Saturday, May 2, 2026
Google search engine
Home Blog Page 31

भांडेवाडा येथे खुल्या कबड्डीच्या सामन्याचे आ. संजय देरकारांच्या हस्ते उद्धाटन व सत्कार समारंभ 

0

News Today 

वणी :- येथून जवळच असलेल्या भांडेवाडा येथे तारीख  १२ फेब्रुवारी रोजी रात्री ८ वाजता हनुमान मंदिर परिसरातील क्रीडांगणावरआमदार संजय देरकर यांच्या हस्ते कबड्डीच्या खुल्या सामन्याचे उद्धाटन व मान्यवरांचा सत्कार सोहळा संपन्न करण्यात आला. यावेळी श्री गुरुदेव सेनेचे अध्यक्ष दिलीप भोयर, माजी जि. प. सदस्य संघदीप भगत, सरपंच्या सौ. संगीता गोबाडे आदी मान्यवर उपस्थित होते.

भांदेवाडा येथील जय जगन्नाथ क्रीडा मंडळाकडून भव्य खुल्या कबड्डीचे सामने तारीख ११ फेब्रुवारी ते १३ पर्यंत आयोजित केले होते. या कार्यक्रमात भांदेवाडा या गावातील घेऊन विविध जिल्ह्यात शासकीय सेवेतून सेवा निवृत्ती घेणाऱ्या जवळपास ४० नागरिकांचा शाल व सन्मान चिन्ह देऊन  आमदार संजय देरकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

यावेळी उपसरपंच प्रेमानंद धानोरकर, सौ. सुरेखा आवारी, नानाजी झाडे, मो. अस्लम , सतीश तेडेवार, राजू डावे यांचे सह समस्त ग्रामवासी व क्रीडा प्रेमी जनता उपस्थित होते. यावेळी या कार्यक्रमाचे संचालन व आभार संजय गोबाडे यांनी मानले. 

पोलिस स्टेशनला “तोडी स्टेशन” करणाऱ्या तीन कर्मचाऱ्यांवर कारवाईचा बडगा, केवळ उचलबांगडीने ललितला न्याय मिळेल का?

0

डी.बी. पथकातील वादग्रस्त हेड कॉन्स्टेबल विकास धडसे, शुभम सोनुले, सागर सिडाम यांची बदली

News Today (दिलीप भोयर)

वणी :- वणी पोलीस स्टेशनला “तोडी स्टेशन” बनविणाऱ्या तीन पोलिस कर्मचाऱ्यांवर वरिष्ठांनी कारवाईची बडगा म्हणून त्यांची तडकाफडकी बदली केली आहे. परंतु या बदलीने स्व . ललित लांजेवार यांना न्याय मिळेल का? असा प्रश्न अनुत्तरित आहे. त्यामुळे पोलिस विभागाची कार्यप्रणाली वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. 

     मागील ५ महिन्यात ४ पोलीस कर्मचाऱ्यांचे निलंबन आणि ठाणेदार अनिल बेहरानी यांची मुख्यालयी बदली पाठोपाठ शनिवारी डी बी पथकातील ३ पोलिस कर्मचाऱ्यांची तडकाफडकी उचलबांगडी करण्यात आली. हेड कॉन्स्टेबल विकास धडसे, शुभम सोनुले, सागर सिडाम असे बदली करण्यात आलेले पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.

वणी पोलीस स्टेशन हद्दीत अवैध धंदे व गुन्ह्यांवर आळा घालण्यासाठी पोलीस ठाण्यात वेगळे डिबी पथक (गुन्हा शोध शाखा) तयार करण्यात आले. मात्र मागील एका वर्षापासून डिबी पथकातील काही महाभाग पोलीस कर्मचाऱ्यांनी अवैध वसुली आणि तोडी करण्याचा सपाटा लावला. रेती तस्कारांसोबत संबंध, रेती चोरी व्यवसायात पोलिसांची भागीदारी, अवैध धंद्यांना पाठबळ तसेच शिवसेना शहर अध्यक्ष ललित लांजेवार मृत्यु प्रकरणी या तिन्ही पोलीस कर्मचाऱ्यांवर कारवाईची मागणी केली जात होती. 

स्व. ललित लांजेवार यांनी वरील तीन कर्मचाऱ्यांची रेती तस्करीत सहभाग असल्याची पोलीस विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत तक्रार केल्याने यातील एका कर्मचाऱ्यांनी ललितला जातीवाचक गुन्ह्यात अडकविण्याची धमकी दिली होती. त्याच धमकीची धास्ती घेतल्याने ललित यांना हृदय विकाराच्या झटका आला व त्यात त्यांचा मृत्यू झाल्याचा आरोप होत आहे. 

