Thursday, July 30, 2026
Google search engine
Home Blog Page 36

चनाखा येथील कुटुंबातील कर्त्या शेतकरी पुत्राची विष प्राशन आत्महत्या 

0

News Today 

वणी :- तालुक्यातील चनाखा येथील कुटुंबातील कर्त्या शेतकरी पुत्राची शेतात विष प्राशन करून तारीख २३ रोजी सकाळी ९ वाजता आपली जीवन यात्रा संपविल्याची दुःखद घटना घडली आहे. अतुल मारोती डाखरे वय ३२ असे या आत्महत्याग्रस्त यवकाचे नाव आहे.

त्यांचे प्रच्छात पत्नी, एक मुलगी, वृद्ध आई वडील असा अप्त परिवार आहे. मृतक हा शेती करून आपल्या कुटुंबाचा गाडा चालवीत होता. मागील तीन वर्षांपासून शेतमाला भाव मिळत नसल्याने शेती करणे त्याला अवघड झाले होते. त्यामुळे कुटुंब चालवायचे तरी कसे असा प्रश्न त्याला पडू लागले होते. याच विवंचनेत त्याने शेतात विष प्राषन केले व आपली आत्महत्या केली. या घटनेने शेतकऱ्यांचे जीवन जगणे अत्यंत कठीण झाले असून सरकारने शेतमालाच्या भावाकडे लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे. अन्यथा येणाऱ्या काळात मोठ्या आत्महत्या वाढतील अशी स्थिती निर्माण होत असल्याची चर्चा शेतकऱ्यांमध्ये दिसून येत आहे.

 

वणी येथे बळीराजा व्याख्यानमाला २०२४ चे आयोजन -प्रा.रंगनाथ पठारे यांचे व्याख्यान

0

News Today 
वणी :- शिव महोत्सव समिती वणी द्वारा आयोजित बळीराजा व्याख्यानमालेचे हे १० वे वर्ष.२०१५ पासुन प्रारंभ झालेल्या या व्याख्यानमालेला सुरुवातीपासूनच श्रोत्यांचा प्रचंड प्रमाणावर प्रतिसाद मिळत आहे. ही व्याख्यानमाला बौद्धिक मेजवानीत रस घेणाऱ्या सुजाण श्रोत्यांच्या सहकार्यातून आयोजित करण्यात येते.


यावर्षी ही व्याख्यानमाला २८ व २९ डिसेंबर २०२४ रोज शनिवार व रविवार ला बाजोरिया लॉन येथे पार पडेल.सायंकाळी ६ वाजता प्रारंभ होणाऱ्या या दोन दिवसीय व्याख्यानमालेला प्रख्यात साहीत्यिक प्रा.रंगनाथ पठारे संबोधित करतील.पहिल्या दिवशीचे स्मृतीपुष्प रामचंद्र जागोजी सपाट यांना समर्पित असुन “सामाजिक वास्तव: काल आज आणि उद्या” या विषयावर विचारमंथन होईल.तर नारायणराव सांबशिव देवडे यांना दुसरे दुसऱ्या दिवशीचे स्मृतीपुष्प समर्पित असुन “साहित्य कशासाठी?” या विषयांवर पठारे संबोधन करतील.

दोन दिवसीय व्याख्यानमाला आयोजन समितीचे अध्यक्ष शहाबुद्दीन अजाणी यांच्या अध्यक्षतेखाली होणार असुन प्रशासकीय आणि विविध क्षेत्रातील मान्यवर पाहुणे म्हणून उपस्थित असतील.दरवर्षी प्रमाणेच श्रोत्यांनी याही वर्षी उपस्थित राहून या व्याख्यानमालेचा बौद्धीक आस्वाद घ्यावा.असे आवाहन शिव महोत्सव समिती वणीच्या वतीने उपाध्यक्ष प्रा.डॉ.करमसिंग राजपुत,निमंत्रक कृष्णदेव विधाते यांनी वणीकरांना केले आहे.

