Thursday, July 30, 2026
Google search engine
Home Blog Page 30

नागपूर येथे संत नामदेव महाराज राष्ट्रीय एकात्मता विश्व महासंमेलनाचे आयोजन 

0

News Today 

नागपूर :- राष्ट्रीय स्तरावर संत नामदेव महाराज यांचे विचार सर्व सामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी व सामाजिक एकत्रीकरण करिता समोरील वर्षीच्या जानेवारी २०२६ मध्ये नागपूर येथे अतिशय भव्य स्वरूपात  संत नामदेव महाराज राष्ट्रीय एकात्मता विश्व महासंमेलनाचे आयोजन करण्यात येणार आहे.

त्या संमेलनाचे नियोजन करण्याकरिता प्रमुख पदाधिकाऱ्यांची नियोजन बैठक नागपूर येथे आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला अखिल भारतीय नामदेव क्षत्रिय महासंघ, नवी दिल्ली या संस्थेचे राष्ट्रीय अध्यक्ष भास्करराव टोम्पे राष्ट्रीय कार्याध्यक्ष ईश्वरभाऊ धिरडे, जेष्ठ समाज सेवक  सुभाष खोडे, प्रमोद कोरमकर,  डॉ. प्रकाश ढगे, सचिव श्याम नानोटे ,  सौ.आरती भाईक, विदर्भ नामदेव शिंपी समाजाचे सचिव बोबडे, युवराजजी सुतोने ,अँड. अमोलजी भिसे,अँड. वासुदेव घिमे, माजी सचिव राजेश गंधे, श्री सुनील जावळेकर, प्रा.अनिल भाईक, छिपा शिंपी समाजाचे नीलकमल खैरवार गहलोत,सौ.स्नेहाताई हुकूम, सौ.सुनिताताई जुमळे , वर्षाताई जुमळे , संजय जुमळे,इत्यादी व्यासपीठावर उपस्थित होते.

ईश्वर धिरडे यांनी या संत नामदेव महाराज राष्ट्रीय एकात्मता महासंमेलन आपण आयोजित करून शिंपी समाजातील सर्व पोट शाखेला एकत्रित करून संत शिरोमणी नामदेव महाराज यांचे विचार घरोघरी पोहोचवण्याकरिता आपल्याला हे कार्य करायचे आहे. हे संमेलन भव्य स्वरूपाचे असेल व या संमेलनात शिंपी समाजातील सर्व भारतभरामधून जवळपास पाच लाख समाज बांधव उपस्थित राहतील याबद्दल माहिती देण्यात आली त्याचप्रमाणे या सर्वांची राहण्याची कार्यक्रमाचे तयारी आपल्याला कशी करायची आहे याबद्दल मार्गदर्शन केले.

सोबतच युवक महिला या सर्वांनी मोठ्या स्तरावर एकत्रित येऊन या संमेलनाची जबाबदारी स्वीकारावी अशी आवाहन सुद्धा करण्यात आले . त्यानंतर अनेक मान्यवर प्रमुख पदाधिकाऱ्यांनी संमेलनाविषयी आपले मत व्यक्त केले. आणि सोबतच आपल्या समाजाला राजकीय स्थैर्य प्राप्त व्हावं या दृष्टिकोनातून सर्वांनी प्रयत्न करावे असे सांगितले.


यावेळी नागपूर शहरातील शिंपी समाजातील सर्व पोट शाखेचे प्रमुख पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते त्यांनी सुद्धा आपले विचार प्रगट केले आणि महासंमेलन यशस्वी करण्याचा संकल्प केला.

देश दुनिया, ईव्हीएम हॅक करून निवडणुकीचा निकाल फिरवणे शक्य; अमेरिका इंटेलिजन्सच्या दाव्यानं जगभरात खळबळ

0

News Today (वृत्तसंस्था)

नवी दिल्ली — देशाच्या निवडणुकीत सर्वाधिक चर्चेचा विषय असेल, तो म्हणजे, ईलेक्ट्राॅनिक व्होटिंग मशीन (ईव्हीएम)! लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर विरोधकांनी पराभवाचे खापर ईव्हीएम मशीनवर फोडले.

काँग्रेस सुरुवातीपासून ईव्हीएमचा निकाल मान्य नाही. आता अमेरिकेच्या नॅशनल इंटेलिजन्सने ईव्हीएम मशीनवर शंका उपस्थित करताना, ईव्हीएम हॅक करून निकाल बदलणे शक्य आहे, असा दावा केला आहे. या दाव्यामुळे भारतातील विरोधकांच्या ईव्हीएम विरोधाला भविष्यात आणखी धार चढण्याची शक्यता आहे.

