Saturday, May 2, 2026
Google search engine
Home Blog Page 34

आमदार संजय देरकरांच्या जनता दरबाराने फोडल्या जनतेच्या समस्यांना वाचा, लवकरच सुरू होईल कारवाईची प्रक्रिया

0

News Today

वणी :- येथून जवळच असलेल्या झरी तालुक्यातील मुकुटबन येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सभागृहात काल ता. ३१ डिसेंबर रोजी दुपारी १ वाजता संपन्न झालेल्या वणी विधानसभेचे आमदार संजय देरकर यांच्या जनता दरबारात विभागातील कोळसा,सिमेंट कंपन्यांमुळे निर्माण झालेल्या तमाम समस्येला जनतेनी वाचा फुडली आहे. यावर तात्काळ कारवाई करण्यात येईल असे आश्वासन आमदार संजय देरकर यांनी जनतेला दिले आहे.

झरी जामनी तालुक्यातील मुकुटबन परिसरातील आरसीसीपीएल (RCCPL) व डोलोमाईट आणि लाईम स्टोन कंपनीच्या कार्यक्षमतेमुळे स्थानिक शेतकऱ्यांमध्ये अनेक अडी अडचणी निर्माण झाल्या आहेत. यावर उपाय शोधण्यासाठी नुकतेच आमदार संजय देरकर यांच्या नेतृत्वाखाली एक जनता दरबार आयोजित करण्यात आला, ज्यात शेतकऱ्यांनी आपली समस्यांमधून आपले दु:ख व्यक्त केले. या दरबारात आरसीसीपीएल कंपनीच्या ब्लास्टिंगमुळे पिंप्रड वाडी गावातील लोकांना मोठे नुकसान होत असल्याचा मुद्दा उपस्थित केला गेला.

जनता दरबारामध्ये शेतकऱ्यांनी सांगितले की, सदर कंपनीने पिंप्रड वाडी या गावाला दत्तक घेतले असतानाही, गावाच्या विकासासाठी कंपनीने एकही CSR (Corporate Social Responsibility) फंड दिला नाही. यामुळे स्थानिक नागरिकांना मदतीची अत्यंत आवश्यकता आहे. पाऊस, सांडपाणी, आणि प्रदूषणामुळे अनेक शेतकऱ्यांची शेती आणि पाणी पुरवठ्याला हानी पोहोचली आहे.

आरसीसीपीएल कंपनीच्या कार्यामुळे मोठ्या प्रमाणावर धुळीचे प्रदूषण वाढले असून यामुळे जनावरांच्या चराईचा प्रश्न ऐरणीवर आहे. भूजल पातळी घटत चालली असून पिकांचे नुकसान आणि शेतकऱ्यांच्या शेतीला खूप मोठा धोका निर्माण झाला आहे. तरीही, कंपनीकडून या समस्यांच्या निराकरणासाठी कोणताही ठोस पाऊल उचलले गेलेले नाही. यावर्षी या समस्यांना तोंड देणाऱ्यांना कंपनीने एकही मदत केली नाही. पिण्याच्या पाणीप्रश्नाबाबत सुद्धा कंपनीने कोणतीही कार्यवाही केली नाही अशी ओरड जनता करीत होते.

मागील १० वर्षात पहिल्यांदाच जनतेच्या समस्येवर आमदार संजय देरकर यांनी जनता दरबार आयोजित केल्याने कंपनीग्रस्त शेतकऱ्यांनी व नागरिकांनी उपस्थित महिला व तरुणांनी मनमोकळे पणाने आपल्या समस्या मांडल्याने आमदार संजय दरेकर यांच्या या उपक्रमाचे अनेकांनी कौतुक देखील केले होते.

जनता दरबारात आमदार संजय देरकर यांना मिळालेल्या सर्व तक्रारीची प्रामुख्याने दाखल घेवून आगामी काळात या समस्यांवर कार्यवाही केली जाईल आणि शेतकऱ्यांच्या हक्कांचा संरक्षण करण्यासाठी संबंधित कंपन्यांना ठोस पावले उचलण्यास प्रवृत्त केले जाईल. असे आमदार महोदयांनी याच दरम्यान, स्थानिक शेतकऱ्यांच्या हितासाठी सीएसआर फंडचा उपयोग, प्रदूषण नियंत्रण, पाणी व्यवस्थापन, आणि शेतकरी-समूहांच्या सहकार्याने ठोस उपाययोजना करण्यात येईल असे आश्वासन दिले आहे.

