Monday, January 19, 2026
Google search engine
Homeवणीपूरड - कुंड्रा रस्त्याचे निकृष्ट काम चौकशीला मुहूर्त नाही; सत्ताधाऱ्यांचे पाठबळ, कंत्राटदार...

पूरड – कुंड्रा रस्त्याचे निकृष्ट काम चौकशीला मुहूर्त नाही; सत्ताधाऱ्यांचे पाठबळ, कंत्राटदार मोकाट 

करोडोचा अपव्यय, वणी तालुक्यातील नागरिक संतप्त

News Today 

वणी (प्रतिनिधी) – येथील सार्वजनिक बांधकाम उपविभाग अंतर्गत येणाऱ्या पूरड – कुंड्रा रस्त्याचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे झाले असूनही, संबंधित सार्वजनिक बांधकाम विभागाने अद्याप चौकशी सुरू केलेली नाही. “मुहूर्त गवसेना,” अशी भूमिका घेत अधिकाऱ्यांनी हे प्रकरण लटकवले असून, कंत्राटदाराला वाचविण्यासाठी सत्ताधाऱ्यांचे प्रयत्न सुरु असल्याचे स्पष्ट होत आहे.

रस्त्याच्या बांधकामात नियमबाह्य पद्धतीने बंद सेन्सर पेव्हरचा वापर करून बी.सी. कोट दाखवण्यात आला. प्रत्यक्षात रस्ता गुणवत्ताहीन असून काही भागांत तर पावसाआधीच उखडला आहे. यामध्ये कंत्राटदाराला  सत्तेतील एका मामा नामक माजी लोकप्रतिनिधीचे पाठबळ असल्याचे बोलले जात आहे.

मागील दहा वर्षांपासून हा कंत्राटदार वणी तालुक्यातील अनेक रस्त्यांची कामे करत असून, त्याने केलेले बहुतांश रस्ते तुटक आणि धोकादायक अवस्थेत आहेत. तरीही त्यालाच पुन्हा पुन्हा कामे देणे म्हणजे भ्रष्टाचाराचा प्रकार उघड करत आहे.

नागरिकांचे रोषाचे उद्गार

स्थानिक शेतकरी मंगेश गोरे म्हणाले, “दरवर्षी रस्त्याच्या कामासाठी कोट्यवधी रुपये मंजूर होतात, पण आम्हाला मिळतो तो खड्ड्यांचा रस्ता. या लुटमारीला जबाबदार असलेल्यांना शिक्षा झालीच पाहिजे.”

तर काही सामाजिक कार्यकर्त्यांनी सांगितले, “हे केवळ कंत्राटदाराचे नव्हे, तर संपूर्ण यंत्रणेचे अपयश आहे. आम्ही या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी व्हावी आणि दोषींवर गुन्हे दाखल व्हावेत, अशी मागणी करतो.”

लवकरच आंदोलनाचा इशारा

या साऱ्या प्रकाराने त्रस्त झालेल्या ग्रामस्थांनी लवकरच सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वणी कार्यालयासमोर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. तसेच जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदन सादर करून चौकशीसाठी वेळापत्रक जाहीर करण्याची मागणी करण्यात येणार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Today News

Most Popular

Visitor Counter