जर या तीन कर्मचाऱ्यांचे रेती तस्करीत सहभाग असेल तर ललित लांजेवार यांनी केलेली तक्रार ही खरी होती. पोलिस विभागात राहून जर कायदा तोडून पोलिसच तस्करदार होत असेल तर हा गुन्हा गंभीर आहे. केवळ बदलीचे फार्स आवळून पोलिस विभाग त्यांच्या गुन्ह्यांवर पदडा घालत असल्याचे आरोप आता होत आहे. जर ते पोलिस दोषी नसेल तर त्यांचेवर बदलीची कारवाई का केल्या जात आहे. याचा खुलासा पोलिसांनी देण्याची गरज निर्माण झाली आहे.

विविध प्रकरणात खाकीतील खादाडांनी लावले डाग..!

येथील पोलिस स्टेशनचे कर्मचारी मटका, जुगार, अवैध दारु विक्री, वाहतूकदार यांच्याकडून पोलिसांची हप्तावसुली काही नवीन गोष्ट राहिलेली नाही. मात्र गोवंश तस्करी व कत्तलखाना चालकांकडून हप्ता वसुलीचे डाग पहिल्यांदा वणी पोलिसांच्या खाकीवर लागले आहे. शहरात ठिकठिकाणी सूरु असलेले देह व्यवसायालाही पोलिसांचा पाठिंबा असल्याचे बोलले जाते. नुकतेच २७ जानेवारी रोजी शहरातील एका वसाहतीत केलेल्या कारवाईत डिबी पथकाने देह व्यवसाय करणाऱ्या ४ महिला व ३ ग्राहकाला त्यांचे वाहनासह ताब्यात घेतले. मात्र आर्थिक व्यवहारातून ग्राहकाला कारवाईतून वगळण्यात आल्याची जोरदार चर्चा आहे .

आमदार संजय देरकरांनी घेतला भांदेवाडा भूमिगत खाणीतील थरारक अनुभव,  चार तास घालविले खानीतील किर्र अंधारात

0

आमदार संजय देरकरांनी घेतला भांदेवाडा भूमिगत खाणीतील थरारक अनुभव,  चार तास घालविले खानीतील किर्र अंधारात

News Today 

वणी :- वणी तालुक्यात वेकोलीच्या आठ कोळसा खाणी आहेत .त्यामुळे वणीतील युवकांना रोजगार देणारा सर्वात मोठा स्रोत आहे. मात्र भूमिपुत्रांना व नव्याने वेकोलीत नोकरी लागलेल्या युवकांना शिक्षा म्हणून त्याच्या कार्यक्षमतेची कसोटी तपासण्यासाठी त्यांना भांदेवाडा येथिल भूमिगत खाणीत नेमणूक दिल्‌या जाते. म्हणून या भूमिगत कोळसा खाणीत कोणत्या समस्या आहेत हे जाणून घेण्याची उत्सुकता आमदार संजय देरकर यांना होती. त्यामुळे त्यांनी शनिवारी ८ फेब्रुवारीला प्रत्यक्ष भांदेवाडा भूमिगत खाणीत उतरून समस्या जाणून घेतल्या. यावेळी वेलोली कडून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. 

आमदार संजय देरकर हे शनिवारी दुपारी एक वाजता वेकोलीचे अधिकारी तसेच त्यांचे सहकारी गणपत लेडांगे, दिलीप भोयर, वेकोलीच्या सुरक्षा बोर्ड चे सदस्य सुनिल मोहीतकर , मो. असलम खान,संघदीप भगत, भगवान मोहिते, देवेंद्र बच्चेवार, प्रेमा धानोरकर, मो. अशरफ, अजिंक्य शेंडे, अजय कवरासे, कुणाल म्यकलवार, बालू दूधकोहळे तसेच इतर कार्यकत्यासह खाणीत उतरले. खाणीतील किर्र अंधार व चढ उताराचे रस्ते पार करीत त्यांनी तब्बल चार तास खाणीत पायी प्रवास केला. 

वेकोलीचे क्षेत्रीय महाप्रबंधक एम. संगीवारेड्डी ,क्षेत्रीय उपप्रबंधकक सय्यद नाझीमुद्दीन, क्षेत्रीय कार्मीक प्रबंधक ओ. पी. करोले, खाण व्यवस्थापक राहुल गवई यांनी खाणीतील सर्व कामकाजाची माहिती दीली. तसेच वेकोलीतर्फे आमदार देरकर यांचे स्वागत करण्यात आले. भूमिगत कोळसा खाणीला प्रत्यक्ष भेट देणारे देरकर हे पहिलेच आमदार असल्याने खाण व्यवस्थापनाकडून समाधान व्यक्त करण्यात आले.

