शासकीय कंत्राटदारासोबत भूखंड खरेदी व्यवहार भोवणार..!
News Today
दिलीप भोयर
वणी :- ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर शासकिय कंत्राटदाराच्या भागीदारीत भूखंड खरेदी विक्रीचा व्यवहार उघडकीस आल्यामुळे आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांची उमेदवारी संकटात येण्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
वणी विधानसभा क्षेत्रातील सर्व रस्त्याची बोगस व निकृष्ट दर्जाची कामे करणारे शासकीय कंत्राटदार आर. व्ही. उंबरकर कंपनीचे मालक नितीन रमेश उंबरकर सोबत भागीदारीत आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी मौजा वणी येथील गट क्रमांक ६८/३ क्षेत्र १.२१ हे.आर. हा भूखंड दिनांक ०९/०६/२०२१ रोजी ६७ लक्ष १० हजार रुपयात खरेदी केल्याची नोंद दुय्यम निबंधक कार्यालयात आहे. सदर भूखंड हा सतीश ओदेलू तोटावार, रा. सत्यसेवा हॉस्पिटल जवळ वणी यांचेकडून खरेदी करण्यात आला.
सदर भूखंड जरी शासकीय नियमानुसार खरेदी केला असला तरी शासकीय कंत्राटदारांना लोक प्रतिनिधी सोबत कोणतीही भागीदारी करता येत नाही. तसेच लोक प्रतिनिधींना सुद्धा शासकीय कंत्राटदारा सोबत कोणतेही आर्थिक हितलाभ संबंध ठेवता येत नाही. त्यामुळे सदर भूखंड व्यवहार अनैतिक आहे. की नाही यावर प्रशासनाने कायदेशीर बाबी तपासण्याची गरज आहे.
आर. व्ही. उंबरकर कन्स्ट्रक्शन कंपनी कडून सार्वजनिक बांधकाम विभाग, प्रधानमंत्री ग्रामसडक योजना, मुख्यमंत्री ग्रामसडक योजना, नगर परिषद व इतर प्राधिकरण कडून कामे करण्यात आली आहे. त्यातील बहुतांश कामे निकृष्ट दर्जाची झालेली आहे. या कंपनीला कोणतेही कामे देवू नये अश्या पद्धतीच्या नागरिकांच्या तक्रारी देखील आहे. जनतेच्या पैश्यावर चालणारी शासकीय यंत्रणा मात्र जनतेच्या तक्रारीची दखल न घेता याच कंपनीला कामे देतात व शेकडो कोटीची कामे निकृष्ट असताना त्यांची देयके अदा करून अधिकारी वर्ग देखील मलींदा लाटण्याचे काम डोळ्या देखत सुरू आहे. अश्या वादग्रस्त कंपनीच्या मालकासोबत लोकांनी लोकांची संपत्तीचे रक्षण करण्यासाठी निवडून पाठवलेले लोकप्रतिनिधीच जर भागीदारीचा व्यवहार करून मधुर संबंध जोडत असेल तर याला कोणते संबंध म्हणावे असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित झाला असून कुंपणच शेत खायला लागले आहे असे बोलल्यास काहीच वावगे ठरणार नाही.
साहेब ये रिश्ता क्या कहलाता है…?
वणी विधानसभेतील सार्वजनिक बांधकाम विभाग व नगर परिषद, नगर पंचायत व इतर शासकीय बांधकाम प्राधिकरण विभाग यांचे कडून ज्या ज्या बांधकामाच्या निविदा प्रकाशित करण्यात आल्या आहे. त्या सर्व निविदा उंबरकर कंपनीला कश्या मिळतील अश्याच पद्धतीच्या नियम व अटी टाकून सर्व सामान्य कंत्राटदारांना निविदा मिळूच नये याची तरतूद करण्यात येत होती. तसेच इतर कोणत्याही बांधकाम करणाऱ्या कंपनीने कंत्राट घेतल्यास त्या कंपनीने प्रत्यक्ष कोणतेच काम केली नाही. या कंपन्यांनी घेतलेली सर्व कामे आर. व्ही. उंबरकर कंपनीने बेकायदेशीर पणे केले आहे. ही बेकायदेशीर कामे आर. व्ही. उंबरकर या कंपनीने कोणाच्या आशीर्वादाने केली असावी हे सांगण्यासाठी या व्यवहारामुळे गरज उरली नाही. त्यामुळे इथ अस म्हणावे लागेल की “ये रिश्ता क्या कहलाता है” ?
ना. गडकरी यांनी दिलेल्या निधीतून पेवर ऐवजी मॅन पॉवरने केलेले वणी शहरील मुख्य मार्गावरील निकृष्ट रस्ता बांधकाम
नितीन गडकरीजी दाल में कूछ काला है..
प्रसार माध्यमांच्या एका मुलाखतीमध्ये देशाचे रस्ते बांधकाम मंत्री ना.नितीन गडकरी असे म्हणाले की आमच्या पक्षाच्या कोणत्याही लोकप्रतिनिधींचे व शासकीय कंत्राटदार कंपनी सोबत हीत संबंध निदर्शनास आणून दिल्यास, त्या लोकप्रतिनिधींवर सक्त कारवाई केल्या जाईल. अश्या प्रतिक्रिया दिल्या होत्या व तसा व्हिडिओ देखील समाज माध्यमांवर प्रचंड वायरल झाला होता. मग आता आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार व आर. व्ही. उंबरकर या कंपनीचे मालक नितीन रमेश उंबरकर यांचे हीत संबंध जगजाहीर झाले आहे. तसेच दस्तुर खुद नितीन गडकरी यांनी वणी शहरातील मुख्य मार्गाचे काँक्रिट रस्त्याला २० कोटीचा फंड दिला होता. ते काम मुबई येथील जे. पी. कंस्ट्रक्षण कंपनीने निविदा घेवून प्रत्यक्ष काम करायचे होते. परंतु तसे न करता आर. व्ही उंबरकर या कंपनीने बेकायदेशीरपणे निकृष्ट करून देखील कोणतीही कारवाई झाली नाही. याचे काही टक्केवारी गडकरी वाड्यात गेली की काय असी चर्चा देखील रंगू लागल्याने एका इमानदार व्यक्तिमत्त्वाला देखील भ्रष्टाचाराचा डाग लागल्या जात आहे. त्यामुळे ये डाग अच्छे है असे म्हणायची वेळ भाजपावर आली आहे. त्यामुळे नितीन गडकरी हे यावर काय कारवाई करतील का? याकडे मतदारांचे लक्ष लागले आहे.