Thursday, July 30, 2026
Google search engine
Home Blog Page 29

वणीत खळबळ, भाजपच्या माजी आमदारांकडून आमदारकीच्या स्टिकरचा गैरवापर, बोदकुरवार यांचा संताप जनक प्रताप

0

News today 

वणी: महाराष्ट्र विधानसभेच्या सदस्यांसाठी असलेल्या अधिकृत स्टिकरचा गैरवापर झाल्याची धक्कादायक घटना वणी येथे उघडकीस आली आहे. माजी आमदार बोदकूरवार यांच्या एम.एच. २९ ए. आर. ६०८६ या क्रमांकाच्या खासगी इनोव्हा वाहनावर “तसेच त्यांच्या फॉर्च्यूनर अश्या दोन्ही वाहनावर महाराष्ट्र विधानसभा मा. आमदार” असे स्टिकर लावण्यात आले आहे. त्यांनी बोदकुरवार यांचा संताप जनक प्रतापाने जनमानसात रोष व्यक्त होत आहे. 

सुरक्षेच्या कारणास्तव आणि विधानमंडळाच्या सदस्यांची ओळख पटवण्यासाठी हे स्टिकर्स जारी केले जातात. मात्र, माजी आमदारांनी अशा स्टिकरचा वापर करणे नियमांचे उल्लंघन असल्याचे बोलले जात आहे. या प्रकारामुळे अधिकृत व्यक्ती ही तोतयेगिरी करत आणि इतरांमध्ये संभ्रम निर्माण होण्याची शक्यता आहे.

या संदर्भात माजी आमदार बोदकूरवार यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, त्यांची प्रतिक्रिया मिळू शकली नाही. मात्र, त्यांच्या वाहनावर असलेले स्टिकर अनेक नागरिकांनी पाहिले असून आश्चर्य व्यक्त केले आहे.

आता प्रश्न असा आहे की, माजी आमदारांनी हे स्टिकर का लावले आणि यामागील त्यांचा हेतू काय आहे? तसेच, या गंभीर प्रकारावर विधानसभा प्रशासन काय कारवाई करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या घटनेमुळे शासकीय स्टिकर्सच्या वितरणा आणि वापरावर पुन्हा एकदा विचार करण्याची गरज निर्माण झाली आहे.

                    जाणकार व्यक्तींचे मत 

माजी आमदारांना त्यांच्या वाहनावर ‘आमदार’ किंवा तत्सम पदनाम दर्शवणारे स्टिकर लावण्याची अनुमती नसते.

नियमानुसार, हे स्टिकर्स केवळ विद्यमान आमदारांना त्यांच्या कार्यकाळात वापरण्याची परवानगी आहे. एकदा आमदारकीचा कार्यकाळ संपला की, त्या स्टिकरचा वापर करणे गैरकानूनी ठरते आणि मोटार वाहन कायद्याचे उल्लंघन मानले जाते.

माजी आमदार आता लोकप्रतिनिधी नसल्यामुळे, त्यांना अशा कोणत्याही विशेषाधिकाराचा वापर करण्याचा हक्क नाही. त्यामुळे, त्यांनी आपल्या वाहनावरून आमदारकीचे स्टिकर तात्काळ काढून टाकणे आवश्यक आहे. जर कोणत्याही माजी आमदारांनी नियमांचे उल्लंघन करून स्टिकरचा वापर केला, तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई होऊ शकते. महाराष्ट्र राज्यातील आज पर्यंतच्या कोणत्याही आमदाराने अशी स्टिकर लावले नाही. कारण ते कायद्यात बसत नाही.

असे करणे म्हणजे कायद्याला मूठमाती देऊन मुजोरी करणे असे होते. असे मत एका जाणकार व्यक्तींनी नाव न टाकण्याच्या अटीवर दिली आहे.  या प्रकारामुळे जन माणसात भाजपची प्रतिमा मलिन होत आहे. त्यामुळे पक्षश्रेष्ठी काय भूमिका घेणार याकडे लक्ष लागले आहे.

 

 

 

वणी तालुक्यातील मोहदा येथे खाण व्यावसायिकाचा धक्कादायक प्रकार, मृतकाच्या कुटुंबीयांना आर्थिक प्रलोभन देत प्रकरण दाबण्याचा प्रयत्न,  महसूल विभागाची डोळेझाक, पोलीस यंत्रणा हतबल?