खानीबदल माहिती देताना उपक्षेत्रीय प्रबंधक सय्यद नाझोमुद्दीन म्हणाले की वणी विभागात प्राचीन काळी एखाद्या नदीचे खोरे असावे त्याचेसभोवार घनदाट जंगले असावे. काळाच्या ओघात भौगोलीक उलथापालथ होऊन जंगल जमिनीखाली दाबले गेले व त्यापासुन वणी परिसरात भूगर्भात प्रचंड असे कोळशाचे थर निर्माण झालेआहे.

भांदेवाडा भूमिगत खाणीला 30 ते ३५ वर्ष झाली. मात्र अजुन येथिल २५ टक्केही कोळसा बाहर काढला गेला नाही. या खाणीत तीन पाळ्यात कामगार काम करतात. प्रत्येक पाळीतुन ५० ते ६० टन कोळसा बाहेर काढला जातो. या खानीतुन मिळणारे उत्पादन खर्चापेक्षा अधिक आहे. मात्र भूमिगत खाणीचे एक मॉडेल टिकविण्यासाठी वेकोलि प्रशासन ही भूमिगत खाण सुरु आहे असे राहूल गवई यांनी स्पष्ट केले. ही कोळसाखाण जमिनीपासुन १०० ते १५० मीटर खोलीवर आहे .परंतु सुरक्षेच्या दृष्टीने सर्व उपाययोजना केल्या आहेत.

आमदार देरकर यांनी खाणीत काम करणारे कामगारांशी प्रत्यक्ष संवाद साधुन त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. व कोळसा कसा काढला जाती यांचे प्रात्यक्षिकही डोळ्याने बघीत‌ले. खाणीत जाने -येणेचा त्रास सोडला तर बाकी कोनत्याही समस्या नसल्याचे कामगारांनी आमदार देरकर यांना सांगीतले.

              संजय देरकर,आमदार ,वणी

खाणीतील प्रत्यक्ष कामकाज बघुन डोळ्याचे पारणे फीटले.फकक्त खाणीत जाणे-येणे साठी एकच प्रवेशद्वार आहेत ते खटकले. प्रवेशद्वार दोन-तीन करावे अशी मागणी मी केंद्रीय खानमंत्र्याकडे करणार आहे.

 सय्यद नाझीमुद्दीन, क्षेत्रीय उप प्रबंधक, भांदेवाडा भूमिगत खाण 

आमदार संजयजी देरकर यांनी आमच्या भूमिगत खाणीला भेट देऊन सुरक्षीततेची माहीती घेतली.कामगारांचा उत्साह वाढविला याबद्दल मला आनंद झाला. ते वेकोलिच्या कामकाजाबाबत सकारात्मक विचार करणारे नेते वाटले. आम्हाला वेळोवेळी त्यांचे सहकार्य अपेक्षीत आहे.

भूमिगत खाणीत जावून कामगारांच्या आपुलकीने समस्या जाणून घेणारे पाहिले आमदार – सुनील मोहितकर

वेकोलीतील कामगारांच्या अनेक समस्या आहे. त्यातल्या त्यात भूमिगत कोळसा खाणीत काम करणे म्हणजे जीव मुठीत घेवून काम करणे आहे. परंतु त्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी प्रत्यक्ष भूमिगत खाणीत जावून त्यांच्या समस्यांची जाणिव करून घेणारे आमदार संजय देरकर हे पहिले लोकप्रतिनिधी आहे. त्यांच्या या कृतीने वेकोली कामगारामध्ये उत्साह निर्माण झाला आहे. 

               

शिबला येथील आश्रम शाळेत आ. संजय देरकरांनी काढली रात्र

0

चिमुकल्यांच्या ढेमसा नृत्याने जिंकले आ. संजय देरकरांचे मन

News Today 

वणी :- येथून जवळच असलेल्या झरीजामणी तालुक्यातील शिबला येथील शासकीय आदिवासी आश्रम शाळेत चिमुकल्यांशी संवाद या कार्यक्रमांतर्गत काल ता. ७ रोजी ८ वाजता रात्री वणीचे विधानसभेचे आमदार संजय देरकर यांनी विद्यार्थ्यांसोबत संवाद साधत एक रात्र तिथेच काढल्याने सर्व मतदार संघात आपुलकीचा आमदार म्हणून चर्चा होताना दिसून येत आहे.

