आता संजय देरकरच फिक्स आमदार खा. संजय देशमुखांनी व्यक्त केला आत्मविश्वास
News Today
दिलीप भोयर
वणी :- येथील महाविकास आघाडीचे उमेदवार संजय देरकर यांच्या प्रचारार्थ आज ता. १७ रोजी दुपारी २ वाजता वणी शहरातून निघालेल्या महा विराट रॅलीने सर्व मतदारांचे लक्ष वेधले असून विजयाचा शंखनाद वाजला आहे अशी चर्चा वणी विधानसभेत रंगायला लागली आहे. आणि पुढचे आमदार संजय देरकर हेच होणार आहे. आणि राज्यात महविकास आघाडीची सत्ता बसणार आहे. असा आत्मविश्वास यवतमाळ – वाशिम मतदार संघाचे खासदार संजय देशमुख यांनी आपल्या भाषणातून व्यक्त केला आहे.
विधानसभा निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात आला असून आज महाविकास आघाडी शिवसेना (उबाठा) गटाचे उमेदवार संजय देरकर हे मशाल या चिन्हावर निवडणूक लढवीत आहे. राज्यातील मतदारांनी महाविकास आघाडीची सरकार बसविण्याचा निर्धार केला आहे.
राज्यातील भाजपा प्रणित महायुतीच्या सरकारला जनता पुर्णतः कंटाळली आहे. शेतमालाला भाव नाही महागाई प्रचंड वाढत आहे. त्याच बरोबर बेरोजगारीची मोठी समस्या उद्भवली आहे. महिलांची सुरक्षा नाही. बदलापूर सारख्या घटनेने उभ्या महाराष्ट्राला बदनाम केले आहे. तर कोकणात शिवरायांचा पुतळा पडल्याने संपूर्ण शिव भक्त्यांच्या भावनेला ठेच पोहचली होती.
त्याच बरोबर शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पाडून सर्व भ्रष्टाचारी नेत्यांना मंत्रीपदे देवून राज्यात खोके बहादरांचे सरकार स्थापन केल्याने भाजपाने सर्व नैतिकता ही धाब्यावर बसवली आहे. देशातील मोदी आणि राज्यातील शिंदे फडणवीस सरकार हे शेतकरी विरोधी सरकार आहे. महाविकास आघाडीचे सरकार येताच शेतकऱ्यांची ३ लाखा पर्यंतची कर्ज माफी करण्यात येईल. असे मत खासदार संजय देशमुख यांनी महा विराट रॅली ला संबोधित करताना व्यक्त केले.
महाविकास आघाडीचे उमेदवार संजय देरकर यांच्या प्रचारार्थ काढलेल्या महा विराट रॅलीत जवळपास २५ ते ३० हजार लोकांच्या या उपस्थितीने वणी करांचे लक्ष वेधले होते. त्यामुळे या निवडणुकीत मशालीचा विजय मतदारांनी निच्छित केला आहे असे दिसून येत होते.
जत्रा मैदानातून निघालेल्या या रॅलीला माजी आमदार वामनराव कासावार यांनी संबोधिले तसेच उमेदवार संजय देरकर यांनी मतदारांना बहुमतांनी निवडून देण्यासाठी साद घातली या रॅलीचे सूत्र संचालन आशिष खुलसंगे यांनी केले. यावेळी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, व शिवसेना (उबाठा) गटाचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. रॅलीत वणी विधानसभा क्षेत्रातून हजारो कार्यकर्ते व मतदार स्वयंपूर्तीने उपस्थित होते.
आणि वर्षाताई निकम भाऊक झाल्या…
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जिल्हाध्यक्षा वर्षाताई निकम यांची संजय देरकरांनी भेट घेताच त्यांच्या नयनातून अश्रू अनावर झाले. अनेक वर्षांपासून संजय देरकर यांचा जो संघर्ष सुरू आहे. तो यावेळी पूर्णत्वास येत आहे आणि जनतेनी खूप चांगला माणूस निवडण्यासाठी निर्धार केला आहे. असे म्हणत त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. आणि भाऊच निवडून येणं खूप गरजेचे आहे. वणीत इतिहास घडेल असे उद्धबोधन केले. हे दुष्य बघून अनेकांच्या भावना स्थब्द झाल्या.
खालील लिंक उघडून बघा रॅलीचा व्हिडिओ
https://www.facebook.com/share/v/17Ng73FwM3/