Friday, May 1, 2026
Google search engine
Home Blog Page 44

सिलेंडरच्या गॅस गळतीमुळे घराला लागली आग, आणि मोठी दुर्घटना….

0

सिलेंडरच्या गॅस गळतीमुळे लागली आग, आणि मोठी दुर्घटना….

News Today
दिलीप भोयर
वणी :- घरगुती सिलेंडर मधील गॅस गळतीमुळे लागलेल्या आगीत संपूर्ण घर जळून खाक झाल्याची घटना आज दुपारी २.३० वाजताच्या सुमारास वणी तालुक्यातील अमलोन येथे घडली. या आगीत घरातील सर्व साहित्य, उपकरणे , धान्य, कपडे जळून खाक झाले असून कोणतीही जीवित हानी न घडल्याने मोठी दुर्घटना टळली आहे.

आमलोन येथील तुळशीराम विठोबा ताजने यांच्या घरगुती वापरासाठी वापरण्यात येणाऱ्या गॅस सिलेंडर मधून अचानक गॅस गळती सुरू झाली. आज दुपारी घरची सर्व मंडळी घरी असताना त्यांची नात कु. पायल ताजने (२०) चहा बनविण्यासाठी स्वयंपाक घरात गेली व गॅसची शेगडी सुरू करून लायटर उगारले असता अचानक हवेत पसरलेल्या गॅसने भडका घेतला असता घरातील सर्व मंडळी घरा बाहेर निघाले. त्यामुळे सर्वांचा जीव वाचला परंतु चाय बनविण्यासाठी गेलेली नाती किरकोळ स्वरूपाची जखमी झाली. बघता बघता सर्व गावकऱ्यांच्या डोळ्यासमोर उभ घर राखेत बदलल्याने ताजने कुटुंबाचे लाखोंचे नुकसान झाले आहे. गावकऱ्यांच्या मदतीने आगीवर नियंत्रण मिळविले परंतु या घटनेत नेमके किती नुकसान झाले आहे. याचा पंचनामा होणे बाकी आहे. स्थानिक नागरिकांनी महसूल तलाठी यांना माहिती दिली असल्याची माहिती दिली आहे.

वणी शहरातील बांधलेले काँक्रिट रस्ते एका महिन्यात उद्ध्वस्त

0

जबाबदार कोण ? नगर पालिका, लोकप्रतीनिधी की जनता

News Today
दिलीप भोयर
वणी :- शहरातील अंतर्गत येणारे रस्ते नगर परिषद बांधकाम विभागा मार्फत मागील एका वर्षात शेकडो कोटींचे काँक्रिट पाण्यासारखे ओतून रस्ते बनविल्या जात जात आहे. परंतु या रस्त्याचा दर्जा मात्र प्रचंड नित्कृष असून याकडे प्रशासन व शासनाचे सर्रास दुर्लक्ष होताना दिसून येत असल्याने या प्रकाराला जबाबदार कोण? नगर पालिका, लोकप्रतिनिधी की जनता असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

सोशल मीडियावर स्थानिक नागरिकांनी वायरल केलेले रस्त्याचे फोटो वाचा खालील लिंक https://www.facebook.com/share/p/QzUkRsPoAWbJZKoB/

