शिवनेच्या हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत संपन्न झाला स्वप्नपूर्ती सोहळा
News Today
वणी : – शिवसेनेची ओळख म्हणजे शिवसैनिकांमध्ये असलेली एकनिष्ठता आहे. ही एक निष्ठता ज्यांच्या रक्तात आहे. ते रक्त कधीच बाळासाहेबांच्या विचारांशी गद्दारी करणार नाही. आहे प्रतिपादन यवतमाळ वाशीम लोकसभा क्षेत्राचे खासदार संजय देशमुख यांनी येथील एस.बी. लॉनच्या प्रांगणात काल ता. १५ रोजी रात्री ८ वाजता संपन्न झालेल्या शिवसेनेच्या स्वप्नपूर्ती या कार्यक्रमात कार्यकर्त्यांना संबोधित करताना व्यक्त केले. यावेळी या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून यवतमाळ जिल्हा संपर्क प्रमुख राजेंद्र गायकवाड तर प्रमुख उपस्थित म्हणून वणी विधानसभेचे आमदार संजय देरकर उपस्थित होते.

यवतमाळ वाशीम लोकसभा क्षेत्रात उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे संजय देशमुख हे विजयी झाले तर व वणी विधानसभा क्षेत्रात संजय देरकर हे विजय झाले होते. त्यामुळे शिवसैनिकात मोठा उत्साह निर्माण झाला होता तसेच शिवसेना विभाजित होऊनही या भागात त्याचा कोणताही विपरीत परिणाम झाला नाही उलट शिवसैनिक एकनिष्ठेने उद्धव ठाकरे यांचे सोबत एकजुटीने उभे होते. त्यामुळेच हा विजय संपादित करता आला म्हणून शिवसेनेचे माजी उपजिल्हा प्रमुख दीपक कोकास यांचे नेतृत्वात स्वप्नपूर्ती सोहळा आयोजन समिती नेमण्यात आली यात उपजिल्हा प्रमुख संजय निखाडे, शरद ठाकरे, गणपत लेडांगे, सुधीर थेरे, राजू तुरणकर, अजिंक्य शेंडे, आदींचा समावेश होता.
यावेळी खासदार संजय देशमुख व त्यांच्या अर्धांगिनी सौ. वैशाली देशमुख तसेच आमदार संजय देरकर व त्यांच्या अर्धांगिनी सौ. किरण देरकर यांचा शिव सैनिकांच्या वतीने पुष्पहार, शाल व विठ्ठल रुक्मिणीची प्रतिमा देऊन भव्य सत्कार करण्यात आला यावेळी या विचार पिठावर जिल्हासहसंपर्क प्रमुख संतोष माहूरे, ओबीसी महासंघाच्या सचि, युवा सेनेचे जिल्हाप्रमुख, महिला आघाडीच्या जिल्हा प्रमुख व आदी मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रस्ताविक गणपत लेडांगे यांनी तर सूत्रसंचालन राजू तुरणकर यांनी तर आभारप्रदर्शन प्रकाश कऱ्हाड यांनी केले.

शिवसेनेत मला न्याय मिळाला – आ. संजय देरकर
अनेकदा पक्ष व अपक्ष राहून निवडणुका लढविल्या आहे. परंतु खऱ्या अर्थाने शिवसेनेकडून मला न्याय मिळाला आहे. महाविजास आघाडीच्या सर्व घटक पक्षांकडून भरभरून सहकार्य मिळाले आहे.
सर्वांच्या सहकाऱ्याने आज मला महाराष्ट्र विधान सभेत जाण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. याबद्दल सर्व कार्यकर्त्यांचे आभार आमदार संजय देरकर यांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केले.

उज्वलकर व कनाके यांचा पक्ष प्रवेश
येथील समाजसेवक तथा आमदार देरकर यांचे समर्थक मोरेश्वर उज्वलकर तथा व रमेश कणाके सामजिक कार्यकर्ता यांचा खासदार संजय देशमुख यांचे हस्ते शिवबंधन बांधून शिवसेनेत प्रवेश करण्यात आला.


