Friday, May 1, 2026
Google search engine
Home Blog Page 7

वणीत राजकीय मोठा भूचाल; एक मोठा नेता शिंदे सेनेच्या वाटेवर, भाजपचे वाढले टेन्शन

0

News Today 

वणी :- नगरपरिषदेच्या निवडणुकीच्या तोंडावर वणीतील भाजपने गंभीर आव्हान सामोरे जावे लागत आहे. शहरातील एक मोठा भाजपा नेता अचानक एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेना गटाशी संपर्क साधत असून, स्थानिक राजकारणात भूकंपीय हालचाली सुरू आहेत. यामुळे भाजपमध्ये अगोरच खुळखुळी वाढली असून, पक्ष आणखी हतबल होण्याच्या टप्प्यावर पोहोचला आहे.

शिंदे सेनेने वणी येथे स्वतंत्रपणे निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतल्यामुळे भाजपच्या ताकदीत सध्या मोठी घट झाली आहे. या निर्णयामुळे भाजप आणि शिंदे सेना दोघे स्वतंत्र उमेदवार मैदानात उतरले आहेत, ज्यामुळे वणी शहरात भाजपची ताकद निम्म्याहून अधिक कमी झाली आहे. 

भाजप कार्यकर्त्यांमध्ये असमंजसता आणि गोंधळ निर्माण झाला असून काही नेतांनी पक्ष सोडण्याचा विचारही व्यक्त केला आहे. अगोदरच अनेक माजी नगर सेवकांनी शिंदे गटात प्रवेश करून निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहे.

नगरपरिषदेतील निवडणुकीत ही शिंदे सेनेची स्वतंत्र लढत महाविकास आघाडीतील इतर घटकांसह भाजपवर मोठा धोका निर्माण करत आहे. यामुळे भाजपची संघटना कमकुवत होण्याची शक्यता प्रबल झाली आहे आणि स्थानिक राजकारणात नव्या सत्तासमीकरणाचे दाट वातावरण तयार झाले आहे. 

भाजपच्या पारंपरिक मतदारसंघावरही याचा नकारात्मक परिणाम दिसण्याची शक्यता आहे.राजकीय तज्ज्ञांच्या मते, महायुतीत असतानाही महत्त्वाच्या निकायांवर झालेल्या या फूटामुळे भाजप आणि शिवसेना दोन्ही पक्षांमध्ये तणाव असून, आगामी निवडणूक निकालांसाठी हे महत्वाचे टप्पा ठरण्याची शक्यता आहे. 

शिंदे सेनेने सर्व नगरपरिषद प्रभागांमध्ये स्वतंत्र उमेदवार रुजू करून भाजपला प्रत्यक्ष आव्हान दिले आहे.वणीतील या राजकीय घडामोडी भाजपच्या पक्षीय धोरणांवर प्रश्नचिन्ह निर्माण करतात आणि स्थानिक नेत्यांदरम्यान सलगी कमी केल्याचे चित्र दिसते. यामुळे वणी नगरपरिषद निवडणूक 2025 हे सत्तासमरणाचा निर्णायक सामना ठरण्याची प्रतीक्षा आहे.

वणीत भाजपच्या पायाखालची वाळू सरकली,नाराज भाजप कार्यकर्त्यांचा रोष उफाळला, शिंदे सेनेचा झंझावताणे, माजी आमदाराला फोडला घाम

0

नगराध्यक्ष पदाच्या उमेदवाराचा कोणताही जनसंपर्क नसल्याने मतदारांमध्ये उमटला नाराजीचा सूर 

News Today 

वणी (प्रतिनिधी) : वणीत नगर परिषद निवडणुकीची रणधुमाळी सुरू होताच भाजपच्या छावणीत असंतोषाचे वारे जोरदार वाहू लागले आहेत. पक्षाने कोणताही जनसंपर्क किंवा स्थानिक ओळख नसलेल्या महिलेला नगराध्यक्षपदाची उमेदवारी दिल्याने भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये तीव्र नाराजी उसळली आहे. तर दुसरी कडे शिंदे सेनेच्या झंझावताने माजी आमदाराला चांगलाच घाम फुडत आहे. त्यामुळे भाजपच्या हवा सर्वत्र गुल होताना दिसून येत आहे. 

