Saturday, May 2, 2026
Google search engine
Home Blog Page 39

रोजगार मागणाऱ्या तरुणाला आ. बोदकुवारांनी दिला भाजप जिंदाबादचा सल्ला, गरीब महीलेने विचारलेल्या प्रश्नांकडे केले दुर्लक्ष, 

0

शिरपूर येथे प्रचार रॅली दरम्यान नागरिकांनी आमदाराला अडविले

News Today 

वणी :- मागील २५ ते ३० वर्षातील इतिहासामध्ये येवढा अपमान कोणत्याही आमदाराचा झाला नाही तेवढा अपमान गावोगावी भाजप आमदार बोदकुरवार याचा या निवडणुकीत होताना दिसून येत आहे. एका तरुणांनी रोजगार संदर्भात विचारताच त्याला उडवाउडवीची उत्तरे देवून भाजप जिंदाबाद म्हणून बोदकुरवार यांनी आपला पाय काढला. हा प्रकार तालुक्यातील शिरपूर येथे घडला आहे. याबाबत व्हिडिओ देखील उलब्ध झाला आहे. 

येत्या २० नोव्हेंबर रोजी संपन्न होत अडलेल्या विधानसभेतील निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी मोठ्या प्रमाणात सुरू असून उमेदवारांच्या रॅल्या, पदयात्रा, कोपरा सभा गावागावात होत आहे. यातील सर्वांच्या चर्चेला विषय म्हणजे विद्यमान सत्तेतील आ. बोदकुरवार यांचा होत आहे. 

तारीख ४ नोव्हेंबर रोजी त्यांच्या निवडणूक प्रचार कार्यालयाच्या शुभारंभ प्रकरणी एका समाजाबद्दल अभद्र टिपणी एका भाजप पदाधिकाऱ्यांनी करताच त्या ठिकाणी जोरदार मारहाण झाली. ही घटना आ. बोदकुरवार यांचेसाठी अशुभ ठरली आणि तेव्हापासून त्यांचे मागे साडेसाती लागल्याची मतदारांत चर्चा आहे. 

विधानसभेत ज्या ज्या गावात आ. बोदकुरवार व त्यांच्या प्रचाराचे वाहन जात आहे. तेथील मतदार, बेरोजगार तरुण, गोर गरिब महिला त्यांचेवर प्रश्नाचा. भडिमार करीत आहे. त्यामुळे भाजपच्या प्रचार मंडळींची  उत्तरे देता देता बोलती बंद होत आहे. त्यामुळे यांनी केलेल्या विकासाची प्रचिती सर्वांना दिसून येत आहे.

आज सकाळी शिरपूर येथे भाजपची प्रचार रॅलीत सुरू असताना काही शेतकरी, बेरोजगार तरुण एकत्रित येवून सरळ सरळ आमदार महोदयांची  रॅली थांबवून विकासाबाबतच्या प्रश्नांचा भडीमार करीत आहे. यात शेतीच्या शेतमालाला भाव, महागाई, व बेरोजगारीचा प्रश्न अत्यंत ऐरणीवर आलेला आहे. त्यामुळे यावर कोणतेही समाधान कारक उत्तर या सत्ताधारी आमदाराकडे दिसून येतं नाही.  यामुळे आमदार बोदकुरवार यांचे चेहऱ्यावर पराभवाचे नैराश्य दिसून येत आहे. त्यांच्यात चिडचीडपणा निर्मान झाल्या सारखे त्या व्हिडिओत दिसून येत आहे. 

शिरपूर येथे घडलेल्या या प्रकारात बेरोजगार तरुणाने विचारलेल्या प्रश्नाचे समाधान कारक उत्तर न देता भाजप जिंदाबाद म्हणून दिलेल्या सल्याने बेरोजगार तरुणांमध्ये रोष निर्माण झाला आहे. या रोषाला महाविकास आघाडीचे उमेदवार संजय देरकर हे कॅश करीत आहे. भाजपचे आमदार बोदकुरवार यांनी आपल्या कार्यकर्त्यावरीलं खर्चाचे हात आवरते घेतल्याची माहिती आहे.

