Thursday, July 30, 2026
Google search engine
Home Blog Page 33

अखिल कुणबी महासंघाच्या जिल्हाध्यक्षपदी राजेश पहापडे

0

News Today

वणी :- येथील कुणबी समाजाचे होतकरू कार्यकर्ते राजेश पहापडे यांची अखिल कुणबी महासंघाच्या यवतमाळ जिल्हाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. या निवडीचे नियुक्ती पत्र संघटनेचे संस्थापक अध्यक्ष डी. के. आरिकर यांनी दिले आहे.

राजेश पाहापडे हे वणी येथील रहिवासी असून धनोजे कुणबी समाज संस्थेचे माजी अध्यक्ष असून त्यांनी कुणबी समाजाबद्दल अनेक सामाजिक उपक्रम राबविले आहे. त्यांच्या सामाजिक कार्याची दखल घेवून त्यांना यवतमाळ जिल्ह्याची जबाबदारी देण्यात आली आहे. त्यांच्या निवडीने राजेश पहापडे यांचे श्री गुरुदेव सेनेचे संस्थापक अध्यक्ष दिलीप भोयर यांनी स्वागत केले असून सर्वत्र त्यांचेवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

नवीन ठाणेदारासमोर खाकीतील खादाड वृत्तीवर अंकुश मिळविण्याचे आवाहन  

0

वाळूची माफियागीरी पोलिसांवरच होत आहे भारी, 

पोलिस पोलिसिंग करण्याऐवजी करतायेत वाळू तस्करी

News Today 

दिलीप भोयर

वणी :- येथील पोलिस स्टेशनचे नुकतेच अनिल बेहराणी हे ठाणेदार बदलून जाताच नव्याने रुजू झालेले पोलिस निरीक्षक गोपाल उंबरकर यांच्या समोर खाकीतीलाच खादाड वृत्तीवर अंकुश मिळविण्याचे मोठे आवाहन उभे आहे ते यावर कसे नियंत्रण मिलावतील याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे. 

सत्तेतील मित्र पक्षाचे शिवसेना (शिंदे गटाचे) शहराध्यक्ष स्व. ललित लांजेवार यांच्या मृत्यू नंतर पोलिसांतील खादाड वृत्तीने ग्रासलेले दस्तुर खुद्द पोलिसच वाळू तस्करी करीत असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. 

पोलीसातीलाच काही खादाड प्रवृत्तीने कार्यरत असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या गैरकायदेशिर कृतीने पोलिसांची पोलिसिंग बदनाम होताना दिसून येत आहे. पोलिसांनी आपले कर्तव्य विसरून वाळूच्या चोऱ्या चहाद्या करणे सुरू केल्याचे आरोप होत असल्याने पोलिसांची प्रचंड बदनामी होत आहे. होणारी बदनामी थांबविण्यासाठी वरिष्ठ पोलिस अधिकारी व नव्याने रुजू झालेले पोलिस निरीक्षक गोपाल उंबरकर यांनी सक्त पाऊले उचलण्याची गरज निर्माण झाली आहे.

वरिष्ठांच्या आदेशानुसार चौकशी केल्या जाईल – पो. नि. उंबरकर

ललित लांजेवार यांचा हृदय विकाराने मृत्यू झाला असला तरी तो झटका पोलिस जमादार विकास धडसे यांनी त्यांना खोटी अट्रोसिटी कायद्यात अडकविण्याची धमकी दिल्यानेच आला असल्याचा खळबळजनक आरोप ललित लांजेवार यांच्या पत्नी श्रीरंगी लांजेवार यांनी दिलेल्या निवेदनात करून योग्य कारवाईची मागणी केली आहे. याबाबत पोलीस निरीक्षक गोपाल उंबरकर यांना विचारणा केली असता वरिष्ठांच्या आदेशाने उचित कारवाई करण्यात येईल अशी माहिती दिली आहे. 

वणीत धनोजे कुणबी समाज संस्थेच्या वतीने जगतगुरु तुकाराम महाराज जयंती साजरी 

0

News Today 

वणी :- येथील धनोजे कुणबी समाज संस्थेच्या वतीने ता. २ फेब्रुवारी रोजी धनोजे कुणबी समाज सांस्कृतीक भवन मध्ये संतश्रेष्ठ तुकाराम महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली.

यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष मंगेश रासेकर हे होते तर संस्थेचे सहसचिव अंबादास वागदरकर यांनी संत तुकाराम महाराज यांच्या जीवन कार्यावर मार्गदर्शन केले, यावेळी जयप्रकाश राजूरकर , सुधाकर गारघाटे , प्रभाकर गौरकार , नारायण ढवस , किशोर मिलमिले , व्यवस्थापक कवडु नागपूरे उपस्तीथ होते. सूत्र संचालन व आभार संस्थेचे कोषाध्यक्ष रामराव गोहोकार यांनी मानले या जयंती निमित्त संचालक मंडळाचे सदस्य व सर्व समाजबांधव कार्यक्रमाला उपस्तीथ होते.

मॅकरून स्कूलमधील स्नेह संमेलनात उसळली होती अलोट गर्दी.

0

समाजमन घडवणाऱ्या विषयावर विद्यार्थ्यांनी नृत्य सादर केलें.

News Today 

वणी:- विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अध्ययन- अध्यापना बरोबरच,शालेय क्रीडा स्पर्धा, आनंद मेळावा, सांस्कृतिक कार्यक्रम अश्या विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव देण्यासाठी वणी शहरातील प्रसिद्ध मॅकरून स्टुडंट्स अकॅडमी सि.बी.एस.ई स्कूलमध्ये ‘द रिदम् वे टू एक्स्प्रेस’ वार्षिक स्नेहसंमेलन (दि.31) जाने रोजी एस.बी.लॉन मध्ये मोठ्या उत्साहात पार पडले.

या ‘द रिदम् वे टू एक्स्प्रेस’ वार्षिक स्नेह संमेलन कार्यक्रमाच्या अध्यक्षपदी व उद्गाटक म्हणून शिक्षणमहर्षी पी.एस.आंबटकर तर सत्कारमूर्ती म्हणून वणी विधानसभेचे विद्यमान आमदार संजय देरकर व शाळेचे उपसंचालक पियूष आंबटकर तसेच प्रमूख पाहूणे म्हणुन वणी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी किशोर गज्जलवार, वाहतूक शाखा प्रमूख सिता वाघमारे, डायरेक्टर ऑफ एम.एस.पी.एम अंकिता आंबटकर, डायरेक्टर ऑफ पॅरमाऊंट प्रांजली रघताटे,डायरेक्टर ऑफ सोमय्या पायल आंबटकर, वणी शाळेचा मुख्यद्यापिका शोभना आणि एम.एस.पी.एम ग्रुपचे सर्व मुख्यद्यापक उपस्थित होते. या मान्यवरांचे जंगी स्वागत करण्यात आले.

यात सर्वात आधी मुख्यद्यापिका शोभना मॅडम यांनी वर्षभराचा कार्यआलेखाचा पाढा वाचला तसेच पालकांनी फक्त अभ्यासावरच लक्ष केंद्रित करण्यापेक्षा कला , क्रीडा यासारख्या इतर क्षेत्रातही विद्यार्थ्यांना झेप घेण्यास प्रोत्साहित करावे,असे प्रतिपादन अध्यक्षीय भाषणात पि. एस आंबटकर यांनी केले.

या वार्षिक समारंभात प्ले ते दहावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांनी मराठी व हिंदी एकांकिका, गायन, पारंपारिक नृत्य, कोळीगीते आणि देशभक्तीपर गीते ,झांसी की राणी चे ऐतिहासिक प्रसंग,आईचे प्रेम, सायबर क्राईम यासारख्या सामाजिक उद्बोधन दर्शविणाऱ्या तर दमलेल्या बाबाची कहाणी यासारख्या मनाला स्पर्श करणाऱ्या भावनिक तसेच हेरा फेरी सारख्या हास्याचे फवारे उडवणाऱ्या थीम मधून चिमुकल्यांनी आपल्या कलागुणांच्या सादरीकरणाने उपस्थितांचे मने जिंकून घेतले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापिका शोभना यांनी केलें .

तर अर्चना व रूपाली यांनी सूत्रसंचालन करून मान्यवर तथा पालकांच्या तोंडून वाहवा मिळवली. तर कार्यक्रमाचे नियोजन सांस्कृतिक कमिटी यांच्या मार्गदर्शनात पार पडले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक वृंद व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अथक परिश्रम घेतले.