अनेक वर्षे पक्षासाठी रात्रंदिवस परिश्रम घेणाऱ्या कार्यकर्त्यांना वाऱ्यावर सोडत बाहेरील उमेदवाराला पुढे करून पक्ष नेतृत्वाने स्वतःच्या पायावर धोंडा मारल्याचे बोलले जात आहे.२ डिसेंबर रोजी होणाऱ्या निवडणुकीसाठी २६ नोव्हेंबरपासून अधिकृत प्रचाराला सुरुवात होणार असली तरी वणीत राजकीय तापमान चांगलेच वाढले आहे. 

राज्यात शिंदे सेना आणि भाजप अनेक ठिकाणी एकत्र लढत असतानाच वणीत मात्र शिंदे गटाने स्वतंत्र झेंडा फडकवत भाजपसमोर गंभीर आव्हान उभे केले आहे.विजयबाबू चोरडिया यांच्या नेतृत्वाखालील शिंदे सेनेने आपल्या संघटकीय व राजकीय कौशल्याच्या बळावर भाजपचे अनेक स्थानिक कार्यकर्ते आपल्या गोटात ओढण्यात यश मिळवले आहे. 

त्यामुळे भाजपला ‘भाडोत्री’ प्रचारकांच्या जोरावर निवडणुकीचा डंक वाजवावा लागत आहे. घराघरातून नाराजीचा सूर उमटत असून ‘भाजपने आमच्याच कार्यकर्त्यांचा विश्वासघात केला’ अशा भावना उफाळल्या आहेत.नगरसेवक उमेदवारीच्या वाटपातही कार्यकर्त्यांच्या मताला थारा मिळाला नसल्याने संतप्त कार्यकर्त्यांनी गुप्तपणे शिंदे सेनेच्या उमेदवारांना पाठिंबा देण्याचा निर्धार केला असल्याच्या चर्चाही जोमात आहेत.

राजकीय जाणकारांच्या मते, स्थानिक पातळीवर शिंदे सेनेचा वाढता प्रभाव, भाजपमधील आंतरिक कलह आणि उमेदवारीतील गैरसमज हे घटक भाजपच्या आवाक्याबाहेर गेले आहेत. आगामी नगर परिषद निवडणुकीत वणीतील हा रोष ‘मतपेटीतला स्फोट’ ठरण्याची चिन्हे स्पष्ट दिसत आहेत.

वणीच्या ‘बोगस विकासा’चं बोलकं चित्र!प्रभाग क्रमांक 2 प्रगती नगरात खड्ड्यांचं साम्राज्य आणि फिल्टर पाण्याच्या गाड्यांचा बोलबाला… भाजपचा विकास फक्त कागदावर

0

News Today 

!वणी  (प्रतिनिधी) – प्रभाग क्रमांक 2 प्रगती नगर परिसरातील नागरिक आज ‘विकासा’च्या नावाखालील भ्रष्टाचाराचा भोग घेत आहेत. भाजपच्या नगरसेवकांनी उभारलेले काँक्रेटचे रस्ते काही महिन्यांतच खड्ड्यांनी विद्रूप झाले आहेत. 

लाखो रुपयांचा निधी खर्च करूनही लोकांना चालण्यालायक रस्ते मिळाले नाहीत, हे दुर्दैवी वास्तव आज एका फोटोद्वारे उघड झाले आहे.एका बाजूला विकासाच्या नावाने टाकलेले निकृष्ट दर्जाचे काँक्रेट रस्ते कोसळत आहेत, तर दुसऱ्या बाजूला त्याच रस्त्यावरून खाजगी फिल्टर पाण्याच्या गाड्या फिरत आहेत.

