Thursday, July 30, 2026
Google search engine
Homeवणीवणीत 31 जुलै रोजी 'एक शाम रफी के नाम' कार्यक्रमाचे आयोजन

वणीत 31 जुलै रोजी ‘एक शाम रफी के नाम’ कार्यक्रमाचे आयोजन

News Today 
वणी : महान पार्श्वगायक पद्मश्री मोहम्मद रफी साहेब यांच्या 46 व्या पुण्यतिथीनिमित्त फ्रेंड्स म्युझिकल ग्रुप, वणी यांच्या वतीने “एक शाम रफी के नाम” या सदाबहार गीतांच्या भव्य संगीत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
हा कार्यक्रम शुक्रवार, दि. 31 जुलै 2026 रोजी सायंकाळी 5.30 वाजता एल. टी. कॉलेज हॉल, वरोरा रोड, वणी येथे संपन्न होणार आहे.
या कार्यक्रमात प्रसिद्ध गायक अरुण डवरे, शेख रफीक, दिंगबर ठाकरे, संतोष जोशी, जयप्रकाश सूर्यवंशी तसेच गायिका सारिका चांदेकर हे मोहम्मद रफी यांच्या अजरामर आणि सदाबहार गीतांचे सादरीकरण करून रसिकांना मंत्रमुग्ध करणार आहेत.
रफी साहेबांच्या सुरेल आठवणींना उजाळा देणाऱ्या या सांगीतिक मैफलीस वणी व परिसरातील सर्व संगीतप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाचा आनंद घ्यावा, असे आवाहन फ्रेंड्स म्युझिकल ग्रुप, वणी यांच्या वतीने करण्यात आले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Today News

Most Popular

Visitor Counter