Wednesday, July 29, 2026
Google search engine
Home Blog Page 43

दहा दिवसांपासून रेल्वे सायडिंगवर पाणी मारणे बंद , युवा सेनेने सायडिंग अधिकाऱ्याला धरले धारेवर 

0

    प्रदूषणाच्या वाढीमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात

News Today 

दिलीप भोयर

वणी: येथील कोळशाच्या रेल्वे साईडिंगवर मागील १० दिवसांपासून पाणी मारणे बंद असल्याने प्रदूषणात कमालीची वाढ झाली आहे. याबाबत परिसरातील काही नागरिकांनी युवासेनेचे जिल्हा उपाध्यक्ष अजिंक्य शेंडे यांची भेट घेऊन समस्या सांगितली असता अजिंक्य शेंडे यांनी सायडिंग मॅनेजर यांची भेट घेऊन सोमवार २८ ऑक्टोबर पर्यत जर पाणी मारणे सुरु न केल्यास कोळष्याची एकही गाडी सायडिंगवर येऊ देणार नसल्याची तंबी देवून मॅनेजरला चांगलेच धारेवर धरले होते. 

  वणी तालुका हा खनिज संपत्तीने भरलेला आहे. या परिसरातून मोठया प्रमाणात कोळसा हा वीज निर्मितीसाठी पॉवर प्लॉटला पाठविला जातो. वाहतुकीसाठी मालगाडीचा उपयोग केला जातो. सदर कोळसा हा वणीतील रेल्वे सायडिंगवर ट्रकने पोहचविल्या जातो. व त्यानंतर मालगाडीत भरून विविध पॉवर प्लांटमध्ये पाठविण्यात येतो. यावेळी धूळ उडू नये म्हणून पाणी मारण्याचे टेंडर सरकारकडून काढल्या जाते. असेच टेंडर वणी सायडिंगबाबतही काढल्या गेले. या ठिकाणी १२ हजार लिटर पाणी टँकर क्षमता असलेल्या टँकरचा उपयोग केल्या जावा असा नियम आहे. परंतु या ठिकाणी ट्रॅक्टर ने पाणी मारल्या जात आहे. आणि हा प्रकार गेल्या १० दिवसांपासून सुरू आहे. जेव्हा टेंडर घेणाऱ्याकडे १२ हजार लिटर क्षमता असलेले वाहन नाही तेव्हा त्याला टेंडर दिला तरी कसा?असा प्रश्न उपस्थित झाला आहे. मागील १०दिवसांपासून ट्रॅक्टर ने पाणी मारणे सुरू असतांना सायडिंग इंचार्ज मूंग गिळून गप्प का? असा सवाल उपस्थित होतो.  

  या सर्व प्रकारबाबत परिसरातील महिलांनी २६ ऑक्टोबर रोजी युवासेना जिल्हा उपाध्यक्ष अजिंक्य शेंडे यांना भेटल्या व अजिंक्य यांनी तात्काळ सायडिंग इंचार्ज श्रवण कुमार यांची भेट घेतली व चांगलीच कानउघडणी केली. तुम्हाला सर्व प्रकार माहीत असतांना या टेंडर घेणाऱ्यावर काय कारवाई केली. लोकांना अनेक आजाराला या धुळीमुळे समोर जावे लागत आहे. श्वसनाचे अनेक आजाराने परिसरातील जनता त्रस्त आहे. व आपण यावर कोणतीही कारवाई करीत नाही. जर सोमवार २८ ऑक्टोबर पर्यत असेच सुरू राहल्यास युवासेनेचे कार्यकते, परिसरातील जनतेला घेऊन आंदोलनाचा इशारा दिला. व एकही गाडी सायडिंगवर खाली होऊ देणार नसल्याचे सांगितले. होणाऱ्या नुकसानीची संपूर्ण जबाबदारी सायडिंग इंचार्ज व संबंधित अधिक्कार्यांची राहणार असल्याचे सांगण्यात आले. यावेळी युवा सेनेचे बादल येसेकर, आर्या राउत, रुद्राक्ष सिडाम, हेमंत चवले, रोहन गंदेवार, महेश बलकी, निलेश कडूकर, आदित्य पेटकर, ईशान झाडे, गोलू बलकी, धनु मडावी, तेजस नागपुरे, किशोर ठाकरे, रोशन काकडे उपस्थित होते.