यावेळी जिल्हा बँकेचे संचालक राजू येल्टीवार, कृ. ऊ.बा.स.चे सभापती राजू कासावार, झरि न. प. च्या नगराध्यक्षा सौ. ज्योती बिजगुनवार, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख संजय निखाडे, दीपक कोकास्, जिल्हा सहसंपर्क प्रमुख संतोष माहुरे, निलेश येल्टीवार, भूमारेड्डी बाजनलावार,सतीश आदेवार, समीर लेनगुडे, डॉ. जगन जुनगरी, विवेक ठाकरे, संदीप विंचू , भगवान मोहिते, सुधीर थेरे, शरद ठाकरे, राजू तुरणकर, नगरसेविका सौ रजनी नैताम, सौ शीला चौधरी नगरसेवक संतोषमंचलवार, नगरसेविका सौ सुजाता अनमूलवार,सौ सीमा मंडाले, संगीता कनाके आदी उपस्थित होते. यावेळी सूत्रसंचालन व आभार नेताजी पारखी यांनी केले.

उद्या आ. संजय देरकर यांच्या वतीने मुकुटबन येथे जनता दरबारराचे आयोजित – सर्व नागरिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन.

0

News Today

दिलीप भोयर

वणी:-  महाविकास आघाडीचे आ. संजय देरकर यांच्या वतीने मुकुटबन येथे उद्या दिनांक 31 डिसेंबर ला दु 12 वाजता एक महत्वाचा जनता दरबार आयोजित करण्यात आलेला आहे. या दरबारात विशेषत: आरसीसीपीएल रिलायन्स सिमेंट कंपनी प्रायव्हेट लिमिटेड अंतर्गत येणाऱ्या ग्रामपंचायतीच्या नागरिकांना तसेच इतर सर्व समस्यांशी संबंधित नागरिकांना आपली समस्या मांडण्याची सुवर्ण संधी मिळणार आहे.

सद्यस्थितीत मुकुटबन आणि आसपासच्या क्षेत्रातील नागरिकांना विविध समस्यांचा सामना करावा लागतो आहे. यामध्ये आरसीसीपीएल रिलायन्स सिमेंट कंपनीच्या विस्तारामुळे होणारी पर्यावरणीय हानी, नोकरीच्या संधींचा अभाव, स्थानिक रोजगार व सार्वजनिक सुविधा यांची कमतरता, तसेच इतर सामाजिक व शासकीय अडचणी समाविष्ट आहेत. या सर्व समस्यांवर चर्चा करून त्वरित निराकरणाची दिशा ठरवण्यासाठी हा जनता दरबार आयोजित करण्यात आला आहे.

आमदार संजय देरकर हे नेहमीच आपल्या क्षेत्रातील नागरिकांच्या हितासाठी आणि त्यांच्या समस्यांच्या निराकरणासाठी तत्पर असतात. मुकुटबन परिसरातील सर्व सामान्य नागरिकांना, तसेच शेतकरी, मजूर, व्यावसायिक, महिलांसाठी हा जनता दरबार एक महत्त्वाचा ठरावा. त्यामध्ये आमदार संजय देरकर यांचे मार्गदर्शन, तसेच संबंधित शासकीय अधिकारी, ग्रामपंचायत सदस्य, आणि इतर प्रशासनिक यंत्रणांद्वारे समस्यांचे त्वरित समाधान करण्यासाठी ठोस निर्णय घेतले जातील.

दरबाराचे आयोजन हे फक्त लोकशाहीच्या मूल्यांची आठवण करणारं नाही, तर स्थानिक प्रतिनिधींच्या संवेदनशीलतेचेही प्रतीक आहे. आमदार संजय देरकर यांच्या प्रगल्भ नेतृत्वामुळे या दरबारामध्ये नागरिकांच्या समस्यांचा योग्य तो निराकरण होईल, याची नागरिकांना खात्री आहे.

