Tuesday, November 5, 2024
Google search engine
Homeवणीओ एकनाथ मामा, सोशल मीडियावर तो व्हिडिओ तुफान वायरल, वाचा बातमी

ओ एकनाथ मामा, सोशल मीडियावर तो व्हिडिओ तुफान वायरल, वाचा बातमी

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना शेतकऱ्यांची पोट तिळखीची आर्त हाक, 

समाज माध्यमावर वायरल झालेल्या व्हिडिओमुळे शेतकऱ्यांमध्ये सरकारप्रती वाढला रोष, 

News Today 

दिलीप भोयर

वणी :-  सद्या सणासुदीचा दिवस आहे. आपलाही सन उत्सवात जावा म्हणून शेतकरी आपल्या शेतातील शेतमाल सोयाबीन बाजारात विकायला आणत आहे. अशाच सोयाबीनच्या भावा संदर्भात एक शेतकरी कृषी उत्पन्न बाजार समितीतील पावती दाखवत म्हणत आहे. ओ एकनाथ मामा, अगा एकनाथ मामा, सोयाबीन बत्तीश्याने गेलं गा, तेलाचा पिपा बाविष्ये झाला गा म्हणून सरकारचा आर्थ हाक मारत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतमालाला कवडी मोल भाव मिळत असूनही सरकार मात्र ऐन निवडणुकीच्या तोंडावर व्यापाऱ्यांचे हीत जोपासत असल्याने शेतकऱ्यांमध्ये हा व्हिडिओ प्रचंड वायरल होत आहे. सोबतच शेतकरी भाजपा ब त्यांच्या सरकारवर प्रचंड रोष व्यक्त करीत आहे.

कृषी उत्पन्न बाजार समिती बाभुळगाव येथे एका शेतकऱ्याने आपले सोयाबीन विक्रीस आणले आहे. त्या सोयाबीनला बाजार भावाप्रमाणे हमीभाव  मिळाला नाही. आणि कुठच हमीभाव व्यापारी देत नसल्याचे निदर्शनास येत आहे. त्यामुळे प्रचंड संतापाची लाट शेतकऱ्यांमध्ये निर्माण झाली आहे. शेतकऱ्याच्या शेतमालाला हमी भाव अधिक ५०% नफा देवू म्हणून सत्तेत आलेले भाजप व मोदी सरकार यांनी शेतकऱ्यांना फसविले आहे.

 जो भाव शेतमालाला मागील १५ ते १६ वर्षा अगोदर मिळत होता तोच भाव आज मिळत आहे. ज्यावेळी सोयाबीनला प्रती क्विंटल तीन ते तीन हजार पाचशे रुपये भाव मिळायचा त्यावेळी सोयाबीन तेलाच्या पीपा हा केवळ ८०० ते ९०० रुपयात मिळत होता आज तोच भाव आणि तेलाच्या पिप्याचा भाव २२०० रुपये झाला आहे. 

व्यावसायिक व व्यापाऱ्यांच्या साहित्याच्या मालाचे भाव तीन पट संख्येने वाढले आहे. परंतु शेतकऱ्यांच्या शेतमालाला मात्र कवडी मोल भाव मिळत आहे. उत्पादन खर्चावर आधारित कमी भाव मिळत असल्याने शेतकऱ्यांना मुद्दल खर्च देखील निघत नसून उलट नफ्या पेक्षा तोटा जास्त होत आहे.

सोयाबीन पेरणीच्या खर्च देखील निघत नसल्याने एका शेतकऱ्याने राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आर्थ हाक लावली आहे. एकीकडे लाडकी बहिण म्हणून प्रत्येक महिलेला निवडणुकीच्या तोंडावर १५०० रुपये महिना वाटला तर दुसरीकडे ऐन दीपावली सणा सूदीच्या तोंडावर खाद्य पदार्थांचे भाव मोठ्या प्रमाणात वाढवून दिले आहे. त्यामुळे सरकारच्या या धोरणावर शेतकरी प्रचंड नाराज आहे. 

समाज माध्यमातून तुफान वायरल झालेल्या या व्हिडिओच्या दुष्परिणाम वणी विधानसभेतील भाजप उमेदवार संजीवरेड्डी बोदकुरवार यांचेवर देखील होत आहे. शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या सरकारला यावेळी चांगलीच अद्दल घडविणारं असल्याचे चित्र उभ झाल आहे. 

सोशल मीडियावर प्रसारित झालेला व्हिडिओ खालील दिलेल्या लिंक वर क्लिक करून बघा

 https://www.facebook.com/share/d9tQ2TjPQk2gZcxi/

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Today News

Most Popular

Visitor Counter