नगरपरिषदेकडून हजारो रुपयांचा पाणीकर आकारला जातो, मात्र नागरिकांना स्वच्छ पाणी मिळत नाही. परिणामी लोकांना पैसे मोजून ‘कॅनचे पाणी’ खरेदी करावे लागत आहे.

निवडणुकीपूर्वी ‘विकासाचे आश्वासन’ देणाऱ्या भाजपच्या प्रतिनिधींना आता लोक विचारत आहेत – “साहेब! शिक्षण, आरोग्य, पाणी आणि प्रदूषण या प्रश्नांवर तुम्ही काय केलं?”

पण उत्तर देताना त्यांच्या ‘बॉबड्याची बोबडी उडते’ अशी जनतेची टीका आहे.जनतेच्या मूलभूत गरजांकडे पूर्ण दुर्लक्ष करून केवळ काँक्रेटच्या बोगस योजनांतून भ्रष्टाचाराला खतपाणी घालणाऱ्या प्रशासनाविरोधात नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे.

वणी येथील वसंत गंगा विहारमध्ये मुख्य मार्ग बंद; नागरिकांचा संताप, नगरपरिषदेने तात्काळ कारवाई करून मार्ग केला मोकळा

0

News Today 

वणी – वसंत गंगा विहारचा गेल्या वीस वर्षांपासून नियमित वापरात असलेला मुख्य रस्ता अचानक एका प्लॉटधारकांनी बंद केल्याने शनिवारी सकाळी परिसरात मोठी खळबळ माजली. “हा रस्ता संताजी ज्ञान प्रसारक मंडळाचा प्लॉट आहे, त्यामुळे रस्ता बंद करण्यात येत आहे,” असा मजकूर असलेला मोठा बॅनर लावून रस्त्यावर बांबूचे अडथळे उभे करण्यात आले. या अचानक कारवाईमुळे रहदारी ठप्प झाली आणि नागरिक अक्षरशः अडकल्यागत झाले.

गेल्या दोन दशकांपासून हा मार्ग वसंत गंगा विहार परिसरातील शेकडो नागरिकांचा मुख्य दळणवळण मार्ग म्हणून वापरात आहे. अशा स्थितीत रस्ता खाजगी प्लॉट असल्याचा दावा अचानक कसा जन्माला आला, याबद्दल परिसरात प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. रस्ता बंद केल्यामुळे काही वेळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

या प्रकरणाची माहिती नगर परिषदेचे मुख्याधिकारी सचिन गाडे पाटील यांच्यापर्यंत पोहोचताच त्यांनी तातडीने नगरपरिषद कर्मचाऱ्यांना घटनास्थळी पाठवले. अधिकाऱ्यांच्या पथकाने बंदिस्त केलेला मार्ग तात्काळ खुला करून लावलेला बॅनर तसेच रस्ता रोखण्यासाठी बसवलेले बांबू काढून ते जप्त केले. नगरपरिषदेकडून अशी तातडीची कारवाई होताच नागरिकांनी समाधान व्यक्त केले.

रस्ता बंद करणाऱ्या व्यक्तींनी अचानक असा निर्णय का घेतला, याबाबत नागरिकांमध्ये मोठी चर्चा रंगली आहे. “जर हा रस्ता खाजगी प्लॉटचा असेल, तर मग वीस वर्षांपासून तो सार्वजनिक रस्ता म्हणून कसा वापरला गेला?” असा युक्तिवाद नागरिक करत आहेत. अनेकांनी यामागे प्लॉटच्या नोंदीतील संभ्रम, नवीन मोजणीतील बदल किंवा जमीन व्यवहाराशी संबंधित अंतर्गत वाद असल्याचा संशय व्यक्त केला आहे.

रस्ता दीर्घकाळ सार्वजनिक वापरात असल्याने कायद्यानुसार तो सार्वजनिक हक्काचा मार्ग मानला जाऊ शकतो. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तो अचानक बंद करण्याचा अधिकार नसल्याचे विधिज्ञ सांगतात. नगरपरिषदेची कारवाई या पार्श्वभूमीवर योग्य आणि आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले जात आहे.

