Thursday, April 30, 2026
Google search engine
Homeवणीसर्वधर्म समन्वय संमेलनातून राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश

सर्वधर्म समन्वय संमेलनातून राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश

News Today 

प्रतिनिधी (अमरावती)

गुरुकुंज मोझरी : – राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या ५६ व्या स्मृतिदिननिमित्त श्रीगुरुदेव अध्यात्म गुरुकुल येथे पालखी पदयात्रा शिबिर महोत्सव सुरु आहे. त्यामध्ये सर्वधर्म समन्वय संमेलन पर पडले त्यात सर्व धर्माच्या धर्मप्रतीनिधिंनी सहभाग घेतला होता. ज्यामध्ये हिंदू (सनातन)धर्म प्रतिनिधी मा.नामदेव गव्हाळे,मुस्लिम धर्म प्रतिनिधी इस्तीयाक अहमद,ख्रिश्चन धर्म प्रतिनिधी नितीन सरदार, बौद्ध धम्म प्रतिनिधी भदंत संघरत्न मानके, जैन धर्मप्रतीनिधी डॉ.मेघराज कोचर, सिख धर्मप्रतिनिधी राणासिंग बावरी इत्यादी उपस्थीत होते.


आपला धर्म विश्व कल्याणाची कामना करतो , हिंसा शिकवत नाही तर माणसाला माणसाशी मानवते ने वागायची शिकवण देतो अश्या आशयाचे प्रतिपादन सर्वच धर्म प्रतिनिधींनी केले. श्रीगुरुदेव सेवा मंडळाचे ज्येष्ठ प्रचारक श्री हरिभाऊ वेरुळकर गुरुजी यांनी या संमेलनाचे समारोपीय भाषण केले.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या जीवनातले अनेक दाखले त्यांनी दिले .ज्यातून राष्ट्रीय एकात्मतेचा विचार जोपासल्या जातो. या संमेलनाचे प्रास्ताविक ज्ञानेश्वर रक्षक यांनी केले तर सूत्र संचालन आकाश टाले यांनी केले.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Today News

Most Popular

Visitor Counter