Thursday, July 30, 2026
Google search engine
Home Blog Page 28

नांदेपेरा चौकात वाढत्या वाहतूक अडथळ्यांविरोधात संभाजी ब्रिगेडचे निवेदन 

0

News Today  प्रतिनिधी, वणी

नांदेपेरा मार्गे वणी शहरात येणाऱ्या अवैध वाहनांमुळे निर्माण होणाऱ्या वाहतूक अडचणींवर उपाययोजना कराव्यात, यासाठी संभाजी ब्रिगेडच्या वतीने प्रशासनाला निवेदन देण्यात आले आहे.

संघटनेचे जिल्हाध्यक्ष अजय पांडुरंग धोबे यांच्या नेतृत्वाखाली दिनांक १ मे २०२५ रोजी उपविभागीय अधिकारी वणी आणि उपविभागीय पोलीस अधिकारी वणी यांच्याकडे हे निवेदन सादर करण्यात आले.

निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, नांदेपेरा चौकातून शहरात येणाऱ्या अवैध ट्रक व मालवाहतूक वाहनांमुळे सायंकाळच्या वेळेत नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागतो. यामुळे रस्त्यांवर वाहतूक कोंडी, अपघाताचा धोका आणि पर्यावरणाचेही नुकसान होत आहे.

या पार्श्वभूमीवर चौकात लावण्यात आलेल्या CCTV कॅमेर्‍यांचे तातडीने परीक्षण करून खालील तीन प्रमुख बाबींवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

CCTV फुटेजचे बारकाईने परीक्षण करावे.

अवैध वाळू वाहनधारकांची ओळख पटवून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी.

भविष्यात अशा प्रकारची वाहतूक अडचण होऊ नये यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात.

रात्री ९च्या नंतर पहाटे ३ ते ४ वाजेपर्यंत अविध्य वाळू वाहतुकीने नागरिकांची सुरक्षा धोक्यात आली आहे. प्रशासनाने याची गांभीर्याने दखल घ्यावी, अशी मागणी संभाजी ब्रिगेडने केली आहे.

वणी आगाराला मिळालेल्या ५ नव्या बसेसचा उद्या भव्य लोकार्पण सोहळा

0

News Today 

वणी, ता. ६ मे – वणी विधानसभेचे आमदार संजय देरकर यांच्या विशेष पाठपुराव्यामुळे वणी एस.टी. आगाराला ५ नवीन बसेस प्राप्त झाल्या असून, त्या उद्यापासून प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार आहेत. या नव्या बसेसमुळे वणी परिसरातील प्रवाशांना अधिक सोयीचा आणि सुटसुटीत प्रवास अनुभवता येणार आहे.

या बसेसच्या लोकार्पणाचा भव्य सोहळा उद्या, ७ मे २०२५ रोजी सकाळी १० वाजता वणी एस.टी. आगारात आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमास वणीचे आमदार संजय देरकर यांची प्रमुख उपस्थिती राहून बसेसचा लोकार्पण सोहळा संपन्न करणार आहे.

या कार्यक्रमास सर्व नागरिक, शिवसैनिक, तसेच आमदारांचे हितचिंतक आणि प्रवासी वर्ग यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे. वणी आगारासाठी ही नव्याने प्राप्त झालेली वाहने ही वाहतूक व्यवस्थेतील एक सकारात्मक पाऊल असून, ग्रामीण व शहरी भागातील प्रवास अधिक सुलभ आणि वेगवान होणार आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा मार्ग मोकळा; चार महिन्यांत निवडणुका घ्या – सर्वोच्च न्यायालयाचा आदेश

0

News Today 

वणी:- महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या रखडलेल्या निवडणुकांना अखेर गती मिळाली आहे. ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून २०२२ पासून प्रलंबित असलेल्या निवडणुकांवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. या सुनावणीत सर्वोच्च न्यायालयाने राज्य निवडणूक आयोगाला येत्या चार महिन्यांत निवडणुका घेण्याचे आदेश दिले आहेत.

ओबीसी समाजासाठी राजकीय आरक्षण सुनिश्चित करण्याच्या मागणीमुळे या निवडणुका रखडल्या होत्या. परिणामी, राज्यातील महत्त्वाच्या महापालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद आणि ग्रामपंचायतींच्या कारभारावर परिणाम झाला होता.

सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयामुळे आता निवडणूक प्रक्रिया सुरू होणार असून, स्थानिक स्वराज्य व्यवस्थेला पुन्हा चालना मिळणार आहे.या आदेशामुळे राज्यात राजकीय हालचाली वाढतील, आणि लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून स्थानिक प्रशासन अधिक कार्यक्षम होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

       चार आठवड्यात घोषणा होण्याची शक्यता

सर्वोच्च न्यायालयाने स्वानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचा मार्ग मोकळा केल्याने येत्या चार आठवड्यात  राज्य निवडणूक निवडणुकांच्या  घोषणा करणार असल्याची माहिती आहे. 

