संजय देरकर यांना स्वराज्य शेतकरी संघटनेचा जाहीर पाठिंबा
वणी :- वणी विधानसभा महाविकास आघाडी प्रणित शिवसेना (उबाठा) गटाचे उमेदवार संजय देरकर यांना स्वराज्य शेतकरी संघटनेकडून जाहीर पाठिंबा देण्यात आला आहे. यावाबत संघटनेचे अध्यक्ष सूर्या अडबाले यांनी पाठिंब्याचे पत्र देखील देण्यात आले आहे.
राज्यातील शेतकरी प्रचंड दुःखी असून त्यांना आर्थिकरित्या लुबडण्यात येत आहे. व्यापारी हीत सरकार जोपासत असून शेतकरी देशोधडीला लावल्या जात असल्याने शेतकरी विरोधी धोरण राबणाऱ्या राजकीय सत्तेचा पालट करण्यासाठी संजय देरकर यांची निवासस्थानी भेट घेवून स्वराज्य शेतकरी संघटनेच्या वतीने पाठिंबा जाहीर करण्यात आला आहे. त्यामुळे वणी विधानसभेत महाविकास आघडीची शक्तित वाढ झाली आहे.