वापरल्यास दातांचा नैसर्गिक एनॅमल झिजतो.

📌 निष्कर्ष : जाहिरात भ्रामक

या टूथपेस्टमध्ये हर्बल घटक खरेच आहेत; मात्र “100% Natural” हा दावा चुकीचा आहे. उत्पादनात रासायनिक घटक मिसळलेले असल्यामुळे ही भ्रामक जाहिरात (Misleading Advertisement) ठरते.

👉 ग्राहकांनी खरेदीपूर्वी उत्पादनाची Ingredients List नीट तपासणे गरजेचे आहे. तसेच FSSAI, ASCI व ग्राहक संरक्षण विभागाने अशा कंपन्यांवर कठोर कारवाई करणे आवश्यक आहे.

📝 ग्राहक तक्रार कुठे व कशी करावी?

ग्राहकांना अशा फसव्या दाव्यांविरोधात तक्रार करण्यासाठी खालील पर्याय उपलब्ध आहेत:

1️⃣ FSSAI (Food Safety and Standards Authority of India):

वेबसाईट: www.fssai.gov.in
Food Safety Connect अॅप किंवा हेल्पलाइन: 1800-112-100
2️⃣ ASCI (Advertising Standards Council of India):

वेबसाईटवर “Lodge a Complaint” पर्याय: www.ascionline.in
3️⃣ राष्ट्रीय ग्राहक हेल्पलाइन (NCH): टोल फ्री क्रमांक: 1800-11-4000 किंवा 14404
SMS: 8130009809
वेबसाईट: www.consumerhelpline.gov.in
NCH App मोबाईलवर उपलब्ध

4️⃣ राज्य व जिल्हा ग्राहक संरक्षण फोरम:

आपल्या जिल्ह्यातील फोरममध्ये लिखित अर्ज करून तक्रार दाखल करता येते.
📌 सूचना: तक्रार दाखल करताना उत्पादनाचे पॅकेट, खरेदीची पावती आणि आवश्यक फोटो हे पुरावे नक्की जोडावेत.

👉 या पद्धतीने ग्राहकांनी जागरूक राहून फसव्या जाहिरातींना आळा घालणे हीच खरी सुरक्षिततेची गुरुकिल्ली आहे.

 

प्रस्तावित वेकोली खान आल्याचे भासवून उमरघाट येथील आदिवासी बांधवांच्या जमिनींची अवैध विक्री? मारेगाव तालुक्यात वादग्रस्त प्रकरण न्यायालयात प्रलंबित

0

News Today

मारेगाव  : मौजा उमरघाट (ता. मारेगाव) येथील आदिवासी समाजाच्या कब्ज्यातील शेतजमिनींच्या अवैध विक्रीचे गंभीर प्रकरण उघडकीस आले आहे. संबंधित प्रकरण सध्या मारेगाव न्यायालयात न्यायप्रविष्ट असून, तरीसुद्धा काही व्यक्तींनी लोकांची दिशाभूल करून जमिनी विक्रीचे व्यवहार सुरू केल्याचा आरोप आदिवासी बांधवांनी केला आहे.

गाव नं. २५ मधील गट नं. ८, गट नं. १६, गट नं. १७/२ व गट नं. २८ या क्षेत्रातील शेतजमिनी मागील सत्तर वर्षांपासून आदिवासी बांधवांच्या ताब्यात आहेत. या जमिनीवरच त्यांचा मुख्य उपजीविकेचा आधार आहे. तथापि, पवन सुभाषचंद्र मुथा, अनिल लुथडे, अभय मोहता यांच्यासह इतर काही व्यक्तींनी कथितरीत्या बनावट कागदपत्रांच्या आधारे शेतजमिनी विक्रीस काढल्या असल्याचे प्रसिद्धीपत्रकातून नमूद करण्यात आले आहे.

यासंदर्भात आदिवासी बांधवांनी न्यायालयात दाद मागितली असून प्रकरणाचा निर्णय प्रलंबित आहे. तरीदेखील संबंधित जमिनी वादग्रस्त असल्याचे माहीत असूनही लोकांची फसवणूक करून व्यवहार रेटले जात असल्याचा आरोप आहे.