शिबला येथील शासकीय आश्रम शाळा ही सन १९७२ पासून सुरू असून या ठिकाणी दरवर्षी चारशे ते पाचशे विद्यार्थी आपले शैक्षणिक भविष्य घडवीत असतात येथील आश्रम शाळेत या वर्षी देखील चारशे १७१ मुली तर दोनशेच्या वर मुळे आहे. वर्ग ५ ते १२ वी पर्यंत ही आश्रम शाळा आहे. उत्कर्ष २०२५ म्हणून या ठिकाणी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

  1. आमदार संजय देरकर यांनी विद्यार्थ्यांसोबत भोजन करून त्यांच्या कडून त्यांना निर्माण होणाऱ्या समस्यांची विचारपूस केली. तसेच विद्यार्थ्यांनी गीत गायन ,नृत्त सादर केले, आपापल्या भूमिका कथन केल्या आमदारांनी खेळीमेळीचे वातावरण निर्माण करून त्यांना प्रोत्साहन मिळेल अश्या पद्धतीने संबोधन केले. 

यावेळी या कार्यक्रमाचे उद्घाटन आमदार संजय देरकर यांनी केले. तर अध्यक्ष म्हणून शाळेचे मुख्याध्यापक प्रा. जे.जी. कांबळे तर प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा बँकेचे विभागीय अध्यक्ष राजू येल्टीवार, दिलीप भोयर कृ. ऊ.बा.स.चे माजी सभापती संतोष कूचनकर, शिबला ग्राम पंचायतीचे सरपच्या सौ. तोडासे अखिल कोठारे, कुंदन टोंगे, प्रदीप दुधकोहळे , पाडुरंग पोयाम ,ग्रा. सदस्य रंजना गेडाम,रेश्मा पुसाम, नंदा नैताम. आदी मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दिघाडे प्रास्ताविक उमाळे अधीक्षक भटकर व अधिक्षिका बारावी मॅडम यांनी केले.

 आज आ. संजय देरकर करणार राजूर – भांदेवाडा भूमिगत कोळसा खानीची पाहणी,

0
  1. भुमगत कोळसा खाणीत जावून पाहणी करणारे संजय देरकर हे पहिले आमदार

News Today 

वणी:- वेस्टर्न कोल्ड फील्ड लिमिटेड नॉर्थ क्षेत्रातील राजूर – भांदेवाडा भूमिगत कोळसा खानीची आज तारीख ८ रोजी सकाळी ११ वाजता वणी विधानसभेचे आमदार संजय देरकर हे पाहणी करणार असून प्रत्यक्ष खदानीत जावून पाहणी करून कामगारांच्या समस्या जाणून घेणारे संजय देरकर पाहिजे आमदार ठरणार आहे.

वणी नॉर्थ क्षेत्रात भांदेवाडा व कुंभारखणी या दोन भूमिगत कोळसा खाणी असून यातील भांदेवाडा या खाणीत सुमारे ७५० च्या वर कामगार काम करीत आहे. यात यवतमाळ, चंद्रपूर , नागपूर जिल्ह्यातील कामगारांचा समावेश आहे. कोळशाच्या खुल्या खदाणीत कामगार म्हणून काम करण्यासाठी अनेक जण उत्साहाने काम करतात परंतु भूमिगत खाणीत काम करण्यासाठी सहजा सहजी कोणी धजवत नाही. 

भुमिखत कोळसा खाणीत अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते असून अनेक किलोमीटर आत जावून कोळशाचे उत्खन करावे लागते आहे. कोळसा उत्खनन करताना लहणातील लहान चूक देखील जीवावर बेतू शकतात असे कामगारांकडून सांगण्यात येतात. म्हणून या ठिकाणी जिम्मेदारी घेवून कामगारांना कोळसा उत्खनन करावे लागते आहे.

भूमिगत कोळसा उत्खनन करण्यासाठी वेकोली कामगारांना काय अडचणी निर्माण होतात व त्यांच्या पुढे कोणकोणती आवाहने निर्माण होतात याची प्रत्यक्ष जाणीव व पाहणी करण्यासाठी आमदार संजय देरकर हे स्वतः भूमिगत कोळसा खाणीत जावून पाहणी करणार आहे. भूमिगत कोळसा खान प्रत्यक्ष पाहणारे देरकर हे पहिले आमदार ठरणार आहे. त्यामुळे त्यांची चांगलीच चर्चा होत आहे. एक आमदार प्रथमतः कोळसा खाणीत जाणार असल्याने वेकोळी कडून चोख सुरक्षा घेण्यात येत आहे.