 

  हा बेरोजगार तरुणांच्या भावनेचा अपमान – संजय देरकर

स्थानिक उद्योग व प्रकल्पामध्ये ८० % रोजगाराचा वाटा हा स्थानिक बेरोजगार तरुणांचा असताना या ठिकाणी बाहेरील राज्यातील भाजपच्या तरुणांना रोजगार दिल्या जात आहे. व एक लोकप्रतिनिधी म्हणून बेरोजगारांच्या रोजगाराची व्यवस्था लावणे हे त्यांची जबाबदारी आहे. आणि बेरोजगाराने आपल्या हक्काच्या रोजगारावर प्रश्न विचारला असता त्याला भाजप जिंदाबाद म्हणून आमदार उत्तर देत असेल तर ते तमाम बेरोजगार तरुणांनाच्या भावनेचा घोर अपमान आहे. तसेच गोरगरीब महिलेने विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर देणे देखील बंधनकारक असताना त्यांनी तिथून पळ काढणे हा त्यांचा पळकुटेपणा बाहेर आला आहे. आणि मतदार त्यांना यावेळी चांगलाच धडा शिकवणार आहे  मत महाविकास आघाडीचे उमेदवार संजय देरकर यांनी आ. बोदकुरवार यांचे नाव न घेता न्युज टुडे जवळ बोलताना टोला लावला आहे. 

अनेकांनी घेतला मनसेचा झेंडा खांद्यावर,

0

News Today 

वणी/ प्रतिनिधी –

विधानसभेच्या निवडणुकीमध्ये मनसेची सर्वत्र हवा पाहायला मिळतं आहे. त्यामुळे अनेक सामजिक, राजकीय संघटनानी मनसेचे उमेदवार राजू उंबरकर यांना उघडपणे पाठींबा घोषित केला आहे. तर अनेकांनी पक्षाचा झेंडा हातात घेऊन पक्ष प्रवेश केला. दिवसेंदिवस मनसेचा वाढत असलेला जनाधार आणि राजकीय मंडळीचे वाढतं असलेले पक्षप्रवेश या निवडणुकीत मनसेला विजयाश्री मिळवून देण्यास साह्यभूत ठरेल. यातच आज वणी शहरा नजिक असलेल्या गणेशपूर येथील विद्यमान ग्रामपंचायत सदस्य व अन्य नागरिकांनी शहराध्यक्ष शिवराज पेचे यांच्या नेतृत्त्वात राजू उंबरकर यांच्या हस्ते महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत प्रवेश केला.

यात गणेशपूर येथील ग्रामपंचायत सदस्य प्रवीण आत्राम, आशिष बोबडे, माजी ग्रामपंचायत सदस्य विठ्ठल काकडे, सुधीर खापणे, उषा कोडापे, अक्षय बोबडे यांच्या सह अन्य आजी माजी ग्रामपंचायत सदस्य व अन्य मंडळींनी पक्षात प्रवेश केला. यावेळी मनसेचे विधानसभा उमेदवार राजू उंबरकर यांनी त्यांच्या गळ्यात पक्षाचा दुपट्टा टाकून त्यांचे पक्षात स्वागत केले व त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यावेळी शहराध्यक्ष शिवराज पेचे, स्वप्निल लांडगे, जयश बुच्चे, नितीन ताजने आदी उपस्थित होते.

आ. बोदकुरवारांची गावागावात होत आहे प्रचाराची नाचक्की, मोहूर्लीत फाडले फलक

0

News Today 

प्रतिनिधी

वणी :- भारतीय जनता पार्टीचे स्वयंघोषित विकास पुरुष आमदार बोदकुरवार यांची प्रचारादरम्यान गावागावात नाचक्की होत असून भाजपावरील रोष दिवसेंदिवस वाढत जात आहे. त्यांचेकडून लावण्यात येत असलेले प्रचार फलक देखील फाडण्यात येत आहे. त्यामुळे या विकास पुरुषाला मतदार मात्र भकास पुरुष म्हणून घोषित करीत असल्याची वार्ता वणी विधानसभेत पसरली आहे. त्यामुळे प्रचारादरम्यान त्यांची चांगलीच नाचक्की होताना दिसून येत आहे.

विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत अनेक प्रकारचे प्रचार कार्य सुरू आहे. येत्या २० नोव्हेंबर रोजी विधानसभेची निवडणूक संपन्न होत आहे. यात मागील दहा वर्षापासून वणी विधानसभेत भाजपचे आ. बोदकुरवार हे राज्य करीत आहे. मागील दहा वर्षात ग्रामीण भागातील समस्यांना कधीच महत्व न देता केवळ शहरी भागात काँक्रिट रस्ते देवून त्यात मोठा भ्रष्ट्राचार केला आल्याचा आरोप मतदार करीत आहे. 