ठाणेदाराची बदली पण “खाकी” तील वाळू माफियांचे काय ?, ललीतच्या न्यायासाठी दाद मागावी कुणाकडे, 

0

News Today 

दिलीप भोयर

वणी :- येथील पोलिस स्टेशनचे काही वादग्रस्त कर्मचारी वाळू तस्करीत गुंतून असल्याची तक्रारदाराला खोट्या ॲट्रोसिटीत अडकविण्याची धमकी दिल्याने या धमकीची धास्ती पकडल्याने ललित लांजेवार यांचा हृदय विकाराच्या झटक्याने मृत्यू झाला असल्याचे तर्क काढल्या जात आहे.

यातच वणी पोलिस स्टेशनचे ठाणेदार अनिल बेहराणी यांची तडका फडकी बदली करण्यात आली परंतु “खाकी ” च्या आढून घादाड धंदे करणाऱ्या वाळू माफियांचे काय ?असा प्रश्न अजूनही कायम आहे.  असून केवळ ठाणेदाराच्या बदलीने मृत ललित यांना न्याय मिळणार आहे का? नसेल तर तो मागावा तरी कुणाकडे असे बोलण्याची वेळ वणीकरांवर निर्माण झाली आहे.

वणी परिसरात सर्रास वाळू तस्करी केल्या जात असून यात मोठ मोठे मासे अडकलेले आहे. यातच राजकीय व गुंड वृत्तीचे लोक वाळू तस्करीत सहभागी असून यात आता पोलीसात नोकरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांनाही आपले हात रोवले आहे. कायद्याचे रक्षकाच आता वाळू भक्षक झाल्याने वणी पोलिसांची कर्तव्य दक्षता वेशीला टांगली आहे.  

वाळू तस्करीत पोलिसांच्या हात असून या प्रकरणाची रीतसर तक्रार शिवसेना (शिंदेगट) शहराध्यक्ष स्व. ललित लांजेवार यांनी केली असता काही पोलिसांनी जाती वाचक शिवी गाळ कायद्याचा फायदा घेत ललित लांजेवार यांना अडकविण्याची धमकी वारिष्ठांसमोर दिली असल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. 

चोर तर चोर वरून शिरजोर होऊन वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या समोर स्व. ललित लांजेवार यांना धमकी मिळाल्याने ललित यांनी या धमकीची चांगलीच धास्ती घेतली होती. त्यामुळे त्यांना अस्वस्थ वाटू लागयला सुरवात झाली होती. रात्री अचानक त्यांच्या हृदयात मोठ्या प्रमाणात दुखून आल्याने त्यांनी रुग्णालयात धाव घेतली. परंतु रुग्णालयातच त्यांना मृत्यूने कवटाळले. 

“खाकी” च्या खादाड वृत्तीने घेतला ललित चा बळी, वणीत चर्चेला ऊत

0

रेती तस्करीत अडकलेल्या पोलिसांना अभय कुणाचे ?

News Today

दिलीप भोयर

वणी :- येथील पोलिस स्टेशन मध्ये कार्यरत असलेले पोलिस कर्मचारी चक्क रेती तस्करी करीत असल्याची तक्रार स्व. ललित लांजेवार यांनी पालकमंत्री संजय राठोड व संबंधित विभागाकडे केली होती. याचा राग मनात ठेवून रेती तस्करीत हात काळे करणाऱ्या पोलिसांनी ललित लांजेवार यांना जातीवाचक गुन्ह्यात अडकवण्याची धमकी दिल्याची विश्वनिय माहिती असून धमकीची धास्ती घेतल्यानेच त्यांना हृदय विकाराचा झटका आल्याची चर्चा आता शहरात पसरली आहे. त्यामुळे खाकीच्या खादाड वृत्तीने हा बळी घेतल्याचा आरोप ऐकायला येत आहे.

