Wednesday, July 29, 2026
Google search engine
Home Blog Page 41

वणी विधानसभा क्षेत्रातील काँग्रेस बंडखोरांची पाठ राखण करतोय कोण ?

0

News Today 

प्रतिनिधी

वणी :- तेथील विधानसभेत काँग्रेस नेत्यांच्या बंडखोरीत दररोज वाढ होत आहे..परंतु त्यांचेवर कोणतीच कारवाई का होत नाही त्यांची पाठराखण करतो तरी कोण ? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. 

महाराष्ट्र राज्य विधानसभा निवडणूक २०२४ मध्ये महा युती विरुद्ध महा विकास आघाडी अशी सरळ लढत संपूर्ण राज्यात लावण्यात आली आहे. महायुती मध्ये भारतीय जनता पार्टी, शिवसेना (शिंदे गट) राष्ट्रवादी (अजित पवार गट) व इतर पक्ष विरुद्ध भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, शिवसेना (उबठा गट) राष्ट्रवादी (श.प.गट व इतर पक्ष अशी लढत निवडणुकीच्या मैदानात रंग भरत आहे. असे असताना वणी विधानसभा क्षेत्रामध्ये महाविकास आघाडी कडून शिवसेना उबाठा गटाचे उमेदवार म्हणून संजय देरकर यांना उमेदवारी घोषित करण्यात आली आहे. 

त्यांना महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्षांचे समर्थन लाभत आहे. परंतु काँग्रेस पार्टीचा स्वयंघोषित रखवाला संजय खाडे यांनी अपक्ष उमेदवारी दाखल केली  व त्यांचे सोबत त्यांचे भलावण करणारे काही काँग्रेसचे पदाधिकारी आम्हाला दिवंगत खा. बालुभाऊ धानोरकर व विद्यमान खासदार प्रतिभा धानोरकर यांचा आशीर्वाद लाभला आहे.

तसेच मला काँग्रेसचा पंजा या विधानसभा क्षेत्रात वाचवायचा असून माझ्यावर महा विकास आघाडीने केलेल्या अन्यायाचा प्रतिरोध करणे हाच हेच एकमेव उद्दिष्ट ठेवून नागरिकांची दिशा भूल करीत असताना भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे उच्च पदस्त पदाधिकारी ह्या सर्व प्रकाराकडे डोळे झालं का करीत आहे. अशी जनसामान्य चर्चा रंगत आहे. 

तसेच  काँग्रेस पक्षातील निष्ठावान कार्यकर्ते हे महविकास आघाडी सोबत दिसून येत आहे. परंतु कही लोभी स्वार्थी राजकीय पुढारी मात्र उठसूट अपक्ष बंडखोर उमेदवार संजय खाडे यांच्या तंबूत जावून आपके समर्थन देत आहे. मग या काँग्रेस पक्षाच्या धोरणा विरुद्ध वागणाऱ्यांना कुणाचा आर्शिवाद मिळत आहे. असा प्रश्न मतदारांमध्ये उपस्थित झाला आहे.

तसेच बंडखोरी करून देखील यांची काँग्रेस पक्षातून हकालपट्टी का केली जात नाही अशी विचारणा मतदारांनमधून विचारणा होत असतानाच बंडखोर उमेदवार संजय खाडे यांना पाठिंबा दर्शविणारे शिवसेना उबाठा गटाचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांचे विरुद्ध पक्षश्रेष्ठींनी एका रात्री कार्यवाही केली. परंतु काँग्रेसला या बंडखोरांवर कारवाई करण्यासाठी मुहूर्त कधी गवसणार अशी चर्चा होत आहे.  

 

भाजपाच्या आमदाराला व कार्यकर्त्यांना गावबंदी वणी विधानसभेत झडकले फलक, ते वक्तव्य सत्यच ” आय विटनेस”  सापडले.

0

कुणबी समाजाबद्दल अभद्र वक्तव्य करणे भाजपला पडले महागात

संपूर्ण विदर्भात निषेधाचे सत्र सुरू, ऐन निवडणुकीत भाजपची दमछाक 

News Today 

दिलीप भोयर

वणी :- येथील भाजपचे उमेदवार संजीवरेड्डी बोदकुरवार यांच्या निवडणूक प्रचार कार्यालयाच्या परिसरात भाजपच्या व्यापारी आघाडीचे उपाध्यक्ष सुधीर साळी याने कुणबी समाजाबद्दल अत्यंत घृनास्पद वक्तव्य केल्याने त्याचेवर वणी पोलीसात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या घटनेचे संपूर्ण विदर्भात भाजपाचा विरोधात पडसाद उमटले असून सर्वत्र सकल कुणबी बांधव रस्त्यावर उतरून त्या वक्तव्याचा निषेध नोंदवत आहे. वणी तालुक्यातील झोला या गावच्या समोर कुणबी समाजाप्रती अभद्र भाष्य केल्याने भाजप आमदार व भाजपचे कार्यकर्तासाठी गवबंदी म्हणून फलक झडकल्याने ऐन निवडणुकीच्या तोंडावर भाजपची चांगलीच दमछाक होताना दिसून येत आहे. 