संबंनधित ठेकेदाराला आम्ही पत्र दिले आहे. व अशीच तक्रार वेकोलीच्या वरिष्ठ अधिकाऱ्याला करण्यात आली आहे. सदर ठेकेदारावर कारवाई करण्याचा अधिकार हा माझा नसून वरिष्ठ अधिकाऱ्यांचा आहे. सायडिंग इंचार्ज श्रवण कुमार यांनी सांगितले.

लाडक्या नातीच्या वाढदिवसानिमित्त समाज प्रबोधनाच्या कार्यक्रमाचे आयोजन

0

राष्ट्रीय चर्मकार संघटनेचे विदर्भाध्यक्षा संबा वाघमारे यांच्या स्तूत उपक्रम

News Today 

दिलीप भोयर
वणी :- येथील वसंत गंगा विहार कॉलनीतील रहिवासी संबाजी वाघमारे यांनी आपल्या लाडकी नात कु. अन्वी अतुल वाघमारे हिच्या वाढदिवसानिमित्त लोकसंत सप्त खंजिरी वादक सत्यपाल महाराज यांचे शिष्य पवणपाल महाराज वडाळीकर यांचे जाहीर राष्ट्रीय कीर्तन व समाज प्रबोधनपर कार्यक्रमाचे आयोजन तारीख ६ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता कॉलनीतील खुल्या मैदानावर आयोजित केला आहे.

पवनपाल महारांचे कीर्तन हे सप्तखांजेरी वादनावर असून वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या ग्रामगीता विचारावर व त्यांच्या उपदेशावर असतात त्याच बरोबर मनोरंजन, धार्मिकता व राष्ट्रीय एकात्मतेवर असतात. त्यांचे कीर्तन राज्यासह इतरही राज्यात प्रचंड गाजलेले आहे. ते एक. नामवांत कीर्तनकारा आहे . त्यांच्या संचासह ते कीर्तनाचे सादरीकरण करतात संगीतमय आणि चालू घडामोडींवर त्यांचे कीर्तन सपंन होत असल्याने अनेकांना त्यांचे कीर्तन ऐकायची  आस लागलेली असते असे प्रसिद्ध किर्तनकार वणीत येत आहे. 

या कार्यक्रमाच्या निमित्ताने वसंत गंगा विहारवासी व राष्ट्रीय चर्मकार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना व कार्यकर्त्यांना एक वैचारिक मेजवानी मिळणार आहे. तरी या कार्यक्रमाला वणी तालुक्यातील, शहरातील, कॉलनीतील सर्व नागरिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन राष्ट्रीय चर्मकार संघ व वसंत गंगा विहार कॉलोनी परिवाराच्या वतीने संबाजी वाघमारे यांनी केले आहे. या अनोख्या स्तुत्य उपक्रमाची संपूर्ण शहरात कौतुक केल्या जात आहे. तर कू. अंवी हिला  सर्वांचे आशीर्वाद व शुभेच्छा मिळत आहे.

घरी जावून विश्वास नांदेकरांना शेकडो शिवसैनिकांचे साकडे, राजकीय वातावरण तापले, खा. संजय देशमुख उद्या वणीत

0

खासदार संजय देशमुख उद्या नांदेकरांच्या भेटीला 

News Today
दिलीप भोयर
वणी :- येथील विधानसभेची जागा शिवसेना (उबाठा) गटाला गेली असली तरी उमेदवारांच्या निवडीबाबत काही शिवसौनीच्या मनातील उमेदवारांची जागा मात्र अजूनही कायम असल्याने आज दुपारी १२ वाजता शेकडो शिवसैनिक व पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख तथा माजी आमदार विश्वास नांदेकर यांच्या घरी जावून त्यांना साकडे घातल्याने वणीतील राजकीय वातावरण प्रचंड तापले आहे. त्यामुळे उद्या शिवसेनेचे खासदार संजय देशमुख हे नांदेकरांच्या भेटीयला येणार असल्याची माहिती आहे.


महाविकास आघाडी कडून शिवसेना (उबाठा) गटाला ही जागा देण्यात आली व संजय देरकर यांच्या नावाची उमेदवार म्हणून निवड झाली. या उमेदवारी करिता माजी आमदार विश्वास नांदेकर हे देखील दावेदारी करीत होते. विश्वास नांदेकर हे १९८९ पासून शिवसेनेत काम करीत असून शिवसेनेचे ते तालुकाध्यक्ष देखील पद भूषविले आहे. त्याच बरोबर ते २००२ च्या स्थानिक स्वराज्य संस्थेतील निवडणुकीत ते जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडून आले होते.