वणी विभागातील सार्वजनिक बांधकाम विभाग, नगर परिषद विभाग व इतर विभागामार्फत ज्या ज्या निविदा संबंधित विभागा मार्फत काढल्या जात आहे. त्या सर्व निविदा नियम व अटींना डावलून लोकप्रतिनिधींच्या मर्जीतील कंत्राटदाराला काम मिळण्यासाठी व्यवस्थितपणे सांभाळून घेवून निविदा अदा करण्यात येत आहे. यात मर्जीतील कंत्राटदार नित्कृष्ट दर्जाचे काम आटोपून कारोडोचे बिल वसून करीत आहे. विकासाच्या नावाखाली भकास कामाचा सुळसुळाट शहरात सद्या सुरू असून यात कमिशन खोरीच्या चिरीमिरीत सर्वच अधिकारी व लोकप्रतिनिधी मतवाल होताना दिसून येत आहे.
याचे जिवंत उदाहरण म्हणजे नांदेपेरा मार्गावरील हेडाऊ हॉस्पिटल समोरील पोस्ट कॉलनीत बांधलेला काँक्रिट रस्ता ओरडुन ओरडुन नित्कृष्ट दर्जेचा पुरावा सादर करीत आहे.
विधानसभेच्या निवडणुका अगदी तोंडावर आल्या असून वणी शहरातील बांधकाम झालेले सर्व रस्ते व बांधकाम चालू असलेले सर्व रस्ते हे नित्कृष्ट दर्जेचे रस्ते लोकप्रतिनिधींना धडा शिकविण्यासाठी पुरेसे असल्याच्या प्रतिक्रिया वणी शहर व ग्रामीण भागातून उमटत आहे.

 

शेतातील विजेच्या झटक्याने शेतकऱ्यांचा दुर्दैवी मृत्यू

0

News Today

दिलीप भोयर
वणी :- तालुक्यातील नेरड (पू.) येथील एका शेतकऱ्यांचा शेतातील जंगली जनावरांच्या सुरक्षेसाठी लावलेल्या जिवंत वीज प्रवाहाचा झटका लागून शेतकऱ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना मुकुटबन पोलिस स्टेशन हद्दीतील नेरड (पू.) शिवारात आज तारीख ११ रोजी दुपारच्या दरम्यान घडली आहे. विठ्ठल आनंदराव जूनगरी असे मृत शेतकऱ्यांचे नाव आहे.
मृतक शेतकरी हा जनावरांसाठी सोयाबीनचे कुटार आणायला मित्राच्या शेतात बैलबंडीने गेला असता कुटार बंडीत भरे पर्यंत बैल चरतील म्हणून सोडले असता  बैल चरता चरता शेता शेजरी असलेल्या नाल्यकडे गेले.  बैल दिसत नाही म्हणून सदर शेतकरी हे बैलाचा शोध घेण्यासाठी शेताच्या धुर्याकडे गेले असता त्या धुर्यावर जिवंत विजेचा प्रवाह असल्याने त्या प्रवाहाचा जोरदार झटका लागला त्यात जागीच शेतकऱ्यांचा मृत्यू झाला असल्याची माहिती आहे.
दुपारी कुटार आणायला गेलेला शेतकरी सायंकाळ झाली तरी घरी परत न आल्याने गावकऱ्यांनी त्यांचा शोध घेतला असता विठ्ठल जूनगरी यांचा  मृतदेह  आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आणि बघता बघता संपूर्ण परिसरात ही माहिती पसरली. वृत्त लीहेपर्यंत कोणतीही तक्रार पोलीसात दाखल झाली नव्हती.