त्यामुळे ग्रामीण भागात आ. बोदकुरवार यांच्या विरोधात मोठ्या प्रमाणात मतदाराची लाट उसळत आहे. परिणामी ते ज्या गावात प्रचारासाठी जात असते त्या गावातून त्यांना हाकलून लावल्या जात आहे. तसेच त्यांनी लावलेले प्रचार फलक देखील फाडण्यात येत आहे. त्यामुळे मतदारांचा भाजपा व त्यांच्या आमदराप्रती किती आक्रोश आहे हे दिसून येत आहे. 

मतदार संघाचा फुसका विकास करून स्वताला विकास पुरुष म्हणून संबोधनारे बोदकुरवार यांची प्रचार दौऱ्या दरम्यान त्यांना अनेक प्रश्नांना सामोरे जावे लागत आहे. कुठे कुणबी समाजाबद्दल अभद्र टिपनीवरून त्यांना टोकल्या जात आहे. तर कुठे रस्ते नाही, वीज, नाही स्वच्छ पाण्याचे आरो बंद पडले आहे. अश्या अनेक प्रश्नांना घेवून त्यांची मतदार संघातील गावागावात चांगलीच गोच्ची करून टाकत आहे. त्यामुळे भारतीय जनता पार्टीला जोर का झटका धीरे से लगणे वाला है. यात महाविकास आघाडी तर्फे शिवसेनेचे उमेदवार संजय देरकर यांची मशाल चांगलीच मतदारांच्या मनात क्रांती घडवितांना दिसून आहे. 

संजय खाडे यांच्या निलंबनाची काँग्रेस पक्षाने वाजवली शिट्टी

0

 

News Today

प्रतिनिधी

प्रतिनिधी
वणी :- येथील काँग्रेसचे पदाधिकारी संजय खाडे यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार निवडणूक लढवीत असताना अपक्ष उमेदवारी लढवून पक्ष शिस्तीचा भंग केला म्हणून त्यांना पुढील सहा वर्षांकरिता निलंबित करण्यात आले आहे. अखेर उशिरा का होईना पण संजय खाडे यांच्या निलंबनाची शिट्टी वाजवून काँगेस पक्षाने त्यांची हकालपट्टी केली आहे.

महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक ही राष्ट्रीय काँग्रेस पार्टी, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व शिवसेना (ऊबाठा) व इतर घटक पक्ष एकत्रित येऊन महाविकास आघाडी म्हणून निवडणुका लढवीत आहे. त्यामुळे जागा वाटपानुसार यवतमाळ जिह्यातील ७ जागे पैकी सर्वाधिक ५ जागा काँग्रेस तर एक एक जागेवर शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस लढवीत आहे.

यातील वणी विधानसभेची जागा ही शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे यांच्या गटाला गेली व त्यांनी संजय देरकर यांच्या हातात मशाल दिली. शिवसेना गटाला जागा गेल्याने नाराज झालेले काँग्रेसचे खाडे यांनी पक्ष शिस्त भंग करून अपक्ष उमेदवारी लढविण्याचा निर्णय घेतला व ते निवडणूक लढवीत आहे. त्यामुळे काँगेस पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष नाना गावंडे यांनी प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले यांचे आदेशावरून निलंबित करण्यात आल्याचे पत्र खाडे यांना दिले आहे. खाडे यांच्या निलंबनामुळे महाविकास आघाडीच्या विजयाचा मार्ग मोकळा झाला आहे. जे काँग्रेस पदाधिकारी खाडे यांचेसोबत आहे ते महाविकास आघाडीत परतणार असल्याची माहिती आहे. 

भाजप आमदाराच्या निवडणुकीचे फाडले  फलक, मतदारांमध्ये प्रचंड रोष

0

गावागावात वाढला भाजप आमदाराच्या विरोधात रोष 

News Today 

वणी :- येथील आ. बोदकुरवार यांच्या निवडणूक प्रचारासाठी लावलेले प्रचाराचे फलक एका तरुणांनी फाडल्याची घटना दोन दिवसागोदर घडली आहे. यात एका तरुणावर शिरपूर पोलीसात प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे. ही घटना तालुक्यातील कुरई या गावातील आहे.

विधानसभा निवडणुकीच्या प्रचार कार्याला प्रचंड मोठा वेग आला आहे. यातच गावागावात मतदारांना ओळख पटण्यासारखी आपापल्या पक्षाचा व निवडणूक चिन्हांचे फलक लावण्यात आले आहे. तसेच फलक कुरई येथे लावण्यात आहे असता ते फलक एका आदिवासी समाजाच्या तरुणाने भाजप आमदार बोदकुरवार यांच्या प्रती असेलेला रोष व्यक्त करून फलक फाडले आहे. संपूर्ण गावात भाजपच्या फसव्या विकासाची जोरदार चर्चा आहे. त्यामुळे आ. बोदकुरवार यांचे निवडणुकीचे भविष्य अंधारमय दिसून येत आहे. 