शिवसेना (शिंदे गट) या सत्तेतील पक्षाचे शहराध्यक्ष ललित लांजेवार यांना तारीख २९ रोजी रात्री ९.३० वाजताच्या सुमारास हृदय विकाराचा तीव्र झटका आला व त्यांचे दुःखद निधन झाले. ते ४५ वार्षाचे तरुण होते. वणी पोलिस स्टेशनचे काही कर्मचारी व अधिकारी पदाचा व पोलीस अधिकाराचा गैरवापर करून स्वतःच रेती (वाळू) तस्करी करीत असल्याची तक्रार स्व. ललित लांजेवार यांनी पालकमंत्री संजय राठोड यांचेकडे केली होती.

वणी परिसरातील वर्धा, पैनगंगा, विदर्भ व इतर नाल्यातून मोठ्या प्रमाणात दरवर्षी वाळूची तस्करी करून माफिया करोडो रुपयाचा चुना अधिकाऱ्यांच्या आश्रयाने लावत असतात. अगोदर वाळू (रेती) तस्करी करणाऱ्या वाहनांवर महसूल विभाग कार्यवाही करीत होते. त्यात केवळ १५ ते २० हजार रुपयाचा दंड ठोठावत होते. परंतु वाळू तस्करीवर नियंत्रण मिळविणे महसूल विभागाला अवघड झाले होते. त्यामुळे या दंडाची रक्कम १ लाख १५ हजारापर्यंत नेली व कारवाई करण्याचा अधिकार पोलिस विभागाकडे देखील देण्यात आला. यात पोलिस व महसूल मिळून तस्करदारांच्या मुसक्या आवरायला पाहिजे होत्या. परंतु महसूल पोलिस व माफियांनी एकजूट करून वाळू तस्करीचा गोरख धंदा उभारून करोडोच्या खनिज संपत्तीवर हात साफ केला आहे.

गुन्हा व गुन्हेगारांना अंकुश मिळविण्याचे काम व राष्ट्रीय संपत्तीचे जतन करण्याची जबाबदारी असलेल्या पोलिसांनीच वाळू तस्करी सुरू केल्याच्या आरोपाखाली स्व. ललित लांजेवार यांनी आवाज उठवला व या प्रकारांची रीतसर चौकशी करून संबंधितांवर सक्त कारवाई करण्याची मागणी केली होती. त्यामुळे खाकीतले खादाड माफियांच्या पायाखालची वाळू सरकली व त्यांनी लांजेवार यांना तुला बघून घेतो ॲट्रोसिटीच्या प्रकरणात अडकवितो अशी धमकी देण्यात आली.

त्यामुळे ललित लांजेवार यांनी या धमकीची धास्ती घेतली व याच धस्तीतून त्यांना हृदय विकाराचा जोरदार झटका आला आणि त्याने निधन झाले आहे. या घटनेची रीतसर चौकशी होणे गरजेचे झाले असून वणी पोलिसांची अब्रू आणखी एकदा वेशीला टांगल्या गेल्याने जनमानसात रोष निर्माण होत आहे. तरी वरिष्ठांनी याकडे जातीने लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे.

                  वणीचा “आनंद” हरवला.

स्व. ललित लांजेवार एक होतकरू हरहुन्नरी  निष्ठावंत शिवसैनिक  होते. आपले कुटुंब चालवून आरोग्याची व्यवस्थित काळजी घेत होते. इतरांची मदत करण्यासाठी ते प्रथम क्रमांकावर असायचे कोणत्याही समस्येवर ते तुटून पडायचे आणि सर्व सामान्य जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी सतत धडपडत असायचे. त्यामुळे संपूर्ण शहरासह त्यांचे ग्रामीण भागात देखील चांगले वलय निर्माण झाले होते. त्यांच्या अशा अचानक मृत्यूने वणी शहरातील आनंद हरवला आहे.

वाळूत तस्करीत पोलिस सहभागी असूनही अधिकारी अनभिज्ञ

वाळू तस्करीत पोलिस कर्मचारी सहभागी असताना त्यांच्या वरिष्ठांना याची माहिती नसणे हे आश्चर्य चकित करणारी बाब आहे. शहरातल्या कानाकोपऱ्यात काय गैरपरकर घडत आहे याची माहिती ठेवणारे पोलीस या वाळू तस्करी बाबत अनभिन्न असतील हे मात्र कोणालाच न पटण्याजोगे आहे. त्यामुळे या वाळू तस्करीचा व ललित लांजेवार यांच्या तक्रारीची गांभिर्याने दाखल घेवून या तस्करीत कुणाकुणाचे हात रंगले आहे याचे पितळ उघड पडणे गरजेचे झाले आहे.