आमदार संजय देरकर यांचे हे प्रयत्न मुकुटबन व इतर भागातील नागरिकांसाठी वरदान ठरतील. त्यांनी सिद्ध केले आहे की, जनता आणि प्रशासनाच्या सुसंवादानेच समृद्ध समाज आणि देशाची निर्मिती शक्य आहे.

एकाच शिवारात चार पट्टेदार वाघांची दहशत, वन विभागाला मनुष्य वधाची प्रतीक्षा, शेतकऱ्यांचा जीव मुठीत, शेती संकटात

0

News Today (दिलीप भोयर)

वणी :- तालुक्यातील शिंदोला परिसरात मागील काही दिवसापासून पट्टेदार चार वाघांचे वास्तव निर्माण झाल्याने शेतकरी व गावकऱ्यांमध्ये मोठी भीती निर्माण झाली असून वन विभाग या वाघांचा बंदोबस्त करण्यासाठी मानवी जीवित हानीची प्रतीक्षा करीत असल्याचा गंभीर आरोप परिसरातील नागरिकांनी केला आहे. आज चिखली येथील शेत शिवारात एका युवकावर वाघाने हल्ला करण्याचा प्रयत्न केला असता युवक किरकोळ जखमी झाला आहे.

शिंदोला शिरावामध्ये अनेक वेकोलीच्या खुल्या कोळशाच्या खदानी व सिमेंट दगडाच्या खदानी असल्याने मातीचे मोठ मोठी आधुनिक डोंगरे उभी झाली असून या मातीवर झाडे झुडपे वाढली आहे. त्याच बरोबर काही प्रमाणात वन विभागाचे जंगल देखील आहे. या जंगलात कधीं न दिसणारे पट्टेदार वाघ दिसून येत आहे.

शिंदोला भागात कुर्ली, कळमना, येनाडी, येनक, चनाखा, पार्डी, टाकली, चिखली, कोलगाव, साखरा असे अन्य गावे आहेत. या भागातील जंगली परिसरात शेळी राखे, गुराखी गावातील जनावरे चारत असतात, त्याच बरोबर या भागातील शेतकऱ्यांच्या शेतजमिनी देखील जंगली भागाला लागून आहे. तसेच अनेक गावातील विद्यार्थी शिक्षण घेण्यासाठी सायकलच्या सहाय्याने जंगली भागातील रस्त्याने शाळेत प्रवास करीत असतात.

या भागात मागील अनेक दिवसांपासून वाघांचे दर्शन दररोज होत असून शेतकर्यांचा जनावरांवर देखील हल्ले वाढले आहे. शेतात अनेक जन शेती कामासाठी असल्याने वाघ दिसताच अरदा ओरड चालू केली की वाघ पळ काढत असतात. परंतु हा प्रकार आणखी किती दिवस चालवायचा असा निर्वाणीचा प्रश्न शेतकऱ्यांमध्ये निर्माण झाला आहे. त्याच बरोबर कोणतीही मानवी जीवित हाणी होण्यागोदर या वाघांचा बंदोबस्त लावला अशी रास्त मागणी या भागातील शेतकरी करीत आहे.

या भागातील जंगल हे वाघांच्या वास्तव्यासाठी उपयुक्त नसून देखील वन विभाग या वाघांना आश्रय देऊन शेतकऱ्यांच्या शेतीवर संकट निर्माण करीत आहे. वाघांच्या भीतीपोटी शेतकऱ्यांना शेतातील कामे करण्यासाठी मजूर मिळेनासे झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा शेती उद्योग संकटात आल्याने त्यांचे उधर निवाहाचे साधन बंद पडण्याच्या मार्गावर आले आहे. त्यामुळे शेती व शेतकरी प्रचंड मोठ्या संकटात येण्याची दाट शक्यता वर्तविण्यात जात आहे.

पट्टेदार वाघ म्हणजे वाघांच्या प्रजातीतील अत्यंत क्रोधित व मानवी जीवितास हाणी पोहचविणारे प्रजाती आहे. असे चार वाघ या परिसरात वास्तव्य निर्माण करीत असल्याची माहिती वनविभागाला असून देखील वनविभागाकडून असे सांगण्यात येत आहे की, जो पर्यंत वाघांकडून मानवी हाणी होणार नाही तोपर्यंत त्यांचेवर कोणताच बंदोबस्त केल्या जाणार नाही असे बेजबाबदार उत्तरे संगल्या जात असल्याचे आरोप शेतकरी करीत आहे. 

