Saturday, May 2, 2026
Google search engine
HomeUncategorizedवणी-मुकुटबन रस्ता प्रकल्पांत जे.पी. कन्स्ट्रक्शनची फसवणूक; मुख्य अभियंता सा.बां. प्रादेशिक विभाग अमरावती...

वणी-मुकुटबन रस्ता प्रकल्पांत जे.पी. कन्स्ट्रक्शनची फसवणूक; मुख्य अभियंता सा.बां. प्रादेशिक विभाग अमरावती यांनी घेतली दिलीप भोयर यांच्या तक्रारीची घेतली दखल

News Today 

वणी : यवतमाळ जिल्ह्यातील वणी तालुक्यातील चिखलगाव चौफुली ते वरोरा रेल्वे गेट सिमेंट रस्ता प्रकल्प पूर्ण झाल्यावर निकृष्ट दर्जाचे असल्याचे उघड झाले असून, झरी तालुक्यातील मुकुटबन येथेही जे.पी. कन्स्ट्रक्शन कंपनी मुंबईकडून असेच बेशिस्त काम चालू आहे. या दोन्ही प्रकरणांची दखल मुख्य अभियंता, सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक विभाग, अमरावती यांनी घेतली असून, तात्काळ अहवाल मागवले आहेत.

वणी प्रकल्प: अपूर्ण कामातील नियमभंग

वणी तालुक्यातील हा रस्ता कॉंक्रिटीकरण प्रकल्प कंत्राटानुसार स्वतःची आरएमसी प्लॉट आणि वाहने वापरून पूर्ण करावा, असा होता. मात्र, कंपनीने दुसऱ्या कंत्राटदाराकडून काम करवले. तेही अपूर्ण आहे. फ्लिप कॉम पेवरऐवजी साध पेवर, मिक्सर ऐवजी टिप्परने काँक्रीट ओतणे – अशा निकृष्ट पद्धतींमुळे रस्ता आता खराब होत आहे. तक्रारदार दिलीप भोयर यांच्या पत्रानुसार मुख्य अभियंत्यांनी कार्यकारी अभियंता (पांढरकवडा) यांच्याकडून अहवाल मागवला आहे. .

झरी तालुक्यातील मुकुटबन येथील प्रकल्पातही वणीप्रमाणेच कंत्राट फसवणूक करून उपकंत्राटदारांचा वापर आणि निकृष्ट साहित्याचा वापर होत आहे. भोयर यांनी तक्रार केल्यानुसार, हे कामही मुख्य अभियंत्यांच्या लक्षात आले आहे.

मुख्य अभियंता, सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक विभाग, अमरावती यांनी दोन्ही प्रकल्पांची गांभीर्य ओळखून कार्यकारी अभियंत्यांकडून सविस्तर अहवाल मागवले. यात गुणवत्ता तपासणी, आर्थिक व्यवहार , ट्रायल अँड रन चा अहवाल आणि नियम पालनाची छाननी होईल. दोषींवर कडक कारवाईची करण्याचे आश्वासन दिले आहे.

दिलीप भोयर यांनी निवेदनात अशी मागणी केली आहे की, कंपनीला काळ्या यादीत टाकावे आणि प्रकल्प स्थगित करावेत. व दोषींवर कायदेशीर गुन्हे नोंदविण्यात यावे, याप्रकरणी जे.पी. कन्स्ट्रक्शनने अद्याप मौन बाळगले आहे. या चौकशीचा निकाल अमरावती विभागात उत्सुकतेने पाहिला जात आहे.

भाजपचे माजी पदाधिकारी मामा आणि जे. पी. चे मधुर संबंध

भाजपचे माजी लोकप्रतिनिधी मामा व बोगस रस्ता बांधकाम करणारी कंपनी जे बी कंट्रक्शन आणि सा. बांध. विभागाचे अधिकारी या तीघांचे प्रचंड मधुर संबंध असून ही कंपनी मामाच्या भरोशावर कामे घेऊन मामा म्हणेल त्या कंत्राटदाराला कामे सोपवून निकृष्ट दर्जाचे कामे करून त्यातून मनसोक्त कमिशन लाटल्या जात आहे. त्यामुळे जनतेत प्रचंड नाराजी पसरली आहे

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Today News

Most Popular

Visitor Counter