0

  महसूल विभागाची डोळेझाक, पोलीस यंत्रणा हतबल?

News Today 
वणी: तालुक्यातील मोहदा येथे एका खाण व्यावसायिकाने माणुसकीला काळिमा फासणारी घटना घडवली आहे. येथील एका ८० फूट खोल खदाणीत प्रोक्लॅन मशीन कोसळून एका चालकाचा दुर्दैवी मृत्यू झाला. मात्र, यानंतर खाण मालकाने मृतकाच्या गरीब कुटुंबीयांना आर्थिक प्रलोभन देऊन हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न सुरू केल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. या गंभीर घटनेकडे महसूल विभागाने डोळेझाक केल्याचा आरोप होत असून, पोलीस यंत्रणाही हतबल दिसत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मोहदा येथील एका खाणीत काही दिवसांपूर्वी ही दुर्घटना घडली. खदाण सुमारे ८० फूट खोल असल्याने आणि सुरक्षा मानकांचे पालन न केल्याने हा अपघात झाला, ज्यात एका निष्पाप चालकाला आपला जीव गमवावा लागला. धक्कादायक बाब म्हणजे या खाण मालकाकडे कामगारांसाठी आवश्यक असलेला कामगार विमा देखील नसल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे, इतक्या धोकादायक परिस्थितीत कामगार कसे काम करत होते, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

मृत्यू झालेल्या चालकाच्या गरीब कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्यातच, खाण मालकाने त्यांना आर्थिक प्रलोभन देऊन पोलिसात तक्रार दाखल न करण्यासाठी दबाव आणण्यास सुरुवात केल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. यामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.

या गंभीर प्रकरणाकडे महसूल विभागाने पूर्णपणे दुर्लक्ष केले आहे, असा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे. तसेच, पोलीस यंत्रणाही या प्रकरणी कोणतीही ठोस कारवाई करताना दिसत नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. एका गरीब कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी आणि दोषींवर कारवाई करण्यासाठी आता प्रशासन काय भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

या घटनेमुळे खाण सुरक्षा मानकांचे उल्लंघन आणि प्रशासनाच्या भूमिकेवर गंभीर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. कामगार कायद्याचे पालन न करणाऱ्या आणि निष्काळजीपणे काम करणाऱ्या खाण मालकांवर कठोर कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

संत नामदेव महाराज राष्ट्रीय एकता विश्व महासंमेलनाच्या आयोजन समितीची बैठक अमरावतीत पार पडली

0

अमरावती, दि. 27 एप्रिल 2025 –
संत नामदेव महाराज राष्ट्रीय एकता विश्व महासंमेलनाच्या आयोजन समितीची महत्त्वपूर्ण बैठक आज अमरावती येथे संपन्न झाली. या बैठकीस विदर्भ समाजाचे सर्व जिल्हा व तालुका स्तरावरील पदाधिकारी उपस्थित होते.

बैठकीच्या सुरुवातीला पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या देशबंधूंना आणि पुण्यातील व्यापारी बंधू  गणबोटे यांच्या हौतात्म्यास अश्रूपूरित मूक श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

या बैठकीला अखिल भारतीय नामदेव क्षत्रिय महासंघ नवी दिल्लीचे राष्ट्रीय अध्यक्ष भास्करराव टोम्पे, ज्येष्ठ नेते  ईश्वर धिरडे,  अनंत जंगजोड, विदर्भ टेलर सोसायटीचे अध्यक्ष  राजू किटये,  प्रदीप गंधे यांच्यासह विदर्भातील सर्व जिल्ह्यांतील अधिकारी व माता-भगिनींची उपस्थिती होती.

या बैठकीत महासंमेलनाच्या आयोजनाची तयारी, नियोजन व आगामी कार्यक्रमांविषयी सविस्तर चर्चा करण्यात आली. सर्व पदाधिकाऱ्यांनी एकत्रितपणे कार्य करण्याचा निर्धार व्यक्त केला. या बैठकीची माहिती पश्चिम महाराष्ट्राचे मुख संघटक  संतोष मुळे यांनी दिली.