अमेरिकेच्या नॅशनल इंटेलिजन्सनच्या तुलसी गबार्ड यांनी ईव्हीएम मशीन सहजपणे हॅक करून निवडणुकीच्या निकालात घोटाळा केला जाऊ शकतो, असा दावा केला आहे. यामुळे संपूर्ण अमेरिकेत मतपत्रिकेवर मतदान प्रक्रिया लागू करण्याची गरज व्यक्त केली आहे. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या उपस्थित तुलसी गबार्ड यांनी मत व्यक्त केल्याने ईव्हीएमच्या विश्वासर्हतेविषयी पुन्हा जगभरात चर्चा सुरू झाली आहे.तुलसी गबार्ड यांनी ईव्हीएम मशीनविषयी उपस्थित केलेली शंका, त्यावरील मत समाज माध्यमांवर वेगानं व्हायरल होऊ लागलं आहे.

त्याचे जगभरात पडसाद उमटू लागले आहे. विशेष म्हणजे, तुलसी गबार्ड यांना समाज माध्यमातून पाठिंबा देखील वाढू लागला आहे. परंतु काहींनी तुलसी गबार्ड यांच्या शंकेमागे राजकीय अजेंडा असल्याची भावना व्यक्त केली आहे. टेस्लाचे सीईओ इलाॅन मस्क यांनी देखील गेल्या वर्षी इलेक्ट्राॅनिक्स मतदान यंत्रावर प्रश्न उपस्थित केले होते.

भारतीय निवडणूक आयोगाचा दावा

अमेरिकेच्या तुलसी गबार्ड यांनी ईव्हीएमबाबत केलेल्या दाव्याचे पडसाद भारतात देखील उमटू लागले आहेत. यावर भारतीय निवडणूक आयोगाने आतापर्यंत मतदानात पाच कोटींहून अधिक व्हीव्हीपॅटवरील मतांशी जुळणी झाली आहे. ईव्हीएम मतांशी जुळत आहे. हा ईव्हीएमबाबतच्या विश्वासर्हतेचा सर्वात मोठा पुरावा आहे. भारतातील ईव्हीएम आणि इतर देशातील ईव्हीएम मशीन सिस्टम वेगळ्या आहेत, असा दावा देखील भारतीय निवडणूक आयोगाने केला आहे. या दाव्यावर मात्र मतदार आता नाराजी व्यक्त करीत असून आयोगावर रोष व्यक्त करीत आहे.

         भारतातील ईव्हीएम प्रोग्राम सिस्टम वेगळी

अमेरिकेची ईव्हीएम मशीन ‘विंडो’, ‘लिनक्स’वर चालतात, भारताची ईव्हीएम अगदी ऑफलाईन आहे. वाय-फाय, ब्लूटुथ नाही. अमेरिकी यंत्र इंटरनेटशी जोडलेले असते. भारतातील ईव्हीएममधील प्रोग्रामिंगनंतर बदला येत नाही. अमेरिकी यंत्रात ते शक्य आहे. भारतीतील ईव्हीएममध्ये मुद्रित पावती देखील पाहता येते. अमेरिकेतल्या यंत्रांमध्ये तसे नाही, असे तुलनात्मक वर्णन भारतीय निवडणूक आयोगाकडून करण्यात आले आहे. यावर मात्र आता कोणत्याही भारतीयांचा विश्वास उरला नाही. शेवटी ईव्हीएम या पुढे नकोच अशी मागणी होत आहे. 

शिरजगाव येथे गुरु शिष्य जयंती सोहळा संपन्न, रवी मानव आणि मनोज अंबडकर या दोन दिग्गज वक्त्यांचे एकाच मंचावर व्याख्यान

0

News Today 

शिरजगाव: येथे दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील महात्मा ज्योतिराव फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंतीचे अर्थात गुरु शिष्य जयंती सोहळाचे आयोजन करण्यात आले होते.

महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध वक्ते मा रवी मानव हे कार्यक्रमाचे अध्यक्ष तर मुख्य वक्ते म्हणून मा.मनोज अंबाडकर होते. तर शिरजगाव मोझरी चे सरपंच निरंजन भाऊ कडू, सौ शारदाताई देवघरे पोलीस पाटील शिरसगाव, सौ उमाताई अंबलकर क्रांती दोन क्रांतीज्योती ब्रिगेड जिल्हाध्यक्ष, दीपक राव तिखे क्रांतीज्योती ब्रिगेड जिल्हा महासचिव, डॉ.छायाताई मानव, डॉ. सुधाकर डेहनकर, किरण खवले प्रफुल्ल उमाप आदींची उपस्थिती होती.