आमदार संजय देरकर यांची आदिवासी विद्यार्ध्यांच्या वस्तीगृह संदर्भातील आंदोलनाला भेट

0

News Today 

वणी :-  मागिल ८ दिवसापासून पांढरकवडा येथील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय समोर सूरू असलेले आंदोलन . त्यात आदिवासी मुला/ मुली यांचे त्यांच्या मूलभूत हक्कासाठी लढत आहे. त्यांच्या प्रमुखं मागण्या महाराष्ट्र शासनाच्या वार्षिक महागाई दरानुसार प्रत्येकवर्षी आदिवासी विकास विभागामार्फत येणाऱ्या जिल्हास्तरीय मुला – मुलींना वस्तीगृहामध्ये लागु असलेल्या DBT या योजनेमध्ये प्रत्येक वर्षी वर्षी महागाई दरानुसार वाढ करण्यात यावी यासारख्या प्रश्नाबाबत आंदोलन सूरू आहे. या आंदोलनस्थळी वणी विधानसभेचे आमदार संजय देरकर यांनी भेट घेतली.

त्या वेळी आमदार संजय देरकर यांनी त्यांचे निवेदन स्वीकारून त्यांची समस्या जाणुन घेतल्या व लवकरात लवकर संबंधीत विभागाला भेटून न्याय मिळवून देऊ असे आश्र्वासन दिले. त्यावेळीं प्रकल्प अधिकारी सुहास गाडे, य. जि. म. बॅक संचालक राजीव येल्टीवार , मिथुन सोयांम, राहुल दांडेकर, बाळु दुधखुळे , संतोष जंगीलवार, गौरव पंधरे, बंडू आळे, गोपाल मडावी, संतोष कोहळे, गौरव भूषेवार उपस्थिती होते.

वणी प्रीमियर लीग – टेनिस बॉल क्रिकेट सामने,आमदार चषकाचे आयोजन 

0

News Today (दिलीप भोयर)

वणी :- इलेव्हन स्टार क्रिकेट क्लब च्या वतीने वणी विधानसभा क्षेत्राचे आदरणीय आमदार संजय जी देरकर यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली १० जानेवारी २०२५ पासून वणी प्रीमियर लीग चे टेनिस बॉल क्रिकेट सामने आयोजित केले जात आहेत. हे सामन्यांचे आयोजन एक ऐतिहासिक आणि रोमांचक अनुभव देण्यासाठी आमदार चषकाचे आयोजन करण्यात आले आहे.

या स्पर्धेसाठी २५ डिसेंबर २०२४ पर्यंत खेळाडूंची रजिस्ट्रेशन सुरू राहील आणि त्यानंतर २८ डिसेंबर २०२४ रोजी खेळाडूंची ऑक्शन प्रक्रिया होईल. या सामन्यात भाग घेणाऱ्या खेळाडूंना एक उत्तम संधी मिळणार आहे, ज्यामुळे त्यांचे क्रिकेट कौशल्य एक नवीन उंचीवर पोहोचेल.

हे टेनिस बॉल क्रिकेट सामने खेळाडू आणि नागरिकांसाठी अत्यंत उत्साही आणि थरारक असतील. हे एक अद्वितीय मंच आहे जिथे स्थानिक खेळाडूंना त्यांची कलेची ओळख प्रकट करण्याची संधी मिळेल. आणि यामुळे त्या खेळाडूंना भविष्यात मोठ्या स्तरावर स्पर्धा करण्याचा मार्ग खुला होईल.

सर्व स्पर्धकांनी या रोमांचक सामन्यात भाग घेण्याचे आवाहन आम्ही आयोजक म्हणून करतो आहे. एकत्र येऊन, आपली कर्तृत्वाची गाठ बांधून, या मोठ्या टुर्नामेंटमध्ये आपली जागा पक्की करा आणि आपला खेळ दाखवा.

जास्तीत जास्त स्पर्धकांनी भाग घ्या आणि आपल्या क्रिकेट कलेला एक नवा वळण द्या!

अधिक माहिती करिता संपर्क शैलेश ढोके:- 9822561450
नदीम:- 8806333786 यांच्याशी साधावा असे आवाहन करण्यात आले आहे. 

कर्मयोगी संत गाडगेबाबांच्या उपदेशाची समाजाला गरज – सौ. किरनताई देरकर

0

कर्मयोगी संत गाडगेबाबांचा स्मृती दिनानिमित्त विविध कार्यक्रम

News Today 

वणी निष्काम कर्मयोगी श्री संत गाडगेबाबा यांच्या 68 व्या पुण्यतिथी निमित शुक्रवार दिनांक 20 डिसेंबर 2024 ला संत गाडगेबाबा चौक वणी येथे स्मृती दिनाच्या निमित्ताने किरणताई संजय देरकर यांच्या प्रमूख उपस्तीतित मान्यवरांच्या उपस्थितीत अभिवादन व हारार्पण कार्यक्रम सकाळी 10 वाजता संपन्न झाला.