वणी विधानसभेत भाजपच्या उमेदवारात बदल, कोण असणार नवीन चेहरा

0

लोकसभेची पुन:रावृत्ती टाळण्यासाठी पक्षश्रेष्ठीच्या हालचालींना वेग

दिलीप भोयर
वणी :- नुकत्याच तोंडावर आलेल्या विधान सभेच्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये लोकसभेसाठी पुन:रावृत्ती होऊ नये या दृष्टीकोनातून भारतीय जनता पार्टीकडून विद्यमान आमदार संजयरेड्डी बोदकुरवार यांची उमेदवारी रद्द करून नवीन चेहऱ्याला संधी देण्यासाठी हालचालींना वेग आल्याची माहिती खास सूत्रांकडून मिळाली आहे.
सन २०१४ ते २०१९ मध्ये मोदी लाटेत निवडून आलेले संजयरेड्डी बोदकुरवार हे भाजपचे २०२४ मध्ये देखील प्रबळ दावेदार म्हणून आज पर्यंत चर्चा होती. परंतु महाविकास आघाडी कडून वणी विधानसभेची उमेदवारी ही शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्या वाट्याला आल्याने भाजपमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. वणी विधानसभा क्षेत्रात ओबीसी कुणबी समाजाचे मतदार मोठ्या संख्येने असून त्यांचे सोबत धनगर,तेली. माळी व इतरही समाज मोठ्या प्रमाणात आहे. सातत्याने प्रस्तापित राजकीय पक्षाकडून ओबीसी सारख्या मोठ्या समाजाला डावलून अल्पसंख्येत असलेल्या समाजातील उमेदवरी देवून बहुसंख्य असलेल्या समाजाला डावल्याने काम सातत्याने सुरू असल्याने लोकसभेत घडलेला प्रकार भाजप अजून विसरला नाही. त्यामुळे येत्या विधानसभेत भाजपा कडून बहुसंख्य असलेल्या कुणबी समाजातील उमेदवाराचा शोध घेण्यास सुरवात केली आहे. यात प्रामुख्याने माजी जिल्हा परिषद सदस्य विजय पिदुरकार, माजी नगराध्यक्ष तरेंद्रा बोर्डे, विजय चोरडिया , रवी बेलुरकर तसेच दिनकर पावडे यांच्या नावाची चर्चा सुरू असून यातील नवीन चेहऱ्यांना संधी मिळण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.

वणीचा गड राखणे हा भाजपच्या प्रतीठेचा प्रश्न ?

चंद्रपूर लोकसभेतील चंद्रपूर, बलार्शा, वरोरा – भद्रावती , राजुरा, आर्णी व वणी या सहाही विधानसभा क्षेत्रात भाजपच्या मतदानात मोठी घासरम निर्माण झाली आहे. ओबीसी समाजाला एकत्रित बांधून ठेवणारे केंद्रीय मंत्री हंसराज अहिर यांना उमेदवारी न देता राज्याचे सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांना उमेदवारी देवून एकाप्रकारे आपल्याच पायावर कुऱ्हाड मारण्याचे काम भाजपने केले होते. याचाच वचपा मतदारांनी काढत भाजपला चारो खाणे चीत करीत माहविकास आघाडीच्या उमेदवार प्रतिभाताई धानोरकर यांना ऐतिहासिक मतांनी विजय मिळवून दिला होता. या पराजय भाजपाने चांगलाच मनावर घेतला होता. आता विधानसभेत जर भाजपाला वणी विधानसभेचा गड कायम राखायचा असेल तर नवीन चेहऱ्याला संधी देण्यापलीकडे दुसरा कोणताच पर्याय नाही. त्यामुळे पक्षश्रेष्ठी कडून नवीन उमेदवाराचा शोध सुरू असल्याची जोरदार चर्चा आहे.

   ऊबाठा गटाकडून तीन नावे चर्चेत

महाविकास आघाडी कडून शिवसेना (ऊबाठा) गटाला उमेदवारी जाहीर झाल्याने शिवसैनिकांच्या अश्या पल्लवित झाल्या आहेत. उमेदवारीसाठी माजी आमदार विश्वास नांदेकर, विधानसभा प्रमुख संजय देरकर, उपजिल्हा प्रमुख संजय निखाडे यांच्या नावाची चर्चा सुरू असून यातील कोणाच्या वाट्याला उमेदवारी जाईल याची प्रतीक्षा लागली आहे.