मोहदा येथील उत्खनन प्रकरणाकडे प्रशासनाचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष, बेजबदार लिझ धारक झवेरी अजूनही मोकाट

0

News Today

वणी:- तालुक्यातील मोहदा परिसरातील गौण खनिज उत्खननाचे वास्तव समोर आणणारी आहे. यामध्ये खालील प्रमुख मुद्द्यांकडे लक्ष दिले पाहिजे 

अधिनियमाची पायमल्ली: महाराष्ट्र गौण खनिज उत्खनन अधिनियम २०१३ चे नियम आणि अटी धाब्यावर बसवून लिझ धारकांनी बेसुमार उत्खनन सुरू केले आहे. नियमानुसार मिळालेल्या परवान्याच्या मर्यादा लांघून मोठ्या प्रमाणावर उत्खनन केले जात आहे.

बेकायदेशीर रात्रीचे उत्खनन: रात्रीच्या वेळी उत्खनन करणे स्पष्टपणे बेकायदेशीर आहे, तरीसुद्धा प्रोकलॅन व जेसीबी मशिनद्वारे रात्रभर उत्खनन सुरू आहे.

प्रशासनाची दुर्लक्ष: महसूल व खाणीकर्म विभागाकडून याकडे ठोस दुर्लक्ष होत असल्याचे स्पष्ट होते, जे गंभीर प्रश्न निर्माण करते.

मानवी व प्राणीजीवनाला धोका: खदाणींमध्ये पडून नागरिक व जनावरे मृत्युमुखी पडत असून, याबद्दल कोणतीही जबाबदारी घेतली जात नाही.

कामगारांचे शोषण: बाहेर राज्यातील मजुरांकडून काम करून घेऊन त्यांना कोणतीही कायदेशीर हमी न देता शोषण केले जात आहे.
गंभीर अपघात: एका प्रोकलॅन चालकाचा मृत्यू होऊनही त्याचे गांभीर्य प्रशासनाने लक्षात घेतले नाही.

उपाययोजना व शिफारसी:
संपूर्ण मोहदा परिसरातील लिझ धारकांच्या उत्खननाचे ऑडिट करणे.
अतिरिक्त उत्खनन करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करणे.
अपघात व जीवितहानीची चौकशी करून दोषींवर गुन्हे दाखल करणे.

पर्यावरणाच्या दृष्टीने पुनर्भरण (reclamation) योजना राबवणे.
कामगार कायद्यांची अंमलबजावणी करून मजुरांचे संरक्षण करणे.
या प्रकरणात स्थानिक ग्रामस्थ, सामाजिक कार्यकर्ते आणि प्रसारमाध्यमांनी पुढाकार घेऊन सरकारवर दबाव आणणे गरजेचे आहे.

मोहदा येथील इस्माईल जैनुद्दिन झवेरी या लिझ धारकाने रात्रीच्यावेळी उत्खनन करण्यासाठी प्रोकलॅन मशीन घेऊन चालकाला खदाणीत उतरविण्याचा प्रयत्न केला असता त्याचे संतुलन गेले व तो चालक प्रोकलॅनसह ८० फूट खोल घाईत पडून मृत पावला आहे.  ही गंभीर घटना घडून देखील महसूल विभाग सदर लिझ धारकांची पाठ राखणं करीत असल्याचे निदर्शनात येत आहे.

“ग्रामविकासासाठी” दर्जेदार पायाभूत सुविधा उपलब्ध करून देणे ही माझी प्रथम जबाबदारी – आ. संजय देरकर

0

वेगाव – मुर्धोनी रस्त्याच्या विकास कामाचे भूमिपूजन संपन्न

News Today

वणी :- वणी विधान सभेतील वणी – मारेगाव तालुका जोडणारा जिल्हा परिषद बांधकाम विभागा मार्फत येणारा मुर्धोनी ते वेगाव या गावांना जोडणाऱ्या रस्त्याच्या विकास कामाचे भूमिपूजन आज तारीख २८ रोजी सायंकाळी ५ वाजता आमदार संजय देरकर यांच्या शुभहस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने ग्रामस्थ, महिला वर्ग, युवक, तसेच स्थानिक नेते व मान्यवर उपस्थित होते.