त्यानंतर त्यांनी २००४ मध्ये विधानसभा निवडणूक लढवून आमदार देखील झाले होते. एक निष्ठावंत शिवसैनिक म्हणून त्यांच्याकडे संपूर्ण विधानसभा मतदार संघात ओळखल्या जाते. त्यांच्या जिल्हा परिषद व आमदारकीच्या कारकीर्द अत्यंत प्रभावी असून अधिकारी वर्ग आजही त्यांच्या नावाने घाबरत असतात. त्याच बरोबर त्यांनी त्यांच्या आमदारकीच्या विधानसभा क्षेत्रात सन २००४ ते २००९ असे पाच वर्ष एकही अवैध व्यवसाय देखील त्यांनी चालू दिले नाही. जनतेच्या कामात कामचुकारपणा करणाऱ्या अधिकाऱ्यांना व कर्मचाऱ्यांची त्यांनी कधीच हयगय गेली नाही. प्रशासनाला सुता सारखं सरळ करून चालविण्याची धम्मक विश्वास नांदेकरामध्ये होती अशी आजही मतदार संघात चर्चा आहे.

ज्या वेळी खोके घेवून बोक्यांनी शिवसेने सोबत गद्दारी केली. त्यावेळी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असणारे जिल्ह्यातील एकमेव नेते म्हणाजे विश्वास नांदेकर होते. म्हणून तर आजही तडागळातील शिवसैनिक हा विश्वासभाऊ म्हणेल तेच करायला पेटून उठतात आजही तोच रुबाब व तोच दरारा मतदार संघात त्यांचा कायम आहे.


महाविकास आघाडीला वणी विधानसभा क्षेत्रात विजयाचा झेंडा रोवायचा असेल तर विश्वासभाऊ म्हणेल तोच आमदार व तोच कामदार ठरवण्याची ताकत त्यांच्या शब्दात आहे. याची जाणीव शिवसेनेला असल्याने नाराज असलेल्या शिवसैनिकांना व विश्वास भाऊवर आजही विश्वास टाकणाऱ्या हजारो शिवसैनिकांची मनधरणी करण्यासाठी चक्क खासदार संजय देशमुख व जिल्ह्यातील इतर पदाधिकारी उद्या वणीत दाखल होणार आहे.

संजय दरेकर यांनी घेतली विश्वास नांदेकर व वामनराव कासावारांची भेट

महाविकास आघाडीचे उमेदवार संजय देरकर यांनी काल शिवसेनेचे जिल्हाप्रमुख तथा माजी आमदार विश्वास नांदेकर व काँग्रेसचे माजी आमदार वामनराव कासावार यांची भेट घेतली व पुढील निवडणुकीची धुरा आपल्या खांद्यावर घेण्याची विनंती केली असता दोघांनी ही त्यांना आम्ही सोबत राहू अशी ग्वाही दिल्याची माहिती आहे. काँग्रेस , शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस. एकत्रित असल्याने महा विकास आघाडीचा विजय निच्छित असल्याचे बोलल्या जात आहे. विश्वासभाऊ नांदेकर हे जनतेला अभद्र युती सरकारला घालवण्यासाठी निश्चितच महाविकास आघाडीचे उमेदवारालाच निवडणून आणण्यासाठी महत्वाची भुमिका पार पाडतील असा विश्वास शिवसैनिक व सर्व घटक पक्ष जनता व्यक्त करीत आहे.

दिल्लीत काढल्या जात आहे काँग्रेस नेते संजय खाडे यांची समजूत 

0

खासदार प्रतिभाताई धानोरकर यांची पक्षश्रेष्ठी सोबत बैठका सुरू

News Today 

दिलीप भोयर

वणी :- येथील काँग्रेस पक्षाचे धडाडीचे नेते संजय खाडे यांनी अपक्ष निवडणूक लढविण्याचा पवित्रा घेतल्याने महाविकस आघाडीत बिघडी होण्याची चिन्हं निदर्शनास आले आहे. खासदार प्रतिभाताई धानोरकर यांनी संजय खाडे यांना तातडीने  दिल्ली येथे पाचारण करण्यात केले आहे. त्यांची मनधरणी ज्येष्ठ पक्षश्रेष्ठी कडून केल्या जात असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