त्यांचे सोबत वेकोलीचे महाप्रबंधक रेड्डी, शिवसेचे उपजिल्हा प्रमुख दीपक कोकास, दिलीप भोयर, अजय कवरासे, मो. अस्लम, संघदीप भगत, मो. अशरफ, अजिंक्य शेंडे, भगवान मोहिते, संजय देठे, प्रेमा धानोरकर व शिवसेनेचे काही नेते मंडळी उपस्थित असणार असल्याची माहिती आहे. 

 

आज आमदार संजय देरकरांचा शिबला येथील आदिवासी आश्रम शाळेत मुकाम, चिमकल्यांशी साधणार संवाद

0

News Today 

वणी :- विधानसभेचे आमदार संजय देरकर आज तारीख ७ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ६ वाजता शिबाला ता. झरिजामनी येथील आदिवासी आश्रम शाळेत चिमुकल्या विद्यार्थ्यांसोबत संवाद साधून त्यांच्या समस्या स्वतः जाणून घेणार आहे. त्याच ठिकाणी आपला तंबू ठोकून मुक्कामी असणार आहे. त्यासाठी सर्व प्रशासन कामी लागले आहे. महाराष्ट्र शासनाच्या संवाद चिमुकल्यांशी अभियान या महाराष्ट्र शासनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

महाराष्ट्रात शासनाच्या या उपक्रमामुळे शालेय कालावधीमध्ये शासनाने निर्गमित केलेल्या सर्व सोईसुविधा, अद्यावत करुन ठेवण्यात यावे व सदर कालावधीमध्ये सर्व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी गैरहजर राहणार नाही यादी दक्षता घ्यावी, व सर्व कर्मचारी शासनाने निर्गमित केलेल्या पोषाखामध्ये उपस्थित राहण्याबाबत आपल्या स्तरावरुन कळविण्यात यावे. असे निर्देश पांढरकवडा येथील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी अमित रंजन यांनी संबंधित मुख्याध्यापक यांना देण्यात आले आहे.

एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प महाराष्ट्र शासन मंत्रालय आदिवासी समाजाचे लोकप्रतिनिधी, मंत्रालयीन अधिकारी शुक्रवार दि.०७. फेब्रुवारी, २०२५ रोजी राज्यातील शासकीय आदिवासी आश्रमशाळांमध्ये किंवा आदिवासी वसतीगृहामध्ये जाउन विद्यार्थ्यांच्या अडीअडचणी, समस्या जाणून घेण्यासाठी मुक्कामी थांबणार आहेत.

या कार्यालयाच्या कार्यक्षेत्रातील मा. मंत्री , राज्यमंत्री, खासदार, आमदार यांचेशी संपर्क साधले असता ते खालील शासकीय आदिवासी आश्रमशाळांमध्ये मुक्कामी थांबणार आहेत. यात वणी विधानसभेतील शिबला येथील आश्रम शाळेत आमदार संजय देरकर हे थांबणार आहे. सर्व त्यामुळे प्रशासन कामी लागले आहे.0

चोर सोडून संन्याशाला मार, वणी पोलिसांचा ऊर्फाटा कारभार, विनाकारण शेतकरयाला मारहाण, सरपंच हितेश राउत संतप्‍त

0

पोलीस उपनिरीक्षकांविरोधात पालकमंत्र्यांकडे तक्रार

News Today 
वणी :- पोलीस स्‍टेशनमधील अनागोंदी कारभार काही केल्‍या संपुष्‍टात येतांना दिसत नाही. अधिकारी तथा कर्मचारयांचा मनमानी कारभार शिगेला पोहचला आहे. शासनाच्‍या धोरणाला हरताळ फासुन शेती पुरक व्‍यवसाय करणारया शेतकरयाला पोलीस उप निरीक्षकांनी मारहाण केल्‍याची घटना उघडकीस आली आहे. याघटनेने अहेरल्‍लीचे सरपंच हितेश राउत चांगलेच संतप्‍त झाले आहे. त्‍यांनी पोलीस उप निरीक्षक गुल्‍हाने यांच्‍या विरोधात पालकमंत्र्यांकडे तक्रार केली आहे.

वणी पोलीस स्‍टेशनमध्‍ये कार्यरत पोलीस अधिकारी तथा कर्मचारी यांच्‍या विरोधात वरीष्‍टांकडे तक्रारीचा सपाटा लावला जात आहे. सातत्‍याने घडत असलेल्‍या घटनांनी पोलीस प्रशासनाच्‍या अब्रुची लक्‍तरे वेशिवर टांगल्‍या जात आहे. कर्मचारी सैराट वागत आहे. अधिकारी मनमानी करत आहे. असे असतांना डिवायएसपी गणेश किंद्रे बघ्‍याची भुमिका घेत आहे. त्‍यांच्‍या कार्यप्रणालीवर प्रश्‍नचिन्‍ह निर्माण होत आहे.