 

अले अले आ. बोदकुरवार यांना वाहनासह हाकलून लावले रे..

0

 

उद्धव ठाकरेंच्या सभेनंतर मतदारांकडूनही भजपाला बसायला लागले शाब्दिक फटके

News Today

दिलीप भोयर

वणी :- भाजपाचे आ. बोदकुरवार यांना आज तारीख १२ रोजी रात्री ९ वाजताच्या सुमारास मरेगावं तालुक्यातील सराटी या गावातून मतदारांनी कोणताही प्रचार न करू देता वाहनाच्या ताफ्यासह गावकऱ्यांनी त्यांना हाकलून लावल्याने उध्दव ठाकरे यांच्या सभे नंतर मतदारांमध्ये भाजपप्रती मोठा रोष पसरल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे आ. बोदकुरवारांची चांगलीच नाकी नऊ येत आहे.

येत्या २० नोव्हेंबर रोजी संपन्न होत असलेल्या विधानसभेच्या निवडणुका जसजश्या जवळ येत आहे तस तश्या भाजपच्या प्रचारात विघ्न तयार होताना दिसून येत आहे. आज आ. बोदकुवार यांचा मारेगाव तालुक्यात प्रचार दौरा असताना मांगरूळ या गावात गावातील मतदार बांधव व कुणबी समाज बांधवांनी त्यांना घेराव घालून प्रश्नाचा भळीमार केला यावेळी बोदकुरवार यांची बोबडी उडाली होती. तसेच आज रात्री सराटी येथील ग्रामस्थांनी तर त्यांना वाहनातून उतरूच न देता गावातून हाकलून लावले आहे.

भारतीय जनता पार्टीचे मनसुबे व त्यांच्या उमेदवारांचा खोटा विकास समोर येत असून गावागावात भाजपाप्रती मोठा रोष दिसून येत आहे. अहम पनाच्या गुर्मीत वावरणाऱ्या आमदाराला जनतेनी तोंडघशी पाडल्याने मतदार संघात चांगलीच चर्चा रंगत आहे. काल तारीख ११ रोजी शिवसेना पक्षप्रमुख वणीत दाखल होताच त्यांची बॅग तपासण्यात असण्यात आली या बाबीचा मतदारांमध्ये मोठा रोष तयार झाला. आज पर्यंतच्या इतिहासात कोणत्याही भाजपच्या राजकीय पुढाऱ्यांची अशी तपासणी करण्यात आली नाही. परंतु ठाकरे यांचीच का असा प्रश्न उपस्थित झाल्याने मतदान क्रोधित झाला आहे.

त्याच बरोबर उद्धव ठाकरे यांनी आपल्या मनोगतात भाजपच्या शेतकरी विरोधी नीतीची चांगलीच चिरफाड करण्यात आली होती. त्यामुळे उपस्थित शेतकरी व मतदारांमध्ये जागृती तयार झाल्याने भाजपाला प्रचार करणे देखील अवघड झाले आहे. गावागावात मतदार भाजपच्या विरोधात उतरून चक्क आ. बोदकुरवार यांचेवर चालून जात आहे. त्यामुळे यावेळी भाजपचा वणी विधानसभा क्षेत्रातून पूर्ण सुफडा साफ होण्याची चिन्ह दिसून येत आहे.

उद्धव ठाकरेंच्या गर्जनेने भाजपच्या शेकल्या कानठळ्या

0

मविआ च्या  संजय देरकरांच्या प्रचारार्थ रेकॉर्ड ब्रेक गर्दी

News Today 

दिलीप भोयर

वणी:- येथील शासकीय मैदानावर महाविकास आघाडीचे उमेदवार संजय देरकरांच्या निवडणूक प्रचारार्थ संपन्न झालेल्या विराट सभेत शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या सभेची रेकॉर्ड ब्रेक गर्दी पाहून विरोधकांची धांदल उडाली आहे. उद्धव ठाकरे यांनी डागलेल्या तोफेने भारतीय जनता पार्टी व त्यांचे उमेदवार आ. बोदकुरवार यांच्या कानाचे पडदे फाटल्याची चर्चा असून  उद्धव ठाकरेंच्या गर्जनेने भाजपच्या कानठळ्या बसल्या आहेत.