वणी विधानसभेत काँग्रेस पक्ष चांगला मजबूत आहे. त्याच बरोबर संजय खाडे यांनी मागील दोन वर्षात काँग्रेस पक्षासाठी अप्रतिम कामगिरी देखील केली आहे. अनेक सामाजिक कामात त्याचा हिररीने सहभाग असायला त्याच बरोबर अनेक स्तुत उपक्रम देखील त्यांनी राबविले आहे. तसेच ते खासदार प्रतिभाताई धानोरकर यांचे अगदी निकटवर्तिय म्हणून ओळखल्या जाते आहे. संजय खाडे यांनाच उमेदवारी मिळावी असा आग्रह देखील खासदार धानोरकर यांनी पक्षश्रेष्ठी कडे धरला होता. त्याचं बरोबर सांगली पॅटर्न करण्यात येईल असे देखील बोलल्या गेले होते. परंतु वणी विधानसभा ही काँग्रेसच्या वाट्याला न जाता शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्या वाट्याला आल्याने ती जागा शांत व  सयंमी नेतृत्व करणारे सर्वच्या मनात जागा करून असणारे एक स्वच्छ व पारदर्शक प्रतिमेच व्यक्तिमत्त्व असलेले संजय देरकर यांना मिळाली आहे. सदर जागा ही शिवसेनेच्या वाट्याला गेल्याने खाडे यांचा थोडाफार हिरमोड झाला आहे. त्यामुळे खाडे  नाराज असल्याचे बोलल्या जात आहे. 

महाविकास आघाडीतील कोणतेही नेते अपक्ष उमेदवारी भरून निवडणुकीच्या रिंगणात उतरल्यास महाविकास आघडीचेच नुकसान होईल त्यामुळे असा प्रकार कोणत्याही मतदार संघात घडू नये यासाठी सर्व पक्ष आपापल्या नाराज उमेदवारांची नाराजी दूर करीत आहे. याचाच भाग म्हणून संजय खाडे यांना पक्ष श्रेष्ठी कडून दिल्लीत बोलवण्यात आले आहे. त्यांची मनधरणी सुरू असून यात यश निछित येणार आहे.

संजय खाडे हे एक समजदार व मोठ्या मनाचं व्यक्तिमत्व असून ते कोणतीही चूक करणार नाही असा विश्वास मतदारांना  आहे. दिल्ली येथे त्यांचे बरोबर  खासदार प्रतिभाताई धानोरकर व काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रफुल मानकर हे उपस्थित आहे. या घडामोडीत सकारात्मक विचार होत असल्याची माहिती मिळाली आहे. त्यामुळे महाविकास आघडीचा कोणताही धोका निर्माण होणार नाही अशी चर्चा राजकीय वर्तुळात चालू आहे. सर्व मतदार खाडे यांच्या पार्टीची प्रतीक्षा धरून आहे. ते परतताच संजय देरकर हे त्यांची भेट घेणार आहे.

गळा आवळून इस्माची हत्या, वाचा सविस्तर वृत्त

0

     मारेगावत कुंभा – बोटोनी मार्गवर इस्माची हत्या 

News Today

दिलीप भोयर

वणी :- येथून जवळच असलेल्या मारेगाव पोलिस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या कुंभा – बोटोणी मार्गावर काल तारीख २४ रोजी रात्रीच्या दरम्यान एका इसमाचा ओळनीने गळा आवरून हत्या झाल्याची घटना आज दुपारी उघडकीस आली आहे. भीमराव तुकाराम मडावी असे या घटतेन मृत झालेल्या इस्माचे नाव आहे.

मारेगाव तालुक्यातील बाभळी पोड (श्रीरामपूर) येथील भीमराव मडावी वय ३१ असे या हत्तेतील घटनेत मृत्यू झालेल्या व्यक्ती आज तारीख २५ रोजी सकाळी ९ वाजताच्या सुमारास कुंभा – बोटोनी मार्गावर बोटोनी पासून २किमी अंतरावर मृत अवस्थेत पडून असल्याची माहिती मारेगाव पोलिसांना मिळताच पोलिस स्टेशनचे राजू टेकाम व दत्ता मडावी यांनी घटनास्थळ गाठून  घटनास्थळ पंचनामा करून मृतदेह उत्तरीय चाचणीसाठी मारेगावं ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता प्राथमिक तपासणीत त्याच्या गळ्याला  गळा आवळून मारल्याच्या खुणा आढळल्या मारेगाव पोलिस स्टेशनचे ठाणेदार संजय सोळखे यांनी या घटनेची माहिती पोलिस उपविभागीय अधिकारी गणेश किंद्रे यांना दिली.

उपविभागीय पोलिस अधिकारी गणेश किंद्रे यांनी तात्काळ मारेगाव गाठले व तपासाची सूत्र हलवले असता हा खून असल्याचे निष्पन्न झाले असून काही संशयितांना ताब्यात घेवून विचारपूस चालू असल्याची माहिती आहे. वृत्त लीहेपर्यंत कोणताही गुन्हा नोंद झाला नव्हता या घटनेचा वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास चालू आहे. 