याशिवाय, श्री लुथडे (रा. नागरी, ता. वरोरा), श्री मुथा (रा. माढेली, ता. वरोरा), श्री. मोहता (रा. माढेली) यांच्यासह काहींनी WCL (वेकोली) चे बोगस राजपत्र Section 4 दाखवून वणी नॉर्थ क्षेत्र, भालर कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना हाताशी धरून लोकांना फसवण्याचे प्रकार सुरू असल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे.

  • कोणताही विक्री व्यवहार करू नये — इशारा
    संबंधित शेतजमिनी वादग्रस्त व न्यायालयीन प्रक्रियेत असल्याने कोणीही विक्री किंवा खरेदीचा सौदा करू नये, असा स्पष्ट इशारा आदिवासी बांधवांनी दिला आहे. अन्यथा अशा व्यवहारात अडकणाऱ्या व्यक्तींवरही कायदेशीर कारवाई होऊ शकते, असे प्रसिद्धीपत्रकाद्वारे वरोरा येथील अंकुश आगलावेयांचे कडून सूचित करण्यात आले आहे.

वणी – मुकुटबन रस्त्यावरील खड्ड्यांमध्ये उपरी गिट्टी टाकून नागरिकांच्या जीवाशी खेळ! ठेकेदार व PWD अधिकाऱ्यांविरुद्ध संताप, रॉकापने केली कारवाईची मागणी

0

News Today 
वणी – मुकुटबन मार्गावरील (घोंसा चौफुली ते १८ नंबर पूल) तब्बल ६० कोटी रुपयांचा रस्ता हमी कालावधीत असतानाही संपूर्ण उखडून गेला आहे. रस्त्यावरील खड्ड्यांमुळे नागरिक व वाहनधारकांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत असल्याने मोठा संताप उसळला आहे. 

या संदर्भात नागरिकांनी वारंवार तक्रारी करूनही PWD वणी उपविभाग व संबंधित ठेकेदाराने गंभीर दुर्लक्ष केले. दुरुस्तीच्या नावाखाली केवळ खड्ड्यांमध्ये उपरी गिट्टी टाकून बुजविण्याचा फसवा प्रकार करण्यात आला. यामुळे — वाहनांचे टायर फुटण्याचा धोका वाढला आहे. अपघात घडण्याची शक्यता आणखी तीव्र झाली आहे,
तसेच ही कारवाई म्हणजे ठेकेदारांची उघड पाठराखण व जनतेची फसवणूक असल्याचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार) गटाचे विधानसभा अध्यक्ष दिलीप भोयर यांनी केला आहे.

रॉकपच्या मागणी

रस्ता तातडीने मानक निकषांनुसार दुरुस्त करण्यात यावा. दोषी ठेकेदार व संबंधित PWD अधिकाऱ्यांवर गंभीर कारवाई करून गुन्हे दाखल करावेत, संपूर्ण प्रकरणाची स्वतंत्र चौकशी करून अहवाल जाहीर करण्यात यावा.

आंदोलनाचा इशारा
 जर मागण्या १५ दिवसांच्या आत मान्य झाल्या नाहीत, तर नागरिक रस्त्यावर उतरून खड्ड्यात आंदोलन, रस्ते रोको, टायर जाळणे व पुतळा दहन अशा तीव्र आंदोलनात्मक भूमिका घेतील. याची संपूर्ण जबाबदारी प्रशासन व संबंधित अधिकाऱ्यांवर राहील, असा इशारा देण्यात आला आहे. 

शिरपूर परिसरातील दुर्दैवी घटना : शेतकऱ्याचा नदीत बुडून मृत्यू

0

News Today 

वणी तालुक्यातील शिरपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत काल सायंकाळी एक हृदयद्रावक घटना घडली. पुनवट (ता. वणी) येथील रहिवासी असलेले शेतकरी देवराव उकीनकर (वय ६० वर्षे) हे शेतातून घरी परत येत असताना निर्गुडा नदीच्या पात्रात सायंकाळी साधारणपणे सातच्या सुमारास  अचानकपणे पाय घसरून ते पाण्यात पडले. नदी पात्रात  पाण्याचा अंत न आल्याने त्यांचा बुडून दुर्दैवी अंत झाला.