यावेळी व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषदा सदस्य तालुका पंचायत समिती सदस्य, सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, तसेच संबंधित विभागाचे अधिकारी आणि ठेकेदार उपस्थित होते. या रस्त्याच्या दुरुस्तीची मागणी अनेक वर्षांपासून प्रलंबित होती. खराब रस्त्यामुळे गावकऱ्यांना प्रवास करताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. या पार्श्वभूमीवर आमदार संजय देरकर यांनी विशेष प्रयत्न करून रस्त्याच्या कामासाठी निधी मंजूर करून घेतला आहे.

भूमिपूजनप्रसंगी आमदार संजय देरकर म्हणाले, “ग्रामविकासासाठी दर्जेदार पायाभूत सुविधा उपलब्ध करून देणे ही माझी प्रथम जबाबदारी आहे. मुर्धोनी- वेगाव रस्त्याचे काम अत्यंत दर्जेदार पद्धतीने आणि वेळेत पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत. त्यांनी ग्रामीण भागातील विकासासाठी अधिक निधी मिळवण्यासाठी सातत्याने प्रयत्न सुरूच राहतील, असेही सांगितले. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून वेगाव ग्राम पंचायतीचे सरपंच्या उषाताई देरकर तर प्रमुख अतिथी म्हणून उपसरपंच दीपक कळसकर, सहकारी संस्थेचे अध्यक्ष दिनेश मोहितकर, माजी जि.प. सदस्य अनिल देरकर,करण किंगरे, कंत्राटदार इंजी. श्वेता कापसे तसेच मारेगाव तालुक्यातील महाविकास आघाडीचे घटक पक्ष शिवसेना उबाठा, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी , कार्यकर्ते समस्त ग्राम पंचायत सदस्य, आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी ग्रामस्थांनी आमदारांचे आभार मानत त्यांच्या पुढील कार्याला शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे संचालन स्थानिक कार्यकर्त्यांनी केले आणि आभार प्रदर्शन ग्रामपंचायतीच्या वतीने करण्यात आले.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी स्थानिक युवक मंडळ, महिला मंडळ, तसेच सर्व ग्रामस्थांनी विशेष मेहनत घेतली.

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार साहेब पार्टीच्या वणी विधानसभा अध्यक्षपदी दिलीप भोयर यांची नियुक्ती

0

News Today 

वणी :- राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार साहेब यांच्या पार्टीच्या वणी विधानसभा अध्यक्षपदी वणी येथील सामाजिक कार्यकर्ते तथा गोर गरिबांचे कैवारी दिलीप भोयर यांची यांची जिल्हाध्यक्षा वर्षाताई निकम यांनी आज ता.२८ रोजी दुपारी २.३० वाजता शासकीय विश्राम गृह यवतमाळ येथे नियक्तीपत्र देऊन नियुक्ती केली आहे.

दिलीप भोयर हे सामाजिक व पत्रकारितेच्या कार्यात मोठ नाव असून अनेक चळवळीतील कार्यकर्ते आहे. त्यांनी आपला राजकीय प्रवास वंचित बहुजन आघाडी या पक्षातून वणी तालुकाध्यक्ष व वणी विधानसभा अध्यक्ष असा पदभार सांभाळून उत्कृष्ट वाटचाल केली होती. मागील लोकसभा निवडून संपताच त्यांनी मुंबई येथे जावून पक्षप्रमुख शरदचंद्र पवार साहेबांच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश घेतला होता. त्यांचे सामाजिक व राजकीय कार्याची दखल घेऊन आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या जिल्हाध्यक्षा वर्षाताई निकम यांनी त्यांची वणी विधानसभा अध्यक्षपदी नियुक्ती केली आहे.

वणी विधानसभा क्षेत्रात दिलीप भोयर यांचे सामाजिक व गोरगरीब जनतेच्या सेवेसाठी सदैव्य तत्पर्यतेचे कार्य असल्याने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला चांगली बळकटी मिळणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. त्यांच्या या नियुक्तीने त्यांचेवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. नियुक्तीपत्र देते वेळी वणी विधानसभेचे माजी अध्यक्ष सूर्यकांत खाडे, रामदास पखाले आदी मान्यवर उपस्थित होते.