दिनांक ४ नोव्हेंबर रोजी भाजपाचे उमेदवार यांच्या निवडणूक प्रचार कार्यालय परिसरात एका समाज कंठकाने कुणबी समाजाबद्दल  अभद्र अपमान जनक व कुणबी समाजाच्या भावना व्यथित होईल अश्या पद्धतीचे वक्तव्य केल्याने त्याला तेथील भाजप कुणबी कार्यकर्त्यांनीच चांगलाच चोप दिला व ही माहिती शहरात वाऱ्या सारखी पसरताच शेकडो सकल कुणबी बांधव एकवटले व त्यांनी निषेध सभा बोलवून त्याच वेळी रात्री तारीख ५ रोजी शेकडोच्या संख्येनी कुणबी समाज बांधवांनी वणीचे पोलिस स्टेशन गाठून सुधीर साळी यांचेवर गुन्हा नोंद केला आहे. 

गुन्हा नोंद होतच तमाम समाज माध्यमांवर प्रसारित झालेल्या वृतामुळे  राज्यभरातील कुणबी बांधवांमध्ये संतापाची लाट पसरली आहे. संपूर्ण राज्यात या अभद्र व्यक्ताव्याच्या विरोधात निषेध नोंदविण्यात येत आहे. त्यामुळे भाजपच्या उमेदावारांना या घटनेने प्रचंड अडचणीत आणले आहे. वणी तालुक्यातील झोला या गावात सकल कुणबी समाजाच्या वतीने गावाबाहेर भाजपच्या आमदाराला व त्यांच्या कार्यकर्त्याना गावबंदी म्हणून फलक झडकले आहे.  हा फलकाची संपूर्ण विधान सभा क्षेत्रात जोरदार चर्चेचा विषय बनला आहे. 

लोकसभेतील चंद्रपूर येथील भर सभेत सक्या बहीण भावाच्या नात्याला काळीमा फासणारे नेते आणि कुणबी समजाबद्दल अभद्र वक्तव्य करणारे कंठक आपल्या जिभे वरील “सु” रांचा “धीर” अनावरण केल्याने भाजपला प्रचंड मोठा फटका बसला आहे. भर सभेत बहीण भावाच्या नात्याला काळीमा फासूनही एक सुधीर मी तस बोललो नाही म्हणून स्पष्टीकरणं देत होता. खोटे बोला पण रेटून बोला असे दुटप्पी धोरण राबविले होता. तेच धोरण वणीतील कुणबी समाजाबद्दल केलेल्या वक्तव्यावर येथील भाजपाचे पदाधिकारी राबवून आरोपींची पाठ राखण करीत आहे. त्यामुळे आणखी रोष वाढत आहे.

तसेच वरिष्ठांच्या दबावाखाली भाजपतील कुणबी व ओबीसी नेते देखील चक्क खोटे बोलून समाजाची दिशा भुल करीत आहे.  सत्य कितीही दाबण्याचा प्रयत्न केला तरी ते दबल्या जाणार नाही. भाजपाचे खोटे बोलणे व “मी नाही त्यातली कडी लाव आतली” ह्या मनी प्रमाणे आहे.  नेहमीचीच भाजप आपली भूमिका बदलवत असते त्यामुळे भाजपा वरील जनतेचा विश्वास पुर्णतः उडाला आहे. 

त्या अभद्र वक्तव्याचा प्रकार घडला एका वकीलासमोर 

(वकील म्हणाले आय एम दी आय विटनेस)

तारीख ४ रोजी भाजप उमेदवाराचे निवडणूक प्रचार कार्यालयाचे उद्घाटन असल्याने अनेक जण तिथे उपस्थित होते. त्याच ठिकाणी एक कुणबी समाजाचेच विधितज्ञ (वकील) देखील आवर्जून उपस्थित होते. सुधीर साळी हे पांढर शुभ्र शर्ट घालून तिथे आला व त्या ठिकाणी चालू असलेल्या चर्चेत सहभागी झाला व त्याने कुणबी समाजाबद्दल अभद्र टीपणी केली असता उपस्थित त्याच ठिकाणी वाद झाला व सुधीर यांना काही लोकांनी आत नेले व तिथं त्याला मारहाण झाली त्या ठिकाणी उपस्थित हंसराज अहिर यांनी ते भांडण सोडविण्याचा प्रयत्न. केला आणि तारेंद्र बोर्डे यांनी देखील आमदार यांना कुणबी समजा बद्दल असे वक्तव्य करीत असताना आपण बग्याची भूमिका घेता का असा प्रश्न देखील उपस्थित केला हा सर्व प्रकार घडत असताना संबंधित ते वकील त्याच ठिकाणी उपस्थित होते अशी त्यांनी माहिती दिली आहे. त्यामुळे भाजपाने पत्रपरिषद घेवून चुकीची माहिती प्रसारित करून समाजाची दिशा भूक केल्याचे उघड झाले आहे. या घटनेचे ते वकील प्रत्यक्ष दर्शी पुरावा आहे. ते पोलीसात देखील आपली जबानी बयान देणार असल्याचे त्यांनी न्युज टुडे जवळ नाव न प्रकाशित करण्याच्या अटीवर सांगितले.