महात्मा ज्योतिराव फुले यांनी समाजातील सर्वच क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कामगिरी केलेली आहे मी पूल असे साहित्य निर्माण करून समाजाला दिशा देण्याचे कार्य केलेले आहे. त्यांचाच वसा पुढे चालू येत महात्मा ज्योतिराव फुले यांच्या विचारांना भारताच्या संविधानामध्ये स्थान देऊन त्याला संविधानिक दर्जा बहाल करून घेण्याचे कार्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केले. या दोन्ही महापुरुषांनी देशावर अनन्य साधारण उपकार केले असल्याची भावना मनोज अंबाडकर यांनी आपल्या प्रबोधनातून बोलताना व्यक्त केली. 

यानंतर रवी मानव यांचे अध्यक्ष भाषण पार पडले अंधश्रद्धा, रूढी परंपरा, जातीयवाद या सर्व विषयावर चौफेर प्रबोधन करत त्यांनी उपस्थितांची मने जिंकली. सर्व प्रकारच्या शोषणाचे कारण हे अविद्या आहे म्हणून आपण विद्या घेऊन विद्यावंत व्हावे असा विचार महात्मा ज्योतिराव फुले यांनी दिला आणि शिक्षणाची गंगा तुमच्या आमच्या दारापर्यंत आणली परंतु आज जिल्हा परिषदेच्या शाळा झपाट्याने बंद होत आहे याकडे अर्थसंकल्पामध्ये कुठलीही विशेष तरतूद करण्यात येत नाही ज्यामुळे गोरगरिबांच्या मुलांना दर्जेदार शिक्षण मिळेल असे झालेले आहे अशी खंत यावेळी रवि मानव यांनी व्यक्त केली .

या उत्सवाच्या यशस्वीतेसाठी गावकऱ्यांनी कष्ट घेतले. महात्मा फुले उत्सव समिती- अध्यक्ष- अक्षय पाचघरे, उपाध्यक्ष- नवीन जळीत, सचिव- ऋषिकेश गाडगे, सहसचिव – सागर बेले, कोषाध्यक्ष – प्रणव पाचघरे, संघटक- सागर होले, सहसंघटक- महेश अडसड, कु.यशस्वी खेरडे कार्यक्रमाचे सूत्रसंचालन – राणी कडू, क्षितिजा गाडगे.सर्व सदस्य गण, समस्त गावकरी मंडळी जय ज्योती जय क्रांती व राष्ट्रवंदना घेऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

पंढरपूर विठ्ठल मंदिर समितीचे सदस्य संभाजी शिंदे यांचे कडून आ. संजय देरकरांचा सत्कार

0

News Today 

वणी:- तमाम शेतकऱ्यांचे कुलदैवत असलेल्या पंढरपुरातील विठ्ठल मंदिर समितीच्या वतीने समितीचे सदस्य तथा शिवसेनेचे सोलापूर जिल्हाध्यक्ष संभाजी शिंदे यांनी वणी विधानसभेतील शिवसेना (उबाठा) चे आमदार संजय देरकर यांचा शाल व मंदिर समितीचे पुस्तक आणि दिनदर्शिका देऊन तारीख ११ एप्रिल रोजी दुपारी २ वाजता मंदिर समितीच्या कार्यालयात त्यांचा सत्कार करण्यात आला. 

आमदार संजय देरकर हे पंढरपूर येथे आले आता विठ्ठलाच्या आशिर्वादासाठी विठ्ठल मंदिरात गेले असता त्यांचा हा सत्कार करण्यात आला यावेळी श्रीगुरुदेव सेनेचे संस्थापक अध्यक्ष दिलीप भोयर, इंजि. कुंडलिक ठावरी, राहुल ठाकरे, मनीष बत्रा, कुणाल मेकलवार , प्रीतम पेंदोर, पोलिस कॉन्स्टेबल निलेश झाडे, व मंदिर समितीचे कर्मचारी उपस्थित होते.

शेतकऱ्यांच्या शेतमालाला भाव देण्यासाठी सरकारला सद्बुद्धी देरे ” पांडुरंगा ”  – आमदार संजय देरकरांचे पांडुरंगाला साकडे

0

News Today
पंढरपूर :- महाराष्ट्र राज्य विधिमंडळाचे सदस्य वणी विधानसभा क्षेत्र जि. यवतमाळचे आमदार संजय देरकर यांनी आज तारीख ११एप्रिल रोजी दुपारी २ वाजता महाराष्ट्राच कुलदैवतं भगवान पांडुरंगाचे दर्शन घेतले व शेतकऱ्यांच्या शेतमालाला भाव देण्यासाठी या सरकारला सद्बुद्धी दे रे पांडुरंगा असे साकडे पंढरपुरात येऊन आमदार संजय देरकर यांनी पांडुरंगाच्या चरणी दिले.