सर्वप्रथम श्री संत गाडगे बाबांच्या स्मारकाला किरनताई संजय देरकर, विजय चोरडिया, दिपक कोकास,सुनील कातकडे, संभाजी वाघमारे, दिलीप मस्के, शेखर चिंचोलकर, यांचे हस्ते पुष्पहार व फुले अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

गरजूंना ब्ल्यंकेट तर महाप्रसादाचे वितरण.

संत गाडगेबाबा यांच्या स्मृतिदिननिमित्त गरजवंताला ब्ल्यांकेट वाटप नगर सेवा समितीच्या वतीने विजय चोरडिया यांच्या मार्गदर्शनात तर महाप्रसादाचे वितरण व्यवस्था संभाजी वाघमारे यांच्या हस्ते करण्यात आली.

गाडगे बाबांच्या कार्याची उजळणी.

गुरुदेव सेवा मंडळाचे ठेंगणे, विजयाताई दहेकर, विजय चोरडिया, किरण ताई देरकर, सुनील कातकडे व दिलीप मस्के यांनी संत गाडगेबाबांच्या कार्याची महती सांगितली.

*समाजाला गाडगे बाबांच्या स्वचछता व शिक्षणाची व निर्व्यसनी जिवन जगण्याच्या विचारांची आजही गरज असल्याचे प्रतिपादन किरन ताई देरकर यांनी केले.*

यावेळी गीता ताई उपरे, नंदा गुहे, चंदा मुन, वैशाली देठे, मीनाक्षी मोहिते, पुष्पाताई भोगेकर, सुरेखा आवरी, कलावती क्षिरसागर, भावना मुके,बेबी ताई थेटे, प्रतिभा फाले, गीता तुरणकर, संगीता दोडके,रिंकू महाकुलकर, रुपाली महाकुलकर, साधना तुरणकर , माधुरी फाले राजु तुरणकर, प्रवीण खानझोडे, रवी बोडेकर, गुलाब आवारी, संजय देठे भगवान मोहिते, दिलीप भोयर, विनोद ढुमणे, राजु धवांजेवार, प्रदीप मुके, मंगेश भोस्कर, उमाकांत भोजेकर, नितीन बिहारी, स्वप्नील बिहारी महादेव दोडके, संदिप फाले, गजनान पिंपलकर, अरविंद क्षीरसागर, राजेश महाकुलकर, दिलीप नांदे, भास्कर पत्रकार , नरेंद्र क्षीरसागर, राजेश क्षीरसागर, गणेश दूरकर सुमित तुरानकर, संजय तुराणकर, संदीप फाले पुरुषोत्तम थाटे, सुनील चिंचोळकर, पवन महाकुलकर, सतीश दोडके, दिवाकर नागपूरे, सचिन क्षिरसागर , विनोद महाकुलकर, मंगल भोंगळे,राजु बोबडे, विजय गुडदे, गजेंद्र थेटे, संजय चिंचोलकर, गणेश दोडके उपस्तीत होते.

स्मारक स्थळी वृक्षारोपण..

आज श्री संत गाडगेबाबा स्मारक निळापूर रोड येथे संत गाडगेबाबांच्या मंदिर परिसरात वृक्षारोपण करून बाबांच्या मूर्तीला पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या अपमान प्रकरणी आमदार संजय देरकर मैदानात

0

News Today

वणी :- केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी भर संसदेत भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याप्रती अपमान जनक टिपणी केल्याने संपूर्ण देशात रोष पसरला आहे. नागपूर येथे चालू असलेल्या विधिमंडळात देखील याचे लोन पोहचले असून विरोधी पक्षाकडून आज ता. १९ रोजी सकाळी ११ वाजता विधान भावनांच्या पायरीवर जोरदार निदर्शने करण्यात आली आहे. यात वणी विधानसभेचे आमदार संजय देरकर हे देखील डॉ. आंबेडकरांच्या सन्मानासाठी मैदानात उतरले आहे.

नागपूर येथे हिवाळी अधिवेशन चालू आसून अधिवेशनाचा आजचा चौथा दिवस आहे. दररोज विविध आंदोलने विरोधी पक्षाकडून गेल्या जात आहे. त्यामुळे सत्ताधाऱ्यांची चांगलीच कोंडी होताना दिसून येत आहे.

भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार तथा तमाम भारतीयांच्या उधारकर्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर आहेत हे आता देशाला सांगायची गरज उरली नाही. परंतु सातत्याने भाजप व मनुवादी व्यवस्थेकडून भारतीय राज्य घटना व राज्य घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा अनादर केल्या जात आहे. ज्यांच्या रजयघटनेने दिलेल्या अधिकाराने देशाची सूत्र सांभाळली जात आहे. तेच लोक आज डॉ. आंबेडकरांचा अवमान करीत आहे. अश्या लोकांना सत्तेत बसायचा कोणताही नैतिक  अधिकार नाही असे मत वणी विधानसभेचे आमदार संजय देरकर यांनी यावेळी व्यक्त केले. या आंदोलनात आमदार संजय देराकर हे निळी टोपी लावून सहभागी झाल्याने आंबेडकरवादी जनतेनी आमदार  संजय देरकर यांची दखल घेतली आहे. 

रेमंड युको डेनिम प्रा. ली. यवतमाळ व निस्वार्थ सेवा फाऊंडेशन यांचे संयुक्त विद्यमाने भव्य रक्तदान शिबिर संपन्न

0

News Today

यवतमाळ:- येथील  रेमंड युको डेनिम प्रा.ली. व निस्वार्थ फाउंडेशन यांचे संयुक्तरित्या लोहरा येथील एम.आय. डी.सी. येथे भव्य रक्तदान शिबिर ता. १८ रोजी आयोजित करण्यात आले होते.

शासकीय रक्तपेढी मध्ये मागील अनेक दिवसापसून रक्ताचा तुटवडा निर्माण झाला होता. त्यामुळे रुग्णालयात भर्ती असणाऱ्या रुग्णांना रक्त मिळणे खूप कठीण झाले होते. थालेसेमिया, सिकलसेल, प्रसुती तसेच अपघातग्रस्त अशा अनेक रूग्णांना रक्ता अभावी उपचार घेणे अवघड झाले होते.

निःस्वार्थ सेवा फाऊंडेशन यवतमाळ या रुग्णांना रक्त मिळावे यासाठी सातत्याने प्रयत्नशील असतात. निस्वार्थ सेवा फाऊंडेशन यांनी रेमंड युको डेनिम प्रा. ली. या कंपनीच्या अधिकाऱ्यांना रक्तदान शिबिराचे आयोजन करणे करीता आवाहन केलं असता, त्यांनी लगेचच रक्तदान शिबिराचे आयोजन करणे करीता परवानगी दिली त्याला रेमंड मधील अधिकारी व कामगारांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला, सदर शिबिरामध्ये रक्तदात्यानी मोठ्या संख्येने उपस्थित राहून 86 रक्त दात्यांनी रक्तदान केले.

सदर शिबिराचे उद्घाटन श्री. नितीन श्रीवास्तव सर, श्री. संतोष चांडक सर यांचे हस्ते करण्यात आले. तर शिबिर यशस्वीरीत्या पार पाडणे करीता रेमंड युको डेनिम प्रा.ली कंपनी तर्फे श्री. नितीन श्रीवास्तव सर, श्री पातुरकर सर, श्री. संतोष चांडक सर, जयविर राठोड, मयूर काळे, निलेश कळसकर, अझर खान, श्यान इंगळे, निलेश कोरे आणि अनेक अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मेहनत घेतली. तसेच निस्वार्थ सेवा फाऊंडेशन तर्फे अनिकेत नवरे, परशुराम कडू, निलेश जगताप, आस्तेश गावंडे, यांनी परिश्रम घेतले. शासकीय रक्तपेढीच्या  अधिकाऱ्यांनी आणि कर्मचाऱ्यांनी मोठ्या उत्साहाने  व जबाबदारीने शिबिर यशस्वीरीत्या पार पाडणे करीता सहकार्य केले. त्यामुळें शासकीय रक्तपेढीत रक्त तुटवडा काहीसा भरून निघण्यास मदत झाली.

 


या महा रक्तदान शिबिरामध्ये सहभागी रक्तंदात्यांना प्रोत्साहन पर भेट देणे करीता *स्व. श्रीमती रक्षा विजय कुमार बुंदेला यांच्या स्मृती प्रित्यर्थ विजय कुमार बुंदेला* यांचे कडून टिफीन बॉक्स देण्यात आले. शासकीय रक्तपेढी तर्फे डॉ.विकास भरकाडे, समाजसेवा अधीक्षक आशिष दहापुते सर, आशिष खडसे सर, मोहन तडवेकर, अतुल राऊत, अनिकेत राठोड, अनिकेत चव्हाण, अंजली जाधव , पल्लवी राठोड, स्नेहल शिवनकर, दीक्षा राऊत या सर्व चमूने सहकार्य केले.