घटनेची माहिती मिळताच शिरपूर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी व स्थानिक नागरिकांनी शोधमोहीम राबवून काही वेळातच उकीनकर यांचा मृतदेह पाण्यातून बाहेर काढला. प्राथमिक तपासणीनुसार हा अपघाती मृत्यू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी वणीच्या ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आला असून घटनेची नोंद शिरपूर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. या घटनेमुळे पुरवट व परिसरात शोककळा पसरली आहे.

स्थानिक शेतकरी व ग्रामस्थांनी उकीनकर यांच्या निधनाबद्दल हळहळ व्यक्त केली असून, नदीकाठी सुरक्षिततेची उपाययोजना करण्याची मागणी होत आहे.

अडेगावमध्ये मध्यरात्री झोपेतच इसमावर  कुऱ्हाडीने हल्ला

0

News Today

वणी:- झरीजामनी तालुक्यातील अडेगाव येथे शुक्रवारी तारीख ५ रोजी  मध्यरात्री झालेल्या एका भीषण घटनेने गाव हादरले आहे. गावातील रहिवासी पुरुषोत्तम टेकाम (वय ६०) यांच्यावर अद्न्यात व्यक्तीकडून कुऱ्हाडीने जीवघेणा हल्ला करण्यात आला. ही घटना रात्री सुमारे १२.३० वाजता घडली.

झोपेतच घडला हल्ला

मिळालेल्या माहितीनुसार टेकाम हे घरात झोपलेले असताना अचानक घरातील लाईट बंद करण्यात आला आणि त्यानंतर कुऱ्हाडीने वार करण्यात आले. या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले.

वणी ग्रामीण रुग्णालयात उपचार

जखमी अवस्थेत त्यांना तातडीने वणी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले असून तेथे प्राथमिक उपचार करण्यात आले आहेत. त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते.

पोलिसांचा तपास सुरू

या घटनेची माहिती मिळताच मुकुटबन पोलिस घटनास्थळी दाखल झाले. हल्लेखोर कोण, हल्ल्यामागील कारण काय याचा शोध सुरू आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपासाला गती दिली आहे.

गावात भीतीचे वातावरण

अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे अडेगाव व परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. गावकऱ्यांमध्ये या घटनेमुळे प्रचंड खळबळ उडाली असून हल्लेखोरांना लवकरात लवकर अटक करण्याची मागणी होत आहे.

“वणी करांनो” तुमच्या घरी नळाचे पाणी येत असेल तर “सावधान”  दामले नगरातील सार्वजनिक शौचालयाचे  मानवी मलमूत्र थेट नदीपात्रात, राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक

0

News Today 

वणी, दि. ३ सप्टेंबर २०२५ : वणी शहरातील दामले नगर येथील सार्वजनिक शौचालयाची दयनीय अवस्था आणि त्यातून निघणारे मळमूत्र मिश्रित पाणी थेट निर्गळा नदीत मिसळत असल्याने नागरिकांच्या आरोग्याला गंभीर धोका निर्माण झाला आहे. याब numar१ नगर परिषदेच्या निष्काळजीपणावर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरद पवार गट) चे शहर अध्यक्ष विनोद ठेंगणे व उपाध्यक्ष मनोज दुर्गे यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत मुख्याधिकाऱ्यांना कायदेशीर इशारा देणारे निवेदन सादर केले आहे.