निवडणुकीच्या वेळी महायुती सरकारने सत्तेत आल्यानंतर शेतकऱ्यांची कर्जमुक्ती देवू, लाडक्या बहिणींना २१०० रुपये मासिक वेतन देऊ, शेतकऱ्यांच्या शेतमालाला योग्य भाव देऊ अशी अनेक वचने यांनी आपल्या जाहीरनाम्यात दिले होते. सत्तेत आल्यानंतर या सरकाने शेतकऱ्यांना देशोधडीला लावले आहे. शेतकऱ्यांना शेतमाल कवडीमोल भावाने विकावा लागला आहे. शेतकऱ्यांनी सर्व शेतमाल विकल्या नंतर भाव वाढ केल्या जात आहे. राज्यातली महायुती आणि शेतकऱ्यांची अधोगती अशी अवस्था राज्याची झाली आहे. महाराष्ट्राला सुजलाम सुफलाम करण्यासाठी सर्वप्रथम शेतकऱ्यांचा विचार झाला पाहिजे. यासाठी या सरकारला सद्बुद्धी दे रे पांडुरंगा असे साकडे आमदार संजय देरकर यांनी पांडुरंगाला घातले.

यावेळी विठ्ठल मंदिर समितीचे सदस्य तथा शिवसेनेचे (उबाठा) सोलापूर जिल्हाध्यक्ष संभाजी शिंदे, श्रीगुरुदेव सेनेचे संस्थापक अध्यक्ष दिलीप भोयर, इंजि. कुंडलिक ठावरी, राहुल ठाकरे, मनीष बत्रा, कुणाल मेकलवार , प्रीतम पेंदोर, पोलिस कॉन्स्टेबल निलेश झाडे आदी मान्यवर उपस्थित होते.

वणी येथे प्रथमच संगीत आणि नाटय महोत्सव २०२५ चे आयोजन

0

 

News Today 

वणी :- श्री रंगनाथ स्वामी संगीत कला केन्द्र वणी यांच्या वतीने वणी मध्ये यावर्षी गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर संगीत आणि नाटय महोत्सव २०२५ चे आयोजन करण्यात आलेले आहे. यामध्ये श्रोत्यांना विविध सांस्कृतिक कार्यक्रम पहायला मिळणार आहे. त्यामध्ये श्री रंगनाथ स्वामी संगीत कला केन्द्राचे विदयार्थ्याचे गायन, श्री. जगन्नाथ महाराज यांचे संगीतमय जिवन चरीत्र, प्रा. हेमंत चौधरी आणि पुरुषोत्तम गावंडे यांचा हास्यदर्पण कार्यक्रम आणि विशेष पर्वणी म्हणून स्वर मंथन बहुद्देशिय संस्था नागपूर येथिल ७० कलाकारांच्या अथक प्रयत्नातून आणि उत्कृष्ट अभिनयातून साकार झालेले संत गजानन महाराज यांचे ‘शेगांवीचा संत गजानन’ हे महानाटय वणीकरांना पहायला मिळणार आहे.

हा कार्यक्रम गुढीपाडवा रविवार दिनांक ३० मार्च २०२५ रोजी सायंकाळी ०५ ते १० वाजेपर्यंत शेतकरी लॉन, वसंत जिनिंग ऑफिस समोर वणी येथे होणार आहे. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्री रंगनाथ स्वामी संगीत कला केन्द्र वणी तसेच वणी शहरातील अनेक धार्मिक आणि सामाजिक संस्था मिळून कार्य करीत आहे.

कार्यक्रमाचा लाभ घेण्याकरीता वणी आणि वणी परीसरातील सर्व श्रोत्यांनी आवजून उपस्थित राहावे असे आवाहन आयोजक सौ. सविता डोर्लीकर, डॉ. सौ. संचिता नगराळे, सौ. विना मोहीतकर, सौ. कानोपात्रा खंडाळकर, सौ. अल्का लाजूरकर, सौ. सुनिता आवारी, सौ. वंदना पिंपळकर, सौ. भाग्यश्री तोडेवार, अजित खंदारे, प्रा. सतिश बाविस्कर, अरूण डवरे, संतोष जोशी, प्रा. हेमंत चौधरी, संतोष क्रिगरे यांनी केले आहे.