विरकुंड येथे “आमदार चषक” कबड्डीच्या सामन्याचे आयोजन 

0

जय बजरंग क्रिडा मंडळ” विरकुंड तर्फे लाखोंच्या बक्षिसाची लुट 

News Today 

वणी :- तालुक्यातील अतिशय प्रसिध्द असलेल्या नवेगाव ( विरकुंड ) येथे “आमदार चषक” जय बजरंग क्रिडा मंडळाच्या वतीने भव्य-दिव्य कबड्डीच्या सामन्याचे आयोजन गुरुवार ६ फेब्रु. , शुक्रवार ७ फेब्रु आणी शनिवार ८ फेब्रु . रोजी करण्यात आले आहे. यामध्ये लाखोंच्या बक्षिसाची लुट मंडळाच्या वतीने करण्यात येणार आहे. या कबड्डीच्या सामन्याचे प्रक्षेपण लाईव्ह दाखवण्यात येत आहे.

यामध्ये मंडळाच्या वतीने स्पर्धेत सहभागी झालेल्या संघाची जेवनाची सोय व राहण्याची व्यवस्था जय बजरंग क्रिडा मंडळ नवेगाव ( विरकुंड) च्या वतीने करण्यात आली आहे. त्यामुळे या भव्य-दिव्य होणाऱ्या कबड्डी स्पर्धेत मोठ्या प्रमाणात संघानी भाग घेण्याचे आवाहन संयोजक विलास कालेकार तसेच देवेंद्र बच्चेवार यांनी केले आहे .या भव्य-दिव्य “आमदार चषक” कबड्डी स्पर्धेचे प्रथम पारितोषिक. , द्वितीय पारितोषिक , सोबतच तिसऱ्या क्रमांकाचे पारितोषिक. , असुन बेस्ट रेडरअसणार आहे.

या कार्यक्रमाला उद्घाटक नवनिर्वाचित आमदार संजय देरकर तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष सामाजिक कार्यकर्ते विजयबाबु चोरडिया असणार आहे. उद्घाटन सोहळा आटोपताच, सामाजिक घडामोडींवर आधारित नाट्य प्रयोगाची मेजवाणी गावकऱ्यांसाठी असणार आहे. या भव्यदिव्य कार्यक्रमाचे सरळ प्रक्षेपण जि.प. वरिष्ठ प्राथ. शाळा नवेगाव (विरकुंड) येथुन होणार आहे.

त्यामुळे या “आमदार चषक” कबड्डी सामन्यासाठी मोठ्या प्रमाणात संघानी सहभाग नोंदवण्याचे आवाहन संयोजक विलास कालेकर , देवेंद्र बच्चेवार तसेच जय बजरंग क्रिडा मंडळ नवेगाव (विरकुंड) च्या वतीने करण्यात आले आहे.

पाच विद्यापीठांना धूळ चारून , अमरावती संघ वेस्ट झोन विजयी,मो. अरमान यांची उत्तम कामगिरी

0

१६ वर्षानंतर गाठली ऑल इंडिया फेरी,
राजूर कॉ. येथील मो. अरमान यांची उत्तम कामगिर

News Today
वणी :- आंतरविद्यापीठ स्पर्धेत डी ग्रुपमध्ये पाच विद्यापीठांचा पराभव करीत अमरावती विद्यापीठ क्रिकेट संघ चॅम्पियन्स ठरला आहे. २०१६ नंतर प्रथमच अमरावती विद्यापीठ संघ दिल्ली येथे होणाऱ्या ऑल इंडिया युनिर्व्हसिटी स्पर्धेसाठी पात्र ठरला आहे.

दरम्यान, राजस्थानातील कोटा येथे झालेल्या आंतरविद्यापीठ क्रिकेट स्पर्धेत पहिल्या सामन्यात अमरावती विद्यापीठाने विक्रांत युनिर्व्हसिटी गुजरात संघाचा ६ गड्यांनी पराभव केला. दुसऱ्या सामन्यात आत्मीय विद्यापीठ गुजरात संघाचा ९ गड्यांनी पराभव केला तर तिसऱ्या सामन्यात होळकर युनिर्व्हसिटी सोलापूर संघाचा १० धावांनी पराभव केला. तर चवथा सामना रविंद्रनाथ टागोर विद्यापीठाचा १० गड्यांनी पराभव करीत झोनची अंतिम फेरी गाठली.