नागरिकांच्या आरोग्याशी खेळ :

दामले नगरातील सार्वजनिक शौचालय अत्यंत दुरवस्थेत असून, त्याची स्वच्छता आणि देखभाल याकडे नगर परिषदेने पूर्णपणे दुर्लक्ष केले आहे. या शौचालयातून निघणारे मळमूत्र मिश्रित दूषित पाणी निर्गळा नदीच्या पात्रात मिसळत आहे. विशेष म्हणजे, या नदीच्या पाण्यावर प्रक्रिया करून वणी शहराला पिण्याचे पाणी पुरवले जाते. यामुळे हजारो नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. ही बाब भारतीय राज्यघटनेच्या कलम २१ अंतर्गत नागरिकांच्या आरोग्यदायी वातावरणाच्या मूलभूत अधिकाराचे उल्लंघन असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

कायदेशीर बंधने आणि जबाबदारी :

निवेदनात महाराष्ट्र नगर परिषद, नगर पंचायती व औद्योगिक नगर अधिनियम (१९६५), पर्यावरण संरक्षण अधिनियम (१९८६) आणि सार्वजनिक आरोग्य कायद्याचा उल्लेख करत नगर परिषदेच्या जबाबदाऱ्या अधोरेखित करण्यात आल्या आहेत. यामध्ये सार्वजनिक आरोग्याला हानी पोहोचवणारी कोणतीही कृती रोखणे, दूषित पाणी शुद्धीकरणाशिवाय पिण्याच्या पाण्यात मिसळू न देणे, स्वच्छ व सुरक्षित पाणीपुरवठा सुनिश्चित करणे आणि सार्वजनिक शौचालयांची देखभाल व स्वच्छता राखणे यांचा समावेश आहे. तसेच, नॅशनल ग्रीन ट्रिब्युनल (NGT) आणि उच्च न्यायालयाच्या अनेक निर्णयांचा दाखला देत, नदी किंवा जलस्रोतांमध्ये मळमूत्र वा घातक पाणी सोडणे हा कायदा भंग आणि गुन्हेगारी निष्काळजीपणाचा प्रकार असल्याचे ठेंगणे यांनी स्पष्ट केले आहे.

तातडीच्या उपाययोजनांची मागणी :

निवेदनात नगर परिषदेला तातडीने पुढील कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत :

१. दामले नगरातील शौचालयाची दुरुस्ती आणि स्वच्छता सुनिश्चित करणे.

२. मळमूत्र मिश्रित पाणी निर्गळा नदीत जाणार नाही यासाठी शाश्वत उपाययोजना करणे.

३. नागरिकांना शुद्ध आणि सुरक्षित पाणीपुरवठ्याची खात्री करणे.

कायदेशीर कारवाईचा इशारा :

नगर परिषदेने ८ दिवसांच्या आत ठोस कार्यवाही न केल्यास, विनोद ठेंगणे यांनी उच्च न्यायालयात जनहित याचिका (PIL) दाखल करणे, नॅशनल ग्रीन ट्रिब्युनलकडे तक्रार करणे आणि सार्वजनिक आरोग्य कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्याचा इशारा दिला आहे. यामुळे होणाऱ्या कायदेशीर, प्रशासकीय आणि आर्थिक परिणामांची संपूर्ण जबाबदारी नगर परिषदेवर राहील, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

नागरिकांमध्ये संताप :

दामले नगरातील शौचालयाची दुरवस्था आणि नदीच्या पाण्याचे प्रदूषण यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र संताप आहे. पिण्याच्या पाण्याच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याने नागरिक भयभीत झाले असून, नगर परिषदेच्या निष्क्रियतेवर तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. विनोद ठेंगणे यांनी या निवेदनाद्वारे प्रशासनाला जागे करण्याचा प्रयत्न केला असून, येत्या काही दिवसांत नगर परिषद काय पावले उचलते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सदर निवेदन देते वेळी वणी विधानसभा क्षेत्राचे अध्यक्ष दिलीप भोयर, तालुकाध्यक्ष राजू वांढरे, उपाध्यक्ष महेंद्र चांदोरे, सचिव प्रदीप खोब्रागडे, युवा आघाडीचे तालुकाध्यक्ष सूर्यवीर चिकटे, कुणाल झगझाप, विशाल मोतेकर, गणेश वाघाडे, शिवम आवारी, करण महाकुलकर, हर्षल मोते, निखिल चाफडे, आदी मान्यवर उपस्थित होते.

