कोणीही गुरुकुलात मुक्कामी येण्याचे टाळावे- रवी मानव यांचे आवाहन
News Today
प्रतिनिधी
अमरावती :- जिल्ह्यातील गुरुकुंज मोझरी येथील राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज यांच्या 56 व्या पुण्यतिथी निमित्ताने होत असलेल्या “पालखी पदयात्रा शिबिर” या कार्यक्रमांमध्ये वादळी पावसा मुळे कार्यक्रमात व्यत्यय निर्माण झालेला आहे . त्यामुळे यात्रेकरूंनी मुक्कामी येण्याचे टाळावे प्रचंड गैरसोय निर्माण होऊ शकते त्यामुळे कोणाचीही गैरसोय होऊ नये या दृष्टी कोनातून श्रीगुरुदेव अध्यात्म गुरुकुलचे संचालक रवी मानव यांनी प्रसार माध्यमांतून आवाहन केले आहे. पुढील कार्यक्रम हॉलमध्ये घेण्यात येईल व त्या पद्धतीची सूचना सर्वांना देण्यात येईल. अशी माहिती दिली आहे.

मागील १७ तारखेपासून वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची पुण्य स्मृतीदिना निमित्त विविध कार्यक्रमाचे जोरदार आयोजन केले होते. परंतु मागील दोन दिवसाच्या वादळी वारा पाण्याने कार्यक्रमासाठी व मुकामी येणाऱ्या मान्यवरांसाठी मुक्कामाच्या व्यवस्थे करिता पेंडाल व मंडपाची मोठी व्यवस्था करण्यात आली होती परंतु या वादळी वाऱ्याने सर्व अस्ता व्यस्त पडझड झाल्याने येणाऱ्या मान्यवरांचे व श्रीगुरुदेव उपसाकांची गैरसोय होवू शकते. त्यामुळे ही गैरसोय टाळण्यासाठी कोणीही मुक्कामाच्या बेताने येवू नये दि. २१ ऑक्टोंबर रोजी मुख्य कार्यक्रला दिवसानेच उपस्थित राहावे असे आवाहन अध्यात्म गुरुकुलचे संचालक रवी मानव यांनी केले आहे.
खालील लिंकवर क्लिक करून बघा झालेली नासधूस