याफेरीत अहिल्यादेवी युनिव्हसिटी इंदोर संघाचा ७ गड्यांनी पराभव करीत, डी झोनमधून चॅम्पियनशिप प्राप्त करत ऑलइंडिया फेरी गाठली. या स्पर्धेत सलग पाच विद्यापीठांचा पराभव करण्यात अमरावती संघाला मोठे यश आले. यामध्ये आदित्य आहुजा याने पाच सामन्यात २८५ धावा करीत, ‘बेस्ट बॅस्टमनचा खिताब पटकाविला तर कर्णधार आकाश राऊत याने सर्वाधिक १२ गडी बाद केले व मोहम्मद अरमान याने १० गडी बाद केले.

असा आहे विजेता संघ !

आकाश राऊत (कर्णधार), रिंकू चिकारा (उपकर्णधार),मो. अरमान,आदित्य आहुजा, सिद्धांत मुळे, विशेष तिवारी, श्रीयोग पवार, यजवान गाढवे, अर्जुन इंगळे, मल्हार शिकरे, आर्यन लाड, भावेष बोपटे, आदित्य लहाने, अद्वैत राऊत, ओम राजपूत आणि शुभम तिवारी यांचा समावेश आहे. संघाचे प्रशिक्षक डॉ. विवेक कपिले तर संघ व्यवस्थापक संकेत निंभोरकर यांनी काम पाहिले.

सिंधीवाढोणा ते बोपापुर मार्गावर नित्कृष्ट दर्जाचे काम सुरू, गावकऱ्यांनी घेतला आक्षेप

0

News Today (दिलीप भोयर)

वणी :- येथून जवळच असलेल्या झरी तालुक्यातील सिंधी वाढोणा ते बोपापुर या मार्गावर अत्यंत नित्कृष्ट दर्जाचे काम चालू असून देखील सार्वजनिक बांधकाम विभागाचे जाणीव पूर्वक दुर्लक्ष होताना दिसून येत असल्याने स्थानिक नागरिकांनी या कामावर जावून आक्षेप घेतला असता कंत्राटदार मुजोरी करून काम करीत असल्याने नागरिकांमध्ये रोष निर्माण झाला आहे. 

रासा ते गनेशपुर (खं.) येणारा मार्ग अत्यंत बाधित झाला असून हा मार्ग सुरळीत करण्यासाठी नुकतेच काम सुरू झाले आहे. निविदेतील  अंदाज पत्रकानुकास कोणतेही काम दिसून येत नाही.त्यामुळे स्थानिक नागरिक कामाची पाहणी केली असता रस्ता ज्या पद्धतीने क्षतीग्रस्त आहे. त्यावरच खुली गीट्टी टाकून प्रवाश्यांना अपघातात टाकण्याचे कार्य कंत्राटदाराकडून चालू आहे. 

उत्तम रस्ते व त्यावरून सुखरूप प्रवास करणे हा प्रवाशांचा अधिकार आहे. त्यासाठी शासनाकडून करोडो रुपये खर्च करून रस्ता दुरुस्ती व बांधकामासाठी जनतेच्या तिजोरीतून निविदा काढल्या जात असते व कंत्राटदारा मार्फत  रस्ता बांधकाम करून जनतेला सेवा पुरविल्या जाते. परंतु कंत्राटदार हे नेहमीच मातुर कामे करून शासनाचे करोडो रुपये गिळंकृत करीत असतात.

 

सिंधी वाढोणा ते बोपापुर मार्गावर अत्यंत नित्कृष्ट दर्जाचे काम चालू असल्याने सदर काम तत्काळ बंद करून अंदाज पत्रकानुसार काम करण्याची मागणी  या भागातील सामाजिक कार्यकर्ते  नागेश घुगुल, संजय देवाळकर, गौरव पंधरे, मोहन काकडे, अभिजित देवाळकर यांनी केली आहे. 

