Wednesday, July 29, 2026
Google search engine
Home Blog Page 9

भाजपच्या जातीयवादाचा पर्दाफाश : वणी नगरपरिषदेच्या निवडणुकीत कुणबी समाजाचा अपमान, उमेदवारी कट, आणि निखिल खाडे यांचा शिंदे गटातील धक्कादायक प्रवेश

0

News Today 

वणी नगरपरिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपमध्ये प्रचंड खळबळ माजवणारी आणि कुणबी समाजाच्या अस्मितेचा प्रश्न प्रकर्षाने चर्चेत आणणारी मोठी राजकीय घटना घडली आहे. भाजपचे जिल्हा महामंत्री आणि वणीतील युवकांचे लोकप्रिय नेते निखिल खाडे यांनी भाजपवर थेट ‘कुणबी समाजावरील व्देष’, ‘जातीयवाद’ आणि ‘उपयोग करून टाकण्याची प्रवृत्ती’ या गंभीर आरोपांचा भडिमार करून पक्षाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी शिवसेना (शिंदे गट) मध्ये विजयबाबू चोरडिया यांच्या नेतृत्वात जाहीर प्रवेश केला असून, या हालचालीमुळे भाजपच्या स्थानिक नेतृत्वात जबरदस्त अस्वस्थता पसरली आहे.

भाजपचा ‘जातीयवादी’ चेहरा उघड

निखिल खाडे यांनी भाजपमधील जातीय प्रवृत्तीवर रोखठोक आरोप करताना सांगितले –भाजपच्या कार्यालयात विधानसभा २०२४ च्या प्रचारादरम्यान कुणबी समाजाचा अवमान, अश्लील शिवीगाळ, आणि मानहानी करण्यात आली होती. या घटनेतील दोषींना पक्षाने संरक्षण दिले आणि उलट माझ्यावर सूडाची कारवाई केली. माझ्या उमेदवारीवर पराभूत माजी आमदार (मामा ) यांनी मुद्दाम कात्री लावली.

केवळ समाजाच्या इज्जतीसाठी आवाज उठवल्यानेच मला डावलले गेले.भाजपमध्ये कुणबी समाजाच्या नेतृत्वाला आणि प्रश्नांना दुय्यम वागणूक देऊन केवळ मतांसाठी वापरून टाकण्याचे धोरण आहे.

समाजातील असंतोषाचा उद्रेक — जनतेत दिसत आहे काळजी

विधानसभा प्रचारातील अपमानकारक घटनेने संपूर्ण कुणबी समाजात संतापाची लहर उसळली होती.

घटनेविषयी बोलल्याबद्दलच कार्यकर्त्यांवर सूडाने कारवाई, ही भाजपच्या ‘जातीयवादी’ आणि प्रतिगामी मानसिकतेची साक्ष आहे.पक्षाच्या ‘कोअर ग्रुप’मधील विल्हेवाट, आपल्या बाजूचे उमेदवार मुद्दाम डावलून पक्षशिस्तीच्या नावाखाली अस्तित्व नाकारण्याचा प्रयत्न.भाजपच्या विरोधात निर्माण होत असलेली जनमत लाट भाजपच्या ‘जातीच्या’ राजकारणाला औरंगाबाद, बुलढाणा, वर्धा, चंद्रपूर यवतमाळ, नागपूर आणि अमरावतीसारख्या जिल्ह्यांत देखील कार्यकर्त्यांनी विरोध केल्याचे उदाहरणे नुकतेच दिसून आले होते.

अनेक ठिकाणी भाजपमध्ये होत असलेल्या प्रवेश—बाहेर पडण्याच्या घटनांनी, जिल्ह्यात महागठबंधनतील फूट व असंतोष चव्हाट्यावर आला आहे.

भाजप वरिष्ठांकडून तिकीट वाटपात वेळोवेळी होत असलेली दिशाभूल, गुप्त वाटाघाटी, आणि पक्षांतर्गत गटबाजीमुळे स्थानिक नेतृत्व नाराज आहे.

निवडणूक पूर्वी भाजपची उलगडती प्रतिमा व संघर्षभाजपमध्ये ७०% जागांचे उमेदवार निश्चित असूनही अनेक नेत्यांची, विशेषतः कुणबी, ओबीसी, स्थानिक समाजाच्या प्रतिनिधीत्वाची होणारी पायमल्ली ही पक्षाच्या सामाजिक समावेशकतेवर प्रश्नचिन्ह उभं करते.