वणी ठाणेदारांची नुकतीच उचलबांगडी करण्‍यात आली आहे. डीबी प्रमुख विकास धडसेंच्‍या धमकी प्रकरणाची व्‍याप्‍ती वाढतच आहे. एका घटनेचे मळभ दुर सारत नाही तर खाकीची प्रतिमा डागाळणारी दुसरी घटना घडत आहे. शेती पुरक व्‍यवसाय करणारया निष्‍पाप शेतकरयाला शहरातील दिपक चौपाटी परीसरात पोलीस उप निरीक्षक गुल्‍हाने यांनी मारहाण केल्‍याचा आरोप सरपंच हितेश राउत यांनी केला आहे. तर घटनेची तक्रारी पालकमत्र्यांना केली आहे.

तक्रारीत शेतकरयांनी शेती सोबतच जोडधंदा करुन आर्थिक उन्‍नती साधावी असे शासनाचे धोरण आहे. माञ वणी पोलीस ठाण्‍यातील डीबी पथकातील अधिकारयांने कोंबडया विकत घेणारया शेतकरयांना मारहाण करुन पिटाळुन लावल्‍याची घटना रविवार दिनांक 2 फेब्रुवारीला जञा मैदान परिसरात घडल्‍याचा आरोप सरपंच राउत यांनी केला आहे.

रविवारी शहरातील जञा मैदान परीसरात व्‍यापारी जातीवंत कोंबडयांची विक्री करत होते तर अनेक शेतकरी कोंबडे व कोंबडया विकत घेण्‍यासाठी आले होते. यादरम्‍यान पोलीस उप निरिक्षक गुल्‍हाणे हे आपल्‍या डीबी प‍थकांसह तेथे आले. त्‍यांनी कोंबडे विक्रेत्‍यांना मज्‍जाव करत कोंबडे विकत घेत असलेल्‍या शेतकरयांना मारहाण केली. असा आरोप तक्रारीतुन राउत यांनी केला आहे.

पालीस स्‍टेशन हददीत कोंबड बाजार खेळणारयांना मुभा दिली जात आहे. यामुळे पोलीसांची भुमिका संशयास्‍पद असल्‍याचा आरोपही सरपंच राउत यांनी केला आहे. तर शेतकरयांनी जोडधंदा करु नये का असा प्रश्‍न तक्रारीतुन उपस्थित केला आहे.याप्रकरणी पोलीस उप निरीक्षक गुल्‍हाने यांचेवर काय कारवाई होणार हे बघणे औत्‍सुक्‍याचे ठरणार आहे.

     वणी पोलिस स्टेशन मध्ये चालले तरी काय ?

येथील पोलिस स्टेशन दररोज नवनवीन वादात अडकले दिसून येत आहे. पोलिस कर्मचारीच या ना त्या वादात गुंतून असल्याचे निदर्शनात येत आहे. वाळू तस्करी, वारली मटका, जुगार अड्डे, अविध्य दारू विक्री, कोळसा तस्करी जोमात सुरू आहे. अश्या गैर कायदेशीर प्रकारात चक्क पोलिसच भागीदारी करून कायदा व सू व्यस्वस्था धोक्यात आणत आहे. गैर कायदेशीर व्यावसायिकांना अभय देत आहे तर सर्व सामान्य जनतेला दंडुके शाही दाखवत आहे. त्यामुळे नेमके या पोलिस स्टेशन मध्ये चालले तरी काय हे समजायला मार्ग गवसत नाही.

एका महिन्यात ट्रॉमा केअर सेंटर चालू करा – आ. संजय देरकर

0

रुग्णांना मिळणार अत्याधुनिक सुविधा
ग्रामीण रुग्णालयाची आढावा बैठक संपन्न.

News Today

वणी :- येथील ग्रामीण रुग्णालयातील सुसज्य आरोग्य सुविधेने भरून असलेले ट्रॉमा केअर सेंटर येत्या एका महिन्यात चालू करण्याच्या अनुषंगाने वणी विधानसभेचे आमदार संजय देरकर यांनी ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. सुलभेवार यांना सूचना दिल्या आहे.
आज तारीख ४ रोजी दुपारी १२ वाजता ग्रामीण रुग्णालयाची आढावा बैठक आ. देरकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली यावेळी ते बोलत होते.