 

शिवसेनेच्या (उबाठा) जिल्हाप्रमुखपदी संजय निखाडे, एका निष्ठावंत शिवसैनिकांच्या हाती जिल्ह्याची सूत्र 

0

News Today

वणी :- शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्ष्याच्या जिल्हा प्रमुखपदी संजय निखाडे यांची वर्णी लागल्याने एका निष्ठावंत कार्यकर्त्याच्या हातात जिल्ह्याची सूत्र गेल्याचे सर्वसामान्य शिवसैनिकत आनंद पसरला आहे.

नुकत्याच संपन्न झालेल्या विधानसभा निवडणुकीत यवतमाळ जिल्हाप्रमुखाचे पद निलंबित केल्याने जिल्हाप्रमुख कोण होतील याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. मागील चार महिन्यापासून यवतमाळ जिल्हा व वणी विधानसभेतील अनेकपदे रिक्त आहेत. जिल्हाप्रमुख पदासाठी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचेकडे अनेकांनी इच्छा व्यक्त केली होती यात मात्र उपजिल्हाप्रमुख पदावर मागील अनेक वर्षापासून कार्यरत असलेले संजय निखाडे यांच्या नावाचा जिल्हाप्रमुख पदावर शिक्का मोर्तब झाला.

मागील ३५ वर्षापासून निष्ठावंत शिवसैनिक म्हणून संजय निखाडे यांची वणी विधानसभेत ओळख आहे. आज त्यांच्या निवडीने सर्व सामान्य शिवसैनिक मात्र आनंदी झाला आहे. निखाडे यांनी आपल्या निवडीचे श्रेय उद्धव बाळासाहेब ठाकरे,जिल्हा संपर्क प्रमुख गायकवाड, आमदार संजय देरकर यांना दिले आहे.

श्रीगुरुदेव सेनेचे अध्यक्ष दिलीप भोयर यांचे नेतृत्वात शहीद दिनी महा जेलभरो

0

विधानसभेत सरकारचे लक्ष वेधण्याचे आमदार संजय देरकारांचे आश्वासन

News Today

मंगेश गोरे
वणी :- शेतकऱ्यांची पहिली आत्महत्या स्व. साहेबराव करपे व त्यांच्या पत्नी मालती करपे यांच्या स्मृती प्रीत्यर्थ व देशाच्या स्वातंत्र्यासाठी शहीद झालेल्या भगतसिंग, राजगुरू, सुखदेव यांच्या शहीद दिनाचे निमित्याने शेतकरी शेतमजूर, निराधार व दिव्यांग्यांच्या विविध मागण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (श. प.) व श्रीगुरुदेव सेना यांचे वतीने लक्षवेधी महा जेलभरो आंदोलन आज रविवार ता. २३ मार्च दुपारी २ वाजता दिलीप भोयर यांचे नेतृत्वात येथील पोलीस स्टेशनमध्ये संपन्न झाले.

या आंदोलनाची सुरवात वसंत जीनिंग कार्यालया पासून सुरू होऊन छत्रपती शिवाजी महाराज यांचे स्मारकाला वंदन करून पोलिस स्टेशन वणी येथील दक्षता सभागृहात भरगच्च गर्दीने जेलभरो करण्यात आला.

यात दिलेल्या निवेदनात प्रमुख मागण्या करण्यात आल्या यात सर्व निराधार , लाडकी बहीण कलावंत योजनेच्या लाभार्थ्यांना प्रतिमहिना मानधन ५ हजार करण्यात यावे, निराधारांच्या उत्पन्नाची अट २१ हजारावरून १ लाखापर्यंत करण्यात यावी, निराधारांचे वय ६० वर्षे करण्यात यावे, सर्व कलावंताच्या मानधनाचे प्रलंबित प्रस्ताव तात्काळ मान्य करावे, निवडणुकांमध्ये राबविण्यात येणाऱ्या ई व्ही एम बंद करण्यात याव्या, शेतकऱ्याच्या शेती साहित्य (बी- बियाणे,रासायनिक खते, औषधे व शेती अवजारे) या वरील जी. एस. टी. रद्द करण्यात यावी. वणी शहरातील राज्य मार्ग क्रमांक ३१५ च्या रस्ता बांधकामाचे तांत्रिकदृष्ट्या ऑडिट करण्यात यावे ,

सर्व शेतमालावरील निर्यात बंदी उठवावी, महाराष्ट्रातील सर्व शेतकरी,शेतमजूर १२ बलुतेदार यांची ( मायक्रो फायनान्स, पतसंस्था,खाजगी सावकार, बँकांचे कर्ज ) यातून सर्वांना कर्ज मुक्त करावे, शेती पंपासाठी दिवसा पूर्ण दाबाने वीज पुरवठा करण्यात यावा, वन्य प्राणी संरक्षण कायदा रद्द करावा , शेतकऱ्याच्या कापसाला किमान १२ हजार रुपये, सोयाबीनला ८ हजार रुपये प्रति क्विंटल भाव देण्यात यावा, सर्व सुशिक्षित बेरोजगार युवकांना १० हजार रुपये मासिक बेरोजगार पत्ता देण्यात यावा,


