Saturday, April 18, 2026
Google search engine
HomeUncategorizedकोल्हेरा (वणी) गावात पूरस्थिती : WCL च्या बेशिस्त नियोजनामुळे गावकरी धास्तावले

कोल्हेरा (वणी) गावात पूरस्थिती : WCL च्या बेशिस्त नियोजनामुळे गावकरी धास्तावले

News Today 

वणी, ता. ९ जुलै (प्रतिनिधी): कोल्हेरा (तालुका वणी) येथे मागील काही दिवसांपासून झालेल्या मुसळधार पावसामुळे गावात पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. मात्र नैसर्गिक आपत्तीपेक्षा अधिक गंभीर समस्या ही वेकोली (WCL) च्या बेशिस्त नियोजनामुळे उभी ठाकली आहे. गावकऱ्यांनी याबाबत तीव्र संताप व्यक्त केला असून प्रशासनाकडून कोणतीही ठोस मदत न मिळाल्यामुळे त्यांची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे.

डंपिंगमुळे नैसर्गिक नाल्याचा अडथळा

WCL कडून करण्यात आलेल्या मातीच्या डंपिंगमुळे गावाजवळील नैसर्गिक नाला पूर्णपणे बंद झाला आहे. त्यामुळे पावसाचे पाणी वाहून जाण्याचा मार्गच बंद झाल्याने गावात पाणी साचले आहे. अनेक घरात पाणी शिरले असून, रस्ते जलमय झाले आहेत. काही ठिकाणी पाण्याची पातळी कमरेपर्यंत पोहोचली आहे.

गाव सोडण्यासाठी दबाव, मोबदला नाही

गावकऱ्यांचा आरोप आहे की, WCL जाणूनबुजून असे नियोजन करत आहे की लोकांना गाव सोडावे लागेल. पण त्यासाठी कोणताही मोबदला दिला जात नाही. हे एक प्रकारचे षड्यंत्र असून गावकऱ्यांच्या हक्कांवर गदा आणण्याचा प्रयत्न केला जात आहे.

गावकऱ्यांचे जीवनमान उध्वस्त

पूरसदृश परिस्थितीमुळे गावकऱ्यांचे दैनंदिन जीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. घरातील साहित्य, अन्नधान्य, पिण्याचे पाणी साठवण, शौचालयांची सोय – सर्व काही ठप्प झाले आहे. वृद्ध, लहान मुले, महिला यांना विशेषतः याचे गंभीर परिणाम भोगावे लागत आहेत.

राज्य सरकारच्या लक्षवेधीसाठी मागणी

सध्या राज्याचे पावसाळी अधिवेशन सुरू आहे, अशावेळी कोल्हेरा गावच्या समस्यांकडे सरकारने तात्काळ लक्ष द्यावे, अशी जोरदार मागणी केली जात आहे. WCL च्या मनमानीला आळा घालावा, गावकऱ्यांना भरपाई मिळावी, नैसर्गिक नाल्याचा प्रवाह पूर्ववत करावा आणि या आपत्तीमध्ये अडकलेल्या नागरिकांना तात्काळ मदत मिळावी, अशा मागण्या गावकऱ्यांनी केल्या आहेत.

सरकार व प्रशासनाने तत्काळ कारवाई करावी

कोल्हेरा गावातील परिस्थिती ही फक्त एका गावाची समस्या नाही, तर संपूर्ण वणी तालुक्याच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी बाब आहे. प्रशासनाने व वेकोलीने याचे गांभीर्य लक्षात घेऊन दोषींवर कारवाई करावी आणि गावकऱ्यांना न्याय मिळावा, हीच अपेक्षा.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Today News

Most Popular

Visitor Counter