आज आ. संजय देरकर यांचे हस्ते मुर्धोनी वेगाव रस्ता विकास कामाचे भूमिपूजन 

0

News Today 

वणी :- येथील विधानसभा क्षेत्रातील मुर्धोनी – दहेगाव – वेगाव असा जिल्हा परिषद अंतर्गत येणाऱ्या रस्त्याच्या बांधकामाचे भूमीपूज आज ता. २८ रोजी दुपारी ४ वाजता वणी विधानसभेचे लोकप्रिय आमदार संजय देरकर यांचेहस्ते भूमिपूजन संपन्न होणार आहे. 

मारेगाव तालुक्यातील वेगास येथील विदेही संत जगन्नाथ बाबा यांचे भव्य मंदिर असून हे एक तीर्थक्षेत्र आहे. या ठिकाणी जाण्यासाठी भाविकांना मारेगाव मार्गाने जावे लागत आहे. या मार्गाची दुरुस्ती झाल्यानंतर वणी तालुक्यातील गणेशपूर जवळील फाट्यापासून मुर्धोनी – दहेगाव – वेगाब हा मार्ग सर्वांसाठी सुलभ होणार आहे.

हा मार्ग दुरुस्ती करिता ३८ लाख रूपाचा निधी प्राप्त झाला आहे. या कामाचे भूमिपूजन आमदार संजय देरकर यांचेहस्ते करण्यात येत असून यावेळी वेगाव येथील सरपंच उषाताई देरकर, उपसरपंच दीपक कळसकर, माजी जि. प. सदस्य अनिल देरकर, दिलीप भोयर, इंजि. कुंडलिक ठावरी कंत्राटदार इंजी. श्वेता कापसे व समस्त ग्राम पंचायत सदस्य तथा समस्त ग्रामवाशी उपस्थित असणार आहे. 

वणी विधान सभेचे संजय देरकर हे आमदार होताच विकास कामाचा सपाटा सुरू असल्याने जनतेत समाधान व्यक्त करण्यात येत आहे.

.

संतप्त गुरुदेव सेवकांनी पालकमंत्र्याचा रोखला ताफा, आणि विचारला सवाल

0


 रवी मानव यांनी विचारला खुला प्रश्न ? बघा व्हिडिओ
News Today
चंद्रपूर :- जिल्ह्यातील ब्रह्मपुरी तालुक्यात कर्मयोगी संत तुकारामदादा गीताचार्य यांच्या अड्याळ टेकडीची जागा व त्यावरील असलेल्या बांधकामावर अमरावती जिल्ह्यातील मोझरी येथील अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळाने बेकायदेशीर आपला ताबा प्रस्थापित करण्याच्या उद्देशाने आयोजित कार्यक्रमास चंद्रपूर पालकमंत्री डॉ. अशोक उईके यांना पाचारण करण्यात आले असता हजारो गुरुदेव सेवकांनी संतप्त होऊन पालकमंत्र्यांचा संपूर्ण ताफा तारीख २१ रोजी दुपारी ३ वाजता अद्याड टेकडीच्या पायथ्याशी अडविण्यात आला यावेळी गुरुकुलचे संचालक रवी मानव यांनी खुला प्रश्न विचारून सर्वांचे लक्ष वेधले होते.

तुकाराम दादा गीताचार्य यांचे कार्य पाहून शासनाची जमीन मुख्यमंत्र्यांनी विशेष अधिकार वापरून भुवैकुंठ समिती घड्याळ टेकडीच्या नावाने दिली होती. अशाप्रकारे शासकीय जमिनीचा हस्तांतरण करण्याचे अधिकार फक्त मुख्यमंत्र्यालाच असतात. असे असताना ब्रह्मपुरी तहसीलदार सतीश मासाळ यांनी सदर जमिनीचे सातबारावर अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळाचे नाव चढवून बेकायदेशीरपणे हस्तांतरण घडवून आणले आहे.