 

शासनाच्या घरकुल योजनेवर वाळूचा खडा? वणीतील लाभार्थ्यांमध्ये मोठा आक्रोश

0

वणी परिसरात तुफान वाऱ्याचा कहर; रात्रभर वीज गायब, नागरिकांचे हाल

0

News Today 

वणी:-  शहरासह ग्रामीण परिसरात काल तारीख ५ रोजी सुमारे ७ वाजता पासून मध्यरात्रीपर्यंत तुफान वाऱ्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून, अनेक भागांत रात्रभर वीजपुरवठा खंडित झाला. यामुळे नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागला.

सुमारे रात्री ७ वाजल्यापासून जोरदार वाऱ्यासह वीज पुरवठा खंडित झाला. परिणामी घरांमध्ये अंधाराचे साम्राज्य पसरले. गरमीमुळे नागरिक त्रस्त झाले असून, मोबाईल चार्जिंग, पाणीपुरवठा व इतर दैनंदिन कामांवरही परिणाम झाला आहे. काही भागांत झाडे व विजेचे खांब पडल्याच्या घटना नोंदवण्यात आल्या आहेत.

महावितरणकडून रात्रीपासूनच काम सुरू असून, अद्यापही काही भागात वीजपुरवठा सुरळीत झाला नसल्याचे समजते. नागरिकांनी महावितरणच्या कार्यक्षमतेवर नाराजी व्यक्त केली असून, प्रशासनाकडून तात्काळ उपाययोजना करण्याची मागणी होत आहे.

या तुफानी वाऱ्यामुळे कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी मोठ्या प्रमाणावर खांब, झाडे आणि काही घरांचे पत्रे उडाल्याचे स्थानिक सूत्रांकडून सांगण्यात येत आहे. प्रशासन व आपत्ती व्यवस्थापन विभागाने तत्काळ पंचनामे करून मदतकार्य हाती घ्यावे, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

भीषण अपघातात शेतकरी नेत्याच्या पत्नीचा मृत्यू

0

News Today 

वणी – शहराच्या ब्राह्मणी फाटा परिसरात आज ता. ५ रोज सोमवारी सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास घडलेल्या दुचाकी आणि ट्रकच्या भीषण अपघातात शेतकरी नेते देवराव धांडे यांच्या पत्नीचा जागीच मृत्यू झाला.

देवराव धांडे हे आपल्या पत्नी मालन धांडे यांच्यासह दुचाकीवरून जात होते. ब्राह्मणी फाटा येथे त्यांची दुचाकी एका उभा असलेल्या कारला मागून धडक दिली असता या धडकेमुळे देवराव धांडे रस्त्याच्या बाजूला फेकले गेले, तर मागे बसलेल्या मालन धांडे रस्त्यावर पडल्या.

त्याच वेळी कोळशाचा ट्रक त्या मार्गावरून जात होता. रस्त्यावर पडलेल्या मालन धांडे यांच्यावर ट्रक गेल्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला. या दुर्घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. घटनास्थळी वणी पोलिसांनी तात्काळ धाव घेऊन पुढील तपास सुरू केला आहे.

आमदार संजय देरकर यांच्या हस्ते विविध मामा तलावाच्या विकास कामाचे भूमिपूजन संपन्न 

0

News Today 

वणी :- तालुक्यातील लालगुडा, सावर्ला, निळापूर आणि कोलार या गावांमध्ये मामा तलावाच्या खोलीकरणाच्या कामाचे भूमिपूजन आज, १ मे रोजी सकाळी आमदार संजय देरकर यांच्या हस्ते संपन्न झाले. या कामामुळे ग्रामीण भागातील पाण्याची पातळी वाढण्यास मदत होईल, तसेच उन्हाळ्यात जनावरांची पाण्याची भटकंती थांबेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला. तलावाच्या खोलीकरणामुळे पाणीसाठ्यात लक्षणीय वाढ होणार आहे.

यावेळी बोलताना आमदार दरेकर म्हणाले की, लवकरच तलावाच्या सौंदर्यीकरणात भर घातली जाईल, ज्यामुळे परिसराला एक नवीन रूप प्राप्त होईल. त्यांच्या या आश्वासनामुळे ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजय निखाडे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे विधानसभा अध्यक्ष दिलीप भोयर, शरद ठाकरे, संतोष भोंगळे, संजय देठे, संतोष8 कुचनकर, सुनील मोहितकर, मनोज ढेंगळे, लालगुडा ग्रा. पं. सरपंच्या सौ. गीता उपरे, सदस्य वंदना चामटे, पूनम मंदे, विद्या पचकटे, शारदा मेश्राम, रत्नमाला चालखुरे, वैशाली नगराळे, विशाल डुकरे, कुणाल पथाडे उपस्थित होते. 

