Thursday, December 12, 2024
Google search engine
HomeUncategorizedदहा वर्षात शेतकऱ्यांना फसविले, भाजपाचा पराभव फिक्स, एका सर्वेतून माहिती उघड

दहा वर्षात शेतकऱ्यांना फसविले, भाजपाचा पराभव फिक्स, एका सर्वेतून माहिती उघड

भाजपने शेतकऱ्यांना फसविल्याचे आरोप

फोडाफोडी व अभद्र व्यवहाराने मतदारांमध्ये नाराजी

महाविकास आघाडीचे संजय देरकर यांचा विजय निच्छित

News Today
दिलीप भोयर
वणी :- होवू घातलेल्या सार्वत्रिक विधानसभा निवडणुकीत ग्रामीण भागातील मतदारांचा कलह महाविकास आघाडीकडे दिसून येत आहे. यावेळी आमदार म्हणून संजय देरकर हे बाजी मारणार असल्याचे एका सर्वेतून माहिती समोर आली आहे. त्यामुळे महायुतीची चांगलीच डोकेदुखी वाढली आहे.  विद्यमान आ. बोदकुरवार हे चींताचुर झाल्याचे दिसून येत आहे. एका सामाजिक संस्थेकडून नुकताच एक गोपनीय सर्वे करण्यात आला आहे. त्या सर्वेतून ही धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यामुळे भाजपाच्या पायाखालची जमीन सरकली आहे. 

मागील दहा वर्षापासून शेतकऱ्यांना महायुती व भाजप सरकार  खोटी आश्र्वासन देत असल्याने शेतकऱ्यांमध्ये मोठी नाराजी पसरली आहे. शेतमालाचा हमी भाव अधिक ५० टक्के नफा देवू त्याच बरोबर शेतकऱ्यांचे उत्पंन दुप्पट करू , स्वामिनाथन आयोग लागू करू अश्या विविध मुद्द्यांवर आश्वासने भाजप कडून देण्यात आले होते. त्यामुळे शेतकरी वर्ग भाजपाकडे मोठ्या प्रमाणात वळला होता. परंतु शेतकऱ्यांना दिलेले एकही आश्वासन मागील १० वर्षात पूर्ण झाले नाही. उलट शेतकऱ्यांचे जगणे अवघड झाले आहे.

शेतमालाला जीएसटी करात समाविष्ट करून शेती साहित्याचे भाव चार पट वाढ केली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न आहे तेवढेच आहे. पण त्यांच्या शेतमालाचे भाव सन २०१० चे जे होते तेच आहे. शेतीला लागणारा खर्च देखील शेतमालातून निघत नसल्याने भाजप सरकारला गंडविण्याची जोरदार निती शेतकऱ्यांनी आखली आहे.

भारतीय जनता पार्टी व महायुतीच्या शेतकरी विरोधी धोरण राबविणार खरा चेहरा शेतकऱ्यांसमोर आला आहे. त्यामुळे शेतकरी मतदार यावेळी बदल घडविण्याच्या मानसिकतेत आले आहे. त्याच बरोबर महाराष्ट्रात जे फोडाफोडीचे राजकारण करून अभद्र युतीचा जन्म झाला. आणि मागील अडीच वर्षांपासून सत्ता भोगत आहे. ते नेते विरोधात असताना किंकाळ्या मारून मारून पोट तीळखीने शेतकऱ्यांच्या कापसाला १० हजार तर सोयाबिनला ८ हजार भावाची मागणी करताना दिसून येत होते तेच आज सत्तेत असून शेतकऱ्यांचे शोषन करीत आहे.

हल्ली कापुस ६ हजारपेक्षा कमी तर सोयाबीन ४ हजारपेक्षा कमी भावाने विकल्या जात असल्याने शेतकऱ्यांच्या डोळ्यात रक्ताचे आसू येत आहे. तरी या नेत्यांना अश्रू पुसण्याकरिता सवळ मिळत नाही. त्यामुळे यांच्या दुतोंडी पणाचा बुरखा शेतकऱ्या समोर टराटर फाटला आहे. त्यामुळे सरकारचे व भाजपांचे ध्येय धोरण शेतकऱ्यांनी ओळखले आहे. म्हणून यावेळी सर्वेतून बाहेर आलेल्या माहितीने भाजपच्या पायाखालची जमीन सरकली आहे.

भाजपच्या कोणत्याही सभेत शेतकऱ्यांच्या समस्येवर कोणताही नेता उमेदवार बोलताना दिसून येत नाही. व शेतकऱ्यांचे प्रश्न मांडताना दिसून येत नाही. यामुळे या विधानसभेच्या निवडणुकीत अनेक दिग्गजांना जोरदार झटके बसणार आहे. यात वणी विधानसभेतील भाजपचे उमेदवार  संजीवरेड्डी बोदकुरवार हे तळ्यात मळ्यात आले आहे.

आमदार बोदकुरवार यांच्या नामांकन रॅलीपेक्षा महाविकस आघाडी प्रणित शिवसेना (उबाठा)गटाचे उमेदवार संजय देरकर यांच्या नामांकन भरतेवेळी निघालेल्या महारॅलीची चर्चा आजही भाजपाच्या गोठ्यात केल्या जात आहे. त्यामुळे भारतीय जनता पार्टीचे उमेदवार आ. संजीवरेड्डी बोदकुरवार हे आपला आत्मविश्र्वास हरवून बसल्याची गोपनीय माहिती आहे. येत्या ४ नोव्हेंबर रोजी काही निवडणुकीत उभे असलेल्या उमेदवारांची नामांकन अर्ज वापस घेण्याची अंतिम तारीख आहे. यात कोण कोण उमेदवार आपले नामांकन परत घेशील याकडे मतदारांचे लक्ष लागले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Today News

Most Popular

Visitor Counter