या भागातील शेतकऱ्याच्या उधार निरवाहाचे साधन केवळ शेती असून शेतकऱ्यांनी आता आपला व आपल्या कुटुंबातील सदस्यांच्या  जीव गमावावा काय ? मानवी जीवित हाणी झाल्यानंतर वन विभाग जागा होऊन उपयोग काय ? जीवित हाणी होण्याअगोदरच या वाघांचा बंदोबस्त लावण्यात यावा अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याच्चे संकेत शेतकर्यांनी दिले आहे.

 

उत्कृष्ठ गोलंदाज मो. अरमानचा आ. संजय देरकरांकडून सन्मान

0

मो. अरमानची आंतर विद्यापीठ क्रिकेट संघात पुनश्च निवड, 

संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे प्रतिनिधित्व करण्याची संधी

News Today

वणी:- संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे प्रतिनिधित्व करण्यासाठी राजूर येथील मो अरमान मो असलम ची विद्यापीठ क्रिकेटच्या पुरुष संघात पुनश्च गोलंदाज म्हणून निवड करण्यात आली आहे.

वणी तालुक्यातील राजूर कॉलरी येथील बीएच्या प्रथम वर्षाला शिक्षण घेत असलेल्या १९ वर्षीय मो. अरमान मो. असलम या उत्कृष्ट गोलंदाज असलेल्या युवकाला संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे प्रतिनिधित्व करण्याची पुनश्च संधी मिळाली आहे. 

मो. अरमानला लहानपणापासूनच क्रिकेटची आवड असलेल्या अरमानला त्याचे वडील मो असलम यांनी क्रिकेट खेळण्यासाठी नेहमीच पाठबळ दिले आहे. अनेक क्रिकेट सामन्यात अरमानची भेदक गोलंदाजी बघायला मिळाली. यातच त्याचे मनोबल वाढत गेले. परिवाराचे सहकार्य सुद्धा चांगले मिळाले. परिणामी तो गोलंदाजीत उत्कृष्ट ठरला आहे. अरमानच्या निवडीने त्याचेवर सर्वत्र कौतुकाचा वर्षाव होत आहे.

यासाठी खेळाडूंचे प्रशिक्षण शिबिर दि २८ डिसेंबर ते ६ जानेवारी दरम्यान डॉ. पंजाबराव देशमुख मेडिकल कॉलेज, अमरावती येथे घेण्याचे प्रस्तावित आहे. पश्चिम विभागीय आंतरविद्यापीठ स्पर्धा दि.९ ते १५ जानेवारी पर्यंत जय मिनेश आदिवासी युनिव्हर्सिटी कोटा (राजस्थान ) येथिल मैदानावर संपन्न होणार आहे.

या निवडीचे श्रेय त्याने आपले वडील मो. असलम, आई प्रणिता, मामा संघदीप भगत, श्रीमती केशराबाई लाहोटी महाविद्यालयात अमरावती प्राचार्य विजयकुमार भांगडीया, प्रा.गजेंद्र रघुवंशी, प्रा. सतीश मोदानी, एनसीए नागपूरचे मुख्य प्रशिक्षक भाकरे, प्रशिक्षक सोहम पाठकसह चाहत्यांना दिले आहे.

त्कृष्ठ गोलंदाज मो. अरमान यांचे आ. देरकरांकडून सन्मान

आंतर विद्यापीठ क्रिकेट संघात राजूर कॉ. येथील माजी सरपंच सौ. प्रणिता अस्लम मोहम्मद यांचा मुलगा मो. अरमान हा क्रिकेटच्या गोलंदाजीत उत्कृष्ठ खेळाडू असून त्यांची संत गाडगेबाबा विद्यापीठ अमरावती कडून खेळल्या जाणाऱ्या संघात गोलंदाज म्हणून निवड करण्यात आली आहे. ही निवड वणी विधानसभेतील खेळाडूसाठी अत्यंत प्रेरणादायी आल्याने वणीचे आमदार संजय देरकर यांनी या निवडीची दखल घेवून मो. अरमान यांची आज भेट घेवून पुष्पगुच्छ देवून सन्मान करण्यात आला व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. 