शिंदे गटासारख्या मित्रपक्षांनीही भाजपच्या वावरण्यावर ताशेरे ओढले असून, आघाडी गटातील हालचालींमुळे भाजप अनेक ठिकाणी अडचणीत आहे.

भाजपच्या आजपर्यंतच्या ‘भागीदारीच्या’ वचनाला हरताळ फासत लोकसभेपासून विधानसभेपर्यंत समाजातील विशिष्ट घटकांना डावलण्याचे आरोप सतत जोर धरत आहेत.ही संपूर्ण घडामोड वणी तालुक्यामध्ये आणि यवतमाळ जिल्ह्यात भाजपच्या विरोधात तीव्र जनमत तयार करत आहे.

कुणबी समाजाच्या अस्मितेचा प्रश्न, स्थानिक नेतृत्वाशी झालेला अन्याय आणि भाजपच्या ‘जातीयवादी’ धोरणांचा पर्दाफाश — या मुद्द्यांमुळे निवडणुकीपूर्वी भाजप समोर गंभीर आव्हान उभे राहिले असून, जनमताचा कल प्रगल्भ बदलाच्या दिशेने झुकण्याची शक्यता वर्तवली जाते.

निखिल खाडे हे प्रभाग ९ मधून आपली उमेदवारी अर्ज शिंदे गटाकडून दाखल करणार असून या उमेदवारीने भाजपला जोरदार झटका बसणार आहे. अशी चर्चा संपूर्ण शहरात चालू आहे. 

वणीत शरद पवार राष्ट्रवादीत तुफानी इंकामिंग! वणी नगर परिषदेच्या रणांगणात चार प्रभागांतील बलाढ्य उमेदवारांची एन्ट्री

0

News Today 

वणी :- नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी शरद पवार पक्षात जोरदार राजकीय वैतागळ सुरू असून प्रभाग क्रमांक ७ चे राजेश बापुराव पारधी, प्रभाग क्रमांक ८ चे नाना उर्फ प्रशांत विठ्ठलराव कापसे, प्रभाग क्रमांक १ चे प्रशांत सुदाम फाळके यांच्यासह प्रभाग क्रमांक १३ मधून संभाव्य उमेदवार म्हणून ओळखले जाणारे संतोष जोगी यांनीही पक्षात प्रवेश केला आहे. या प्रवेशामुळे राष्ट्रवादीत अक्षरशः मोठी इंकामिंग होत असल्याचे चित्र आहे.

वणी विधानसभा क्षेत्राध्यक्ष दिलीप भोयर यांच्या नेतृत्वावर दाखवलेला विश्वास आणि संघटनातील सातत्यपूर्ण कामामुळे पक्षात प्रवेश घेणाऱ्यांची संख्या वाढत असल्याचे निरीक्षकांचे म्हणणे आहे.

पक्ष प्रवेश सोहळ्यास प्रदेश संघटन सचिव रज्जाक पठाण, कामगार सेलचे प्रदेश उपाध्यक्ष आबिद हुसेन, अल्पसंख्यांक सेलचे जिल्हाध्यक्ष अरबाज पठाण, तालुकाध्यक्ष राजू वांढरे, शहराध्यक्ष विनोद ठेंगणे, तसेच प्रदीप खोब्रागडे, नरेंद्र लोणारे , खुशाल बासमवार यांसह अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभली.

तिन्ही प्रभागांतील बलाढ्य तिकडीबरोबरच प्रभाग १३ मधील संभाव्य उमेदवार संतोष जोगी यांचा वाढता प्रभावही लक्षवेधी आहे. या चौघांच्या उमेदवारीमुळे स्थानिक राजकारणातील समीकरणे मोठ्या प्रमाणात ढवळून निघाली असून अनेकांच्या पायाखालची वाळू सरकली असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे.

या आता चौफेर—प्रवेशामुळे राष्ट्रवादी शरद पवार पक्ष वणी नगर परिषदेच्या निवडणुकीत नव्या आत्मविश्वासाने उतरला आहे. आगामी निवडणुकीत या बदलांचा थेट परिणाम दिसून येईल, असा ठाम अंदाज व्यक्त केला जात आहे.

