Saturday, April 18, 2026
Google search engine
HomeUncategorizedशिवसेनेचा दणका...आरसीसीपीएल कंपनीसमोर आमदार संजय देरकरांची आक्रमक मोर्चेबांधणी; चार तासांच्या चर्चेत मान्य...

शिवसेनेचा दणका…आरसीसीपीएल कंपनीसमोर आमदार संजय देरकरांची आक्रमक मोर्चेबांधणी; चार तासांच्या चर्चेत मान्य मागण्या 🚩

News Today 

मुकुटबन, ता. झरी (दि. २७ सप्टेंबर २०२५)
मुकुटबनच्या भूमीत गेल्या काही दिवसांपासून पेटलेल्या आंदोलनाच्या ज्वाला अखेर भडकल्या आणि शिवसेना (उबाठा) गटाच्या आमरण उपोषणाने ऐतिहासिक वळण घेतले. आरसीसीपीएल कंपनीविरोधातील ग्रामस्थांचा संताप आणि शिवसैनिकांचा निर्धार यांच्या संगमाने काल कंपनी प्रशासनाला गुडघ्यावर आणले.

आमदार देरकरांचे आक्रमक नेतृत्व
२६ सप्टेंबर रोजी सकाळी आमदार संजय देरकर यांच्या नेतृत्वाखाली हजारो शिवसैनिक रणांगणात उतरले. कंपनीच्या मुख्य प्रवेशद्वारावर प्रचंड जनसागर उसळला. वाहतूक ठप्प, पोलीस बंदोबस्त निष्प्रभ! 👉 शिवसैनिकांनी थेट कंपनीच्या कार्यालयात घुसून दणदणीत आंदोलन करून मुकुटबनच्या इतिहासात नवा अध्याय रचला.

आंदोलनाची धग मंत्रालयात पोहचली
गावकऱ्यांचा ज्वालामुखी थेट मंत्रालयापर्यंत धडकला. जिल्हाधिकारी डॉ. विकास मीना व पोलिस अधीक्षक कुमार चिंता यांनी स्वतः आमदार देरकरांना फोन करून विनंती केली – “कृपया आंदोलन शांत घ्या, आम्ही सर्व मागण्या मान्य करू आणि पूर्ण सहकार्य करु.”
👉 या फोनकॉलने आंदोलनाच्या विजयाचा शंखनाद झाला.

सत्ताधाऱ्यांचे मांजर ठरले उंदीर
याच वेळी काही अधिकारी, कर्मचारी सत्ताधाऱ्यांच्या ताटाखालचे मांजर बनून कंपनीचे समर्थन करण्यासाठी धडपडत होते. पण ग्रामस्थांचा संताप आणि शिवसेनेची जिद्द पाहून त्यांचे “माऊ-माऊ” निष्फळ ठरले.

चार तासांचा निर्णायक सामना
उपोषणकर्त्यांच्या शिष्टमंडळाने कंपनी अधिकाऱ्यांसोबत तब्बल चार तास चर्चा केली. शिवसैनिकांचा दबाव, आमदार देरकरांची ठाम भूमिका आणि ग्रामस्थांची तडफ पाहून अखेर कंपनी प्रशासन झुकले. 👉 सर्व मागण्या मान्य झाल्याची घोषणा होताच उपोषण स्थळावर जल्लोषाचा महापूर उसळला.

शिवसैनिकांची विजयी रणधुमाळी
या लढ्यात नेताजी पारखी, संदीप विंचू, संकेत गझलवार, संतोष माहुरे, सतीश आदेवार, सितारामजी पिंगे, दया कर गिराम, विजय पनघंटीवार, अशोक बरपटवार, शिवशंकर ठाकरे, सुभाष पारखी, संतोष लढांगे, सुभाष भगत, विनोद चिंतावर यांच्यासह हजारो शिवसैनिकांनी खांद्याला खांदा लावून सहभाग घेतला.

मुकुटबनचा नवा इतिहास
शिवसेनेच्या या विजयाने ग्रामस्थांचा आत्मविश्वास उंचावला आहे. कंपनी प्रशासन गारद झाले, तर गावोगाव “मुकुटबनच्या लढ्याचा” जयजयकार सुरू आहे.
👉 हे आंदोलन मुकुटबनच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी कोरले जाईल, यात तिळमात्र शंका नाही!

आंदोलनाला यशस्वी करण्यासाठी

जिल्हाप्रमुख संजय निखाडे, संतोष माहुरे, दिपकभाऊ कोकास, सुधीर थेरे, अजिंक्य शेंडे, विनोदभाऊ उप्परवार, तालुकाप्रमुख सतीश आदेवार, संतोष कुचनकार, पुरुषोत्तम बुट्टे, संजय बिजगुणवार, बंडू गुरणुले, संगीत भुजबलराव, सुरेखाताई भोयर, समता माहुरे, मनिषा वऱ्हाटे, कविता भगत, मायाबाई मंगाम, सतीश पचारे, देवाजी बोबडे, सीताराम पिंगे, विजय पनगंटीवार, दयाकर गेडाम, दुष्यांत उपरे, अशोक पंधरे, मंगेश मोहितकर, अतुल निखाडे, अशोक कल्लूरवार, अशोक बरपटवार, नेताजी पारखी, संतोष लेडांगे, शिवशंकर ठाकरे, बालू दुधकोहळे, राजु आसुटकर, संतोष बर्डे, शेख हसन, शेख अहमजद, अतुल विधाते, सुभाष भगत, महेंद्र आवते, विनोद धोटे, विशाल ठाकरे, संतोष सासनवार, शेख आसिफ, प्रविण आसुटकर, संजय आसुटकर, प्रकाश खिरटकर, किशोर गोल्लावार, किसन पाटील गावंडे, मनोहर ताजने, मधूकर ठाकरे, प्रविण खडसे, राकेश गोंडलावर, शंकर ठाकरे, पांडुरंग खडसे, दुर्गे पाटील, संतोष नेल्लावार, बळवंत देवलवार, अशोक गालेवार, पांडुरंग पाईलवार, नेताजी पारखी, संदीप विच्चू, संकेत गज्जलवारयांचेसह शेकडो शिवसैनिकांनी परिश्रम घेतले या आंदोलनात हजारोच्या संख्येनी पुरुष व महिला उपस्थित होत्या

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Today News

Most Popular

Visitor Counter