दरम्यान, नागरिकांनी असा देखील निर्वाळा दिला की भविष्यात अशा अनधिकृत रस्ता बंदीच्या प्रकारांची पुनरावृत्ती होऊ नये, यासाठी नगरपरिषदेने रस्त्यांच्या नोंदी, सीमारेषा व मोजणी याबाबत स्पष्टता निर्माण करावी.

राजकारणाच्या रंगमंचावर पत्रकारितेचा तमाशा, कमळाबाईची चाटूगिरी करणाऱ्या “उच्च भू” पत्रकारांच्या दिशा भूल बातम्या पासून सद् विवेक मतदारांनी सतर्क राहण्याची गरज 

0

News Today 

वणी नगर परिषदेच्या निवडणुकीची सरगर्मी वाढत असतानाच, काही तथाकथित पत्रकार आता आपल्या सवर्ण मानसिकतेच्या पिंजर्‍यातून बाहेर पडू न शकल्याने कमळाबाईचे पाय चाटत फिरताना दिसत आहेत. लोकशाहीच्या चौथ्या स्तंभावर जनतेचा विश्वास असतो, पण काही पत्रकारांनी तोच स्तंभ बाजारात विकायला काढल्यागत वर्तन सुरू केले आहे.

विधानसभेतील पराभव अजूनही गळ्याखाली न उतरणाऱ्या काही सवर्ण गटांतील लोकांनी आता “पत्रकार” या आडव्या नावाखाली एका विशिष्ट पक्षाला वाचविण्याची मोहीम उघडपणे चालवली आहे. तांत्रिक कारणे, आकडेमोडीचे खेळ आणि अर्धवट सत्य मांडून मतदारांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा केविलवाणा प्रयत्न सुरू आहे.

लोकशाहीला पोसणारे माध्यम आता एका पक्षाच्या पिंजऱ्यात अडकले असून वास्तविक मुद्द्यांपासून दूर जाऊन केवळ प्रचाराचे पोस्टी लिहिण्याचे काम सुरु झाले आहे. जनतेचा आवाज आज मुळात विकला जात आहे — आणि हेच भयावह आहे.

सजग मतदारांनी या जातीयवादी आणि पक्षपाती पत्रकारितेच्या पलीकडे जाऊन स्वतःच्या सद्‍विवेकबुद्धीने निर्णय घ्यावा. कारण पत्रकारितेचा उद्देश जनतेला माहिती देणे आहे, गोंधळ घालणे नाही.

अश्या चाटूगिरी करणाऱ्या एका पत्रकाराला देखील मराठी अस्मिता जागवणाऱ्या एका राजकीय नेत्याने त्याला घरी जाऊन चोप दिला होता. या घटनेचे मळभ दूर सारत नाही तोच नांदेपरा चौफुली येथे एका आंबट शौकाच्या प्रकरणातून चार ते पाच राजूर येथील तरुणांनी बेधून बदळले होते. या प्रकरणाचे व्हिडिओ क्लिप  हाती लागले आहे. तसेच मुकुटबन रोडवरील ९८ एकराच्या जमिनीच्या गौळ बंगाल लवकरच जनतेला वाचण्यासाठी मिळणार आहे. 

वणी येथील भाजपाच्या माजी आमदाराचा दबाव? राष्ट्रवादी (शरद पवार) उमेदवार माया ढुरके यांचा धक्कादायक आरोप; नामांकन मागे घेण्यासाठी फोनवरून तगादा

0

News Today 

वणी नगर परिषद निवडणुकीत प्रभाग क्रमांक १४ (क) मध्ये राजकीय वातावरण तापले असून, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार) गटाच्या अधिकृत उमेदवार माया मारोती ढुरके यांनी थेट भाजपच्या माजी आमदार बोदकुरवार यांचेवर दबाव टाकल्याचा गंभीर आरोप केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, माया ढुरके यांनी सुरुवातीला भाजपकडून बोदकुरवार यांना उमेदवारी मागितली होती. मात्र, त्यांनी उमेदवारी न मिळाल्याने त्यांनी राष्ट्रवादी (शरद पवार) गटाकडून प्रभाग १४ (क) मधून आपले नामांकन दाखल केले. या प्रभागात केवळ तीनच उमेदवार रिंगणात असल्याने व मायाताई यांचे जबरदस्त प्रभुत्व असल्याने निवडणुकीला वेगळेच समीकरण निर्माण झाले आहे.