मागील ७ ते ८ वर्षापासून ग्रामीण रुग्णालयाला लागून ट्रॉमा केअर सेंटर म्हणून इमारत बांधण्यात आली आहे. या इमारतीत अत्याधुनिक आरोग्य विषयक लागणाऱ्या सर्व साहित्य देखील उपलब्ध झालेले आहे. असे असताना देखील सर्व साहित्य धूळखात पडलेल्या अवस्थेत आहे.

आज आमदार संजय देरकर यांनी आरोग्य विभागाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांची आढावा बैठक आयोजित केली असता या बैठकीच्या निमित्ताने सर्व इमारत व इमारतीतील साहित्याची पाहिनी केली व सर्व साहित्याची माहिती करून घेतली असता रुग्णांना अत्याधुनिक सुविधा पुरवितात येईल असे साहित्याबद्द या ठिकाणी उपलब्ध आहे.

परंतु त्या साहित्याचा वापर करण्यासाठी लागणारे तज्ञ मनुष्यबळ उपलब्ध नसल्याने ट्रॉमा केअर धूळखात पडले आहे.असे निदर्शनात आले असता आमदार देरकर यांनी एका महिन्यात ट्रॉमा केअर सेंटर चालू करण्यासाठी ज्या अडचणी आहे. त्या दूर करून सेंटर चालू करण्याच्या सूचना वैद्यकीय अधीक्षक डॉ. सुलभेवार यांना दिल्या आहे.

तसेच आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांनी एकामेकांच्या उणीवा न बघता रुग्णांना कोणत्या उपचाराची गरज आहे. त्याकडे लक्ष द्यावे व जनतेला सुविधा पुरविण्यात याव्या तसेच गोरगरीब ऋग्नच नाही तर व्हीआयपी उपचार पद्धत देखील या ट्रॉमा केर मध्ये सुरू करण्यात यावी असेही आ. देरकर यांनी सुचविले.

त्यामुळे येत्या महिन्याभरात ट्रॉमा केअर सेंटर सुरू करणे अनिवार्य असल्याचे मत व्यक्त करून वणी परिसरातील रुग्णांना अत्याधुनिक आरोग्याच्या सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सदैव कटी बद्ध राहू तसेच ट्राम केअर सेंटर चालू करण्यासाठी जिल्हा आरोग्य विभागाकडून पाहिजे त्या सुविधांची पूर्तता करण्याकरिता संबंधितांना सूचित करण्यात येईल असे आश्वासन आमदार संजय देरकर यांनी दिले आहे.

या आढावा बैठकला इंजि. कुंडलिक ठावरी, दिलीप भोयर, भगवान मोहिते, विवेक ठाकरे वैद्यकिय अधीक्षक डॉ. सुलभेवार, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. समीर थेरे, डॉ. पी. एन. आवारी, डॉ. शिरीष ठाकरे, डॉ. भालचंद्र आवारी डॉ. शिरीष मांडेकर, डॉ. पोहे, डॉ. जगन जुनगरी, डॉ. अग्रवाल आदी मान्यवर उपस्थित होते.

वणी पोलिस स्टेशनची गुन्हे शाखाच बनली गुन्हेगारीचा अड्डा

0

गुन्हे शाखा तोड्या करण्यात व्यस्त, वाळू तस्करी, वरली मटका,जुगार व अविद्य दारू सर्रास चालू

गुन्हेशाखेतील कर्मचाऱ्यांच्या मोबाईलवर रेती वाहतूक करणाऱ्या हायवा टीप्पर ट्रॅक्टरचे जीपीएस कशासाठी

News Today

दिलीप भोयर

वणी :- येथील पोलिस स्टेशनची गुन्हे नियंत्रण शाखाच चक्क गुन्हेगारांचा अड्डा बनली आहे. वाळू तस्कातीतून गुन्हे शाखेतील पोलिस कर्मचाऱ्यांनी लाखोंची माया जमवली असून शहरातील विविध ठिकाणी मोठ्या प्रमाणात वरली मटका , जुगार व अवैध दारू विक्री जोमात सुरू असताना गुन्हे शाखेच्या डोळ्यावर चिरीमितीची पट्टी बांधलेली आहे.

केंद्र व राज्यातील सत्तेत असलेल्या शिवसेना शिंदे गटाचे स्व. ललित लांजेवार यांचा हृदय विकाराच्या झटक्याने मृत्यू झाला असला तरी हा मृत्यू वणी पोलिस स्टेशनच्या गुन्हे शाखेतील पो. कॉ. विकास धडसे यांनी जातीवाचक गुन्ह्यात अडकविण्याची धमकी दिल्यामुळे हा हृदय विकाराचा झटका आला व त्यात त्यांचा मृत्यू झाल्याचा आरोप ललित यांच्या पत्नी श्रीरंगा लांजेवार यांनी दिलेल्या तक्रारीत केला आहे.