प्रधानमंत्र्याची कल्पना नंदोरीत झाली साकार : हंसराज अहिर

0

 

हजारो शेतकरयांची उपस्थिती शेतकरी उत्पादक कंपनी तथा तक्रार समाधान केंद्र कार्यालयाचे उद्घाटन

चंद्रपूर:- शेतकऱ्यांचं उत्पादन वाढलं आणि भावच नाही मिळाला तर काय करणार. भाव पाहिजे खरेददारी पाहिजे आणि खरेददारी पासून भाव पण योग्य मिळाला पाहिजे. उत्पादनात वाढ झाली पाहिजे. या सगळ्या गोष्टीची दखल घेऊन प्रधानमंत्री महोदयांनी घेतलेली काम याला यश आले आहे. कापसापासून हरभऱ्या पर्यंत चांगले भाव सरकारनी हमीभाव वाढविला. नरेंद्र जीवतोडे यांनी आपली कंपनी स्थापन केली. गावात जाऊन आपला माल शेतकऱ्यांनी विकला पाहिजे. भाव योग्य आला पाहिजे. आपल उत्पादनाच प्रोसेसिंग केल पाहिजे. व्यापाऱ्याच्या माध्यमातून उत्पादन विकण्यापेक्षा आपल्या शेतकऱ्यांच्या कंपन्या स्थापन करून विका ही प्रधानमंत्र्यांची कल्पना नंदोरी गावात साकार होत आहे. असा विश्वास भारत सरकारचे राष्ट्रीय मागासवर्गीस आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर यांनी व्यक्त केला.

चंद्रपुर नागपुर महामार्गावरील शेतकरी उत्पादक कंपनी महासंघ चंद्रपुरच्या कार्यालयाचे तथा शेतकरी तक्रार समाधान केंद्र कार्यालयाचे उद्घाटन भारत सरकारचे राष्ट्रीय मागासवर्गीस आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर यांच्या हस्ते सायंकाळी 6 वाजता पार पडले.या शेतकरी उत्पादक कंपनी च्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या शेतात तयार होणारे पिके थेट ग्राहकांपर्यंत विक्रीस उपलब्ध राहणार आहे. तर शेतकऱ्यांना योग्य भाव मिळावा या करीता स्टोरेज तयार करण्यात आले आहे. या कंपनीच्या माध्यमातून आता शेतकऱ्यांना आपल्या पिकांचा योग्य मोबदला मिळणार आहे. तर शेतकऱ्यांसाठी शासनाकडून अनेक योजना राबविल्या जात आहे. मात्र प्रशासनाकडून, प्रशासकीय यंत्रणेकडून योग्य अमलबजावणी होत नसल्याने अनेक योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहचतच नाही. केंद्र व राज्य सरकारकडून शेतकऱ्यांना प्रधानमंत्री किसान योजने अंतर्गत 2000 रुपये देण्यात येतात. मात्र या योजनेचा लाभ अजूनही अनेक शेतकऱ्यांना मिळत नाही. काही शेतकऱ्यांची प्रकरणे त्रुटीत आहे. या सोबत अनेक योजनाचे प्रशासनाकडून शेतकऱ्यांचे समाधान होत नाही.

यामुळे शेतकऱ्यांना मानसिक, शारीरिक व आर्थिक नुकसान होत असल्याने या शेतकरी उत्पादक कंपनीत शेतकऱ्यांसाठी शेतकरी समाधान तक्रार केंद्र कार्यालय उघडण्यात आल्याचे शेतकरी उत्पादक कंपनी चंद्रपुरचे अध्यक्ष नरेंद्र जीवतोडे यांनी यावेळी सांगितले.

या उद्घाटन सोहळ्या प्रसंगी भारत सरकारचे राष्ट्रीय मागासवर्गीस आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर, डॉक्टर सागर वझे, किशोर टोंगे, रमेश राजूरकर, तालुका सरपंच संघटनेचे अध्यक्ष प्रदीप महाकुलकर, चंद्रकांत गुंडावार, संजय लोहकरे, नितिन मेहता, विजय वानखेडे, अफजल भाई, सुनील नामोजवर, पंचायत समिती माजी सभापती प्रवीण ठेंगणे, सामाजिक कार्यकर्ते दादा झाडे, चंद्रपुर शेतकरी उत्पादक महासंघाचे पदाधिकारी बालाजी धोबे, सतीश बावणे, बळीराम डोंगरकर, संदीप एकरे, प्रकाश निब्रड गावातील सरपंच, सेवा सहकारी संस्थेचे अध्यक्ष तथा महिला मंडळ सह वरोरा भद्रावती तालुक्यातील हजारो शेतकरी बांधव व महिला उपस्थित होते. या उद्घाटन सोहळ्याचे संचालन व आभार संदीप झाडे यांनी मानले.