विधानसभा निवडणूक २०२४ ची निवडणूक येत्या २० नोव्हेंबर रोजी संपन्न होत असून वणी विधानसभेतील महाविकास आघाडीची जोरदार हवा तैयार झाली आहे. वणी विधानसभेत शिवसेना ऊबाठा गटाचे संजय देरकर हे मशाल चिन्हावर निवडणूक लढवीत आहे. शिवसेना ( ऊबाठा) गटाचे पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रचार सभेचे आज तारीख ११ रोजी दुपारी शासकीय मैदान पाण्याच्या टाकीजवळ आयोजन करण्यात आले होते.

या सभेला खा. अरविंद सावंत, खा. प्रतिभाताई धानोरकर, माजी आमदार वामनराव कासावार, दिलीप भोयर, अजय धोबे. राजीव कासावार, प्रकाश मॅकलवार, प्रा. टिकाराम कोंगरे, संजय निखाडे संध्या बोबडे आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी उद्धव ठाकरे आपल्या मनोगतात असे म्हणाले की, भाजप सरकारच्या पुढाऱ्यांजवळ शेतकऱ्यांना सांगण्यासाठी कोणतेच मुद्दे उरले नाही. केवळ ३७० हटविल्याने शेतकऱ्यांच्या शेतमालाला भाव मिळणार शेतकरी देशोधडीला लावून देशाचा विकास होणार त्यासाठी शेतीचे विकसित धोरण प्रामुख्याने राबविणे गरजेचे आहे. आणि ज्यांनी कुणबी समजाबद्दल जे  वक्तव्य केले ते अत्यंत  घृणास्पद आहे असे संबोधीले. 

याच बरोबर लोकसभेतील निवडणुकीत बहीण भावाच्या नात्याला काळीमा फासली होती तो मंत्री अजूनही भाजपवाल्यानी सरकार मध्ये ठेवला आहे. यावरून यांची नैतिकता उभ्या महाराष्ट्राला दिसून आली आहे आणि आज कुणबी समाजाबद्दल अभद्र टीपणी करून महाराष्ट्रातील वाघांना डिवचले आहे. त्यामुळे छाताडावर बसून मशाल पेटवायची आहे. 

तसेच अन्य मतदारसंघातील जिव्हाळ्याचे अनेक मुद्दे आपल्या गर्जनेतून मांडताच भाजपकडे शेती विकासाचे कोणतेही मुद्दे नसल्याने भाजप व आ. बोदकुरवार यांची चांगलीच गोची यावेळी उद्धव ठाकरे यांनी केली. रेकॉर्ड ब्रेक गर्दीच्या सभेला संबोधित करून  ठाकरे यांनी भाजपच्या कानठळीत हाणली. यासभेचे सूत्रसंचालन समीर लेनगुळे यांनी केले. तर आभार प्रवीण खानझोडे यांनी मानले.

उमेदवारांची ओळख नसल्याने घडला तो प्रकार :- संजय निखाडे

वणी येथील प्रचार सभेत उद्धव ठाकरे यांच्या सभे दरम्यान वरोरा भद्रावतीचे उमेदवार प्रवीण काकडे हे स्टेजवर ठाकरे यांचे सोबत अभिवादन करताना जात असताना शिवसेनेचे खा. अरविंद सावंत यांनी त्यांना अडवले होते. हा प्रकार केवळ उमेदवार काकडे यांची ओळख नसल्याने त्यांना अडविण्यात आल्याची माहिती शिवसेना कडून देण्यात आली आहे. त्यामुळे याचा अपप्रचार कोणी करू नये असे आवाहन उपजिल्हा प्रमुख संजय निखाडे यांनी केले आहे .

 

वणी विधानसभा क्षेत्रातील काँग्रेस बंडखोरांची पाठ राखण करतोय कोण ?

0

News Today 

दिलीप भोयर

वणी :- तेथील विधानसभेत काँग्रेस नेत्यांच्या बंडखोरीत दररोज वाढ होत आहे..परंतु त्यांचेवर कोणतीच कारवाई का होत नाही त्यांची पाठराखण करतो तरी कोण ? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. 

महाराष्ट्र राज्य विधानसभा निवडणूक २०२४ मध्ये महा युती विरुद्ध महा विकास आघाडी अशी सरळ लढत संपूर्ण राज्यात लावण्यात आली आहे. महायुती मध्ये भारतीय जनता पार्टी, शिवसेना (शिंदे गट) राष्ट्रवादी (अजित पवार गट) व इतर पक्ष विरुद्ध भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, शिवसेना (उबठा गट) राष्ट्रवादी (श.प.गट व इतर पक्ष अशी लढत निवडणुकीच्या मैदानात रंग भरत आहे. असे असताना वणी विधानसभा क्षेत्रामध्ये महाविकास आघाडी कडून शिवसेना उबाठा गटाचे उमेदवार म्हणून संजय देरकर यांना उमेदवारी घोषित करण्यात आली आहे. 