वणी न्युज टुडे कधीच खोटी बातमी प्रकाशित करीत नाही तसेच कोणताही तेढ निर्माण करीत नाही व कोणत्याही षडयंत्राला खतपाणी घालत नाही.  जे सत्य असते तेच वाचकांच्या समोर परखडपणे प्रसारित करीत असते त्यामुळे जे आरोप आ. बोदकुरवार व काही नेत्यांनी समाजापेक्षा पक्ष मोठा समजून वणी न्युज टुडे या पोर्टलवर लावले होते ते सर्व आरोप खोटे निघाल्याने भाजप आणखी तोंड घशी पडली आहे. यामुळेभाजपचे खोटारडे रूप जनमानसासमोर उघड पडले आहे. 

वणी विधानसभेत अपक्ष उमेदवारांना बसणार मतदारांचे “खाडे”  महाविकास आघाडीचे पारडे जड

0

News Today 

प्रतिनिधी

वणी :- वणी विधानसभा क्षेत्रात सत्ताधारी सरकारवर शेतकरी प्रचंड नाराज असल्याने यावेळी जे अपक्ष उमेदवार खोक्यांची संस्कृती चालवून मतविभागणी करण्याच्या उद्देशाने रिंगणात उतरले आहे. अश्या उमेदवाराचे मनसुबे मतदारांनी ओळखले आहे. त्यामुळे मतदार आपल्या मनातील मतदान हे त्यांनी ठरवलेल्या उमेदवारालाच देवून खोके बहाद्दर अपक्ष उमेदवारांना मात्र मतदारांकडून चांगलेच  ” खाडे ” मारून जाग्यावर बसविण्याची असल्याची जोरदार चर्चा आहे. 

राज्यातील विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे अनेक राजकीय पक्षांनी आपापले उमेदवार निवडणुकीच्या या रिंगणात उभे केले आहे. या उमेदवारांचे भाग्य २० नोव्हेंबर रोजी इलेक्ट्रिक वोटिंग मशीन मध्ये बंद होणार आहे. या निवडणुकीतील उमेदवारांनी आपापल्या पद्धतीने मतदारांना आकर्षित करण्यासाठी विविध पद्धतीने प्रचार कार्य सुरू केले आहे. 

निवडणुकीत शेतकरी मतदारांची संख्या मोठ्या प्रमाणात असून शेतकरी ज्या पक्षाकडे वळतील त्या उमेदवारांचा विजय निच्छित आहे. मागील दहा वर्षापासून सत्तेतील सरकारने मात्र शेतकऱ्यांना पिळून पिळून टाकले आहे. त्यामुळे तमाम शेतकरी बांधवांमध्ये सरकार व त्यांच्या उमेदवारांप्रती रोष निर्माण होऊन आहे. हा रोष मतदारांच्या मतदानातून व्यक्त होणारा आहे. त्यामुळे विरोधपक्षतील उमेदरांना जमेची बाजू आहे. 

ही जमेची बाजू मोडून काढण्यासाठी शेतकरी एकतेचे मते विभाजन करून राजकीय सत्तेची मलाई लाटण्यासाठी सत्ताधारी पक्षातील कुबुद्धिजीवी लोकांनी काही खोके बहाद्दर उमेदवार रिंगणात उतरवले आहे. परंतु या प्रकारचे बिंग मतदारांमध्ये उघड झाले आहे. 

वणी विधानसभेतील काही खोके बहाद्दर अपक्ष बोके उमेदवारांना मतदार चांगलेच खाडे मारणार असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे.  

 

” त्या वृत्ताबाबत मानहानी करू द्या” आम्ही शेकडो वकील उभे करू – ऍड विप्लव तेलतुंबडे धावले न्युज टुडेच्या मदतीला

0

News Today 

प्रतिनिधी

वणी :- येथील सत्य व परखड लिखाण करून जनमानसात सत्ताधाऱ्यांचा भ्रष्ट्राचार उघड पाडणारे एकमेव न्युज पोर्टल म्हंजे वणी न्युज टुडे आहे.  या पोर्टलवर मानहानी दाखल करू म्हणून पत्रपरिषदेत धमकी देणारे सत्तेतील प्रस्तापित लोकांनी मानहानी दाखल करावी आम्ही त्यांच्या पाठीमागे समाजातील शेकडो वकील आपले वकील पत्र घेवून उभे करू घाबरण्याचे कोणतेही काम नाही. असे आश्वासन येथील नामांकित विधीतज्ञ ऍड. विप्लव तेलतुंबडे यांनी वणी न्युज टुडे चे संपादक दिलीप भोयर यांची भेट घेवून दिले आहे. ऍड. तेलतुंबडे यांच्या या भूमिकेमुळे समाजातील असंख्य वकिलांची संवेदना जागृत झाल्या आहे.  अनेक वकील देखील मदतीला धावणार असल्याचे सांगितले.