रंगनाथ स्वामी देवस्थानात आ. संजय देरकर यांना सत्कार

0

News Today 

वणी :- येथील रंगनाथ स्वामी देवस्थान कमिटी व महाराष्ट्र राज्य सैनिक सेवा समितीच्या वतीने आज तारीख २८ रोजी दुपारी १२ वाजता वणी विधानसभेचे नवनिर्वाचित आमदार संजय देरकर यांचा सत्कार समारंभ आयोजित करून सन्मान करण्यात आला.यावेळी त्यांच्या अर्धंगिनी सौ. किरण देरकर उपस्थित होत्या.

नुकत्याच संपन्न झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत भरघोस मतांनी महाविकास आघाडीचे उमेदवार संजय देरकर यांना विजय मिळाला तेव्हापासून त्यांचा सत्कार व सन्मान समारंभात वाढले असून त्यांच्या लोकप्रियतेत देखील मोठी वाढ झाली आहे. रंगनाथ स्वामी देवस्थानात देखील त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी इंदिरा सुत गिरणीचे अध्यक्ष सुनील कातकडे देवस्थान कमितीचे अध्यक्ष विशाल ठोंबरे, माजी सैनिक समितीचे सचिव कॅप्टन महादेव गाताडे, विलास पारखी, सुरेश बोबडे आदी मान्यवर उपस्थित होते. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी समितीचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.

चंद्रपूर येथील कृषी महोत्सव व उपवर – वधू परिचय मेळाव्यात आ. संजय देरकर यांचा भव्य सत्कार

0

धनोजे कुणबी समाज मध्यवर्ती समितीचे आयोजन, शेतकऱ्यांचा मोठा प्रतिसाद

News Today (दिलीप भोयर)

वणी :- येथील विधान सभेचे नवनिर्वाचित आमदार संजय देरकर यांचा काल तारीख २७ रोजी दुपारी २ वाजता चंद्रपूर येथील चांदा ग्राऊंडवर आयोजित भव्य कृषी महोत्सव व उपवर – वधू परिचय मेळाव्यात धणोजे कुणबी समाज मध्यवर्ती समिती पुरस्कृत धनोजे कुणबी समाज मंदिर लक्ष्मीनगर चंद्रपूरचे अध्यक्ष ऍड. पुरुषोत्तम सातपुते व कृषी महोत्सव प्रमुख श्रीधर मालेकर यांच्या हस्ते मानचिन्ह, शाल, श्रीफळ भव्य सत्कार करण्यात आला. यावेळी खा. प्रतिभाताई धानोरकर आ. देवराव भोंगळे माजी जि. प. सदस्य नरेंद्र जीवतोड आदी मान्यवर उपस्थित होते.

चंद्रपूर येथे तीन दिवसीय भव्य कृषी महोत्सव व प्रदर्शनाचे आयोजन तारीख २७ ते २९ पर्यंत करण्यात आले आहे. यात शेतकरी मेळावा, उपवर – वधु परिचय मेळावा, शेती विषयक तज्ञांचे मार्गदर्शन, सरपंच परिषद, उधोजकता मार्गदर्शन, ज्येष्ठांचा सत्कार, सांस्कृतिक मार्गदर्शन व मोफत आरोग्य तपासणी शिबिर आदी कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे.

या कार्यक्रमाच्या पहिल्या दिवशीच्या पहिल्या सत्रात नुकत्याच संपन्न झालेल्या निवडणुकीतील नवनिर्वाचित आमदार यांचा सत्कार करण्यात आला. यात ब्रह्मपुरीचे आमदार विजय वडेट्टीवार, वणीचे आमदार संजय देरकर, राजुराचे आमदार देवराव भोंगळे यांचा समावेश होता. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून धणोजे कुणबी समाज मंदिराचे अध्यक्ष ऍड. पुरुषोत्तम सातपुते, उद्घाटक म्हणून खा. प्रतिभाताई धानोरकर, स्वागताध्यक्ष म्हणून मेळावा प्रमुख तथा चंद्रपूर जि. प. चे माजी सी.ओ. श्रीधर मालेकर, आदी मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमाला शेतकर्यांनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला होता.