पोलिसांची गुन्हे नियंत्रण शाखा ही त्यांच्या हद्दित येणाऱ्या गुन्ह्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी व प्रलंबित गुन्ह्यांचा शोध लावण्यासाठी कार्यरत असते. तसेच नव्याने गुन्हा घडू नये यासाठी सतर्कता ठेवून असते. परंतु वणी पोलिस स्टेशनची ही गुन्हे नियंत्रण शाखा चक्क गुन्हेगारांचा पायंडा पाडून यातील सर्व कर्मचारी खुलेआम तोड्या करताना दिसून येत आहे.

शहरातील विविध भागात वरली मटका चालू असून त्यांचेकडून एक कर्मचारी १२ ते १५ हजार रुपयाचे मासिक हप्ता घेत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. तसेच पोलिस विभागाला देखील लखो रुपये मोजल्या जात असल्याचे आरोप होत आहे. येवढेच नाही तर काही कर्मचाऱ्यांनी वाळूची तस्करी करण्यासाठी हायवा टीप्पट व ट्रॅक्टर दुसऱ्यांच्या नावावर घेवून पोलिस पेट्रोलिंग ने वाळू तस्करी केल्या जात आहे.

या वाळू यास्करिकच्या वाहनांना लागणारे जीपिएस सिस्टीम त्यांनी स्वतःच्या मोबाईल मध्ये अत्यवत करून ठेवले आहे. वर्धा नदी, विदर्भ नदी, नीर्गुडा नदी व पैनगंगा नदीच्या पात्रातून सर्रास जेसिपी लावून रात्रीच्या वेळी टीप्पर व ट्रॅक्टर भरून वाळूचा उपसा केल्या जात आहे. नदीच्या घाटावरून वाहन निघताच एक पोलिस कर्मचारी वाहनाने समोर पेट्रोलिंग करीत असतो तर मागून वाहनात वाळू भरून वाहने चालवल्या जात असल्याची माहिती आहे.

स्व. ललित लांजेवार यांनी वाळू तस्करीत अडकलेल्या पोलिस कर्मचाऱ्यां संदर्भात चौकशीची मागणी केली असता त्यांना खोट्या जातीवाचक गुन्ह्यात अडकवण्याची धमकी दिली व त्या धमकीची धास्ती घेवून ललित यांना हृदय विकाराचा झटका आला अशी तक्रार त्यांच्या पत्नीने केली आहे.

वाळूची तस्करी शहरात मोठ्या प्रमाणात चालू असून महसूल विभाग देखील हातावर हात देवून गप्प बसला आहे. त्यामुळे शासनाच्या करोडो रुपयाचा कर पाण्यात जात असून महसुलाचे अधिकारी व पोलीस मतवाल होताना दिसून येत आहे. गुन्हे शाखेतील काही पोलिस कर्मचाऱ्यांनी शहरात लाखो रूपयाचे बंगले देखील बुक करून घेल्याची माहिती समोर आली आहे. या वाळू तस्करांवर कारवाई करणार तरी कोण ? कारण यातच पोलिस गुन्हेगारीच्या पिंजऱ्यात अडकले आहे.

 

 

 

 

 

 

 

 

 

 

अखिल कुणबी महासंघाच्या जिल्हाध्यक्षपदी राजेश पहापडे

0

News Today

वणी :- येथील कुणबी समाजाचे होतकरू कार्यकर्ते राजेश पहापडे यांची अखिल कुणबी महासंघाच्या यवतमाळ जिल्हाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. या निवडीचे नियुक्ती पत्र संघटनेचे संस्थापक अध्यक्ष डी. के. आरिकर यांनी दिले आहे.

राजेश पाहापडे हे वणी येथील रहिवासी असून धनोजे कुणबी समाज संस्थेचे माजी अध्यक्ष असून त्यांनी कुणबी समाजाबद्दल अनेक सामाजिक उपक्रम राबविले आहे. त्यांच्या सामाजिक कार्याची दखल घेवून त्यांना यवतमाळ जिल्ह्याची जबाबदारी देण्यात आली आहे. त्यांच्या निवडीने राजेश पहापडे यांचे श्री गुरुदेव सेनेचे संस्थापक अध्यक्ष दिलीप भोयर यांनी स्वागत केले असून सर्वत्र त्यांचेवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.