नुकतेच  ४ दिवसापूर्वी एका राजकीय पक्षाच्या प्रचार कार्यालयात एका विशिष्ट समाजाबद्दल आक्षेपार्थ भाष्य करण्यात आल्याने त्या स्वपक्षीयातील एका पदाधिकाऱ्यांनी आक्षेपार्थ विधान करणाऱ्या पदाधिकर्याला चांगलाच चोप दिला ही बातमी संपूर्ण शहरात त्याच रात्री पसरली होती. दुसऱ्या दिवशी पत्रकार दिलीप भोयर यांनी या घटनेची शहानिशा करून त्यांचे पोर्टलवर मुद्देसुत  प्रकाशित केली. त्यात कोणतीही कुणाचीही मानहानी होईल असे काहीही मजकूर नाही. परंतु त्या वृत्ताने प्रस्तापित राजकारण्यांची भूमिका व त्यांचे कृत्य बाहेर आल्याने त्यांची चांगलीच दमझाक झाली आहे.  त्या दिवशीचा संबंधित राजकीय पार्टी प्रचार कार्यालयातील घटनाक्रम आणि सर्वांचे तांत्रिक अहवाल देखील तपासण्याची गरज आहे. 

 

त्या ठिकाणी कुणबी समाजाबदल आक्षेपार्थ विधान झाले नसते तर मारहाण झाली नसती व मारहाण झाली नसती तर त्यांच्या डोक्याला टाके पडले नसते. त्याच बरोबर त्याने उपचार केला नसता व त्यांचेवर समाजाने पोलीसात गुन्हा नोंद केला नसता. ह्या सर्व बाबी लक्षात घेतल्या तर हेच सिद्ध होते की त्या ठिकाणी आक्षेपार्थ भाष्य केले आहे.

म्हणून प्रस्थापितांना प्रत्र परिषद घेवून खुलासा द्यावा लागला व त्यांनी देखील कबूल केले आहे. तसे व्हिडिओ समाज माध्यमामध्ये प्रसारित झाले आहे. तसेच हा प्रकार घडला परंतु तो प्रकार तसा नाही असे असेल तर त्यास आरोपीची व माहरण करणाऱ्या पाधिकर्यांची तेथे उपस्थित असलेल्या लोकप्रतिनिधींची शासनाच्या संबंधित यंत्रणेने नार्को चाचणी करावी किंव्हा या प्रस्तापित लोकांनी स्वतःची नार्को चाचणी करून जनतेला ते वृत्त खोटे आहे याचे पुरावे सादर करावे.  केवळ सत्य बातम्या प्रकाशित होवू नये यासाठी या लोकांनी अश्या कोरड्या धमक्या देवू नये. आणि मुजोरी करून तशी मानहानी दाखल केली तरी ती कायद्या समोर आणि अभीव्यक्ती स्वातंत्र्या समोर टिकणार नाही.

असे असताना देखील त्यांनी मानहानी दाखल केली तर त्यांच्या पाठीमागे समाजातील शेकडो वकील आपले वकील पत्र घेवून न्युज टुडे पोर्टल व त्यांचे संपादक दिलीप भोयर यांचे पाठीमागे उभे होतील याची आम्हाला गॅरंटी आहे. त्यामुळे घाबरण्याचे कोणतेही कारण नाही. सत्य लिहायचा अधिकार लोकशाहीच्या ४ थ्या आधार स्तंभाला आहे. त्यांच्या सौरक्षणासाठी कायदेशीर तरतूद आहे. अशी माहिती ऍड. विप्लव तेलतुंबडे यांनी न्युज टुडे पोर्टलचे संपादक दिलीप भोयर याणा दिली आहे. तसेच सत्य आणि परखड  लिखाण करून समाजाला जागृत करणाऱ्या पत्रकारांची अत्यंत गरज असल्याचे सांगितले. 

शेतीच्या सौरक्षणासाठी लावलेल्या विजेचा करंट लागून शेतकऱ्यांचा दुर्दैवी मृत्यू,

0

बाबापुर – कायर येथील घटना

News Today 

दिलीप भोयर

वणी:- तालुक्यातील बाबापूर – कायर शेतशिवरात काल तारीख ५ रोजी दुपारच्या दरम्यान जंगली जनावरापासून शेतीतील शेतमाल सुरक्षेसाठी लावलेल्या विजेच्या धक्याने शेतकरी लक्ष्मण सोनुर्ले यांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना आज तारीख दुपारी उघडकीस आली आहे. 