त्यांना महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्षांचे समर्थन लाभत आहे. परंतु काँग्रेस पार्टीचा स्वयंघोषित रखवाला संजय खाडे यांनी अपक्ष उमेदवारी दाखल केली व त्यांचे सोबत त्यांचे भलावण करणारे काही काँग्रेसचे पदाधिकारी आम्हाला दिवंगत खा. बालुभाऊ धानोरकर व विद्यमान खासदार प्रतिभा धानोरकर यांचा आशीर्वाद लाभला आहे.

तसेच मला काँग्रेसचा पंजा या विधानसभा क्षेत्रात वाचवायचा असून माझ्यावर महा विकास आघाडीने केलेल्या अन्यायाचा प्रतिरोध करणे हाच हेच एकमेव उद्दिष्ट ठेवून नागरिकांची दिशा भूल करीत असताना भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे उच्चपदस्त पदाधिकारी ह्या सर्व प्रकाराकडे डोळे झालं का करीत आहे. अशी जनसामान्य चर्चा रंगत आहे. 

तसेच काँग्रेस पक्षातील निष्ठावान कार्यकर्ते हे महविकास आघाडी सोबत दिसून येत आहे. परंतु कही लोभी स्वार्थी राजकीय पुढारी मात्र उठसूट अपक्ष बंडखोर उमेदवार संजय खाडे यांच्या तंबूत जावून आपके समर्थन देत आहे. मग या काँग्रेस पक्षाच्या धोरणा विरुद्ध वागणाऱ्यांना कुणाचा आर्शिवाद मिळत आहे. असा प्रश्न मतदारांमध्ये उपस्थित झाला आहे.

तसेच बंडखोरी करून देखील यांची काँग्रेस पक्षातून हकालपट्टी का केली जात नाही अशी विचारणा मतददारांनमधून विचारणा होत असतानाच बंडखोर उमेदवार संजय खाडे यांना पाठिंबा दर्शविणारे शिवसेना उबाठा गटाचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांचे विरुद्ध पक्षश्रेष्ठींनी एका रात्री कार्यवाही केली. परंतु काँग्रेसला या बंडखोरांवर कारवाई करण्यासाठी मुहूर्त कधी गवसणार अशी चर्चा होत आहे.  

वणी विधानसभा क्षेत्रातील काँग्रेस बंडखोरांची पाठ राखण करतोय कोण ?

0

News Today 

प्रतिनिधी

वणी :- तेथील विधानसभेत काँग्रेस नेत्यांच्या बंडखोरीत दररोज वाढ होत आहे..परंतु त्यांचेवर कोणतीच कारवाई का होत नाही त्यांची पाठराखण करतो तरी कोण ? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. 

महाराष्ट्र राज्य विधानसभा निवडणूक २०२४ मध्ये महा युती विरुद्ध महा विकास आघाडी अशी सरळ लढत संपूर्ण राज्यात लावण्यात आली आहे. महायुती मध्ये भारतीय जनता पार्टी, शिवसेना (शिंदे गट) राष्ट्रवादी (अजित पवार गट) व इतर पक्ष विरुद्ध भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, शिवसेना (उबठा गट) राष्ट्रवादी (श.प.गट व इतर पक्ष अशी लढत निवडणुकीच्या मैदानात रंग भरत आहे. असे असताना वणी विधानसभा क्षेत्रामध्ये महाविकास आघाडी कडून शिवसेना उबाठा गटाचे उमेदवार म्हणून संजय देरकर यांना उमेदवारी घोषित करण्यात आली आहे. 

त्यांना महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्षांचे समर्थन लाभत आहे. परंतु काँग्रेस पार्टीचा स्वयंघोषित रखवाला संजय खाडे यांनी अपक्ष उमेदवारी दाखल केली  व त्यांचे सोबत त्यांचे भलावण करणारे काही काँग्रेसचे पदाधिकारी आम्हाला दिवंगत खा. बालुभाऊ धानोरकर व विद्यमान खासदार प्रतिभा धानोरकर यांचा आशीर्वाद लाभला आहे.

