Thursday, April 16, 2026
Google search engine
HomeUncategorized"बोर्डा येथील बस सेवा सुरू करा” – सरपंच, उपसरपंच यांची मागणी

“बोर्डा येथील बस सेवा सुरू करा” – सरपंच, उपसरपंच यांची मागणी

News Today  (सचिन वाभिटकर )

वणी (ता. बोर्डा) – बोर्डा येथील बससेवा काही दिवसांपासून बंद असल्याने विद्यार्थी, प्रवासी व सर्वसामान्य नागरिकांना मोठ्या प्रमाणात गैरसोय सहन करावी लागत आहे. शिक्षणासाठी दररोज प्रवास करणाऱ्या विद्यार्थ्यांना खाजगी वाहनांवर अवलंबून राहावे लागत असून त्यामुळे वेळ, श्रम व आर्थिक भार वाढला आहे. कामकाज, बाजारहाट तसेच उपचारासाठी जाणाऱ्या नागरिकांच्याही हालअपेष्टा वाढल्या आहेत.

या पार्श्वभूमीवर बोर्डा ग्रामपंचायतीचे सरपंच सौ. आशा  झाडे व उपसरपंच सतीश राजुरकर यांनी बससेवा तातडीने पूर्ववत सुरू करण्याची मागणी केली आहे. यासंदर्भात आगरप्रमुख, वणी यांना निवेदन सादर करण्यात आले. निवेदनात विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी व नागरिकांच्या दैनंदिन गैरसोयी दूर करण्यासाठी बोर्डा येथील बससेवा तातडीने सुरू करण्यात यावी, असे नमूद करण्यात आले आहे.

निवेदन सादर करताना ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते. बससेवा सुरू झाल्यास नागरिकांचा प्रवास सुलभ व सुरक्षित होईल, असा विश्वास सरपंच व उपसरपंच यांनी व्यक्त केला. 

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Today News

Most Popular

Visitor Counter