महाविकास आघाडीचे उमेदवार संजय देरकरांच्या स्वागतानेच विरोधाची हवा गुल

0

   संजय देरकरांचे वणीत जल्लोषात स्वागत,                 शिवसैनिकांमध्ये प्रचंड उत्साह

        महाविकास आघाडीच्या आशा पल्लवित

News Today 

दिलीप भोयर

वणी :- महाविकास आघाडीच्या कोट्यातून वणी विधानसभेची जागा शिवसेना (उबाठा) गटाला गेली व संजय देरकर  यांना उमेदवारी जाहीर होताच मतदरांध्ये सहानुभूतीची लाट निर्माण झाली आहे. संजय देरकर हे आज तारीख २५ रोजी दुपारी १२ वाजता मुंबई येथून परत येताच त्यांचे नंदेश्वर देवस्थानासमोर हजारो शिवसैनिक व महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी एकत्रित येवून त्यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. यावेळी तमाम शिवसैनिकांमध्ये प्रचंड उत्साह दिसून येत होता त्यामुळे महाविकास आघाडीच्या अश्या पल्लवित झाल्या आहे. 

मागील चार ते पाच दिवसांपासून महाविकास आघाडीतील वणी विधानसभेचा तिढा सुटता सुटत नव्हता त्यामुळे (उबाठा) गटाचे उमेदवार हे मुब्बई येथे ठाण मांडून बसून होते. शेवटी महाविकास आघाडी कडून वणी विधान सभेची जागा शिवसेना (उबाठा) गटाच्या वाट्याला आली व संजय देरकर यांना उमेदवारी जाहीर झाली. तेव्हा पासून ते मुंबईतच मुक्कामी होते. शेवटी पक्षाचा बी. फॉर्म घेवून त्यांनी मुब्बई सोडली. व आज दुपारी ते वणीत दाखल होताच उत्साही शिवसैनिकांनी त्यांचे मोठ्या जल्लोषात स्वागत केले.

यावेळी संजय देरकर यांनी सर्व कार्यकर्त्यांना सोबत सोबत घेवून छञपती शिवाजी महाराज, डॉ बाबासाहेब आंबेडकर, स्व. बाळासाहेब ठाकरे, संत जगन्नाथ महाराज, पाण्याच्या टाकी जवळील दर्गा, जय परसापेन मंदिरात पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी ढोल ताशांच्या गजरासह हजारो कार्यकर्ते उपस्थित होते.

   संजय देरकरांच्या स्वागतानेच विरोधाची हवा गुल

महाविकस आघाडीचे उमेदवार संजय देरकर हे वणीत दाखल होताच वणी विधानसभेतील हजारो कार्यकर्ते स्वयंमपूर्तीने त्यांच्या स्वागतासाठी उपस्थित होते. संजय देरकरांच्या जल्लोषात स्वागत बघूनच विरोधाची हवा गुल झाल्याची प्रतिक्रिया मतदारांकडून ऐकायला येत होती.

इलेक्ट्रिक वोटिंग मशीन (evm) ही हँक होवू शकते – जगप्रसिद्ध अमेरिकन वैधानिक एलन मस्क यांचा दावा

0

कुठ गेला निवडणूक आयोग, इलान मस्क वर कारवाई करणार का ?

इलेक्ट्रिक वोटिंग मशीन चोर आहे, निवडणूक आयोग चोरो का सरदार तर नाही ना?

News Today 

दिलीप भोयर

वणी :- जगप्रसिद्ध श्रीमंत आणि वैद्यानिक संस्था चालविणारे अमेरिकेतील नागरिक एलन मस्क यांनी पुन्हा एकदा इलेक्ट्रिक वोटिंग मशीन (EVM)  संदर्भात आपली शंका नाही तर खात्री पटवून सांगितले आहे की इलेक्ट्रिक वोटिंग मशीन ही संगणकीय प्रणालीवरुन मतांची हेराफेरी करू शकते किंव्हा त्यातील मतदानात फरक करणे हे शक्य आहे. असा दावा त्यांनी एका कार्यक्रमात बोलताना केल्याने भारतातील निवडणूक प्रणालीवर मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. एकीकडे EVM मशीन पारदर्शक असून यात कोणताही बदल होत नसल्याचा दावा करणारे निवडणूक आयोग एलन मस्कवर कारवाई करण्याचे धाडस दाखवतील का ? असा प्रश्न प्रत्येक भारतीयांच्या मनात निर्माण झाला आहे.