तसेच मला काँग्रेसचा पंजा या विधानसभा क्षेत्रात वाचवायचा असून माझ्यावर महा विकास आघाडीने केलेल्या अन्यायाचा प्रतिरोध करणे हाच हेच एकमेव उद्दिष्ट ठेवून नागरिकांची दिशा भूल करीत असताना भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे उच्च पदस्त पदाधिकारी ह्या सर्व प्रकाराकडे डोळे झालं का करीत आहे. अशी जनसामान्य चर्चा रंगत आहे. 

तसेच  काँग्रेस पक्षातील निष्ठावान कार्यकर्ते हे महविकास आघाडी सोबत दिसून येत आहे. परंतु कही लोभी स्वार्थी राजकीय पुढारी मात्र उठसूट अपक्ष बंडखोर उमेदवार संजय खाडे यांच्या तंबूत जावून आपके समर्थन देत आहे. मग या काँग्रेस पक्षाच्या धोरणा विरुद्ध वागणाऱ्यांना कुणाचा आर्शिवाद मिळत आहे. असा प्रश्न मतदारांमध्ये उपस्थित झाला आहे.

तसेच बंडखोरी करून देखील यांची काँग्रेस पक्षातून हकालपट्टी का केली जात नाही अशी विचारणा मतदारांनमधून विचारणा होत असतानाच बंडखोर उमेदवार संजय खाडे यांना पाठिंबा दर्शविणारे शिवसेना उबाठा गटाचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांचे विरुद्ध पक्षश्रेष्ठींनी एका रात्री कार्यवाही केली. परंतु काँग्रेसला या बंडखोरांवर कारवाई करण्यासाठी मुहूर्त कधी गवसणार अशी चर्चा होत आहे.  

 

भाजपाच्या आमदाराला व कार्यकर्त्यांना गावबंदी वणी विधानसभेत झडकले फलक, ते वक्तव्य सत्यच ” आय विटनेस”  सापडले.

0

कुणबी समाजाबद्दल अभद्र वक्तव्य करणे भाजपला पडले महागात

संपूर्ण विदर्भात निषेधाचे सत्र सुरू, ऐन निवडणुकीत भाजपची दमछाक 

News Today 

दिलीप भोयर

वणी :- येथील भाजपचे उमेदवार संजीवरेड्डी बोदकुरवार यांच्या निवडणूक प्रचार कार्यालयाच्या परिसरात भाजपच्या व्यापारी आघाडीचे उपाध्यक्ष सुधीर साळी याने कुणबी समाजाबद्दल अत्यंत घृनास्पद वक्तव्य केल्याने त्याचेवर वणी पोलीसात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या घटनेचे संपूर्ण विदर्भात भाजपाचा विरोधात पडसाद उमटले असून सर्वत्र सकल कुणबी बांधव रस्त्यावर उतरून त्या वक्तव्याचा निषेध नोंदवत आहे. वणी तालुक्यातील झोला या गावच्या समोर कुणबी समाजाप्रती अभद्र भाष्य केल्याने भाजप आमदार व भाजपचे कार्यकर्तासाठी गवबंदी म्हणून फलक झडकल्याने ऐन निवडणुकीच्या तोंडावर भाजपची चांगलीच दमछाक होताना दिसून येत आहे. 

दिनांक ४ नोव्हेंबर रोजी भाजपाचे उमेदवार यांच्या निवडणूक प्रचार कार्यालय परिसरात एका समाज कंठकाने कुणबी समाजाबद्दल  अभद्र अपमान जनक व कुणबी समाजाच्या भावना व्यथित होईल अश्या पद्धतीचे वक्तव्य केल्याने त्याला तेथील भाजप कुणबी कार्यकर्त्यांनीच चांगलाच चोप दिला व ही माहिती शहरात वाऱ्या सारखी पसरताच शेकडो सकल कुणबी बांधव एकवटले व त्यांनी निषेध सभा बोलवून त्याच वेळी रात्री तारीख ५ रोजी शेकडोच्या संख्येनी कुणबी समाज बांधवांनी वणीचे पोलिस स्टेशन गाठून सुधीर साळी यांचेवर गुन्हा नोंद केला आहे. 

गुन्हा नोंद होतच तमाम समाज माध्यमांवर प्रसारित झालेल्या वृतामुळे  राज्यभरातील कुणबी बांधवांमध्ये संतापाची लाट पसरली आहे. संपूर्ण राज्यात या अभद्र व्यक्ताव्याच्या विरोधात निषेध नोंदविण्यात येत आहे. त्यामुळे भाजपच्या उमेदावारांना या घटनेने प्रचंड अडचणीत आणले आहे. वणी तालुक्यातील झोला या गावात सकल कुणबी समाजाच्या वतीने गावाबाहेर भाजपच्या आमदाराला व त्यांच्या कार्यकर्त्याना गावबंदी म्हणून फलक झडकले आहे.  हा फलकाची संपूर्ण विधान सभा क्षेत्रात जोरदार चर्चेचा विषय बनला आहे. 

