Friday, April 17, 2026
Google search engine
HomeUncategorizedआठ दिवसापासून बेपत्ता असलेल्या इसमाचा अखेर मृतदेहच आढळला

आठ दिवसापासून बेपत्ता असलेल्या इसमाचा अखेर मृतदेहच आढळला

     मृत्यदेह उचलताना पोलिस कर्मचारी दीपक ताटे 

News Today 

वणी :- तालुक्यातील मुकुटबन पोलिस स्टेशन हद्दीतील दहेगाव येथे घडलेल्या धक्कादायक घटनेत आठ दिवसांपासून बेपत्ता असलेल्या कामगाराचा मृतदेह आज सकाळी शेतात आढळल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

मृताचे नाव देवेंद्र विठ्ठल पेदाम (वय 40 वर्षे, रा. गायडोंगरी, ता. सावली, जि. चंद्रपूर) असे असून तो दहेगाव येथील शेतमालक प्रवीण युवराज नगराळे यांच्या शेतात मजूर म्हणून काम करत होता. देवेंद्र पेदाम हा 11 ऑक्टोबरपासून घरून बाहेर पडून बेपत्ता झाला होता. कुटुंबीय आणि ग्रामस्थांनी त्याचा सर्वत्र शोध घेतला, मात्र तो सापडला नव्हता.

आज दिनांक 15 ऑक्टोबर रोजी सकाळी सुमारास 11 वाजता, नगराळे यांच्या शेतातील कपाशीच्या झाडांमध्ये एक मृतदेह पडलेला असल्याची माहिती ग्रामस्थांनी पोलिसांना दिली. घटनास्थळी तत्काळ मुकुटबन पोलीस ठाण्याचे निरीक्षक विलास कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय प्रवीण हिरे, तसेच हेड कॉन्स्टेबल दीपक ताटे यांनी घटनास्थळाचा पंचनामा केला.

या तपासात संदीप तिजारे, रवी इसनकर आणि अन्य पोलिस कर्मचारी सहकार्य करीत आहेत. प्राथमिक तपासानुसार मृत्यूचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच मृत्यूचे नेमके कारण समजू शकेल, असे पोलिसांनी सांगितले.

दरम्यान, देवेंद्र पेदाम यांच्या मृत्यूमुळे गायडोंगरी व दहेगाव परिसरात शोककळा पसरली असून, पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Today News

Most Popular

Visitor Counter