सार्वजनिक बांधकाम विभागाचे निविदा विषयक नियम धाब्यावर बसवून काम करणाऱ्या जे.पी. कन्स्ट्रक्शन कंपनी मुंबई व आर. व्हि. उंबरकर कन्स्ट्रक्शन कंपनीचे काम तांत्रिक दृष्ट्या ऑडिट करण्यात यावे,
वणी मुकूटबन घोन्सा चौफुली ते पुरड (नेरड) पर्यंतच्या मार्गावर सुमारे ६० करोड रूपय खर्चुन सुध्दा काम नित्कृष्ट झाले आहे. करिता या मार्गाचे बांधकाम पुनःश्चा करण्यात यावे. वणी शहरातील साई मंदिर चौक ते नांदेपेरा मार्गावरील रेल्वे गेट पर्यंत चालु असलेले रस्ता बाधकाम अत्यंत निकृष्ठ असुन काम मागील अनेक दिवसांपासुन बंद आहे. सदरचे काम नियमबाह्य पध्दतीने केले आहे. त्याची संपुर्ण चौकशी करून संबंधीत अधिकारी व कंत्राटदारावर सक्त कारवाई करण्यात यावी,

सा. बां. विभाग पांढरकवडा जि. यवतमाळ यांचे कडुन सन २०१६ ते २०२४ पर्यंत खनिज विकास निधी अंतर्गत बांधण्यात आलेले सार्वजनिक सभागृहाची चौकशी करण्यात यावी. तसेच गावा गावातील बसविण्यात आलेले जल शुध्दीकरण यंत्र पुर्णता बंद आहे. या जलशुध्दी करण यंत्राची चौकशी करावी व संबधीत कंत्राटदार व अधिकारी यांचेवर कायदेशिर कारवाई करण्यात यावी, नव्याने प्रस्तावित असलेले जिल्हा सत्र न्यायालयाची ईमारत ज्या जागेवर बांधण्यात येणार आहे. ती जागा वणी शहराच्या कार्यक्षेत्रा बाहेर आहे. त्यामुळे सर्व सामन्य नागरीकांना त्या ठिकाणी येणे जाणे करणे अत्यंत अवघड होणार असुन नागरीकांना प्रचंड आर्थिक भुर्दंड सहन करावा लागणार आहे. त्या इमारतीची जागा वणी शहरात उपलब्ध करून त्या ठिकाणी न्यायालयाची ईमारत बांधण्यात यावी.

मौजा परसोडा येथे ही ईमारत बांधुन मुख्यालयात बदल होत आहे, वणी शहरातील ग्रामिण रुग्णालयात मागील अनेक वर्षापासुन ट्रामा केअर सेंटर बांधण्यात आले आहे. त्याचे बांधकाम पुर्ण झाले आहे. त्या ठिकाणी लागणारे करोडो रूपयाचे साहित्य धुळखात पडले आहे. त्या साहित्याचा रुग्णांना कोणताही लाभ मिळत नसल्याने परनामी त्यांना त्यांचा जिव गमवावा लागत आहे. त्यामुळे सदर ट्रामा केअर सेंटर तात्काळ सुरू करण्यात यावे, शेतकऱ्यांना सरसकट पीक विम्याचा लाभ देण्यात यावा, वणी येथील कोळशाची रेल्वेसाठी हटविण्यात यावी आदी मागण्या करण्यात आल्या आहे,

या आंदोलनात शेतकरी शेतमजुर कलावंत , दिव्यांग व निराधार मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश संघटक सचिव विजय नगराळे, जिल्हा सरचिटणीस रामकृष्ण वैद्य, विधानसभाध्यक्ष सूर्यकांत खाडे, श्रीगुरुदेव सेना तेलंगणा राज्याचे प्रभारी डॉ सुरेश महाराज उदार, रामदास पखाले, पुंडलिक मोहितकर, शहराध्यक्ष विनोद ढेंगळे, शेतकरी संघटनेचे दशरथ पाटील बोबडे, मिलिंद पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. या आंदोलन यशस्वी करण्यासाठी मंगेश गोरे, प्यारेलाल मेश्राम, सौ.रत्‍नाबाई पारखी, निर्मलाबाई मडावी, राजू झाडे,वसंतराव कोहळे, अमोल वाघाडे, शिवाजीराव डाखरे,ज्ञानेश्वर कोडापे, सिंधुबाई गोरे, पुंडलिकराव कोंगरे, रंगरावजी भोयर, प्रतिमा मडावी, शोभा तुरानकर, भाऊराव दुरटकर, मेघबाई भगत, बालाजी गुरनुले, पंचफुलाबाई मंगाम, आदी परिश्रम घेत आहे.