विधिमंडळाच्या पहिल्याच भाषणात आ. संजय देरकर यांनी जिंकली वणी विधानसभेतील मतदारांची मने, बघा व्हिडिओ

0

जलजिवन योजना, शिंदोल्यातील देवस्थानाच्या जमिनी, व सीसीआय कापूस खरेदीबाबत प्रश्न 

News Today (दिलीप भोयर)

वणी :-  येथील विधानसभेचे लोकप्रिय आमदार संजय देरकर यांनी नागपूर येथे चालू आलेल्या हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या भाषणात मतदार संघातील जनतेच्या जिव्हाळ्याचे प्रलंबित असलेल्या प्रश्नांना सरकार दरबारी मांडून वाचा फोडल्याने आमदार देरकर यांनी तमाम मतदारांची मने जिंकल्याने सर्वत्र त्यांनी मांडलेल्या प्रश्नांची चर्चा होताना दिसून येत आहे.

नुकतीच राज्यातील विधानसभेच्या निवडणुका संपन्न झाल्या असून जेमतेम सरकार स्थापन होऊन पहिलेच अधिवेशन नागपूर येथे संपन्न होत आहे. या पहिल्या अधिवेशनात आज तारीख १८ रोजी राज्याचे महामहीम राज्यपाल यांच्या अभि भाषणावर वणी विधानसभेचे आमदार संजय देरकर यांना बोलण्याची संधी मिळाली असता त्यांनी वणी , मारेगाव ल, झरि तालुक्यातील जलजिवण योजनेअंतर्गत अत्यंत संथ गतीने चालू असलेल्या कामाबाबत कामांना गती देण्यासाठी सरकारने निधी देवून २४१ गावातील पाणी टंचाईचा प्रश्न मार्गी लावण्यात यावा,

तसेच वणी तालुक्यातील शिंदोला परिसरातील देवस्थानाची जमीन शेतकरी कसत असून ७/१२ वर त्या शेतकर्यांनी नावे नाही त्यामुळे त्यांनी पिकविलेला कापूस सीसीआय खरेदी करून घेत नाही. त्यांचा कापूस सीसीआयने खरेदी करण्यासाठी तहसीलदार यांचे पत्र असूनही खरेदी केल्या जात नसल्याने सरकारने त्यांना कापूस खरेदीचे आदेश द्यावे व सीसीआय खरेदीचे केंद्र वाढविण्यात यावे,

तसेच शिरपूर – कोरपणा मार्ग हा पुर्णतः खड्डेमय झाला आहे. तो मार्ग अवघ्या दोन वर्षात उद्ध्वस्त झाला आहे तो तत्काळ दुरुस्त करण्याची मागणी आमदार देरकर यांनी  केल्याने हे तिन्ही प्रश्न अत्यंत जनतेच्या जिव्हाळ्याचे असून आजपर्यंत वणीच्या इतिहासातील कोणत्याही आमदाराने सरकार दरबारी मांडले नाही. 

उघडा लिंक बघा आमदार संजय देरकर यांचा व्हिडिओ

https://www.facebook.com/share/v/18oMVsfdeg/

आमदार संजय देरकर यांनी आज विधिमंडळाच्या पायरीवर पराटीचे झाड नेवून शेतकऱ्यांच्या कापसाच्या भावाकडे सरकारचे लक्ष वेधले व पहिल्याच भाषणात जोरदारपणे अत्यंत प्रलंबित असलेले प्रश्न मांडून सरकारच्या निदर्शनात आणून दिले. त्यामुळे आमदार देरकर यांनी वणी विधानसभेच्या प्रत्येक मतदारांच्या मनात एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. त्यामुळे आज त्यांनी केलेल्या अप्रतिम कामगीरीची सर्वत्र चर्चा रंगली आहे.