लोकसभेतील चंद्रपूर येथील भर सभेत सक्या बहीण भावाच्या नात्याला काळीमा फासणारे नेते आणि कुणबी समजाबद्दल अभद्र वक्तव्य करणारे कंठक आपल्या जिभे वरील “सु” रांचा “धीर” अनावरण केल्याने भाजपला प्रचंड मोठा फटका बसला आहे. भर सभेत बहीण भावाच्या नात्याला काळीमा फासूनही एक सुधीर मी तस बोललो नाही म्हणून स्पष्टीकरणं देत होता. खोटे बोला पण रेटून बोला असे दुटप्पी धोरण राबविले होता. तेच धोरण वणीतील कुणबी समाजाबद्दल केलेल्या वक्तव्यावर येथील भाजपाचे पदाधिकारी राबवून आरोपींची पाठ राखण करीत आहे. त्यामुळे आणखी रोष वाढत आहे.

तसेच वरिष्ठांच्या दबावाखाली भाजपतील कुणबी व ओबीसी नेते देखील चक्क खोटे बोलून समाजाची दिशा भुल करीत आहे.  सत्य कितीही दाबण्याचा प्रयत्न केला तरी ते दबल्या जाणार नाही. भाजपाचे खोटे बोलणे व “मी नाही त्यातली कडी लाव आतली” ह्या मनी प्रमाणे आहे.  नेहमीचीच भाजप आपली भूमिका बदलवत असते त्यामुळे भाजपा वरील जनतेचा विश्वास पुर्णतः उडाला आहे. 

त्या अभद्र वक्तव्याचा प्रकार घडला एका वकीलासमोर 

(वकील म्हणाले आय एम दी आय विटनेस)

तारीख ४ रोजी भाजप उमेदवाराचे निवडणूक प्रचार कार्यालयाचे उद्घाटन असल्याने अनेक जण तिथे उपस्थित होते. त्याच ठिकाणी एक कुणबी समाजाचेच विधितज्ञ (वकील) देखील आवर्जून उपस्थित होते. सुधीर साळी हे पांढर शुभ्र शर्ट घालून तिथे आला व त्या ठिकाणी चालू असलेल्या चर्चेत सहभागी झाला व त्याने कुणबी समाजाबद्दल अभद्र टीपणी केली असता उपस्थित त्याच ठिकाणी वाद झाला व सुधीर यांना काही लोकांनी आत नेले व तिथं त्याला मारहाण झाली त्या ठिकाणी उपस्थित हंसराज अहिर यांनी ते भांडण सोडविण्याचा प्रयत्न. केला आणि तारेंद्र बोर्डे यांनी देखील आमदार यांना कुणबी समजा बद्दल असे वक्तव्य करीत असताना आपण बग्याची भूमिका घेता का असा प्रश्न देखील उपस्थित केला हा सर्व प्रकार घडत असताना संबंधित ते वकील त्याच ठिकाणी उपस्थित होते अशी त्यांनी माहिती दिली आहे. त्यामुळे भाजपाने पत्रपरिषद घेवून चुकीची माहिती प्रसारित करून समाजाची दिशा भूक केल्याचे उघड झाले आहे. या घटनेचे ते वकील प्रत्यक्ष दर्शी पुरावा आहे. ते पोलीसात देखील आपली जबानी बयान देणार असल्याचे त्यांनी न्युज टुडे जवळ नाव न प्रकाशित करण्याच्या अटीवर सांगितले.

वणी न्युज टुडे कधीच खोटी बातमी प्रकाशित करीत नाही तसेच कोणताही तेढ निर्माण करीत नाही व कोणत्याही षडयंत्राला खतपाणी घालत नाही.  जे सत्य असते तेच वाचकांच्या समोर परखडपणे प्रसारित करीत असते त्यामुळे जे आरोप आ. बोदकुरवार व काही नेत्यांनी समाजापेक्षा पक्ष मोठा समजून वणी न्युज टुडे या पोर्टलवर लावले होते ते सर्व आरोप खोटे निघाल्याने भाजप आणखी तोंड घशी पडली आहे. यामुळेभाजपचे खोटारडे रूप जनमानसासमोर उघड पडले आहे.