पंधराव्या प्रकट दिन सोहळ्या निमित्य
विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन
____________________________
विशेष आकर्षण हरिपाठाने
दुमदुमणार पिंपरी (कायर) नगरी
____________________________
News Today
वणी:- श्री संत खेमराज महाराज यांचा पंधरावा प्रगट दिनाचे औचित साधून दरवर्षी प्रमाणे यंदाही श्री संत खेमराज महाराज यांचा पंधरावा प्रगट दिन सोहळा दि. १७ ऑक्टोंबर २०२५ रोज शुक्रवारला साजरा करण्यात येणार आहे.
या प्रकट दिन सोहळ्याला दूरवरून भावीक भक्त पिंपरी (कायरला) दाखल होणार आहे. श्री संत खेमराज महाराज यांचे दर्शन आणि आशिर्वादाचा लाभ यावेळी भाविक भक्तांना घेता येणार आहे.
श्री संत खेमराज महाराज यांनी अनेकांना व्यसनापासून दूर केले अनेकांचे सुखी संसार करण्यास “महाराष्ट्र रत्न पुरस्कृत” श्री संत खेमराज महाराज यांचे योगदान आहे. त्यांच्या या योगदानाची जाणीव व त्यांच्या कार्याने प्रभावित होऊन अनेक जण या दिनाला दिवाळी सारखा हा प्रकट दिन उत्सव साजरा करतात .
या दिनी ग्रामवासी घरापुढे रांगोळी काढून, चहा पाण्याची, नाश्त्याची व्यवस्था करून, श्री संत खेमराज महाराज यांच्या पालखी सोहळ्याचे स्वागत करतात त्यांचे औक्षवण करतात श्री संत खेमराज महाराज यांच्या दर्शनाने भाविक भक्त सुखावून जातात, त्यांची आरती ओवाळतात. श्री संत खेमराज महाराज की जय असा जयघोष करीत त्यांना वंदन करतात.
श्री संत खेमराज महाराज यांच्या प्रकट दिन सोहळ्यानिमित्त
दिनांक १६ ऑक्टोबर रोज गुरुवारला होमहवन व महारुद्राभिशेक
सद्गुरु श्री खेमराज महाराज यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.
वृंदावन काशीचे पंडीत यांच्या उपस्थितीत वरोऱ्याचे सुरपाम महाराज यांचे किर्तन होणार असून त्यानंतर घुगरी काल्याचे आयोजन करण्यात आले आहे.
दिनांक १७ ऑक्टोंबर रोज शुक्रवारला
सकाळी ८. वाजून १६ मिनिटांनी भव्यशोभा यात्रा व सद्गुरु श्री जगन्नाथ बाबा पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
या पालखी सोहळ्यात विशेष आकर्षण हरिपाठ उपस्थिताचे लक्ष वेधणार असून यात हरिपाठ मंडळ परसोनी, वेगाव, डोंगरगाव, झरपट, सोमनाळा, नवेगाव यांचा समावेश राहणार आहे.
सकाळी १० वाजून १६ मिनिटाने भव्य रक्त दान शिबीराला प्रारंभ होणार आहे या रक्तदान शिबिरा करिता सामान्य रुग्णालय रक्त पेढी विभाग चंद्रपूर तसेच संजयभाऊ निखाडे (शिंदोला) यांचे सहकार्य लाभणार आहे.
दुपारी १२ वाजून १६ मिनिटांनी
कथा व्यास – पूज्य श्री शिवांशूजी महाराज (वृंदावन काशी)
यांच्या प्रवचनाला सुरुवात होणार आहे. त्यानंतर मंगेश व सुवर्णा बेलेकार यांचे कडून घुगरी काला व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.
दुपारी १ वाजून १६ मिनिटांनी विश्व प्रसिद्ध बनारस काशीच्या भव्य गंगा आरतीचे दर्शन उपस्थित भावी भक्तांना होणार आहे. या आरतीसाठी काशीतील ६ पंडित या ठिकाणी दाखल होणार असून या पंडितांच्या हस्ते गंगा आरती संपन्न होईल.
बाहेर गावातील पालखी सोहळ्यात सहभागी होणाऱ्या भाविक भक्तांनी तसेच भजनी मंडळाने 17 ऑक्टोबरला सकाळी ठीक ८ वाजता सद्गुरु जगन्नाथ महाराज नंदीगड संस्थान पिंपरीला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन संस्थानचे अध्यक्ष डॉक्टर गजानन पावडे यांनी केले आहे.