भारत देश हा एक लोकशाही प्रधान देश असून इथे २६ जानेवारी १९५० पासून भारतीय संविधान लागू झाले व देशाला लोकशाही मिळाली आहे. तेव्हा पासून निवडणूक प्रणाली व्दारे देशाचे सरकार निवडल्या जात आहे. निवडणूक प्रणाली मध्ये कागदी मतपत्रिका वापरून निवडणूक प्रक्रिया पूर्ण होत होती. परंतु सन २००४ पासून भारतात Evm मशीनचा वापर होऊन कागदी मतपत्रिकेला पूर्ण विराम दिला आहे. सन २००४ ते २००९ मध्ये वापरण्यात झालेल्या निवडणुकीत EVM मशीन संदर्भात शंका निर्माण करून भाजपचे  ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी आणि खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी एक जनहित याचिका दिल्ली उच्च न्यायालयात दाखल केली होती. आणि यात गडबली होवू शकते असा निर्वाळा देखील न्यायालयाने दिला आहे. तरी देखील निवडणूक आयोग आजही ही बाब माणायला तयार नाही. आणि निवडणूक आयोगाने आता तर फतवा काढला आहे की, ज्यांच्या कडून  evm मशीन संदर्भात चुकीची अफवा पसरविल्या जाईल त्यांचेवर उचित कारवाई करण्यात येईल. मग एलान मस्क यांनी जे विधान केलं आहे. ते चुकीचे अथवा अफवा पसरविणारे असेल तर त्यांचेवर कारवाई करण्यासाठी भारतातील निवडणूक आयोग धजावल का ? असा प्रश्न निर्माण झाला आहे. 

एलान मस्क यांच्या मतांप्रमाने जर evm मशीन मध्ये गडबड होत असेल तर देशात निवडणूक प्रक्रिया केवळ जनतेच्या डोळ्यात धूळफेक करणारी प्रक्रिया ठरतं आहे. देशाच्या नागरिकांचे भविष्य सरकारच्या हातात असतं आणि जर सरकारमध्ये चोर लुटारू , गद्दार लोक जर EVM मशीन मध्ये गडबड करून सत्तेत बसत असेल तर नीच्छितपणे देशाचे देशाच्या नागरिकांचे आणि देशाच्या भावीपीडीचे भविष्य उद्ध्वस्त होणार आहे. मागील २० वर्षापासून एकंदरीत देशाच्या सार्वभोमत्वावर विचार केला तर देशाच्या पोशिंदा असलेला शेतकरी प्रचंड त्रस्त आहे. कर्जाच्या डोंगरात फासला आहे. ना आरोग्याची सेवा सुरळीत आहे. ग्रामीण भागातील शिक्षण शिल्लक राहिलेलं नाही. सुशिक्षित बेरोजगारांना रोजगार उरला नाही. ना हाताला काम , ना हातात येणार दाम, दिवस रात्र गाळतो घाम तरी मिळत नाही आराम अशी अवस्था शेतकऱ्यांची झाली आहे. 

देशाचा कना आणि देशाचा मालक हा मतदार आहे. परंतु अधिकारी व लोकप्रतिनिधी हे मालक बनले आहे. जनहिताचे एक पण निर्णय देशात होताना दिसून येत नाही. मुजोरी आणि दादागिरी वाढली असून अराजक्ता दिवसेंदिवस वाढत आहे. लोकशाही देशातील लोकांचे दररोज कर भरून शोषण केल्या जात आहे. तर सुविधा मात्र शून्य होत आहे. याचा परिणाम कदाचित एवं तर नाही ना ? 

देशातील जातीय व्यवस्था अजूनही जिवंत आहे. वर्ण व्यवस्थेतील उच निचता आजही जिवंत आहे. देशाच्या सर्वांगीण विकासाबद्दल कोणतेही राजकीय पक्ष बोलत नाही. देशाची शिक्षण प्रणाली खिळखिळी होत आहे. अश्या एक ना अनेक कारणे आणींप्रश्र्न उद्भवत आहे. 

साधा मोबाईल मधील अपडेट इंटरनेटच्या सह्यय्यानी होत असेल तर evm मशीन मधील मास्टरचीप ती देखील इंटरनेटच्या सहाय्याने अपडेट होत नसेल कशावरून इंटरनेटने जगात क्रांती केली केली आहे. पृथ्वी वरून चंद्रावर यान नियंत्रित केल्या जात असेल तर ही evm काय आहे. 

