News Today
वणी :- केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी भर संसदेत भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याप्रती अपमान जनक टिपणी केल्याने संपूर्ण देशात रोष पसरला आहे. नागपूर येथे चालू असलेल्या विधिमंडळात देखील याचे लोन पोहचले असून विरोधी पक्षाकडून आज ता. १९ रोजी सकाळी ११ वाजता विधान भावनांच्या पायरीवर जोरदार निदर्शने करण्यात आली आहे. यात वणी विधानसभेचे आमदार संजय देरकर हे देखील डॉ. आंबेडकरांच्या सन्मानासाठी मैदानात उतरले आहे.
नागपूर येथे हिवाळी अधिवेशन चालू आसून अधिवेशनाचा आजचा चौथा दिवस आहे. दररोज विविध आंदोलने विरोधी पक्षाकडून गेल्या जात आहे. त्यामुळे सत्ताधाऱ्यांची चांगलीच कोंडी होताना दिसून येत आहे.
भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार तथा तमाम भारतीयांच्या उधारकर्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर आहेत हे आता देशाला सांगायची गरज उरली नाही. परंतु सातत्याने भाजप व मनुवादी व्यवस्थेकडून भारतीय राज्य घटना व राज्य घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा अनादर केल्या जात आहे. ज्यांच्या रजयघटनेने दिलेल्या अधिकाराने देशाची सूत्र सांभाळली जात आहे. तेच लोक आज डॉ. आंबेडकरांचा अवमान करीत आहे. अश्या लोकांना सत्तेत बसायचा कोणताही नैतिक अधिकार नाही असे मत वणी विधानसभेचे आमदार संजय देरकर यांनी यावेळी व्यक्त केले. या आंदोलनात आमदार संजय देराकर हे निळी टोपी लावून सहभागी झाल्याने आंबेडकरवादी जनतेनी आमदार संजय देरकर यांची दखल घेतली आहे.