Saturday, April 18, 2026
Google search engine
HomeUncategorized"उद्रेक "दिव्यांग उपोषणकर्त्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करून – भाजप नेत्यांची कंपनीत ‘पेटपूजा’

“उद्रेक “दिव्यांग उपोषणकर्त्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करून – भाजप नेत्यांची कंपनीत ‘पेटपूजा’

News Today 

मुकुटबन, दि. २४ : मुकुटबन येथील RCCPL सिमेंट कंपनीसमोर दिव्यांग बांधव व स्थानिक भूमिपुत्रांचे रोजगाराच्या मागणीसाठी सुरू असलेल्या आमरण उपोषणाच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीचे माजी केंद्रीय मंत्री तथा OBC आयोगाचे राष्ट्रीय अध्यक्ष हंसराज अहिर यांनी २४ सप्टेंबर रोजी उपोषणस्थळी भेट दिली.

स्थानिक नागरिक व उपोषणकर्त्यांची अपेक्षा होती की, या भेटीदरम्यान त्यांनी कंपनीच्या अधिकाऱ्यांना थेट उपोषण मंडपात बोलावून समस्या सोडविण्यासाठी ठोस चर्चा केली असती. परंतु तसे न करता त्यांनी केवळ औपचारिक चौकशी करून पुढे कंपनीच्या परिसरात जाऊन अधिकाऱ्यांसोबत उपहाराचा आस्वाद घेतला. या प्रकारामुळे जनतेच्या मनात भाजपच्या प्रति मोठा उद्रेक होत आहे.

उपोषणकर्ते दिवसरात्र उपाशीपोटी न्याय मागत असताना नेतेमंडळी मात्र कंपनीच्या उपचारात सहभागी झाल्याने स्थानिकांमध्ये तीव्र नाराजीचा उद्रेक झाला. उपोषणकर्त्यांच्या म्हणण्यानुसार, “आम्ही उपाशी बसलो आहोत, आणि आमचे नेते मात्र कंपनीसोबत ‘पेटपूजा’ करत आहेत. हा आमच्या संघर्षाचा आणि भावनांचा अपमान होता.”

या घटनेने जिल्ह्यातील संपूर्ण परिसरात मोठी चर्चा रंगली असून, उपोषणाकडे दुर्लक्ष करून कंपनीशी सलगी दाखवल्याचा आरोप भाजप नेत्यांवर केला जात आहे.

आमदार संजय देरकर यांच्या मध्यस्थीने दिव्यांग यांच्या उपोषणाची सांगता. 

वणी विधानसभेचे आमदार संजय दरेकर यांनी कंपनी समोर चालू असलेले दिव्यांग यांच्या उपोषणाची सांगता तारीख २६ रोजी  केली. आर सी सी पी एल कंपनीच्या अधिकाऱ्यांना उपोषण मंडपात बोलावून दिव्यांग यांच्या समस्येवर चर्चा केली व यात बहुतांश समस्यांचा निपटारा करून उपोषणकर्त्यांना लिंबू पाणी पाजून त्यांच्या उपोषणाची सांगता केली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे वणी विधानसभा अध्यक्ष दिलीप भोयर यांचेसह  शिवसेना (उबाठा) गटाचे नेते मंडळी उपस्थित होते.

 

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Today News

Most Popular

Visitor Counter