 

प्रभाग ३ मध्ये राजकीय भूकंप! प्रहार जनशक्तीचे तालुकाध्यक्ष अनिकेत चामटे यांचा राष्ट्रवादीत धडाकेबाज प्रवेश—प्रस्थापितांचे धाबे दणाणले

0

News Today 

वणी :- नगर परिषद प्रभाग क्रमांक ३ मध्ये आज प्रहार जनशक्ती पक्षाचे तालुकाध्यक्ष युवा व प्रभावी कार्यकर्ते अनिकेत अनिल चामटे यांनी शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करताच स्थानिक राजकारणात जोरदार खळबळ उडाली आहे. परिसरात सामाजिक कार्यासाठी परिचित असलेले चामटे यांनी शरदचंद्र पवार साहेबांच्या विचारांनी प्रेरित होऊन तथा वणी विधानसभा अध्यक्ष दिलीप भोयर यांच्या नेतृत्वावर ठाम विश्वास ठेवत राष्ट्रवादीत प्रवेश केला.

त्यांच्या उमेदवारीचा फटका थेट प्रस्थापितांना बसल्याचे राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरला आहे. प्रभाग ३ मध्ये चामटे हे “प्रभावी आणि दमदार पर्याय” म्हणून उदयास आले असून त्यांच्या आगमनाने समीकरणे मोठ्या वेगाने बदलण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

या कार्यक्रमाला राज्य संघटन सचिव रज्जाक पठाण, कामगार सेलचे प्रदेशाध्यक्ष आबिद हुसेन, अल्पसंख्यांक सेलचे जिल्हाध्यक्ष अरबाज पठाण, तालुकाध्यक्ष राजू वांढरे, शहराध्यक्ष विनोद ठेंगणे, प्रदीप खोब्रागडे नरेंद्र लोणारे, महेंद्र चांदोरे यांसह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती.

स्थानिक पातळीवर त्यांच्या प्रवेशाने निर्माण झालेली उमेद व जनसंपर्कातील त्यांची पकड पाहता आगामी राजकीय लढतीत प्रभाग ३ मध्ये ‘तिखट’ रंग चढणार हे निश्चित

धडाकेबाज एन्ट्रीने प्रभाग १२ मध्ये वाढती राजकीय चुरस; बाळू (नरेंद्र) गेडाम यांचा राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) मध्ये प्रवेश

0

News Today 

वणी : वणी नगर परिषदेच्या निवडणुकीत प्रभाग क्र. १२ मध्ये चुरशीचा माहोल निर्माण झाला असून उत्साही दुर्गा उत्सव मंडळातील कार्यातून सर्वत्र ओळख निर्माण केलेले बाळू (नरेंद्र) गणपत गेडाम आता राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात प्रवेश करून उमेदवारीच्या रेषेत ठामपणे उभे राहिले आहेत. आणि तुतारी या चिन्हावर ते निवडणूक लढविणार आहे.

गेल्या काही दिवसांपासून त्यांची लोकप्रियता आणि तरुणांमध्ये असलेले मैत्रीपूर्ण संबंध यामुळे त्यांची राजकीय वाटचाल चर्चेत होती. अखेर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) मध्ये प्रवेश करून उमेदवारीसाठी अधिकृतपणे अर्ज सादर केला आहे. समोरून मिळालेल्या सकारात्मक संकेतांमुळे त्यांची उमेदवारी निश्चित होण्याच्या मार्गावर असल्याचे पक्ष सूत्रांनी सूचित केले आहे.

बाळू गेडाम यांनी पक्ष प्रवेश वणी विधानसभा अध्यक्ष दिलीप भोयर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आपला प्रवेश घेतला. यावेळी प्रदेश संघटन सचिव रज्जाक पठाण, शहराध्यक्ष विनोद ठेंगणे, खुशाल बासमवार आदी मान्यवर उपस्थित होते. या प्रवेशामुळे प्रभाग १२ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला नवे बळ मिळाल्याचे स्थानिक पातळीवर दिसून येत आहे.

निवडणुकीची चाहूल लागताच प्रभागातील राजकीय हालचालींना आणखी वेग आला आहे. विविध पक्षांचे कार्यकर्ते जनसंपर्क वाढवत असताना बाळू गेडाम यांच्या उमेदवारीची चर्चा सर्वाधिक जोमात आहे.