भाकाप मध्ये इंकमिंग सुरूच

0
  • News Today 
  • वणी :- भारतिय कम्युनिस्ट पक्षात ग्रामीणांचे ईनकमींग सुरूच.वि‌धानसभा उमेदवार कॉ.अनिल हेपट यांचा झंजावात सुरू.वती,मारेगाव,झरी तालुक्यातील प्रत्येक गावात प्रत्येक घरी पोहोचण्याचे लक्ष. वणी विधानसभा मतदारसंघातील बुथ बांधणी कार्यक्रमांतर्गतबोर्डा, कायर,मुकुटबन, मार्की,  झरी, कोसारा,डोंगरगाव येथे बुथ बांधणी करण्यात आली.याप्रसंगी भाकपचे राष्ट्रीय कौंसिलर कॉ.तुकाराम भस्मे,विधानसभा उमेदवार कॉ.अनिल हेपट,जिल्हासचिव कॉ.अनिल घाटे उपस्थित होते.कॉ.अनिल हेपट यांचे नेतृत्वावर विस्वास ठेऊन वरील गावातील शेकडो नागरिकांनी भाकपमध्ये प्रवेश घेतला.

वंचीतचे विधानसभा अध्यक्ष दिलीप भोयर सहकाऱ्यांसह राष्ट्रवादीत

0

मुंबईत पक्षप्रमुख शरदचंद्र पवार यांच्या उपस्थित घेतला प्रवेश

News Today


वणी :- येथील वंचित बहुजन आघाडीचे विधानसभा अध्यक्ष तथा ओबीसी समाजाचे नेते दिलीप भोयर यांनी ता. २७ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष शरदचंद्र पवार यांची मुंबई येथील वसंतराव चव्हाण सेंटर येथे भेट घेवून आपल्या सहकाऱ्यासह पक्ष प्रवेश घेतला आहे. यामुळे वणी विभागात रॉकापला चांगली बळकटी मिळणार आहे.

सामाजिक कामात अग्रेसर असलेले दिलीप भोयर यांनी मागील ४ वर्षा अगोदर वंचित बहुजन आघाडीमध्ये प्रवेश घेतला होता त्यांनी वंचितचे तालुका अध्यक्षपद व नंतर विधानसभा अध्यक्ष अशी त्यांची वर्णी लागली होती. त्यांनी वंचित बहुजन आघाडीला पण मोठ्या प्रमाणात मजबूत केले होते. ऐन विधानसभेच्या तोंडावर त्यांनी वंचित बहुजन आघाडीला जय भीम करत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात पार्टीच्या प्रदेश सरचिटणीस डॉ. ऍड. अंजली साळवे (विटणकर) यांच्या नेतृत्वात तर माजी आमदार संदीप बाजोरिया, व जिल्हाध्यक्षा वर्षाताई निकम, यांच्या मार्गदर्शनाखाली आणि वणी विधानसभा अध्यक्ष सूर्यकांत खाडे व मारेगाव तालुकाध्यक्ष भारत मत्ते यांचे उपस्थितीत दिलीप भोयर यांचे सोबत बळीराजा पार्टीचे विधानसभा अध्यक्ष रामदास पखाले, वंचितचे तालुका उपाध्यक्ष मंगेश गोरे, वंचीत युवा शाखेचे शहर उपाध्यक्ष मनोज दुर्गे, वंचितचे तालुकासह सचिव प्यारेलाल मेश्राम, निंबाळा येथील माजी सरपंच चंपत पाचाभाई, सामाजिक कार्यकर्ते अतुल पिदूरकर, शरद खुसपूरे, गणराज टेकाम, घाटंजी येथील विलास साबापूरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार यामध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कार्यकर्त्यात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