ढुरके म्हणाल्या की, “मी एक माजी नगर सेविका असून आता राष्ट्रवादीची अधिकृत उमेदवार म्हणून अर्ज दाखल केला असून कोणत्याही दबावाला बळी पडणार नाही. माजी आमदारांनी केलेला हा प्रयत्न निवडणूक प्रक्रियेवर परिणाम करणारा आहे.”
त्यांच्या या खुलाशामुळे वणी शहरात मोठी राजकीय खळबळ उडाली आहे.

राष्ट्रवादी (शरद पवार) गटात या प्रकारामुळे तीव्र नाराजी असून पक्षाकडूनही या घटनेची गंभीर दखल घेण्यात येण्याची शक्यता आहे. दुसरीकडे, भाजपकडून अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया मिळालेली नाही.

प्रभाग १४ (क) मध्ये तीन उमेदवारांच्या चुरशीच्या लढतीत अशा प्रकारच्या आरोपांमुळे निवडणुकीचे वातावरण आणखी चिघळण्याची चिन्हे दिसत आहेत.

व्हिडिओ बघण्यासाठी लिंक ओपन करा

https://youtu.be/PKiE6sROXM0?si=P2g40tVLU2L_ZSNi

 

वणी नगरपरिषद निवडणूक: शिंदे गटाच्या शक्तीप्रदर्शनाने भाजपात खळबळ, विजयबाबू चोरडिया ठरले केंद्रबिंदू

0

News Today 

वणी (प्रतिनिधी): वणी नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना (शिंदे गट)च्या रॅलीने शहरातील राजकीय वातावरण ढवळून काढले आहे. १७ नोव्हेंबर रोजी अध्यक्षपदासह २९ उमेदवारांचे अर्ज भरताना शिंदे गटाने घेतलेले शक्तीप्रदर्शन ऐतिहासिक ठरले. ढोल-ताशांचा गजर, भगव्या झेंड्यांची लाट आणि कार्यकर्त्यांचा उत्साह यामुळे संपूर्ण शहर केशरी रंगात न्हाऊन निघाले.

या रॅलीचे नेतृत्व ज्येष्ठ नेते आणि समाजसेवक विजयबाबू चोरडिया यांनी केले. त्यांच्या नेतृत्वाखालील या दमदार आयोजनाने भाजपच्या खेम्यात चांगलीच खळबळ निर्माण केली आहे.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि पालकमंत्री संजय राठोड यांच्या उपस्थितीत भाजपा सोडून शिंदे गटात दाखल झाल्यानंतर अवघ्या सव्वा महिन्यातच चोरडिया यांनी शहरात ठोस संघटन उभे केले आहे.

शहरातील अनेक ज्येष्ठ कार्यकर्ते आणि नागरिक शिंदे गटात सहभागी होत असल्याने वणी–झरी–मारेगाव परिसरात पक्षाची ताकद वाढताना दिसत आहे. माजी आमदार विश्वास नांदेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पक्षाने स्थानिक स्तरावर जोरदार पकड निर्माण केली आहे.

रंगनाथ स्वामी देवस्थान येथून निघालेल्या रॅलीत नागरिकांनी फुलांचा वर्षाव करत चोरडिया यांचे स्वागत केले. एकत्रित उत्साह, घोषणाबाजी आणि शिस्तबद्ध शक्तीप्रदर्शनाने वणीच्या राजकारणात नव्या समीकरणांची चाहूल लागली आहे.