जग प्रसिद्ध वैधानिक संस्था चालविणारा एक वैधानिक एलन मॅस्क जर evm हँक होवू शकते असे व्यक्तव्य करीत असेल तर इच्छित त्यात सत्यता असली पाहिजे. त्याच बरोबर चक्क अमेरिका देखील कागदी मतपत्रिकेवर निवडणुका घेतात आणि सात दिवस त्याची मतगणना चालते. परंतु आमच्या देशात evm ने निवडणुका घेवून ७० दिवस त्या पेटीत बंद करून ७ तासात निकाल देण्यात येते. अस का ? जेव्हा की जनतेला या evm वर भरोसा नाही तेव्हा अधिकारी वर्ग का जबरदस्ती करून evm जनतेच्या मानगुटीवर बसवत आहे. हाचा विचार होणे गरजेचे आहे.

अन्न पुरवठा निरीक्षकास ७० हजाराची लाच घेताना रंगे हात अटक

0

  अमरावती येथील लाच लुचपत विभागाची कारवाई

News Today
दिलीप भोयर
वणी :- येथील तहसील कार्यालयातील अन्न पुरवठा विभागाचे निरीक्षक अधिकारी यांना आज गुरुवार २४ ऑक्टोबर रोजी दुपारी ३ वाजता दरम्यान ७० हजार रुपयांची लाच घेतांना रंगेहाथ पकडल्या गेल्याने तहसील कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी दणानुक गेले आहे. सदर कारवाई ही अमरावती लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने केल्याची माहिती आहे.

तहसील कार्यालयातील अन्न पुरवठा विभागात निरीक्षक म्हणून कार्यरत असलेले संतोष उईके यांनी कंट्रोल डीलर बंडू देवाळकर चिखलगाव यांना राशन दुकानाच्या कामासाठी ७० हजार रुपयाची लाच मागितली होती. यावरून बंडू देवाळकर यांनी संतोष उईके यांची लाच लुचपत विभाग अमरावती यांचेकडे तक्रार दाखल केली असता लाचलुचपत प्रतिबंधक अमरावती विभाग यांनी आज व्यवस्थित सापळा रचला व त्यानुसार संतोष उईके यांना तहसील कार्यालयातच ७० हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ अटक केली आहे. त्यांना अटक करून पुढील कारवाईसाठी शासकीय विश्रामगृह येथे आणण्यात आले होते.

वणी विधान सभेतील ओबीसी मत विभागणीसाठी भाजप कडून मोठी खेळी होण्याची संभावना

0

खोके देवून अपक्ष उमेदवार उभा करण्याचा जोरदार प्रयत्न सुरू

News Today
दिलीप भोयर
वणी :- विधानसभा क्षेत्रातून महा विकास आघाडीचा पगडा भारी पडत असल्याने विरोधातील उमेदवारांनी चांगलीच धास्ती घेतल्याचे दिसून येत आहे. माहाविकास आघाडीतील मतविभागणी करण्यासाठी भारतीय जनता पार्टी खोके खर्च करून अपक्ष उमेदवार रिंगणात उतरवण्याच्या जोरदार तयारी सुरू झाल्याची चर्चा सूत्रांकडून मिळत आहे.

येत्या २० नोव्हेंबर रोजी राज्यातील विधानसभेच्या निवडणुका होवू घातल्याने वणी विधानसभा क्षेत्राची जागा ही शिवसेनेच्या वाट्याला आली आहे. वणी विधानसभेत शिवसेनेचा मोठा गलबला असून त्यांचे सोबत काँगेस व राष्ट्रवादी काँग्रेस व इतर मित्र पक्षाची साथ आहे. त्यामुळे महाविकास आघाडीकडून संजय देरकर हे शिवसेनेची मशाल घेवून मैदानात उतरणार आहे. तर भाजपचे कमळ मात्र कोमुजण्याच्या मार्गावर आले आहे. 