आंदोलकांच्या मागण्या विधानसभेत मांडणार – आमदार संजय देरकर यांची ग्वाही

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व श्रीगुरुदेव सेनेच्या लक्षवेधी जेलभरो आंदोलनाला वणी विधानसभेचे आमदार संजय देरकर यांनी भेट दिली व आंदोलकांचे निवेदन स्वीकारले आणि निवेदनातील सर्व मागण्यासाठी विधानसभेत मांडणार अशी ग्वाही दिली आली आंदोलनाला भगवी झेंडी दाखवून आंदोलनाची सुरवात केली.

वणी येथे २३ मार्च शहीद दिनी तथा साहेबराव व मालती करपे स्मृती प्रित्यर्थ महा जेलभरो आंदोलन ,

0

हजारोच्या संख्येने उपस्थित राहण्यासाठी श्रीगुरुदेव सेनेचे आवाहन

News Today 

वणी :- शेतकऱ्यांची पहिली आत्महत्या स्व. साहेबराव करपे व त्यांच्या पत्नी मालती करपे यांच्या स्मृती प्रीत्यर्थ व देशाच्या स्वातंत्र्यासाठी शहीद झालेल्या भगतसिंग, राजगुरू, सुखदेव यांच्या शहीद दिनाचे निमित्याने शेतकरी शेतमजूर, निराधार व दिव्यांग्यांच्या विविध मागण्यासाठी श्रीगुरुदेव सेनेने लक्षवेधी महा जेलभरो आंदोलनाचे आयोजन रविवार ता. २३ मार्च २०२५ रोजी दुपारी २ वाजता येथील पोलीस स्टेशनमध्ये आयोजित केले आहे.

या आंदोलनाचे प्रमुख मार्गदर्शक आमदार संजय देरकर हे उपस्थित असणार असून श्रीगुरुदेव सेनेचे संस्थापक अध्यक्ष दिलीप भोयर यांचे नेतृत्वात संपन्न होणार आहे. 

या आंदोलनाला प्रमुख उपस्थितीत म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (श.प.) च्या जिल्हाध्यक्षा सौ. वर्षा निकम, यवतमाळ जिल्हा बँकेचे विभागीय अध्यक्ष राजू येल्टीवार, राकाँपचे राज्य संघटक सचिव विजय नगराळे, वणी विधानसभाध्यक्ष सूर्यकांत खाडे, शेतकरी नेते देवराव धांडे, कलावंत संघटनेचे विदर्भ अध्यक्ष रामदास पखाले, आदी मान्यवर उपस्थी असणार आहे. सदर आंदोलनात खालील मागण्या करण्यात येणार आहे. यातील सर्व निराधार , लाडकी बहीण कलावंत योजनेच्या लाभार्थ्यांना प्रतिमहिना मानधन ५ हजार करण्यात यावे, निराधारांच्या उत्पन्नाची अट २१ हजारावरून १ लाखापर्यंत करण्यात यावी,

निराधारांचे वय ६० वर्षे करण्यात यावे, सर्व कलावंताच्या मानधनाचे प्रलंबित प्रस्ताव तात्काळ मान्य करावे, निवडणुकांमध्ये राबविण्यात येणाऱ्या ई व्ही एम बंद करण्यात याव्या, शेतकऱ्याच्या शेती साहित्य (बी- बियाणे,रासायनिक खते, औषधे व शेती अवजारे) या वरील जी. एस. टी. रद्द करण्यात यावी.

वणी शहरातील राज्य मार्ग क्रमांक ३१५ च्या रस्ता बांधकामाचे तांत्रिकदृष्ट्या ऑडिट करण्यात यावे , सर्व शेतमालावरील निर्यात बंदी उठवावी, महाराष्ट्रातील सर्व शेतकरी,शेतमजूर १२ बलुतेदार यांची ( मायक्रो फायनान्स, पतसंस्था,खाजगी सावकार, बँकांचे कर्ज ) यातून सर्वांना कर्ज मुक्त करावे, शेती पंपासाठी दिवसा पूर्ण दाबाने वीज पुरवठा करण्यात यावा, वन्य प्राणी संरक्षण कायदा रद्द करावा , शेतकऱ्याच्या कापसाला किमान १२ हजार रुपये, सोयाबीनला ८ हजार रुपये प्रति क्विंटल भाव देण्यात यावा, सर्व सुशिक्षित बेरोजगार युवकांना १० हजार रुपये मासिक बेरोजगार पत्ता देण्यात यावा,