राजकीय विश्लेषकांचे मत आहे की, या रॅलीनंतर नगरपरिषद निवडणुकीची बाजी शिंदे गटाच्या दिशेने झुकताना दिसत आहे, तर भाजपसमोर कठीण आव्हान उभे राहिले आहे.

वणीत बेकायदेशीर कमळाबाईच्या पक्षप्रवेश कार्यक्रमात गोंधळ व तुफान हमरी- तुमरी पदाधिकाऱ्यांनी काढला पळ

0

News Today 

वणी:- नगर परिषदेच्या आगामी निवडणुकीचे वारे आता अधिक वेगाने वाहू लागले असून, अधिकृत प्रचाराला अजून सुरुवातही झालेली नसतानाच कमळाबाई गटाच्या अंतर्गत वादांनी जोर धरला आहे. दिनांक १८ नोव्हेंबर रोजी रात्री सुमारे ११ वाजताच्या दरम्यान  दीपक टॉकीज परिसरातील एका नगरात (गोकुळच्या दारी)  पक्ष प्रवेशाच्या दरम्यान कमळाबाई समर्थित दोन संभाव्य उमेदवारांमध्ये तीव्र बाचाबाची झाल्याची माहिती समोर आली आहे. हा वाद उमेदवारीच्या वाटपावरून झाल्याची गोपनीय माहिती आहे. आणि हे प्रकरण दळपण्याचा पुरेपूर प्रयत्न केल्या जात आहे.

स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, ही बाचाबाची केवळ शब्दांच्या चकमकीपर्यंत न थांबता जुने वैर आणि परस्पर स्पर्धेमुळे तीव्र ‘हमरी–तुमरी’पर्यंत पोहोचली होती. दोन्ही कार्यकर्ते एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत असल्याने परिसरात काही वेळ तणाव निर्माण झाला होता.
घटना अधिक बिघडू नये म्हणून उपस्थित पदाधिकाऱ्यांनी मध्यस्थी करत दोघांना शांत करण्याचा प्रयत्न केला. अखेर परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे पाहून पदाधिकाऱ्यांनी दोन्ही कार्यकर्त्यांना तिथून दूर नेऊन प्रसंगाचा निपटारा करण्याचा प्रयत्न केला. यामुळे मोठी धुमश्चक्री टळल्याचे स्थानिक स्रोतांनी सांगितले.

दरम्यान, रात्री उशिरा घडलेल्या या प्रकरणानंतर स्थानिक राजकीय वर्तुळात एक वेगळाच सवाल उपस्थित होत आहे—अधिकृत आचारसंहिता लागू असूनही सत्ताधारी कमळाबाई गटाच्या कार्यकर्त्यांना निवडणूक विभागाकडून मोकळीक मिळतेय का? या घटनेवर निवडणूक विभाग कोणती भूमिका घेतो, याकडे आता स्थानिक नागरिक आणि विरोधी गटांचे लक्ष लागले आहे.

या अंतर्गत कलहामुळे कमळाबाई गटाची प्रतिमा धुळीस मिळण्याची शक्यता राजकीय निरीक्षकांनी व्यक्त केली आहे. निवडणुकीचे वातावरण चांगलेच तापले असताना गटांतर्गत भांडणांनी पुढील काही दिवसांत आणखी नवे वळण घेण्याची शक्यता नाकारता येत नाही.

भाजपच्या जातीयवादाचा पर्दाफाश : वणी नगरपरिषदेच्या निवडणुकीत कुणबी समाजाचा अपमान, उमेदवारी कट, आणि निखिल खाडे यांचा शिंदे गटातील धक्कादायक प्रवेश