नवरगाव येथे कबड्डीच्या खुल्या सामान्यांचे आ. संजय देरकरांच्या हस्ते थाटात उद्घाटन

0

News Today 

वणी :- तालुक्यातील नवरगाव (उमरी) येथील आयोजित कबड्डीच्या खुल्या सामान्यांचे उद्धाटन काल तारीख २६ रोजी रात्री ८ वाजता जिल्हा परिषद शाळेच्या प्रांगणात वणी विधानसभेचे आमदार संजय देरकर यांच्या हस्ते मोठ्या थाटात उद्घाटन संपन्न झाले.

नवरगाव नवयुवक क्रीडा मंडळ यांच्या वतीने ४ दिवसीय खुल्या कबड्डीचे सामने आयोजीत करण्यात आले आहे. ग्रामीण भागात कबड्डी या खेळाला प्रचंड मोठी पसंदीचा खेळ म्हणून ओळखल्या जाते त्यामुळे हा खेळ बघण्यासाठी मोठी गर्दी निर्माण होत असते. त्यामुळे गावकऱ्यांच्या मनोरंजनासाठी या खेळाचे आयोजन करण्यात आले होते. 

यावेळी उद्घाटक वणी विधानसभेचे आमदार संजय देरकर तर अध्यक्ष म्हणून वणी वसंत जिनिंगचे अध्यक्ष आशिष खुलसंगे, तर प्रमुख अतिथी म्हणून श्रीगुरुदेव सेनेचे अध्यक्ष दिलीप भोयर, कृ.ऊ.बा.स.चे माजी सभापती संतोष कुचनकर, विवेक पानघाटे, गणपत लेडांगे, भगवान मोहिते, विवेक ठाकरे, उपसरपंच, पोलिस पाटील, तंटामुक्ती अध्यक्ष तथा विविध मान्यवर उपस्थित होते. 

यावेळी संपूर्ण गावकऱ्यांनी आमदार संजय देरकर यांचे गावकऱ्यांनी मोठ्या उत्साहात स्वागत केले. तसेच गावातील वंदनीय राष्ट्रांत तुकडोजी महाराज व कर्मयोगी संत गाडगेबाबा यांचा प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी संपूर्ण गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

वीज पडून मृत महिलेच्या कुटुंबाला तत्काळ  मदत करण्याचे तहसील प्रशासनाला आ. संजय देरकरांचे आदेश 

0

News Today 

वणी :- विधानसभा क्षेत्रातील मारेगाव तालुक्यातील मौजा केगावं येथे आज तारीख २७ रोजी सायंकाळी ५.३० वाजताच्या सुमारास वीज पडून मृत पावलेल्या श्रीमती मेघा गणपत पानघाटे वय ५५ या महीलेल्या कुटुंबाची वणी विधानसभेचे आमदार संजय देरकर यांनी भेट घेतली असता या नैसर्गिक आपत्तीत सापडलेल्या पीडित कुटुंबाला तात्काळ शासकीय मदत प्रधान करण्याचे आदेश आमदार संजय देरकर यांनी तहसील प्रशासनाला देण्यात आले आहे.

अचानक निसर्गात बदल होत ढगाळी वातावरण तयार झाले आणि विजेचा कडकडाटासह पाऊस सुरु झाला अशातच शेतकरी महिला शिवारातून घरी परत येत असतांना वीज पडली व यात मेघा पानघाटे या जागीच ठार झाल्याची दुर्दैवी घटना घडली. या घटनेतील मृतक महिलेचे शव मारेगाव ग्रामीण रुग्णालयात उत्तरीय चाचणीसाठी आणण्यात आल्याची माहिती आमदार संजय देरकर यांना मिळताच त्यांनी सरळ मारेगाव गाठले व रुग्णालयात जावून आपत्ती पीडित कुटुंबाची सात्वनपर भेट घेतली व त्यांना धीर दिला. 