कायर येथील रहिवासी असलेले लक्ष्मण विश्वनाथ सोनुर्ले ६० वर्ष यांचे बाबापूर शिवारात त्यांचे शेत होते. शेतातच त्यांनी वाडा तयार करून ते २४ तास शेतातच राहत होते. या परिसरत जंगली प्राण्यांचा हैदोस असल्याने शेतपिकांच्या सुरक्षे करिता शेताच्या सभोवताल तार बंधुन त्या ताराला जिवंत वेजेचा प्रवाह जोडल्या जात असते. सोनुले यांनी देखील तेच केले. त्यांनीच लावलेल्या विजेचा करंट  लागून त्यांच्या मृत्यू झाल्याचे आज उघडकीस आले आहे. पुढील तपास. शिरपूर पोलिस स्टेशनचे ठाणेदार माधव शिंदे यांचे मार्गदर्शनाखाली सुरू आहे. ते सेवा निवृत्त कर्मचारी होते त्यांचे प्रच्यात मुलगा मुलगी असल्याचे कळते.

वणी – चंद्रपुरासह नागपुरातही कुणबी तापले, फडणवीसांच्या ही मतदार संघात कुणबी मते निर्णायक

0

 

News Today

दिलीप भोयर

वणी :- येथील भारतीय जनता पार्टीचे आ. संजीवरेड्डी बोदकुरवार यांच्या निवडणूक प्रचार कार्यालयात व्यापारी आघाडीचे उपाध्यक्ष सुधीर साळी या विकृत मानसिकेत्याच्या व्यक्तीने कुणबी समजाबद्दल आक्षेपार्थ विधान केले होते. त्यामुळे सकल कुणबी समाजाच्या भावना दुखावल्या आहे. वणी विधानसभा क्षेत्रातील गावागावात संतापाची लाट पसरली आहे. याचे लोन आता चंद्रपूर जिल्ह्यासह नागपुरातही  पसरले आहे. कुणबी समाज बांधवाकडून निषेध करण्यासाठी आयोजन केल्या जात आहे. त्यामुळे कुणबी प्रचंड तापले आहे. असे चर्चेतून बोलने ऐकायला येत आहे.

तरी देखील अजूनही भाजप कडून कोणतीही कारवाई न करता सुधीर साळी यांची पाठराखण केल्या आत असल्याचे आरोप होताना दिसून येत आहे. त्यात राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपूर येथील निवडणूक मतदार क्षेत्रात मोठ्या प्रमाणात कुणबी समाजाचे मतदार असून त्यांचीही निर्णायक भूमिका ठरणार असल्याची सूत्रांकडून माहिती मिळाली आहे.

कुणबी समाजाबद्दल अर्वाच भाषेचा वापर केल्या प्रकारचे वृत्त काल संपूर्ण राज्यातील कुणबी बांधवांमध्ये हवे सारखे पसरताच भाजपा प्रती संताप व्यक्त होऊन कुणब्यांमध्ये एक जुटीची भावना निर्माण झाली व काल ता. ५ रोजी रात्री ७ वाजता वणी येथील कुणबी समाज भवनात सकळ कुणबी बांधवांची बैठक घेवून निषेध नोंदविण्यात आला आणि सरळ शेकडो समाज बांधवांनी पोलिस स्टेशन गाठून दोषींवर गुन्हा दाखल केला आहे. परंतु अद्यापही भाजप कडून त्यांचेवर कोणतीही कारवाई केली नसून त्यांची पाठराखण करीत या प्रकरणाला कलाटणी देण्यासाठी मोठी खटाटोप केल्या जात आहे. त्याच बरोबर भाजपाचे कुणबी पुढाऱ्याना हा प्रकार घडलाच नाही असे बोलण्यासाठी वरिष्ठांकडून प्रचंड दबाव आणल्या जात असल्याची माहिती आहे.

एकांदरी कुणबी समाजाबद्दल असलेला सवर्ण जातीचा रोष बाहेर आल्यामुळे कुणबी समाजात मोठी संतापाची लाट पसरली आहे. त्यामुळे वणी विधान सभेचे आ. बोदकुरवार यांच्या देऊळ पाण्यात आले आहे.याच बरोबर या प्रकाराने देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे, व सुधीर मुनगंटीवार याचेही मतदार संघात मोठ्या प्रमाणात कुणबी बांधव असल्याने त्यांची चांगलीच उठबस सुरू झाल्याची माहिती आहे.