0

News Today 

वणी नगरपरिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपमध्ये प्रचंड खळबळ माजवणारी आणि कुणबी समाजाच्या अस्मितेचा प्रश्न प्रकर्षाने चर्चेत आणणारी मोठी राजकीय घटना घडली आहे. भाजपचे जिल्हा महामंत्री आणि वणीतील युवकांचे लोकप्रिय नेते निखिल खाडे यांनी भाजपवर थेट ‘कुणबी समाजावरील व्देष’, ‘जातीयवाद’ आणि ‘उपयोग करून टाकण्याची प्रवृत्ती’ या गंभीर आरोपांचा भडिमार करून पक्षाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी शिवसेना (शिंदे गट) मध्ये विजयबाबू चोरडिया यांच्या नेतृत्वात जाहीर प्रवेश केला असून, या हालचालीमुळे भाजपच्या स्थानिक नेतृत्वात जबरदस्त अस्वस्थता पसरली आहे.

भाजपचा ‘जातीयवादी’ चेहरा उघड

निखिल खाडे यांनी भाजपमधील जातीय प्रवृत्तीवर रोखठोक आरोप करताना सांगितले –भाजपच्या कार्यालयात विधानसभा २०२४ च्या प्रचारादरम्यान कुणबी समाजाचा अवमान, अश्लील शिवीगाळ, आणि मानहानी करण्यात आली होती. या घटनेतील दोषींना पक्षाने संरक्षण दिले आणि उलट माझ्यावर सूडाची कारवाई केली. माझ्या उमेदवारीवर पराभूत माजी आमदार (मामा ) यांनी मुद्दाम कात्री लावली.

केवळ समाजाच्या इज्जतीसाठी आवाज उठवल्यानेच मला डावलले गेले.भाजपमध्ये कुणबी समाजाच्या नेतृत्वाला आणि प्रश्नांना दुय्यम वागणूक देऊन केवळ मतांसाठी वापरून टाकण्याचे धोरण आहे.

समाजातील असंतोषाचा उद्रेक — जनतेत दिसत आहे काळजी

विधानसभा प्रचारातील अपमानकारक घटनेने संपूर्ण कुणबी समाजात संतापाची लहर उसळली होती.

घटनेविषयी बोलल्याबद्दलच कार्यकर्त्यांवर सूडाने कारवाई, ही भाजपच्या ‘जातीयवादी’ आणि प्रतिगामी मानसिकतेची साक्ष आहे.पक्षाच्या ‘कोअर ग्रुप’मधील विल्हेवाट, आपल्या बाजूचे उमेदवार मुद्दाम डावलून पक्षशिस्तीच्या नावाखाली अस्तित्व नाकारण्याचा प्रयत्न.भाजपच्या विरोधात निर्माण होत असलेली जनमत लाट भाजपच्या ‘जातीच्या’ राजकारणाला औरंगाबाद, बुलढाणा, वर्धा, चंद्रपूर यवतमाळ, नागपूर आणि अमरावतीसारख्या जिल्ह्यांत देखील कार्यकर्त्यांनी विरोध केल्याचे उदाहरणे नुकतेच दिसून आले होते.

अनेक ठिकाणी भाजपमध्ये होत असलेल्या प्रवेश—बाहेर पडण्याच्या घटनांनी, जिल्ह्यात महागठबंधनतील फूट व असंतोष चव्हाट्यावर आला आहे.

भाजप वरिष्ठांकडून तिकीट वाटपात वेळोवेळी होत असलेली दिशाभूल, गुप्त वाटाघाटी, आणि पक्षांतर्गत गटबाजीमुळे स्थानिक नेतृत्व नाराज आहे.

निवडणूक पूर्वी भाजपची उलगडती प्रतिमा व संघर्षभाजपमध्ये ७०% जागांचे उमेदवार निश्चित असूनही अनेक नेत्यांची, विशेषतः कुणबी, ओबीसी, स्थानिक समाजाच्या प्रतिनिधीत्वाची होणारी पायमल्ली ही पक्षाच्या सामाजिक समावेशकतेवर प्रश्नचिन्ह उभं करते.

शिंदे गटासारख्या मित्रपक्षांनीही भाजपच्या वावरण्यावर ताशेरे ओढले असून, आघाडी गटातील हालचालींमुळे भाजप अनेक ठिकाणी अडचणीत आहे.