तर सावर्ला येथे सरपंच्या सौ. कुंदा चोपणे, उपरपंच अविनाश सोमलकर, रामदास  चोपणे, ऍड. विनोद चोपणे, विठ्ठल तुरणकर, महेश सोमलकर, अरविंद मालेकर, उपस्थित होते.  तर निळापूर येथे, सरपंच्या सौ. पूजा बोढाले, उपसरपंच रवींद्र कडसकर, वसंता चटप, विपुल ढवस,  प्रवीण चटप, विनोद पारखी, मारोती खामणकर, नामदेव कडुकर, उपस्थित होते. तर सामाजिक कार्यकर्ते अनिल बोढाले यांनी या कार्यक्रमाचे सूत्र संचलन करून सर्व मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. 

कोलेरा येथे ग्रा. पं. सदस्या सौ. काजल बोंडे, दिलीप पिदुरकर, जितेंद्र बोंडे, सचिन टिपले, प्रवीण बांदुरकर, उपस्थित होते.

झरी जामणी तालुक्यात विकासकामांचा धडाका; आमदार संजय देरकर यांच्या हस्ते आज विविध भूमिपूजन सोहळे

 

News Today

झरी जामणी :- दि. २ मे २०२५: झरी जामणी तालुक्यात विविध विकासकामांना गती देण्यासाठी आमदार संजय देरकर यांच्या हस्ते आज भूमिपूजन सोहळा पारपडणार आहे. या सोहळ्यात तालुक्यातील आठ महत्त्वाच्या रस्त्यांच्या सुधारणा कामांचा शुभारंभ करण्यात येणार आहे.

विकासकामांचा तपशील:
* कोसारा – मामा तलाव रस्ता सुधारणा: ₹ ३५.५१ लक्ष
* डोंगरगाव – मामा तलाव रस्ता सुधारणा: ₹ ४५.५४ लक्ष
* चीज घाट ते बोपापूर रस्ता सुधारणा: ₹ १०० लक्ष
* शिबला – बोरगाव – रोहपाट रस्ता सुधारणा (अ): ₹ २२५ लक्ष
* शिबला – बोरगाव – रोहपाट रस्ता सुधारणा (ब): ₹ २२५ लक्ष
* सगनापूर ते म्हैसदोडका रस्ता सुधारणा: ₹ २५ लक्ष
* कारेगाव – पिवरडोल रस्ता सुधारणा: ₹ ७१ लक्ष
* मांगुर्ला – झारी – जामणी रस्ता सुधारणा: ₹ १२० लक्ष


भूमिपूजन सोहळ्याचा कार्यक्रम:
सकाळी ११ वाजल्यापासून सुरू झालेल्या या सोहळ्यात दिवसभर विविध ठिकाणी भूमिपूजन कार्यक्रम आयोजित करण्यात आले. यावेळी महाविकास आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते तसेच शिवसेनेचे प्रमुख पदाधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहण्यासाठी आवाहन करण्यात आले आहे.

या सोहळ्याला शिवसेनेचे सर्व प्रमुख पदाधिकारी, विभाग अध्यक्ष आणि नागरिक उपस्थित राहण्याचे आवाहन आमदार संजय देरकर यांच्या जनसंपर्क कार्यालय वणी यांच्याकडून माहिती देण्यात आली आहे.

जागतिक कामगार दिनानिमित्त मोहदा येथील मृत कामगाराला न्याय मिळेल काय?

0

महसूल विभागाकडून खदान धारकांची पाठराखण का?

News Today 

वणी :- मोहदा येथे ८० फूट खोल गिट्टी खदाणीत प्रोब्लेम मशीन पडून एका कामगाराचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेला आता बराच काळ लोटला आहे, तरीही मृत कामगाराला न्याय मिळालेला नाही, अशी खंत व्यक्त होत आहे. आश्चर्य म्हणजे, या प्रकरणी महसूल विभागाकडून योग्य कारवाई होत नसल्याचा आरोप स्थानिक करत आहेत. गौण खनिज मानकांचे सर्रास उल्लंघन होत असताना आणि अनेक लिझ धारकांच्या खाणीत कामगारांचा विमा नसतानाही महसूल विभाग मूग गिळून बसला आहे का, असा सवाल उपस्थित होत आहे.