फडणवीस व बावनकुळे कडून तरेंद्र बोर्डे वर दबाव आणण्याचा प्रयत्न सुरू, कुणब्यांना शिवीगाळ करणे भाजपला भोवणार 

0

News Today 

वणी :- येथील भाजप उमेदवार संजीवरेड्डी बोदकुरवार यांच्या प्रचार कार्यालयात एका पदाधिकाऱ्यांनी कुणबी समाजाप्रती आक्षेपार्थ वक्तव्य केल्याने राज्यातील तमाम कुणबी बांधवांमध्ये रोष व्यक्त केल्या जात आहे. यात भाजपचे जिल्हाध्यक्ष तरेंद्र बोर्डे यांचेवर देवेंद्र फडणवीस व चंद्रशेखर बावनकुळे याचे कडून दबाव आणून प्रकरणाला वेगळी कलाटणी देण्यासाठी पुरेपूर प्रयत्न केल्या जात असल्याची माहिती नागपूर येथील सूत्रांकडून मिळाली आहे.

कुणबी समाजाप्रती असभ्य वक्तव्य करणाऱ्या त्या समाज कंटकाला चक्क भाजपचे जिल्हाध्यक्ष तारेंद्र बोर्डे यांनीच त्यांना चांगलाच चोप दिला आहे.  

दिनांक ४ रोजी भाजपचे निवडणूक प्रचार कार्यालयाचे उद्धाटन संपन्न झाले असता रात्री ८ वाजताच्या सुमारास सुधीर साळी नामक भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी कुणबी समाजाबद्दल अत्यंत खालच्या पातळीवर जावून टिप्पणी केल्याने तेथील उपस्थित आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी मात्र बघ्याची भूमिका घेतली हे विशेष होते.

नुकत्याच सहा महिन्यापूर्वी संपन्न झालेल्या लोकसभा निवडणूकित भाजपला जोरदार झटका मिळाला होता तेव्हापासून भाजपचे अनेक गैर कुणबी पदाधिकारी सातत्याने कुणबी नेत्यांचा अपमान करीत असल्याची माहिती आहे. त्यांना आवले टेवले मारत आहे. त्यामुळे कुणबी समाजात मोठ्या प्रमाणात भाजपाप्रती सर्वसामान्य जनतेत रोष व्यक्त केल्या जात आहे.

ऐन राज्याच्या विधानसभेच्या निवडणका तोंडावर असताना राज्यातील सर्वात मोठा असलेल्या कुणबी समजालाप्रती अपमानास्पद वक्तव्य केल्याने संपूर्ण राज्यातील भारतीय जनता पार्टीच्या विरोधात मोठी संतापाची लाट पसरली आहे. त्यामुळे भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांनी व उमेदवारांची  झोप उडाली आहे. त्यामुळे हा प्रकार कलाटणी देण्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुडे यांनी जिल्हाध्यक्ष तरेंद्र बोर्डे यांची समजूत घालून सुधीर साळी यांनी असे वक्तव्य केलेच नाही रागाच्या भरात व गैर समजुतीतून झाल्याचे सर्वांना सांगावे असे दूरध्वनी वरून दबाव वाढल्याची नागपुरी सूत्रांकडून मिळाली आहे.

त्या वक्तव्याच्या निषेधार्थ कुणबी समाजाची आज रात्री ७ वाजता बैठकीचे आयोजन

News Today

दिलीप भोयर

वणी :- भाजपाचे आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांचा प्रचार कार्यालयात सुधीर साळी या भाजप पदाधिकाऱ्यांनी कुणबी समाजाबद्दल जातीला अनुसरून अर्वाच्च भाषेत वक्तव्य करून डिवचल्याने कुणबी समाजात मोठा रोष निर्माण झाला आहे. या निषेधार्थ आज साधनकरवाडी वणी येथील धानोजे कुणबी समाज समाज भवनात आज तारीख ५ रोजी रात्री ७ वाजता एका बैठकीचे आयोजन करण्यात आल्याची माहिती सकल कुणबी समाजाच्या वतीने देण्यात आली आहे. 

वणी विधानसभेत कुणबी समाज प्रचंड मोठ्या प्रमाणात आहे. त्याच बरोबर भारतीय जनता पार्टीच्या विविध पदावर देखील कुणबी समाजाचे पुढारी आहे. 

अश्यातच कुणबी समाजाबद्दल गैरकुणबी असलेला पदाधिकारी आमदार बोदकुरवार यांच्या समोरच कुनाब्याला कुत्र्यांची उपमा देत असताना ते तोंडातील मूंग गिळून गप्प का होते असा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे असे अपमान जनक एखाद्या मोठ्या समाजाबद्दल भाषा वारणे भाजपच्या चांगलीच अंगलट येण्याची स्थिती निर्माण झाली आहे.

यापूर्वी देखील दस्तुर खुद आमदार महोदयांनी देखील काही कुणबी पदाधिकाऱ्यांना अपमानित केल्याची माहिती आहे. त्यामुळे भाजप गटातील इतर जातीच्या पदाधिकाऱ्यांची कुब्याणप्रती अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करण्याची हिम्मत वाढली आहे. जे आमदार महोदयांच्या मनात क्रोध आहे.