वणी – कायर मार्ग तत्काळ १५ दिवसात दुरुस्त करा अन्यथा मुख्यमंत्री व केंद्रीय रस्ते मंत्र्याचे पुतळे फुंकणार , राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) प्रशासनाला इशारा, जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

0

News Today

वणी :  मुकुटबन मार्गावरील घोंसा चौफुली ते १८ नंबर पूल हा तब्बल ६० कोटी रुपये खर्चून बांधण्यात आलेला रस्ता असून सध्या तो हमी कालावधीत (DLP) आहे. मात्र, या रस्त्याचा डांबरी पृष्ठभाग उखडून गेला असून ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहेत. यामुळे वाहनधारक आणि प्रवाशांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे. या संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार गट) वणी  तर्फे  उपविभागीय अधिकारी वणी यांचे मार्फत जिल्हाधिकारी यांना निवेदन सादर करण्यात आले.

जर ही रस्ते येत्या १५ दिवसात दुरुस्त न झाल्यास राज्याचे मुख्यमंत्री व केंद्रीय रस्ते विकास मंत्री यांचे त्याच खड्ड्यात पुतळे फुंकून निषेध. नोंदविण्यात येणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे. 

निवेदनातील आरोप :

ठेकेदार व सार्वजनिक बांधकाम विभागाने गंभीर दुर्लक्ष केले असून दर्जाहीन काम केले आहे.

प्रत्यक्षात रस्ता दुरुस्ती न करता, अधिकाऱ्यांनी शासनाची दिशाभूल करण्यासाठी जुनी छायाचित्रे अपलोड करून रस्ता सुरळीत असल्याचे खोटे दाखविले.

दोषी कंत्राटदारांना पाठीशी घालून अधिकाऱ्यांनी कर्तव्यच्युती केली आहे.

या सर्व प्रकारामुळे सार्वजनिक निधीचा अपव्यय होऊन शासनाची फसवणूक झाली आहे.

मागण्या :

१) रस्ता १५ दिवसांच्या आत उच्च दर्जाने दुरुस्त करण्यात यावा.
२) स्वतंत्र तांत्रिक व आर्थिक चौकशी समिती नेमून कामाची तपासणी करावी.
३) दोषी ठेकेदार व संबंधित अधिकारी (तत्कालीन व वर्तमान) यांच्यावर निलंबनासह दंडात्मक व कायदेशीर कारवाई करावी.
४) खोटी माहिती व जुनी छायाचित्रे सादर करणाऱ्यांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा.

आंदोलनाची चेतावणी :

राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) तर्फे स्पष्ट करण्यात आले की, वरील मागण्या १५ दिवसांच्या आत पूर्ण न झाल्यास रस्त्यावरील खड्ड्यात आंदोलन छेडले जाईल. तसेच राज्याचे मुख्यमंत्री व केंद्रीय सार्वजनिक बांधकाम मंत्री यांच्या पुतळ्यांचे दहन करून तीव्र निषेध करण्यात येईल.

प्रशासनावर प्रश्नचिन्ह :

६० कोटी रुपये खर्चून उभारलेला रस्ता हमी कालावधीतच खड्डेमय होणे ही अत्यंत गंभीर बाब असून, यावरून संबंधित विभागाच्या कामकाजावर मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. जिल्हा प्रशासन व सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने याकडे लक्ष देऊन दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) कडून करण्यात आली आहे.

 सदर निवेदन देते वेळी वणी विधानसभा क्षेत्राचे अध्यक्ष दिलीप भोयर, तालुकाध्यक्ष राजू वांढरे, उपाध्यक्ष महेंद्र चांदोरे, सचिव प्रदीप खोब्रागडे, शहराध्यक्ष विनोद ठेंगणे, युवा आघाडीचे तालुकाध्यक्ष सूर्यवीर चिकटे, मनोज दुर्गे, कुणाल झगझाप, विशाल मोतेकर, गणेश वाघाडे, शिवम आवारी, करण महाकुलकर, हर्षल मोते, निखिल चाफडे, आदी मान्यवर उपस्थित होते.