आता मतदारांची मते कोणाच्या बाजूने झुकतात आणि या नव्या राजकीय समीकरणांचा अंतिम निकालावर कसा प्रभाव पडतो हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

 

धडाकेबाज बातमी! प्रभाग १० मध्ये राजकीय वारे बदलणार – सौ. संगीताताई मांढरे यांचा शरद पवार राष्ट्रवादीत दमदार प्रवेश!

0

News Today
वणी नगर परिषद निवडणुकीची रणधुमाळी शिगेला पोहोचली असून प्रभाग १० मध्ये सध्या सर्वाधिक चर्चा जर कोणाची होत असेल, तर ती सौ. संगीताताई रामेश्वर मांढरे यांच्या दमदार एन्ट्रीची! शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये त्यांच्या प्रवेशामुळे प्रभाग १० मधील राजकीय समीकरणे अक्षरशः उलटपालट होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.

सर्वसाधारण महिलावर्गासाठी उमेदवारी मागितलेल्या संगीताताई आपल्या वॉर्डातील जनसेविका, समाजहिताची धडाडीने काम करणारी कार्यकर्ती, आणि लोकांमध्ये सदैव उपलब्ध असलेली नेता म्हणून ओळखल्या जातात. गेल्या पाच–सात वर्षांत वॉर्डातील पाणी, रस्ते, स्वच्छता, महिलावर्गाच्या अडचणी तसेच वृद्धांच्या प्रश्नांवर त्यांनी केलेल्या झटापटीमुळे त्यांची भक्कम पकड निर्माण झाली आहे.

स्थानिकांमध्ये सध्या एकच चर्चा रंगली आहे— “यावेळी जनतेकडून संगीताताईंना त्यांच्या सेवाभावाची पावती मिळणार!”
प्रभाग १०मध्ये राष्ट्रवादीच्या पक्षध्वजाखाली त्या मैदानात उतरणार असल्याने विरोधकांच्या गणितात गोंधळ उडाला आहे. संगीताताईंच्या लोकप्रियतेसोबतच पक्षाच्या रणनीतीमुळे या प्रभागात धडाकेबाज सामना पाहायला मिळणार हे निश्चित. यांच्या पक्ष प्रवेश विधानसभा अध्यक्ष दिलीप भोयर यांनी राष्ट्रवादीचा दुपट्टा टाकून घेतला यावेळी प्रदेश संघटन सचिव रज्जाक पठाण, कामगार सेलचे उपाध्यक्ष अबिद हुसेन, तालुका अध्यक्ष राजू वांढरे, शहराध्यक्ष विनोद ठेंगणे आदी मान्यवर उपस्थित होते.

वणी नगर परिषद निवडणुकीचा रंग चढत असताना प्रभाग १०ची लढत अतिशय रोमहर्षक बनली आहे. संगीताताई मांढरे यांच्या उमेदवारीने या प्रभागात उत्सुकता, रंगत आणि राजकीय उष्णता प्रचंड वाढली असून पुढील काही दिवसांत अजून मोठे राजकीय वारे वाहण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
प्रभाग १० — सज्ज व्हा! एक धडाकेबाज महिला उमेदवार मैदानात उतरली आहे!

प्रभाग क्रमांक १४ मधून तुषार काकडे यांच्या उमेदवारीला वेग, शरद पवार राष्ट्रवादीला मिळाला युवा तडफदार चेहरा

0

News Today 

वणी प्रतिनिधी :
आगामी वणी नगर परिषदेच्या निवडणुकांना काहीच दिवस उरतुषार काकडे यांच्या उमेदवारीला वेग

ले असताना प्रभागातील लोकप्रिय समाजसेवक तुषार काकडे यांच्या उमेदवारीबाबतची चर्चा चांगलीच रंगली आहे. स्थानिक पातळीवर विविध सामाजिक उपक्रम राबवणाऱ्या काकडे यांना नागरिकांचा मोठा पाठिंबा लाभलेला असून, अनेक ठिकाणी त्यांना भावी नगरसेवक म्हणून आजच संबोधले जात आहे.

तुषार काकडे हे गेल्या काही वर्षांत प्रभागातील सर्वसामान्यांच्या अडचणी समजून घेत त्यांच्या निवारणासाठी सतत पुढाकार घेताना दिसले आहेत. आर्थिक मदत, शैक्षणिक सहाय्य, आरोग्यविषयक उपक्रम, तसेच आपत्तीच्या काळात दिलेली मदत यामुळे त्यांनी स्थानिकांमध्ये ठाम विश्वास निर्माण केला आहे. विविध सामाजिक संघटनांबरोबर कार्य करताना त्यांनी जनतेशी थेट नाळ जुळवली असून, त्यांच्या या कार्याची दखल अनेकांनी घेतली आहे.