वणीत महाआरोग्य शिबिरातील अनेक रुग्णांना मिळणार सावंगी (मेघे) येथे मोफत उपचार, आ. देरकरांचे सर्वत्र

 

वणी:-हिंदुहृदयसम्राट, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व विद्यमान आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य महाआरोग्य शिबीर येथील शिक्षण प्रसारक मंडळ शाळेच्या प्रांगणात ता. १९ रोजी सकाळी १० ते दुपारी ३ पर्यंत आयोजित करण्यात आले होते. दरम्यान याशिबिरात विविध आजार असलेल्या असंख्य रुग्णांनी महाआरोग्य शिबिराचा लाभ घेतला.

आयोजित या शिबिराचे उद्घाटक म्हणून वणीचे आमदार संजय देरकर तर अध्यक्ष म्हणून माजी नगराध्यक्ष विजय मुकेवार तर प्रमुख अतिथी म्हणून शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख संजय निखाडे, शरद ठाकरे, दीपक कोकास, संतोष माहूरे, सावंगी मेघे येथील शशांक गोतरकर, डॉ. एन. पी. शिंगणे, सुनील कातकडे, गणपत लेडांगे सुधीर थेरे, आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी सावंगी मेघे जि. वर्धा येथील आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालय, वणी तालुका आरोग्य विभाग, व ग्रामीण रुग्णालय वणी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या शिबिरात हजारो रुग्णांनी सहभाग घेतला होता.

 

यात विविध आजाराचे रुग्ण सहभागी झाले होते. जवळजवळपास अडीच ते तीन हजार रुग्णांनी सहभाग नोंदवला. यात विविध आजारांवर शस्त्रक्रिया करण्यासाठी स्थानिक श्री संत जगन्नाथ महाराज नांदेश्वर देवस्थान येथे विविध दिवशी बोलाविण्यात आले आहे. आजतागायत सर्वात मोठे मासे आरोग्य शिबीर विद्यमान आमदार संजय देरकर यांनी जनसामान्यांचा विचार करीत हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त या महाआरोग्य शिबिराचे आयोजन केले होते. या शिबिरात विविध आजारावरील रुग्णांची तपासणी करून त्यांना विनोबा भावे रुग्णालय मेघे सावंगी येथे शस्त्रक्रिया होणार आहे.

केवळ रुग्णांना औषध देण्यासाठी नव्हे तर?, त्यांच्या जिवासाठी आमदार संजय देरकर व संजय निखाडे यांनी जे कार्य केले ते जनसामान्याच्या आरोग्यासाठी! हे या महाशिबिरातून निदर्शनात येत होते. त्यामुळे सर्व सामान्य रुग्णांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते. शिबिर यशस्वी करण्यासाठी वणी येथील एसपीएम शाळेतील प्रांगणात महाआरोग्य शिबीर आयोजित केले होते. प्रसंगी या शिबिरात ग्रामीण रुग्णालय वणीचे अधीक्षक डॉ धर्मेंद्र सुलभेवार, डॉ विवेक गोफणे, वणी तालुका वैद्यकीय अधिकारी, डॉ समीर थेरे, मारेगावच्या तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ अर्चना देठे, झरि येथील तालुक वैधकिय अधिकारी डॉ मोहन गेडाम,डॉ सुभाष इंगळे वैद्यकीय अधीक्षक ग्रामीण रुग्णालय मारेगाव तसेच डॉ. विलास बोबडे, बालू दुधकोहले, आशा सेविका, आरोग्य सेवक आदींनी परिश्रम घेतले.

मारेगाव व झरीतही होणार महाआरोग्य शिबिर – आमदार देरकरांची घोषणा

वणी येथे महाआरोग्य तपासणी व उपचार शिबिराला  रुग्णांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आपली तपासणी करून घेतली व ज्या रुग्णांना त्यांच्या आजारावर शस्त्रक्रिया उपचाराची गरज आहे अश्या शेकडो रुग्णांना सावंगी येथे मोफत सेवा मिळणार  आहे. याच पद्धतीचे शिबिर मारेगाव तालुका व झरि तालुक्यात देखील आयोजित करण्यात येणार असल्याची घोषणा आमदार संजय देरकर यांनी या शिबिरा दरम्यान केली आहे.