News Today
वणी (प्रतिनिधी) :- तालुक्यातील मोहदा गावातील गट क्र. 283 मधील खदान पुन्हा अवैध पद्धतीने सुरू झाल्याने ग्रामस्थांत संताप आहे. या खदानाची लीज संपली असूनही ब्लास्टिंग सुरू असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.धोका वाढला, ग्रामपंचायत मौन आहे.
गावापासून अवघ्या 100 मीटरवर चालणाऱ्या ब्लास्टिंगमुळे घरांना भेगा पडत आहेत. DGMS नियमानुसार 500 मीटर ‘डेंजर झोन’ ठेवणे बंधनकारक असतानाही नियम धाब्यावर बसवण्यात आले आहेत. “कधी घर कोसळेल ही भीती सतावत आहे”, अशी ग्रामस्थांची खंत.कायद्याचे उल्लंघनलीज संपल्यानंतरही सुरू काम हे MMDR Act, 1957 व पर्यावरण संरक्षण कायदा, 1986 चे सरळ उल्लंघन आहे.
तसेच स्फोटकांचा पुरवठा व वापर Explosives Act, 1884 अंतर्गत गुन्हा ठरतो. मात्र स्थानिक प्रशासन व ग्रामपंचायत यांचे मौन संशयास्पद ठरत आहे.ग्रामस्थांचा इशारा“अवैध उत्खनन थांबवा, नाहीतर आंदोलन करू,” असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे. रद्द झालेल्या लीजनंतरही खदान कशा परवानगीवर चालू आहे, हा प्रश्न आता ग्रामस्थ विचारत आहेत.