वणी नगर परिषदेच्या निवडणुका २ डिसेंबर रोजी पार पडणार आहेत. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार गट) कडून तुषार काकडे यांच्या उमेदवारीला हिरवा कंदील मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पक्षाच्या स्थानिक पदाधिका–यांमध्ये या संदर्भात सकारात्मक हालचाली सुरू असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली.

निवडणूक जसजशी जवळ येत आहे, तसतशी काकडे यांच्या प्रचाराची गतीही वाढताना दिसत आहे. त्यांच्या समर्थकांकडून प्रभागात जनसंपर्क मोहीम राबवली जात असून, नागरिकांचा प्रतिसादही उत्साहवर्धक असल्याचे चित्र आहे.

आगामी काही दिवसांत अधिकृत उमेदवारी जाहीर झाल्यानंतर वणी नगर परिषदेची निवडणूक अधिक रंगतदार होण्याची शक्यता आहे.

 

“मनसेतून भाजपकडे उडी; जिल्हा उपाध्यक्षपदी नियुक्तीने पक्षांतर्गत खदखद”, “पदाचे आमिष : बाहेरच्या नेत्यांमुळे निष्ठावंत नाराज”

0

News Today 

वणी:- भाजप सत्तेत येण्याच्या प्रयत्नात वेगवेगळ्या पक्षातील नेत्यांची “आयात” जोमाने सुरू केली आहे, आणि त्यातून कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे.

वणी येथील मनसेचे माजी शहराध्यक्ष अंकुश बोढे यांनी आज अधिकृतपणे भाजपमध्ये प्रवेश केला असून, त्यांची भाजप जिल्हाउपाध्यक्षपदी वर्णी लागली आहे. या घडामोडींमुळे स्थानिक मनसे आणि भाजपच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांमध्ये नाराजीची आणि अस्वस्थतेची भावना दिसून येत आहे.

भाजपकडून इतर पक्षातील नेत्याची भरती भाजपने गेल्या काही काळात इतर पक्षातील – विशेषतः मनसे, काँग्रेस आणि शिवसेना – नेत्यांना आपल्याकडे आकर्षित करण्याचा प्रयत्न केल्या आहे, आणि अनेक नेत्यांना पदाचे प्रलोभन देत प्रवेशाची संधी दिली आहे. हे घडत असताना, भाजपमधील पारंपारिक, निष्ठावंत कार्यकर्त्यांमध्ये भावना निर्माण झाल्या आहेत की बाहेरच्या नेत्यांना मोठ्या पदांवर संधी दिली जात आहे, तर स्थानिक एकनिष्ठ कार्यकर्त्यांची उपेक्षा केली जाते.

अंकुश बोढे यांचा भाजपमध्ये प्रवेशवणीतील मनसेचे माजी शहराध्यक्ष अंकुश बोढे यांनी आपला राजीनामा देऊन आज औपचारिकपणे भाजपमध्ये प्रवेश घेतला आहे.त्यांच्या या प्रवेशानंतर लगेचच त्यांची भाजप जिल्हाउपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. यामुळे भाजपमध्ये स्थानिक कार्यकर्त्यांना धक्का बसला आहे आणि मनसेच्या स्थानिक गटातही घबराट निर्माण झाली आहे.निष्ठावंत कार्यकर्त्यांमध्ये नाराजीवारंवार “आयात नेत्यांना” महत्त्व देण्याच्या धोरणामुळे भाजपमधील जुने, कष्ट करणारे कार्यकर्ते नाराज आहेत आणि त्यांच्यामध्ये असंतोष वाढत आहे.

अनेक कार्यकर्त्यांनी आपल्या नाराजीचा सूर सोशल मीडियावर, तसेच पक्ष संघटनांच्या आढाव्यात मांडला आहे. बहुसंख्य कार्यकर्त्यांना वाटते की, पक्षाच्या जडणघडणीत ज्यांनी वेळ, पैसा आणि श्रम दिलेत, त्यांना डावलले जात आहे.राजकीय परिणाम आणि पुढील दिशाअशा नेत्यांच्या गळती आणि आयातीमुळे भाजपला काही प्रमाणात स्थानिक पातळीवर मजबुती मिळू शकते; मात्र, दीर्घकालीन परिणाम म्हणून निष्ठावंत कार्यकर्ते नाराज राहिल्यास संघटनावाढीस अडथळा येण्याची भीती आहे.