भाजपच्या आजपर्यंतच्या ‘भागीदारीच्या’ वचनाला हरताळ फासत लोकसभेपासून विधानसभेपर्यंत समाजातील विशिष्ट घटकांना डावलण्याचे आरोप सतत जोर धरत आहेत.ही संपूर्ण घडामोड वणी तालुक्यामध्ये आणि यवतमाळ जिल्ह्यात भाजपच्या विरोधात तीव्र जनमत तयार करत आहे.

कुणबी समाजाच्या अस्मितेचा प्रश्न, स्थानिक नेतृत्वाशी झालेला अन्याय आणि भाजपच्या ‘जातीयवादी’ धोरणांचा पर्दाफाश — या मुद्द्यांमुळे निवडणुकीपूर्वी भाजप समोर गंभीर आव्हान उभे राहिले असून, जनमताचा कल प्रगल्भ बदलाच्या दिशेने झुकण्याची शक्यता वर्तवली जाते.

निखिल खाडे हे प्रभाग ९ मधून आपली उमेदवारी अर्ज शिंदे गटाकडून दाखल करणार असून या उमेदवारीने भाजपला जोरदार झटका बसणार आहे. अशी चर्चा संपूर्ण शहरात चालू आहे. 

वणीत शरद पवार राष्ट्रवादीत तुफानी इंकामिंग! वणी नगर परिषदेच्या रणांगणात चार प्रभागांतील बलाढ्य उमेदवारांची एन्ट्री

0

News Today 

वणी :- नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी शरद पवार पक्षात जोरदार राजकीय वैतागळ सुरू असून प्रभाग क्रमांक ७ चे राजेश बापुराव पारधी, प्रभाग क्रमांक ८ चे नाना उर्फ प्रशांत विठ्ठलराव कापसे, प्रभाग क्रमांक १ चे प्रशांत सुदाम फाळके यांच्यासह प्रभाग क्रमांक १३ मधून संभाव्य उमेदवार म्हणून ओळखले जाणारे संतोष जोगी यांनीही पक्षात प्रवेश केला आहे. या प्रवेशामुळे राष्ट्रवादीत अक्षरशः मोठी इंकामिंग होत असल्याचे चित्र आहे.

वणी विधानसभा क्षेत्राध्यक्ष दिलीप भोयर यांच्या नेतृत्वावर दाखवलेला विश्वास आणि संघटनातील सातत्यपूर्ण कामामुळे पक्षात प्रवेश घेणाऱ्यांची संख्या वाढत असल्याचे निरीक्षकांचे म्हणणे आहे.

पक्ष प्रवेश सोहळ्यास प्रदेश संघटन सचिव रज्जाक पठाण, कामगार सेलचे प्रदेश उपाध्यक्ष आबिद हुसेन, अल्पसंख्यांक सेलचे जिल्हाध्यक्ष अरबाज पठाण, तालुकाध्यक्ष राजू वांढरे, शहराध्यक्ष विनोद ठेंगणे, तसेच प्रदीप खोब्रागडे, नरेंद्र लोणारे , खुशाल बासमवार यांसह अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभली.

तिन्ही प्रभागांतील बलाढ्य तिकडीबरोबरच प्रभाग १३ मधील संभाव्य उमेदवार संतोष जोगी यांचा वाढता प्रभावही लक्षवेधी आहे. या चौघांच्या उमेदवारीमुळे स्थानिक राजकारणातील समीकरणे मोठ्या प्रमाणात ढवळून निघाली असून अनेकांच्या पायाखालची वाळू सरकली असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे.

या आता चौफेर—प्रवेशामुळे राष्ट्रवादी शरद पवार पक्ष वणी नगर परिषदेच्या निवडणुकीत नव्या आत्मविश्वासाने उतरला आहे. आगामी निवडणुकीत या बदलांचा थेट परिणाम दिसून येईल, असा ठाम अंदाज व्यक्त केला जात आहे.