Tuesday, May 26, 2026
Google search engine
HomeUncategorizedपंढरपूर येथे डॉ. उदार महाराजांचे ग्रामगीता तत्वज्ञानावर प्रभावी कीर्तन

पंढरपूर येथे डॉ. उदार महाराजांचे ग्रामगीता तत्वज्ञानावर प्रभावी कीर्तन

News Today 

पंढरपूर, दि. ६ जुलै २०२५ – आषाढी वारीनिमित्त पंढरपूर येथे पार पडलेल्या ग्रामगीता तत्वज्ञान दर्शन मंदिरातील कार्यक्रमात डॉ. उदार महाराज यांनी अतिशय प्रभावी आणि हृदयस्पर्शी कीर्तन सादर केले. दुपारी १ वाजता सुरू झालेल्या या कीर्तनात वारकरी संप्रदायाचे महत्त्व, त्याची सामाजिक आणि आध्यात्मिक भूमिका तसेच ग्रामगीतेतील तत्वज्ञानाचा समावेश करत त्यांनी श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले.

वारकरी भक्तांसमोर सादर केलेल्या या कीर्तनात त्यांनी संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर यांचे विचार, वारीचे आध्यात्मिक महत्व आणि समाज प्रबोधन यावर भर दिला. कीर्तनाच्या दरम्यान त्यांनी भक्ती, सेवा, निष्ठा आणि एकात्मता या संकल्पनांवर प्रभावी भाष्य केले.

या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने वारकरी भाविक उपस्थित होते. कीर्तनानंतर उपस्थितांनी समाधान व्यक्त करत डॉ. उदार महाराजांच्या विचारप्रवासाचे कौतुक केले.

कार्यक्रमाचे आयोजन ग्रामगीता तत्वज्ञान दर्शन मंदिराच्या वतीने करण्यात आले होते. आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर घडलेला हा कीर्तन सोहळा वारकरी परंपरेच्या सशक्ततेचे दर्शन घडवणारा ठरला.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Today News

Most Popular

Visitor Counter