स्थानिक आणि जिल्हास्तरावरील निवडणुकांमध्ये हा असंतोष पक्षासाठी अडचणीचे ठरू शकतो.या पार्श्वभूमीवर, अंकुश बोढे यांची भाजप जिल्हाध्यक्षपदी वर्णी लागणे हे पक्षासाठी तात्पुरते राजकीय पाठबळ ठरले असले, तरी, हा निर्णय भाजपमधील अंतर्गत गटबाजी, असंतोष, आणि ओलांडलेल्या कार्यकर्त्यांचा असंतोष यास कारणीभूत ठरू शकतो—अशी प्रतिक्रिया स्थानिक स्तरावर दिसून येत आहे.

अरबाज पठाण यांची अल्पसंख्यांक सेलच्या जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती, वणीत राष्ट्रवादीची भरगच्च सभा

0

News Today 

वणी (ता. १२ नोव्हेंबर) — राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार) गटाच्या अल्पसंख्यांक सेल, जिल्हा यवतमाळ यांच्या वतीने आयोजित भव्य पक्ष प्रवेश व पदाधिकारी नियुक्ती सोहळ्यात अरबाज पठाण यांची रॉकाप अल्पसंख्यांक सेलच्या जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती जाहीर करण्यात आली. या नियुक्तीमुळे कार्यकर्त्यांत उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान रॉकाप अल्पसंख्यांक सेलचे प्रदेशाध्यक्ष व जिल्हा निरीक्षक अफजल फारूक यांनी भूषविले. प्रमुख अतिथी म्हणून प्रदेश संघटन सचिव रज्जाक पठाण, कामगार सेलचे प्रदेश उपाध्यक्ष आबिद हुसेन, सामाजिक न्याय सेलचे संघटन सचिव विजय नगराळे, तसेच वणी विधानसभा अध्यक्ष दिलीप भोयर, तालुकाध्यक्ष राजू वांढरे आणि शहराध्यक्ष विनोद ठेंगणे उपस्थित होते.

या सोहळ्यात विविध समाजघटकांतील कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरद पवार) गटात प्रवेश करून पक्षावरील विश्वास पुन्हा दृढ केला. नवीन पदाधिकाऱ्यांची घोषणा करण्यात आली, त्यात अरबाज पठाण यांच्या जिल्हाध्यक्षपदाच्या निवडीने जिल्ह्यातील अल्पसंख्यांक संघटनेला नवी दिशा मिळाली आहे.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रामदास पखाले यांनी केले, तर प्रास्ताविक रज्जाक पठाण यांनी करून संघटनेच्या बळकटीकरणावर भर दिला. वणी विधानसभा अध्यक्ष दिलीप भोयर यांनीही या वेळी शासनाच्या जनविरोधी धोरणांवर तिखट भाष्य करत कार्यकर्त्यांना जनतेच्या प्रश्नांसाठी लढण्याचे आवाहन केले. सभागृह घोषणांनी गजबजून गेले होते.

सोहळ्यात शेकडो कार्यकर्त्यांची उपस्थिती लाभली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रदीप खोब्रागडे, महेंद्र चांदोरे, रामकृष्ण वैद्य, नरेंद्र लोणारे, सोनू दुर्गे आदींनी परिश्रम घेतले. या नियुक्तीद्वारे रॉकाप अल्पसंख्यांक सेलच्या कार्यात गतिमानता येईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.

वणी नगर परिषद प्रभाग ८ मध्ये राजू नागोराव रिंगोले हे शिंदे गटाकडून प्रभावी उमेदवार

0

News Today 

वणी नगर परिषद प्रभाग ८ मध्ये आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजू नागोराव रिंगोले हे शिवसेना शिंदे गटाकडून प्रभावी उमेदवार म्हणून चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहेत. त्यांच्या उमेदवारीची चर्चा संपूर्ण वॉर्डामध्ये नागरिकांमध्ये रंगली असून, स्थानिक राजकीय वातावरणात उत्सुकता आणि संभ्रम निर्माण झाला आहे.