वणीचे प्रवीण खानझोडे यांचा शिवसेना (उबाठा गट) ला रामराम 

0

News Today 

वणी : शिवसेना (उबाठा गट) चे कार्यकर्ते प्रवीण खानझोडे यांनी आजपासून पक्षाशी असलेला सर्व राजकीय संबंध संपुष्टात आणल्याची घोषणा केली आहे.

मागील चार वर्षांपूर्वी खानझोडे ही बहुजन समाज पार्टी मध्ये एक सक्रिय पदाधिकारी होते. त्यांनी BSP सोडून यवतमाळ येथे झालेल्या शिवसेना कार्यकर्ता मेळाव्यात, तत्कालीन पालकमंत्री व जिल्हाप्रमुख आदरणीय संजय राठोड, जिल्हा पदाधिकारी तसेच वणी येथील जिल्हा मध्यवर्ती बँकेचे तत्कालीन उपाध्यक्ष संजयभाऊ देरकर आणि विद्यमान आमदार यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला होता. त्यानंतर काही काळ सक्रियपणे कार्यरतही होते.

मात्र, खाजगी कारणास्तव पक्षकार्यास पुरेसा वेळ देता येत नसल्यामुळे त्यांनी पक्षापासून स्वतःला दूर करण्याचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भात ते म्हणाले की, “शिवसेनेतील सर्व नेते, सहकारी व मित्रपरिवाराशी माझे आपुलकीचे व स्नेहाचे संबंध कायम राहतील. मात्र संघटनात्मक किंवा राजकीय कार्यात माझा पुढील काळात सहभाग नसेल.”

त्यांनी पक्षातील सर्व पदाधिकाऱ्यांना भावी राजकीय वाटचालीस शुभेच्छाही दिल्या आहे.

वणी येथे १५०० वा सालाना जश्ने ईद मिलादुन्नबी ईनाम वाटप सोहळा

0

News Today 

वणी (प्रतिनिधी) :
जामा मश्जिद इंतेजामिया कमिटी, वणी यांच्या वतीने १५०० वा सालाना जश्ने ईद मिलादुन्नबी (स.अ.व.) ईनाम वाटप कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडणार आहे. या कार्यक्रमात मदरशातील विद्यार्थ्यांना (तल्बा) विविध बक्षिसांचे वाटप करण्यात येणार आहे. हा सोहळा येत्या शुक्रवार, दिनांक ५ सप्टेंबर रोजी रात्री ९.३० वाजता जामा मश्जिद समोर आयोजित करण्यात आला आहे.

या कार्यक्रमाला मान्यवर उपस्थित राहणार आहेत. मेहमान-ए-खुसुसी म्हणून आमदार संजयभाऊ देरकर (वणी विधानसभा) उपस्थित राहणार आहेत.जुलूस की सदारत जनाब अब्दुल कदीर सेठ (अध्यक्ष, जामा मश्जिद ट्रस्ट, वणी) करणार आहेत.

याशिवाय मेहमान-ए-खास म्हणून उपविभागीय अधिकारी नितीनकुमार हिंगोले, उपविभागीय पोलिस अधिकारी, सुरेश दलवे, तहसीलदार निखिल धुळधर, न.प. प्रशासक व मुख्याधिकारी, सचिन गाडे, पोलीस निरीक्षक गोपाल उंबरकर, तसेच हॉटेल जन्नतचे संचालक मोईस मिन्नाज शेख व मुफीझ इझार शेख उपस्थित राहणार आहेत.

यावेळी १०० गरजू लोकांना ब्लैंकेट वाटप करण्यात येणार आहे. तसेच ग्रामीण रुग्णालय वणी आणि मूक व बधीर अपंग विद्यालयात वाघदरा फळ वाटप करण्यात येणार आहे. सर्व उपक्रम जामा मस्जिद वणी कङून राबवीन्यात येत आहे अशी माहिती जामा मस्जिद चे सचिव बबलु भाई दिवांजी यानी दिली आहे.

जामा मश्जिद कमिटीने नागरिकांना या कार्यक्रमाला उपस्थित राहून मुलांचे मनोबल वाढविण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.