नुकत्याच संपन्न झालेल्या लोकसभा निवडणुकीत वणी विधान सभा क्षेत्रातून भाजपचे उमेदवार ना. सुधीर मुनगंटीवार यांना ६७ हजार मतदान झाले यात महाराष्ट्र नव निर्माण सेनेचा पाठिंबा होता यातील मनसे चे मतदान जर २० ते २५ हजार मतदान गृहीत धरले तर भाजपच्या झोळीत केवळ ४२ ते ४५ हजार मतदान पडले तर महाविकास आघडीलाच्या उमेदवार यांना १ लाख २५ हजाराचे जवळपास मतदान मिळाले होते त्यामुळे वणी विधानसभेत महाविकास आघाडीचा दबदबा निर्माण झाला होता लोकसभेचा पराभव भाजप अजूनही पचवू शकली नाही. हीच पुनरावृत्ती होवू नये म्हणून भाजपातील माजी केंद्रीय मंत्री तथा राष्ट्रीय ओबीसी आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर यांनी पुरेपूर प्रयत्न करीत विधानसभेत नवीन ओबीसी चेहऱ्याचा उमेदवार देण्याचा आग्रह पक्षश्रेष्ठींकडे धरला होता. परंतु ओबीसी समाजाला केरकचरा समजणारी भाजपाने मात्र भैया यांची मागणी धुळकावून लावली आहे.त्यामुळे भाजपातील मोठा ओबीसी गट हा आणखी नाराज झाला आहे.

लोकसभेत देखील (भैया) यांची उमेदवारी नाकारून अल्पसंख्यांक समजात उमेदवारी देवून भाजपाने आपल्याच पायावर धोंडा मारून घेतला होता. हीच परिस्थिती वणी विधानसभेत निर्माण झाली आहे. त्यामुळे महाविकास आघाडीच्या लाखो मतांची बेरीज बघता मतदान कसे विभागल्या जाईल याची यावर भाजप मोठी खेळी करण्यासाठी खोके संस्कृतीचा वापर करून महाविकस आघाडीतील एखादा जयचंद शोधून त्यांची अपक्ष उमेदवारी उभी करण्याच्या हालचालींना वेग आल्याचे दिसून येत आहे. परंतु मतदार मात्र आता जागृत झालेला आहे. तो कोणत्याही अपक्ष उमेदवारांच्या भूलथापांना बळी पडणार नाही अशी प्रतिक्रिया मतदरांमधून ऐकायला मिळत आहे.

गूरुकुंज मोझरी येथे दिलीप भोयर यांना सन्मानपत्र

0

गूरुकुंज मोझरी येथे दिलीप भोयर यांना सन्मानपत्र

News Today
प्रतिनिधी :- रुड्या परंपरा व कर्मकांड नाकारून वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी लिहलेल्या ग्रामगीता विचारांचे परिवर्तनशिल कार्य केल्याबद्दल वणी येथील श्रीगुरुदेव सेनेचे अध्यक्ष तथा पत्रकार दिलीप रामदासजी भोयर यांना ग्रामगीता विचार प्रचारक तथा ज्येष्ठ विचारवंत, लेखक ज्ञानेश्वरजी रक्षक नागपूर यांचे हस्ते सन्मानपत्र देवून सन्मानित करण्यात आले आहे.


शेतकरी समाज हा रूड्या आणि परंपरा व कर्मकांडात गुर्फडून आर्थिक्तेच्या संकटात पडला आहे. त्यामुळे या समाजाने वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी लीहलेल्या ग्रामगीता ग्रंथातील विचारांना अनुसरून जीवन जगणे असे उपदेशित केले आहे. याच विचारांणा अनुसरून दिलीप भोयर हे आपले जीवन जगत आहे. त्यांनी अनेक परिवर्तनशील उपक्रम राबविले आहे.


दिलीप भोयर यांचे वडील रामदासजी भोयर यांचे निधन २०२२ मध्ये झाले होते त्यांनी आपल्या वडिलांचा अत्याविधी हा श्रीगुरुदेव पद्धतीने केला व वडिलांची राख ही कोणत्याही नदीत अथवा तीर्थ स्थानी नेवून कर्मकांड न करता सरळ आपल्या शेतात पुरवली आहे. त्याच बरोबर तेरावी सारखी प्रथा देखील घरातून मोडून काढली आहे. त्यामुळे त्यांच्या या उपक्रमाची दखल अध्यात्म गुरुकुलचे संचालक तथा ग्रामगीता विश्व विद्यापीठाचे कुलपती रविदादा मानव यांनी घेतली व त्यांचा विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत सन्मानपत्र देवून सन्मान करण्यात आला. यावेळी अड्याळ टेकडीचे संचालक सुबोधदादा, कवदुजी वडस्कर , चैत्यन महाराज, सत्यपाल महाराज, भाऊ साहेब थुटे डॉ. उधार महाराजसह अनेक मान्यवर उपस्संथित होते. कार्यक्रमाला  महाराष्ट्रातील लाखो श्रीगुरुदेव भक्त उपस्थिती होती.