यावेळी उपस्थित मारेगावचे तहसीलदार निलावार यांना या कुटुंबाला तात्काळ शासकीय निधीची मदत देण्याचे आदेश आमदार संजय देरकर यांनी दिले आहे. मृत मेघा पानघाटे हिच्या पश्चात पती, एक मुलगा व एक मुलगी आहे असा आप्त परिवार असून या घटनेने संपूर्ण गावात शोककळा पसरली आहे.

चनाखा येथील कुटुंबातील कर्त्या शेतकरी पुत्राची विष प्राशन आत्महत्या 

0

News Today 

वणी :- तालुक्यातील चनाखा येथील कुटुंबातील कर्त्या शेतकरी पुत्राची शेतात विष प्राशन करून तारीख २३ रोजी सकाळी ९ वाजता आपली जीवन यात्रा संपविल्याची दुःखद घटना घडली आहे. अतुल मारोती डाखरे वय ३२ असे या आत्महत्याग्रस्त यवकाचे नाव आहे.

त्यांचे प्रच्छात पत्नी, एक मुलगी, वृद्ध आई वडील असा अप्त परिवार आहे. मृतक हा शेती करून आपल्या कुटुंबाचा गाडा चालवीत होता. मागील तीन वर्षांपासून शेतमाला भाव मिळत नसल्याने शेती करणे त्याला अवघड झाले होते. त्यामुळे कुटुंब चालवायचे तरी कसे असा प्रश्न त्याला पडू लागले होते. याच विवंचनेत त्याने शेतात विष प्राषन केले व आपली आत्महत्या केली. या घटनेने शेतकऱ्यांचे जीवन जगणे अत्यंत कठीण झाले असून सरकारने शेतमालाच्या भावाकडे लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे. अन्यथा येणाऱ्या काळात मोठ्या आत्महत्या वाढतील अशी स्थिती निर्माण होत असल्याची चर्चा शेतकऱ्यांमध्ये दिसून येत आहे.

 

वणी येथे बळीराजा व्याख्यानमाला २०२४ चे आयोजन -प्रा.रंगनाथ पठारे यांचे व्याख्यान

0

News Today 
वणी :- शिव महोत्सव समिती वणी द्वारा आयोजित बळीराजा व्याख्यानमालेचे हे १० वे वर्ष.२०१५ पासुन प्रारंभ झालेल्या या व्याख्यानमालेला सुरुवातीपासूनच श्रोत्यांचा प्रचंड प्रमाणावर प्रतिसाद मिळत आहे. ही व्याख्यानमाला बौद्धिक मेजवानीत रस घेणाऱ्या सुजाण श्रोत्यांच्या सहकार्यातून आयोजित करण्यात येते.


यावर्षी ही व्याख्यानमाला २८ व २९ डिसेंबर २०२४ रोज शनिवार व रविवार ला बाजोरिया लॉन येथे पार पडेल.सायंकाळी ६ वाजता प्रारंभ होणाऱ्या या दोन दिवसीय व्याख्यानमालेला प्रख्यात साहीत्यिक प्रा.रंगनाथ पठारे संबोधित करतील.पहिल्या दिवशीचे स्मृतीपुष्प रामचंद्र जागोजी सपाट यांना समर्पित असुन “सामाजिक वास्तव: काल आज आणि उद्या” या विषयावर विचारमंथन होईल.तर नारायणराव सांबशिव देवडे यांना दुसरे दुसऱ्या दिवशीचे स्मृतीपुष्प समर्पित असुन “साहित्य कशासाठी?” या विषयांवर पठारे संबोधन करतील.

दोन दिवसीय व्याख्यानमाला आयोजन समितीचे अध्यक्ष शहाबुद्दीन अजाणी यांच्या अध्यक्षतेखाली होणार असुन प्रशासकीय आणि विविध क्षेत्रातील मान्यवर पाहुणे म्हणून उपस्थित असतील.दरवर्षी प्रमाणेच श्रोत्यांनी याही वर्षी उपस्थित राहून या व्याख्यानमालेचा बौद्धीक आस्वाद घ्यावा.असे आवाहन शिव महोत्सव समिती वणीच्या वतीने उपाध्यक्ष प्रा.डॉ.करमसिंग राजपुत,निमंत्रक कृष्णदेव विधाते यांनी वणीकरांना केले आहे.