तेच हे भुरके पदाधिकारी भाषा बोलत असल्याचे आरोप भाजपाचे काही कुणबी पदाधिकारी दबक्या आवाजात चर्चा करत आहे. एकीकडे निवडणूक आणि दुसरीकडे कुणबी समाजाला डिवचने म्हणजे कुणबी समजाप्रती भाजपाला किती आपुलकी आहे हे सर्व मतदार संघात दिसून येत आहे. 

या अर्वाच्च भाषेच्या निषेधार्थ आज कुणबी समाजाचे पदाधिकारी व सर्व सदस्यांची आज बैठक बोलवली असून या बैठकीला सकल कुणबी समाजाच्या प्रतिनिधींनी उपस्थित राहण्याचे राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

भाजप कार्यालयातच कुणब्यांना दिली कुत्र्याची उपमा, स्वाभिमानी कार्यकर्त्याने एकला बदडले

0

आ. बोदकुरवारांच्या समोर घडला प्रकार

* माजी खासदार हंसराज भय्या यांनी घातली समजूत
*भाजपाच्या प्रचार शुभारंभात अपशकुन

News Today
दिलीप भोयर
वणी :- “साले कुणबी पाचशे रुपयात विकल्या जातात, विजेच्या खांबावर मुतणाऱ्या कुत्र्या सारखी अवस्था कुणब्याची झाली आहे”. असे आक्षेपार्ह वक्तव्य एका पदाधिकाऱ्यांने भाजप प्रचार कार्यालयात आ. बोदकुरवार यांच्या समोर केले. या प्रकारामुळे स्वाभिमान दुखावलेल्या एका स्वाभिमानी कार्यकर्त्याने त्या पदाधिकाऱ्याला चांगलेच बदडले. यानंतर माजी खासदार हंसराज भय्या अहिर यांनी सर्वांची समजूत काढली मात्र घडलेल्या घटनेने चांगलीच खळबळ माजली आहे. 

बसस्थानक परिसरात भाजपचे निवडणूक प्रचार कार्यालयाचा सोमवारी सायंकाळी शुभारंभ होता. यावेळी एका पदाधिकऱ्याची जीभ घसरली, मात्र बोदकुरवार यांनी बघ्याची भूमिका घेतली. त्याचवेळी एका कुणबी कार्यकर्त्याचा स्वाभिमान जागा झाला व त्याने घडलेला प्रकार जिल्हाध्यक्ष तारेद्र बोर्डे यांना सांगितला. बोर्डे यांनी लगेचच कार्यालयात धाव घेतली व त्या कुणबी समाजाला बदनाम करणाऱ्या पदाधिकाऱ्यांला चंगलीच मारहाण केली. ही घटना काल तारीख ४ ऑक्टोंबर रोजी रात्री ८ वाजताच्या सुमारास घडली.

प्रचार कार्यालयाच्या शुभारंभ हा अपशकुणाने झाला आहे. आ. बोदकुरवार यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. काल बस स्टॉप समोरील एका हॉटेलच्या बाजूला भारतीय जनता पार्टीच्या विधानसभा उमेदवार आ. संजीवरेड्डी बोदकुरवार यांच्या प्रचार कार्यालयाचे उद्घाटन सायंकाळी ५ वाजता करण्यात आले. त्या नंतर माजी केंद्रीय मंत्री व केंद्रीय ओबीसी आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर आमदार संजीवरेड्डी बोदकुवार व इतर भाजपाचे पदाधिकारी नियोजन करीत असताना सुधीर साळी नामक भाजपाचा पदाधिकारी हा कुणबी समाजाला जातीवरून अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करीत होता.

त्यावेळी उपस्थित अनेक कुणबी नेते मात्र मूग गिळून बसून होते. यातील एक कार्यकर्ता निखिल खाडे यांनी सुधीर साळी याने कुणबी पाचशे रुपयात विकल्या जाणारे असून त्यांची इलेक्ट्रिकच्या खांबावर लघु शंका करणाऱ्या सारखी गत आहे. असे म्हणताच खाडे यांनी असे कसे बोलता भाऊ म्हणून टोकले. असता  सुधीर साळी यांची अजून जीभ घसरतच होती परंतु उपस्थित आ. बोदकुरवार हे बघ्याची भूमिका बजावत होते.

शेवटी निखिल खाडे यांना कुणब्यांना हा आपमान सहन झाला नाही त्याने सरळ जिल्हाध्यक्ष तारेद्र बोर्डे यांना सदर प्रकार सांगितला असता बोर्डे यांच्या तळपायाची आज मस्तकात गेली व त्यांनी सुधीर  यांना कॉल केला व  तू कुठे आहे. म्हणून विचारले व सुधीर हे आमदार बोदकुरवार व भाजपचे रवी बेलूरकर यांच्या सोबत प्रचार कार्यालयात बसून असल्याची माहिती मिळताच बोर्डे यांनी कार्यालय गाठले व सुधीर यांच्या कानशिलात  सळ “साळी”त आवाज काढत यांना चांगलीच मारहाण केली. त्यात सुधीर यांच्या डोक्याला गंभीर इजा झाल्याची माहिती आहे. यावेळी हंसराज अहिर यांनी भांडणाची सोडवणूक केली यात निखिल खाडे यांनी ही आपला हात साफ केला. यात साळी हे चांगलेच जखमी झाले आहे. परंतु ऐन निवडणुकीच्या तोंडावर कुणबी समाजात भाजपा व्देश निर्माण होईल म्हणून हे प्रकरण कार्यालयातच दाबण्यात आल्याची माहिती आहे. याबाबत सुधीर यास कॉल करून संपर्क केला असता त्यांनी कॉल रिसिव्ह केला नाही. 


