Thursday, April 16, 2026
Google search engine
HomeUncategorizedवणी - कायर मार्ग तत्काळ १५ दिवसात दुरुस्त करा अन्यथा मुख्यमंत्री व...

वणी – कायर मार्ग तत्काळ १५ दिवसात दुरुस्त करा अन्यथा मुख्यमंत्री व केंद्रीय रस्ते मंत्र्याचे पुतळे फुंकणार , राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) प्रशासनाला इशारा, जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

News Today

वणी :  मुकुटबन मार्गावरील घोंसा चौफुली ते १८ नंबर पूल हा तब्बल ६० कोटी रुपये खर्चून बांधण्यात आलेला रस्ता असून सध्या तो हमी कालावधीत (DLP) आहे. मात्र, या रस्त्याचा डांबरी पृष्ठभाग उखडून गेला असून ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहेत. यामुळे वाहनधारक आणि प्रवाशांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे. या संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार गट) वणी  तर्फे  उपविभागीय अधिकारी वणी यांचे मार्फत जिल्हाधिकारी यांना निवेदन सादर करण्यात आले.

जर ही रस्ते येत्या १५ दिवसात दुरुस्त न झाल्यास राज्याचे मुख्यमंत्री व केंद्रीय रस्ते विकास मंत्री यांचे त्याच खड्ड्यात पुतळे फुंकून निषेध. नोंदविण्यात येणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे. 

निवेदनातील आरोप :

ठेकेदार व सार्वजनिक बांधकाम विभागाने गंभीर दुर्लक्ष केले असून दर्जाहीन काम केले आहे.

प्रत्यक्षात रस्ता दुरुस्ती न करता, अधिकाऱ्यांनी शासनाची दिशाभूल करण्यासाठी जुनी छायाचित्रे अपलोड करून रस्ता सुरळीत असल्याचे खोटे दाखविले.

दोषी कंत्राटदारांना पाठीशी घालून अधिकाऱ्यांनी कर्तव्यच्युती केली आहे.

या सर्व प्रकारामुळे सार्वजनिक निधीचा अपव्यय होऊन शासनाची फसवणूक झाली आहे.

मागण्या :

१) रस्ता १५ दिवसांच्या आत उच्च दर्जाने दुरुस्त करण्यात यावा.
२) स्वतंत्र तांत्रिक व आर्थिक चौकशी समिती नेमून कामाची तपासणी करावी.
३) दोषी ठेकेदार व संबंधित अधिकारी (तत्कालीन व वर्तमान) यांच्यावर निलंबनासह दंडात्मक व कायदेशीर कारवाई करावी.
४) खोटी माहिती व जुनी छायाचित्रे सादर करणाऱ्यांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा.

आंदोलनाची चेतावणी :

राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) तर्फे स्पष्ट करण्यात आले की, वरील मागण्या १५ दिवसांच्या आत पूर्ण न झाल्यास रस्त्यावरील खड्ड्यात आंदोलन छेडले जाईल. तसेच राज्याचे मुख्यमंत्री व केंद्रीय सार्वजनिक बांधकाम मंत्री यांच्या पुतळ्यांचे दहन करून तीव्र निषेध करण्यात येईल.

प्रशासनावर प्रश्नचिन्ह :

६० कोटी रुपये खर्चून उभारलेला रस्ता हमी कालावधीतच खड्डेमय होणे ही अत्यंत गंभीर बाब असून, यावरून संबंधित विभागाच्या कामकाजावर मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. जिल्हा प्रशासन व सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने याकडे लक्ष देऊन दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) कडून करण्यात आली आहे.

 सदर निवेदन देते वेळी वणी विधानसभा क्षेत्राचे अध्यक्ष दिलीप भोयर, तालुकाध्यक्ष राजू वांढरे, उपाध्यक्ष महेंद्र चांदोरे, सचिव प्रदीप खोब्रागडे, शहराध्यक्ष विनोद ठेंगणे, युवा आघाडीचे तालुकाध्यक्ष सूर्यवीर चिकटे, मनोज दुर्गे, कुणाल झगझाप, विशाल मोतेकर, गणेश वाघाडे, शिवम आवारी, करण महाकुलकर, हर्षल मोते, निखिल चाफडे, आदी मान्यवर उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Today News

Most Popular

Visitor Counter