.उमेदवाराची पार्श्वभूमी व प्रभावराजू नागोराव रिंगोले हे स्थानिक सामाजिक आणि राजकीय कार्यात सक्रिय आहेत. त्यांनी प्रभागातील विविध समस्या व प्रश्नांवर सातत्याने लक्ष केंद्रित केले आहे�.शिवसेना (शिंदे गट) पक्षाची जिल्हास्तरीय सभा, उमेदवारी तपासणी प्रक्रिया आणि कार्यकर्त्यांशी सल्लामसलत यामध्ये रिंगोले यांचा नाव पुढे आले आहे. त्यामुळे निवडणूकपूर्व चर्चेत त्यांची उमेदवारी अत्यंत ठळकपणे अधोरेकित होत आहे.

निवडणूक वातावरण आणि स्थानिक राजकारणवणी नगर परिषदेसाठी येत्या निवडणुकीत प्रभाग ८ हे पक्षासाठी महत्त्वाचे रणांगण ठरणार आहे. शिवसेना शिंदे गटाने संभाव्य उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या असून, कार्यकर्त्यांमध्ये नवा उत्साह संचारित करण्यात आला आहे.

प्रभागातील मोठ्या प्रमाणावर समर्थन मिळवण्यासाठी गट, स्थानिक प्रश्न, विकासाच्या मुद्द्यांवर रिंगोले यांनी मतदारांशी संवाद साधण्यास सुरुवात केली आहे�.जनतेच्या अपेक्षाशहराच्या विकासासाठी, पाणीपुरवठा, रस्ते, शिक्षण, आरोग्य सुविधा अशा क्षेत्रातील सुधारण्याची जनतेची अपेक्षा आहे.स्थानिक नागरीकांनी नवीन नेतृत्वासाठी आणि त्यांच्या प्रश्नांना प्राधान्य देणाऱ्या व्यक्तीसाठी आग्रह धरला आहे. त्यामुळे रिंगोले यांच्या उमेदवारीचा गड वर्धिष्णू होत आहे.

निवडणुकीचा महत्वही निवडणूक केवळ स्थानिक नगर परिषदेसाठीच नव्हे तर शहराच्या भविष्याशी निगडित आहे. त्यामुळे अनेक राजकीय गट, कार्यकर्ते, आणि नागरिक सक्रियपणे सहभागी होत आहे

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार) गटाच्या वतीने वणी येथे आज भव्य पक्ष प्रवेश व पदाधिकारी नियुक्ती सोहळा

0

News Today

वणी, ता. १२ नोव्हेंबर :
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार) गटाच्या अल्पसंख्यांक सेल, जिल्हा यवतमाळ यांच्या वतीने भव्य पक्ष प्रवेश व पदाधिकारी नियुक्ती सोहळ्याचे आयोजन आज सायंकाळी ७ वाजता वणी येथील वरोरा रोड वरील हॉटेल V9 च्या सभागृहात करण्यात आले आहे.

या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून रॉकाप अल्पसंख्यांक सेलचे प्रदेशाध्यक्ष तथा यवतमाळ जिल्हा निरीक्षक अफजल फारूक हे उपस्थित राहणार आहेत. तर प्रमुख अतिथी म्हणून प्रदेश संघटन सचिव रज्जाक पठाण, कामगार सेलचे प्रदेश उपाध्यक्ष आबिद हुसेन, सामाजिक न्याय सेलचे संघटन सचिव विजय नगराळे, वणी विधानसभा अध्यक्ष दिलीप भोयर, तालुकाध्यक्ष राजू वांढरे, शहराध्यक्ष विनोद ठेंगणे, तसेच युवा आघाडीचे तालुकाध्यक्ष सूर्यवीर चिकटे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

या कार्यक्रमात विविध समाजघटकांतील कार्यकर्ते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार) गटात प्रवेश करणार असून, नव्या पदाधिकाऱ्यांची घोषणा देखील करण्यात येणार आहे. पक्ष संघटनेची ताकद वाढवणे आणि पक्षाच्या ध्येयधोरणांनुसार कार्यकर्त्यांना एकत्र आणणे हा या उपक्रमामागील उद्देश आहे.

कार्यक्रमासाठी पक्षाचे स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिकांना मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे प्रदीप खोब्रागडे, नरेंद्र लोणारे, महेंद्र चांदोरे, आदी आयोजकांकडून आवाहन करण्यात आले आहे.