Monday, May 25, 2026
Google search engine
HomeUncategorizedपंढरपूर येथे सर्वांगीण सुसंस्कार शिबीराचे आयोजन

पंढरपूर येथे सर्वांगीण सुसंस्कार शिबीराचे आयोजन

     २ मे २०२६ पर्यंत नाव नोंदणीची अंतिम तारीख

News Today 

पंढरपूर (प्रतिनिधी) – विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण व्यक्तिमत्व विकासासाठी ग्रामगीता तत्वज्ञान सक्रिय दर्शन मंदिर, सांगोला रोड, पंढरपूर येथे दिनांक ५ मे ते २० मे २०२६ या कालावधीत सर्वांगीण सुसंस्कार शिबीर २०२६ आयोजित करण्यात आले आहे. या शिबिरामध्ये १२ ते २० वयोगटातील मुला-मुलींना सहभाग घेता येणार आहे.

या शिबिरात ध्यान, प्रार्थना, योग-प्राणायाम, ग्रामगीता व भगवद्गीता अभ्यास, व्यक्तिमत्व विकास, पर्यावरण रक्षण, लाठी-काठी, कराटे, भजन, संगीत, वादनकला तसेच वैदिक गणित यांसारख्या विविध उपक्रमांचा समावेश करण्यात आला आहे. विद्यार्थ्यांमध्ये शिस्त, नम्रता, सेवाभाव आणि सामाजिक जाणीव निर्माण करण्याचा या शिबिराचा उद्देश आहे.

शिबिराचे अध्यक्ष प्रा. जनार्दन देठे असून सचिवपदी दिलीप भाऊ भोयर कार्यरत आहेत. शिबिराचे प्रमुख सेवकरामदादा असून मार्गदर्शनासाठी गजानन घुमनर (गुरुजी), राजुजी घुमनर (गुरुजी), अभिराज पवार, कु. नंदिनी ठेंगणे, कु. दिव्यानी बोढे हे योग व प्राणायाम शिक्षक म्हणून कार्यरत आहेत.

संगीत व बौद्धिक मार्गदर्शनासाठी सेवकरामदादा, गजानन घुमनर, ह.भ.प. केसाळे दादा, ह.भ.प. गुलाबरावजी महाराज, दिनकर उघडे, बाळासाहेब वाळके यांचे सहकार्य लाभणार आहे. तसेच संगीतकार म्हणून डॉ. कल्पेश कांबळे यांचे मार्गदर्शन लाभणार आहे.

शिबिराच्या आयोजनात सुरेंद्र नावडे (पुणे), सुधीर गायकवाड, जामदार महाराज (बेलवाडी), अॅड. राजाभाऊ व्यवहारे, चंपत पाचभाई, आण्णासो पवार, महादेव फरफार, मंगलाताई बोबडे, दिग्विजय, दिनकर उपबळे, भिमराव डोके, कृष्णात पवार, नंदकुमार पवार, दत्ता गाडे, सरसे साहेब, पेटकर, विनोद दादा विधाते, माणिक दादा दुकरे, नगरकर काकाजी आदींचे सहकार्य लाभत आहे.

शिबिरासाठी प्रवेशाची अंतिम तारीख २ मे २०२६ असून व्यवस्थापन फी ५०० रुपये ठेवण्यात आली आहे. शिबिरादरम्यान सहभागी विद्यार्थ्यांना जेवण व नाश्ता मोफत देण्यात येणार आहे.

पालकांनी आपल्या पाल्यांना या शिबिरात सहभागी करून त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी संधी उपलब्ध करून द्यावी, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Today News

Most Popular

Visitor Counter