 

विधिमंडळात गाजले कपासीचे झाड, आ. संजय देरकर यांनी कपासीचे झाड घेवून मागितला शेतकऱ्यांना न्याय,

0

 

शेतमालाच्या हमीभावासाठी कपासीचे झाड पोहचले विधिमंडळात

आ. संजय देरकर यांनी कपासीचे झाड घेवून मागितला शेतकऱ्यांना न्याय

News Today
वणी :- नागपूर येथे राज्याचे हिवाळी अधिवेशन चालू असून विरोधकांकडून सरकारला विविध प्रश्नावर घेतल्या जात आहे. आज तारीख १८ अधिवेशनाचा तिसरा दिवस असून सभागृहाच्या पायरीवर महाविकास आघाडीकडून शेतकऱ्यांच्या शेत मालाला हमीभाव अधिक ५०% नफा घोशित करण्यात यावा या करिता आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात वणी विधानसभेचे लोकप्रिय आमदार संजय देरकर यांनी चक्क शेतातील कपासीचे झाड घेवून शेतकऱ्यांना न्याय मागितल्याने सर्वत्र शेतकऱ्यांमध्ये आ. देरकरांच्या भूमिकेचे कौतुक केल्या जात आहे.

मागील दहा वर्षात केंद्रात व राज्यात डबल इंजनची सत्ता असून शेतकऱ्यांना हमी भाव अधिक ५०% नफा देवू म्हणून आश्वासन देणाऱ्या भाजपने शेतकऱ्यांना देशोधडीला लावले आहे. शेतकर्यांनी ना कर्ज माफी केल्या जात आहे. ना त्यांच्या शेतमालाला योग्य भाव दिल्या जात आहे. शेतकऱ्यांचा लागत खर्च देखील निघत नसल्याने मुद्दलमध्ये तोटा निर्माण होत आहे. असे असताना शेतकऱ्यांच्या कष्टाचे मूल्य सरकार ठरवू शकत नाही आहे. हे सरकार शेतकरी विरोधी धोरण आखून शेती हा व्यवसाय नष्ट करू पाहत आहे. परंतु हे सरकारचे मनसुबे पूर्ण होणार नाही. असा सूर विरोधी पक्षाकडून निघत आहे.

आज हिवाळी अधिवेशनाचा तिसरा दिवस या निमित्ताने महाविकास आघाडीचे सर्व पक्षांची गटनेते विद्यमान आमदार यांनी विधानभवनाच्या पायरीवर शेतकऱ्याच्या शेतमालाला हमीभाव मिळालाच पाहिजे, कर्ज माफी झालीचं पाहिजेत, शेतकऱ्याना शेती पंपासाठी पूर्णवेळ विज मिळालीच पाहिजेत, यासाठी लाक्षणिक आंदोलन केले त्यानिमित्ताने विधानसभेतील सर्व महाविकास आघाडीचे आमदार व नेते मंडळी उपस्थित होते. वणी विधानसभेतील आमदार संजय देरकर हे सुद्धा या आंदोलनात सहभागी होते त्यांनी कपासीचे बोंडे भरलेले झाडच विधी मंडळात पोहचविण्याचे शेतकऱ्यांसाठी झटणारा एकमेव आमदार म्हणून त्यांचे वणी विधानसभा क्षेत्रातील शेतकऱ्यांमध्ये चर्चा होत आहे.

शासकीय कंत्राटदारांसोबत कॅबिनेट मंत्री प्रा. उईके यांच्या भेटीने मामाच्या उलट सुलट चर्चेला ऊत 

0

News Today 

वणी :- राळेगाव विधानसभा मतदार संघाचे आमदार डॉ. प्रा. अशोक उईकें यांनी कॅबिनेटमंत्री पदाची शपथ घेताच शासकीय जिल्हा कंत्राटदार संघटनेने एका माजी आमदाराला घेवून भेट घेतल्याने मामाच्या उलट सुलट चर्चेला ऊत आला आहे. 

वणी विधानसभेतील बहुतांश रस्ते हे नित्कृष्ट दर्जाचे व बोगस पद्धतीने बनविल्याने कोणत्याही कंत्राटदारांची चौकशी होऊ नये या करिता एका माजी आमदाराने सर्व कंत्राटदाराला घेवून नामदार उईके यांची भेट घेतल्याचे बोलल्या जात आहे.

सदरच्या माजी आमदाराने विधानसभा क्षेत्रात केवळ आणि केवळ कामे मंजूर करून घेतली व त्या कामाची सुरवात देखील झाली परंतु आता कंत्राटदार हे आर्थिक दबगाईस आल्याने ही भेट सावरा सावर तर नाही ना अश्या चर्चांना ऊत आला आहे. या भेटीत वणी विधानसभा क्षेत्रातील निवडक कंत्राटदार दिसून येत आहे.