Thursday, February 6, 2025
Google search engine
Homeवणीवणी विधान सभेतील ओबीसी मत विभागणीसाठी भाजप कडून मोठी खेळी होण्याची संभावना

वणी विधान सभेतील ओबीसी मत विभागणीसाठी भाजप कडून मोठी खेळी होण्याची संभावना

खोके देवून अपक्ष उमेदवार उभा करण्याचा जोरदार प्रयत्न सुरू

News Today
दिलीप भोयर
वणी :- विधानसभा क्षेत्रातून महा विकास आघाडीचा पगडा भारी पडत असल्याने विरोधातील उमेदवारांनी चांगलीच धास्ती घेतल्याचे दिसून येत आहे. माहाविकास आघाडीतील मतविभागणी करण्यासाठी भारतीय जनता पार्टी खोके खर्च करून अपक्ष उमेदवार रिंगणात उतरवण्याच्या जोरदार तयारी सुरू झाल्याची चर्चा सूत्रांकडून मिळत आहे.

येत्या २० नोव्हेंबर रोजी राज्यातील विधानसभेच्या निवडणुका होवू घातल्याने वणी विधानसभा क्षेत्राची जागा ही शिवसेनेच्या वाट्याला आली आहे. वणी विधानसभेत शिवसेनेचा मोठा गलबला असून त्यांचे सोबत काँगेस व राष्ट्रवादी काँग्रेस व इतर मित्र पक्षाची साथ आहे. त्यामुळे महाविकास आघाडीकडून संजय देरकर हे शिवसेनेची मशाल घेवून मैदानात उतरणार आहे. तर भाजपचे कमळ मात्र कोमुजण्याच्या मार्गावर आले आहे. 

नुकत्याच संपन्न झालेल्या लोकसभा निवडणुकीत वणी विधान सभा क्षेत्रातून भाजपचे उमेदवार ना. सुधीर मुनगंटीवार यांना ६७ हजार मतदान झाले यात महाराष्ट्र नव निर्माण सेनेचा पाठिंबा होता यातील मनसे चे मतदान जर २० ते २५ हजार मतदान गृहीत धरले तर भाजपच्या झोळीत केवळ ४२ ते ४५ हजार मतदान पडले तर महाविकास आघडीलाच्या उमेदवार यांना १ लाख २५ हजाराचे जवळपास मतदान मिळाले होते त्यामुळे वणी विधानसभेत महाविकास आघाडीचा दबदबा निर्माण झाला होता लोकसभेचा पराभव भाजप अजूनही पचवू शकली नाही. हीच पुनरावृत्ती होवू नये म्हणून भाजपातील माजी केंद्रीय मंत्री तथा राष्ट्रीय ओबीसी आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर यांनी पुरेपूर प्रयत्न करीत विधानसभेत नवीन ओबीसी चेहऱ्याचा उमेदवार देण्याचा आग्रह पक्षश्रेष्ठींकडे धरला होता. परंतु ओबीसी समाजाला केरकचरा समजणारी भाजपाने मात्र भैया यांची मागणी धुळकावून लावली आहे.त्यामुळे भाजपातील मोठा ओबीसी गट हा आणखी नाराज झाला आहे.

लोकसभेत देखील (भैया) यांची उमेदवारी नाकारून अल्पसंख्यांक समजात उमेदवारी देवून भाजपाने आपल्याच पायावर धोंडा मारून घेतला होता. हीच परिस्थिती वणी विधानसभेत निर्माण झाली आहे. त्यामुळे महाविकास आघाडीच्या लाखो मतांची बेरीज बघता मतदान कसे विभागल्या जाईल याची यावर भाजप मोठी खेळी करण्यासाठी खोके संस्कृतीचा वापर करून महाविकस आघाडीतील एखादा जयचंद शोधून त्यांची अपक्ष उमेदवारी उभी करण्याच्या हालचालींना वेग आल्याचे दिसून येत आहे. परंतु मतदार मात्र आता जागृत झालेला आहे. तो कोणत्याही अपक्ष उमेदवारांच्या भूलथापांना बळी पडणार नाही अशी प्रतिक्रिया मतदरांमधून ऐकायला मिळत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Today News

Most Popular

Visitor Counter