तघ्टफब

0

फवभजनंनक्क्घब

filter: 0; fileterIntensity: 0.0; filterMask: 0; brp_mask:0;
brp_del_th:null;
brp_del_sen:null;
delta:null;
module: photo;hw-remosaic: false;touch: (-1.0, -1.0);sceneMode: 8;cct_value: 0;AI_Scene: (-1, -1);aec_lux: 0.0;aec_lux_index: 0;albedo: ;confidence: ;motionLevel: -1;weatherinfo: null;temperature: 36;

Eminem – Stronger Than I Was

0

We woke reasonably late following the feast and free flowing wine the night before. After gathering ourselves and our packs, we headed down to our homestay family’s small dining room for breakfast.

Refreshingly, what was expected of her was the same thing that was expected of Lara Stone: to take a beautiful picture.

We were making our way to the Rila Mountains, where we were visiting the Rila Monastery where we enjoyed scrambled eggs, toast, mekitsi, local jam and peppermint tea.

We wandered the site with other tourists

Yet strangely the place did not seem crowded. I’m not sure if it was the sheer size of the place, or whether the masses congregated in one area and didn’t venture far from the main church, but I didn’t feel overwhelmed by tourists in the monastery.

Headed over Lions Bridge and made our way to the Sofia Synagogue, then sheltered in the Central Market Hall until the recurrent (but short-lived) mid-afternoon rain passed.

Feeling refreshed after an espresso, we walked a short distance to the small but welcoming Banya Bashi Mosque, then descended into the ancient Serdica complex.

We were exhausted after a long day of travel, so we headed back to the hotel and crashed.

I had low expectations about Sofia as a city, but after the walking tour I absolutely loved the place. This was an easy city to navigate, and it was a beautiful city – despite its ugly, staunch and stolid communist-built surrounds. Sofia has a very average facade as you enter the city, but once you lose yourself in the old town area, everything changes.

Clothes can transform your mood and confidence. Fashion moves so quickly that, unless you have a strong point of view, you can lose integrity. I like to be real. I don’t like things to be staged or fussy. I think I’d go mad if I didn’t have a place to escape to. You have to stay true to your heritage, that’s what your brand is about.

Dj Dark – Chill Vibes

0

We woke reasonably late following the feast and free flowing wine the night before. After gathering ourselves and our packs, we headed down to our homestay family’s small dining room for breakfast.

Refreshingly, what was expected of her was the same thing that was expected of Lara Stone: to take a beautiful picture.

We were making our way to the Rila Mountains, where we were visiting the Rila Monastery where we enjoyed scrambled eggs, toast, mekitsi, local jam and peppermint tea.

We wandered the site with other tourists

Yet strangely the place did not seem crowded. I’m not sure if it was the sheer size of the place, or whether the masses congregated in one area and didn’t venture far from the main church, but I didn’t feel overwhelmed by tourists in the monastery.

Headed over Lions Bridge and made our way to the Sofia Synagogue, then sheltered in the Central Market Hall until the recurrent (but short-lived) mid-afternoon rain passed.

Feeling refreshed after an espresso, we walked a short distance to the small but welcoming Banya Bashi Mosque, then descended into the ancient Serdica complex.

We were exhausted after a long day of travel, so we headed back to the hotel and crashed.

I had low expectations about Sofia as a city, but after the walking tour I absolutely loved the place. This was an easy city to navigate, and it was a beautiful city – despite its ugly, staunch and stolid communist-built surrounds. Sofia has a very average facade as you enter the city, but once you lose yourself in the old town area, everything changes.

Clothes can transform your mood and confidence. Fashion moves so quickly that, unless you have a strong point of view, you can lose integrity. I like to be real. I don’t like things to be staged or fussy. I think I’d go mad if I didn’t have a place to escape to. You have to stay true to your heritage, that’s what your brand is about.