यामुळे संतप्त झालेल्या श्री गुरुदेव सेवा मंडळाच्या हजारो कार्यकर्त्यांनी अचानक पालकमंत्र्यांचा ताफा रोखला. यावेळी आत्मानुसंधान टेकडी भू वैकुंठ समितीचे संचालक सुबोध दादा, सेवकरामजी मिलमिले, रवी मानव, दिलीप भोयर, ज्ञानेश्वर रक्षक, मिलिंद पाटील, रामदास पखाले, मंगेश गोरे, रेखाताई बुराडे, लालचंद नखाते, कवडू वडस्कर इत्यादी मंडळी प्रामुख्याने उपस्थित होते.

उघडा लिंक बघा व्हिडिओ

https://youtu.be/P5ttR79ylL4?si=WZHESGaUfuxvnJf8

३६ तासानंतही मोहदा येथील त्या घटनेतील खदान धारक मोकाट, थातूरमातूर गुन्हे दाखल

0

News Today 

वणी :-  तालुक्यातील मोहदा येथील गिट्टी खडणीत उत्खननासाठी जात असलेली प्रोकलॅन मशीन ८० फूट खोल घाईत पडून झालेल्या अपघातात चालक ठार झाल्याची घटना घडली होती. यात चंद्रपूर पोलिस स्टेशन कडून दाखल झालेल्या झिरो एफ.आय. आर. वरून शिरपूर पोलिस स्टेशनला नाममात्र गुन्हे नोंद करून तपास सुरू करण्यात आल्याची माहिती आहे. परंतु महसूल विभागाने रीतसर तक्रार दाखल करून घेतली नआल्याने आरोपीवर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा नोंद न झाल्याने आरोपी मोकाट फिरत आहे.  त्यामुळे सदर प्रकरण हडप करण्याच्या मार्गावर तर नाही ना. अशी चर्चा सुरू झाली आहे.

मोहदा येथील इस्माईल जैनुद्दिन झवेरी यांनी लिझवर घेतलेल्या सर्व क्रमांक २८२ व २८३ मध्ये यात्रेच्या वेळी गाईकेदेशीर पद्धतीने बंद असलेल्या खाणीतून उत्खननासाठी प्रोकलॅन मशीन रेणू अहिरवार नामक चालक घेऊन जात असताना त्याचे संतुलन गेले व तो मशीन क्षमतेपेक्षा जास्त प्रमाणात उत्खनन केलेल्या खाणीच्या खोल खड्ड्यात पडल्याने गंभीर रित्या जखमी झालेला चालक राणू यास चंद्रपूर येथील रुग्णालयात मृत्य घोषित करण्यात आले आहे. गंभीर गुन्हा या ठिकाणी घडला असताना देखील महसूल विभागाकडून चौकशीसाठी जाणीवपूर्वक विलंब होत आहे.

या परिसरात अनेक गिट्टी खदाणी असून या खदान धारकांनी महाराष्ट्र गौण खनिज उत्खनन अधिनियम २०१३ चे उलंघन करून उत्खन्न केले आहे. या गंभीर बाबीकडे सातत्याने संबंधित प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने हे खादान धारक मजुरांच्या व कामगारांच्या जीवावर उठून आपली खळगी भरून घेत आहे. 

ज्या खदाणीत जे कामगार असतील त्यांचा कामगार विमा उतरविणे अनिवार्य असताना देखील राणू अहिरवार यांचा विमा खदानधारक झवेरी यांनी उतरविला नाही अशी माहिती आहे. त्यामुळे कामगार सुरक्षा अधिनियाचे देखील यांनी उलंघन केल्याने निदर्शनास येत आहे. एवढा गंभीर प्रकार असताना देखील या प्रकरणाची कोणतीही रीतसर तक्रार दाखल न झाल्याने महसूल विभागावर संशय व्यक्त केल्या जात आहे. सदर प्रकरणाची रीतसर महाराष्ट्र गौण खनिज अधिनीयमानुसार चौकशी करण्याची मागणी केल्या जात आहे.

खदानधारक इस्माईल जैनुद्दिन झवेरी यांचेवर गुन्हा नोंद करण्यास विलंब का ?

मोहदा येथील खदाणधारक इस्माईल जैनुद्दिन झवेरी यांना महाराष्ट्र गौण खनिज उत्खनन अधिनियम २०१३ चे अंतर्गत देण्यात आलेल्या परवानगीमध्ये उत्खनन करण्यासाठी दिलेल्या टिपीवर नमूद नियम व अटींचा भंग होऊन देखील महसूल विभाग निद्रिस्त होऊन आरोपीची पाठ राखणं करीत असल्याचे आरोप होत आहे.