या भागातील अनेक खाणींमध्ये कामगारांच्या सुरक्षेची कोणतीही काळजी घेतली जात नाही. कामगार जीव मुठीत घेऊन केवळ पोटापाण्यासाठी काम करत आहेत. कामगार कायद्याचे सरळसरळ उल्लंघन होत असूनही संबंधित यंत्रणा कोणतीही ठोस भूमिका घेत नाही, हे दुर्दैवी आहे.

जागतिक कामगार दिनी तरी या मृत कामगाराच्या कुटुंबाला न्याय मिळेल का? महसूल विभाग आपली भूमिका बदलून दोषींवर कारवाई करेल का? हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. 

राष्ट्रीय पातळीवरील नृत्य स्पर्धेत वणीतील स्पर्धाकांचे जोरदार प्रदर्शन

0

 

विविध पारितोषिके पटकावित वणीची राष्ट्रीय पातळीवर शान

News Today 

वणीः- महाराष्ट्रातील वर्धा येथे दिनांक 25 एप्रिल ते 27 एप्रिल 2025 दरम्यान तीन दिवशीय राष्ट्रीय पातळीवरील अखिल भारतीय नृत्य स्पर्धा “नृत्योत्सव-3” या स्पर्धेचे आयोजन राष्ट्रीय कला मंच व सचिन डान्स अकाडमी यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते. या राष्ट्रीय पातळीवरील अखिल भारतीय नृत्य स्पर्धेमध्ये वणीतील चिमुकल्या स्पर्धाकांनी आपल्या नृत्याचे जोरदार प्रदर्शन करत वणीची शान उंचावली आहे.

या राष्ट्रीय पातळीवरील अखिल भारतीय नृत्य स्पर्धेमध्ये कु. भार्गवी विरेंद्र महाजण,कु.युक्ता सहारकर,कु.क्रिष्मा चाणना,दिशा केशवाणी.कु. उर्वी प्रणित बांगडे, कु. सिया सचिन डोर्लीकर, कु.मुग्धा सचिन डोर्लीकर, चि. आरुश सुधीर पांडे,कु सिद्धी कोंडावार कु.ध्रुवीया रासेकर यांनी “नृत्योत्सव-3” या स्पर्धेमध्ये सहभाग घेवुन राष्ट्रीय पातळीवरील अखिल भारतीय नृत्य स्पर्धेत वणीतील कु भार्गवी वीरेंद्र महाजन वय 7 वर्ष,युक्ता सहारकर,क्रीष्मा चाणना,दिशा केशवाणी या चिमुकल्यानी आपल्या कलेचे जोरदार प्रदर्शन करत द्वितीय क्रमांक पटकावीला तर कु.उर्वी बांगडे ,कु.सिया डोर्लीकर,कु मुग्धा डोर्लीकर, कु.ध्रुवीया रासेकर,चि.आयुश पांडे ,कु.सिद्धी कोंडावार, या चिमुकल्याणी तृतीय पारितोषिके पटकावीत कलेचे जोरदार प्रदर्शन करत वणीची राष्ट्रीय पातळीवर शान उंचाविली.

नृत्य प्रशिक्षिका गुरुरत्न कु. पुजा धनवटे यांनी मोलाची कामगिरी करत चिमुकल्याना घडविल्याबद्दल तसेच बालकांना घडविण्याचा वसा घेतल्याने या प्रसंगी त्यांचा गौरव करत गुरुरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

या बाबत असे की, अशा नृत्य स्पर्धा दरवर्षी राष्ट्रीय पातळीवर आयोजित करण्यात येत असुन या स्पर्धेमध्ये विविध राज्यातील स्पर्धक भाग घेत असतात.याआधी हिच स्पर्धा छत्तीसगड येथील दुर्ग,महाराष्ट्र राज्यातील नांदेड व गोवा येथील पणजी येथे तसेच भारतातील अनेक राज्यामध्ये आयोजित करण्यात आली होती.त्यामध्ये सुद्धा याच स्पर्धाकांनी पारितोषिक पटकाविले होते. राष्ट्रीय पातळीवरील अखिल भारतीय नृत्य स्पर्धेमध्ये वणीतील चमूंनी बाजी मारणे, हे वणीकरांसाठी अभिमानास्पद बाब आहे. वणीतील चमुंनी राष्ट्रीय पातळीवर विविध स्पर्धेत विजय मिळवित पारितोषीके पटकाविल्याने सर्वच स्पर्धकांचे व नृत्य प्रशिक्षिका यांचे सर्वत्र कौतुक करण्यात येत असून अभिनंदनाचा वर्षाव करण्यात येत आहे. स्पर्धकांनी या विजयाचे श्रेय त्यांचे आई वडील व नृत्यगुरु पूजा धनवटे व गुरूजनांना दिले आहे.