आ. बोदकुरवार है बोर्डे यांच्यावरच संतापले

इथे येवढे कुणबी असताना त्यांना काहीच नाही वाटते तुम्ही येऊन कसे काय मारहाण करता म्हणून भाजपचे जिल्हाध्यक्ष तारेंद्र बोर्डे यांचेवर संतापल्याने बोर्डे यांनी त्यांना कुणबी समाजाचा स्वाभिमान नाही परंतु मला माझ्या समाजाचा स्वाभिमान आहे. असे उत्तर देताच आमदार गप्प झाले, परंतु आमदार महोदयांच्या मनात कुणबी समजा बद्दल किती आपुलकी आहे हे मात्र दिसून आल्याने भाजपाप्रती कुणबी समाजात मोठी नाराजी पसरली आहे.


वणी विधानसभेत सर्वाधिक कुणबी मतदार
निवडणुकीच्या काळात एक एक मतदार जोडणे गरजेचे असून वणी विधानसभेतील सर्वाधिक संख्येने असलेल्या कुणबी समाजाला अशा पद्धतीने डिवचुन त्यांना एका खांबावर लघुशंका करणाऱ्याची उपमा देणे ही अत्यंत घृणास्पद बाब आहे. अशा वक्तव्याने कुणबी समाजात रोष निर्माण झाला असून भारतीय जनता पार्टी व त्या पदाधिकाऱ्याचा निषेध नोंदविण्यात येत आहे. त्यामुळे या निवडणुकीत आमदार बोदकुरवार यांचा समोर कुणब्यांना डिवचने भाजपला महागात पडणार आहे.

खोके सरकारला गाडण्यासाठी संभाजी ब्रिगेडचा महाविकास आघाडीला पाठिंबा

0

     कार्यकर्ता मेळावा घेत सर्वानुमते पाठिंबा जाहिर


वणी :- उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवसी संभाजी ब्रिगेडचे अधिकृत उमेदवार अजय धोबे यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेत अवैध रित्या स्थापन झालेले शिंदे फडणविस अजीत पवाराचे सरकार पुन्हा आले तर शेतकरी कष्टकरी व सामान्य जनतेला जगने कठिन होईल हा विचार करित पक्षाच्या कार्यकार्याचे मत जाणून घेत संभांजी ब्रिग्रेड पक्षाने महाविकास आघाडी सोबत राहून महाविकास आघाडीचे उमेदवार संजय देरकर यांना पाठिंबा देण्याची भुमिका जाहिर करित खोके सरकारला हद्दपार करून शेतकरी हिताचे महाविकास आघाडीचा उमेदवार विजयी करण्यासाठी जीवाचे रान करू असे संभाजी ब्रिगेडच्या वतिने शेकडो कार्यकत्याच्या उपस्थितीत निर्णय घेण्यात आला.

यावेळी विचारपिठावर अध्यक्ष म्हणून संभाजी ब्रिगेडचे अमरावती विभागीय अध्यक्ष इंजि अनंत मांडवकर , संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष अजय धोबे , सेवानिवृत शिक्षक संघटनेचे राज्याध्यक्ष अशोक चौधरी मराठा सेवा संघाचे वणी तालुका अध्यक्ष अंबादास वागदरकर , झरी तालुका संभाजी ब्रिगेडचे तालुका अध्यक्ष आशिष झाडे , वणी तालुका संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष गणेश बोंडे , मारेगांव तालुका संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष लहु जिवतोडे उपस्थित होते कार्यकर्ता मेळावा कार्यक्रमाचे प्रास्ताविक संदिप रिंगोले यांनी केले तर संचालन दत्ता डोहे यांनी केले , यावेळी वणी , मारेगांव , झरी तालुक्यातील संभाजी ब्रिगेडचे कार्यकर्ते मोठया प्रमाणात उपस्थित होते , मेळावा यशस्वी करण्यासाठी वसंता थेटे , आशिष रिंगोले, अमोल टोंगे, सुरेंद्र घागे, संजय गोडे, अमोल लोखंडे , अभय पानघाटे , नितेश ठाकरे , प्रमोद लडके अनामिक बोढे , देव येवले सह शेकडो कार्यकत्यानी एकमतानी भुमिकेला पाठिंबा दर्शवित कार्यक्रम यशस्वी केला .