यात संबंधित खदान धारककाकडे रात्रीच्या वेळी उत्खननाची परवानगी होती का ? तसेच मृत्य प्रोक्लॅन मशीन चालकाकडे मशीन चालविण्याचा परवाना होता काय? टिपीवरील नमूद नियम व अटींचे उलंघन झाले आहे का? या सर्व प्रकाराचा अहवाल देण्यास महसूल विलंब लावत असल्याने पाणी कुठ मुरल्या जात आहे. त्याच बरोबर सदरची मशीन ही बंद असलेल्या सर्व क्रमांक २८३ मध्ये कोणत्या कारणाने गेली होती. सदरची खान बंद असताना अपघात घडला आहे. त्यामुळे बंद खाणीतून रात्रीच्या वेळी गैरमार्गाने उत्खनन केल्या जात होते काय? असे असेल तर त्यांचेवर गंभीर स्वरूपाचे गुन्हे नोंद होऊ शकते परंतु प्रशासन मात्र सदरचे प्रकरण गुलदस्त्यात ठेवू इच्छित असल्याचे दिसून येत आहे. 

मोठी खळबड : – प्रोकलॅन मशीन ८० फूट खदानीत पडली , एक ठार, वणी तालुक्यातील घटना

0

News Today 

वणी :-  गिट्टी खदान मध्ये उत्खनन करण्यासाठी जात असलेला प्रोकलॅन अचानक नियंत्रण सुटले व तो ८० फूट खोल खाणीत पडल्याने चालक गंभीर जखमी झाला असता उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला ही घटना वणी तालुक्यातील मोहदा येथे  काल तारीख १६ रोजी रात्री ९ वाजताच्या सुमारास घडली आहे.

मोहदा येथे मोठ्या प्रमाणात गिट्टीसाठी लागणारा दगडाच्या खाणी असून दररोज हजारो ब्रास दगडाचे उत्खनन केल्या जात आहे.या परिसरात १२ ते १५ गिट्टी क्रेशर असून कार्यान्वित आहे. या क्रेशरसाठी लागणारा दगळ उत्खननासाठी हजारो हेक्टर जमिनीवर उत्खनन करणाऱ्यांसाठी शासकीय लिजवर जमिनी वाटप करून खदाणी निर्माण केल्या आहे. 

मोहदा येथील क्रेशर मालक इस्माईल जैनुद्दिन झवेरी यांच्या नावे असलेल्या गिट्टी खदानीत काल रात्री १० वाजता च्या सुमारास राणू अहिरवार वय २६ वर्षाचा चालक हा प्रोकलॅन मशीन घेऊन उत्खननासाठी जात असता त्याचे प्रोकलॅन चालवित असताना संतुलन सुटले व ८० ते ९० फूट खोल खदाणीत प्रोकलॅन कोसळले असता यात चालक राणू अहिरवार रा. मोहदा हा चालक गंभीर जखमी झाला होता त्याला चंद्रपूर येथे उपचारासाठी दाखल केले असता उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. 

संबंधित खदाण मोहदा गावातील गट क्र. २८३ मध्ये असून त्या खदाण ची लिज ही संपली असल्याची चर्चा आहे. गावातील काही नागरिकांनी ती खदाण गावा जवळ आहे म्हणून बंद केली  होती. गावातील नागरिकांनी  प्रशासन अधिकाऱ्याकडे त्या खदाण ची एटीएस मोजणीची मागणी पण केली होती त्यावर काही कार्यवाही केली गेली नसल्याने गावकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. याबाबत उचित चौकशीची मागणी होत आहे.

                  घटना स्थळावर पोलिस दाखल

वणी तालुक्यातील शिरपूर पोलिस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या मोहदा येथे काल रात्री घडलेल्या अपघाताची चौकशी करण्यासाठी शिरपूर पोलिस स्टेशनचे ठाणेदार माधव शिंदे आपल्या ताफ्यासह आज तारीख १७ रोजी दुपारी १२.३० वाजता दाखल झाले आहे.