शेतकऱ्यांना सरसकट पीक विम्याचा लाभ देण्यात यावा, वणी येथील कोळशाची रेल्वेसाठी हटविण्यात यावी आदी मागण्या करण्यात येणार आहे. या आंदोलनाला सर्व शेतकऱ्यांनी शेतमजुरांनी, कलावंतांनी , दिव्यांग्यानी व निराधारांनी हजारोच्या संख्येने उपस्थित आव्हान करण्यासाठी श्रीगुरुदेव सेनेचे संस्थापक अध्यक्ष दिलीप भोयर यांच्या नेतृत्वात उपस्थित राहण्याचे आव्हान करण्यात आले.

 हे आंदोलनासाठी चंपतज पाचभाई,बाबाराव कुळमेथे, मधुकर वाभीटकर,विजय आस्कर, मारुती पाटील खापणे, सौ.रत्‍नाबाई पारखी, निर्मलाबाई मडावी, राजू झाडे,वसंतराव कोहळे, अमोल वाघाडे, शिवाजीराव डाखरे, सचिन वाभीटकर, विलास काळे,अरविंद येसेकर,ज्ञानेश्वर कोडापे, सिंधुबाई गोरे, पुंडलिकराव कोंगरे, सौ संगीताताई सातपुते, रंगरावजी भोयर,शोभाताई तुरा नकर, भाऊराव दुरटकर, मेघबाई भगत, बालाजी गुरनुले, पंचफुलाबाई मंगाम,शकुंतला हनुमंते, मंगलाताई मडचापे, अर्चनाताई कातकडे, राजूभाऊ सिडाम, गंगाधर महाराज लोणसावडे, सुभाषजी पानघाटे,सुहास सप्रे, दिगांबर कुमरे, संभाजी पारशिवे, राकेश कापनवार आदी परिश्रम घेत आहे.

लक्षवेधी, वणी परिसरात मुली बेपत्ता होण्याच्या संख्येत लक्षणीय वाढ

0

पालकांची चिंता वाढली, मानव तस्करी करणारी टोळी सक्रीय असल्याची भीती

News Today 

दिलीप भोयर

वणी:- परिसरातील अल्पवयीन व किशोरी वयीन मुलींच्या बेपत्ता होण्याच्या संख्येत मोठी वाढ झाली असून मुलींना फूस लावून पळवून नेवून त्यांची परराज्यात परस्पर विक्री करीत असल्याची टोळी सक्रीय असल्याची गोपनीय माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

मागील तीन महिन्यात केवळ वणी पोलिस स्टेशन हद्दीतील सुमारे ४५ मुली बेपत्ता असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यामुळे पालकांच्या चिंतेत मोठी वाढ झाली आहे. 

वणी ग्रामीण भागातील शिक्षण घेणाऱ्या असंख्य मुली शहरात वास्तव्य करीत आहे. ग्रामीण भागातील आर्थिक परिस्थिती बिकट असल्याने अनेक मुलींना अडचणीला सामोरे जावे लागत आहे.अश्या आर्थिकतेच्या विवंचनेत असलेल्या मुलींना सहजरित्या टिपल्या जात आहे. तिला आर्थिकतेचे आमिष दाखवून ही टोळी मुलींना पळवून नेण्यात माहिर आहे. 

मागील तीन महिन्यात वणी विभागातील वणी,शिरपूर, पाटण, मुकुटबन, व मारेगाव या पाचही पोलिस स्टेशन मधून जवळपास १२० जन बेपत्ता असल्याची माहिती आहे. यातील केवळ वणी पोलिस स्टेशन मधून जवळपास ४५ मुलींची संख्या आहे. ही बाब अत्यंत गंभीर असून या बाबीकडे प्रशासनाचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होताना दिसून येत आहे. 

मागील काही महिन्यापासून वणी परिसरातील वयोवर्ष १६ ते २४ च्या दरम्यान वयात आलेल्या अविवाहित मुलीना फूस लावल्या जात आहे. त्याच बरोबर त्यांना आर्थिकतेचे आमिष दाखवण्या जात आहे. बेपत्ता होण्याच्या संख्येत दिवसेंदिवस प्रचंड वाढ होताना निदर्शनास येत आहे. तरी पालकांनी आपल्या मुलींकडे लक्ष देण्याची गरज आहे.