Tuesday, May 12, 2026
Google search engine
HomeUncategorizedसृजन अभियानांतर्गत उद्या वणी येथे काँग्रेसची महत्वपूर्ण बैठक

सृजन अभियानांतर्गत उद्या वणी येथे काँग्रेसची महत्वपूर्ण बैठक

News Today

वणी : अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या वतीने देशभरात पक्ष बांधणी व संघटन मजबुतीसाठी राबविण्यात येणाऱ्या संघटन सृजन अभियान अंतर्गत वणी विधानसभा मतदारसंघात महत्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली आहे.

ही बैठक बुधवार, 15 एप्रिल 2026 रोजी दुपारी 3 वाजता वसंत जिनिंग सभागृह, वणी येथे पार पडणार आहे.

बैठकीस अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे निरीक्षक संजय कपूर, वणी-चंद्रपूर-आर्णी लोकसभा क्षेत्राच्या खासदार प्रतिभाताई धानोरकर, निरीक्षक सुनिल केदार, शकूर नगीन, भैय्याजी पवार, माजी आमदार वामनराव कासावर, जिल्हाध्यक्ष प्रफुल मानकर, प्रदेश सचिव संजय खाडे यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

वणी विधानसभा क्षेत्रातील काँग्रेसचे सर्व नेते, पदाधिकारी, आजी-माजी लोकप्रतिनिधी तसेच कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन वणी तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष विकेश भा. पानघाटे यांनी केले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Today News

Most Popular

Visitor Counter