News Today
वणी :- श्री रंगनाथ स्वामी संगीत कला केन्द्र वणी यांच्या वतीने वणी मध्ये यावर्षी गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर संगीत आणि नाटय महोत्सव २०२५ चे आयोजन करण्यात आलेले आहे. यामध्ये श्रोत्यांना विविध सांस्कृतिक कार्यक्रम पहायला मिळणार आहे. त्यामध्ये श्री रंगनाथ स्वामी संगीत कला केन्द्राचे विदयार्थ्याचे गायन, श्री. जगन्नाथ महाराज यांचे संगीतमय जिवन चरीत्र, प्रा. हेमंत चौधरी आणि पुरुषोत्तम गावंडे यांचा हास्यदर्पण कार्यक्रम आणि विशेष पर्वणी म्हणून स्वर मंथन बहुद्देशिय संस्था नागपूर येथिल ७० कलाकारांच्या अथक प्रयत्नातून आणि उत्कृष्ट अभिनयातून साकार झालेले संत गजानन महाराज यांचे ‘शेगांवीचा संत गजानन’ हे महानाटय वणीकरांना पहायला मिळणार आहे.
हा कार्यक्रम गुढीपाडवा रविवार दिनांक ३० मार्च २०२५ रोजी सायंकाळी ०५ ते १० वाजेपर्यंत शेतकरी लॉन, वसंत जिनिंग ऑफिस समोर वणी येथे होणार आहे. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्री रंगनाथ स्वामी संगीत कला केन्द्र वणी तसेच वणी शहरातील अनेक धार्मिक आणि सामाजिक संस्था मिळून कार्य करीत आहे.
कार्यक्रमाचा लाभ घेण्याकरीता वणी आणि वणी परीसरातील सर्व श्रोत्यांनी आवजून उपस्थित राहावे असे आवाहन आयोजक सौ. सविता डोर्लीकर, डॉ. सौ. संचिता नगराळे, सौ. विना मोहीतकर, सौ. कानोपात्रा खंडाळकर, सौ. अल्का लाजूरकर, सौ. सुनिता आवारी, सौ. वंदना पिंपळकर, सौ. भाग्यश्री तोडेवार, अजित खंदारे, प्रा. सतिश बाविस्कर, अरूण डवरे, संतोष जोशी, प्रा. हेमंत चौधरी, संतोष क्रिगरे यांनी केले आहे.