दिलीप भोयर News Today
मुबई:- महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या एक धक्कादायक व्हिडिओ चर्चेचा विषय ठरत आहे. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या नावावर कामठी मतदारसंघात तब्बल 1147 एकर जमीन असल्याचा दावा या व्हिडिओमध्ये करण्यात आला आहे. या दाव्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून सोशल मीडियावरही याची जोरदार चर्चा सुरू आहे.
या व्हिडिओमध्ये मंत्री बावनकुळे यांच्या पत्नी सौ. ज्योती, मुलगा संकेत आणि मुलगी पायल यांच्या नावाने ही जमीन असल्याचा आरोप करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, शेतकऱ्यांना कर्जमाफीसाठी गाडी किंवा बंगला नसावा अशी अट मांडणाऱ्या मंत्र्यांवरच आता प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

ही पोलखोल केल्याचा दावा रामेश्वर शिवाजी दरेकर यांनी केला आहे. त्यांनी “बोल बिंदास बोल” या कार्यक्रमातून हा व्हिडिओ सादर करत गंभीर आरोप केले आहेत. यापूर्वीही त्यांनी शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर बावनकुळे यांच्या विधानाविरोधात आवाज उठवला होता. त्यानंतर त्यांच्यावर गुन्हाही दाखल करण्यात आला होता, अशी माहिती समोर येत आहे.
दरेकर यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, “शेतकरी पुत्र घाबरत नाही, तो लढतो,” आणि त्यांनी पुन्हा एकदा सरकारला थेट आव्हान दिले आहे. या प्रकरणात पांडुरंग विठ्ठलराव डक मांडकीकर यांच्यावतीनेही गुन्हा दाखल केल्याची चर्चा आहे.
दरम्यान, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे या प्रकरणाकडे लक्ष देण्याची मागणी केली जात आहे. व्हिडिओमध्ये दाखवलेले पुरावे सत्य आहेत का, याची अधिकृत चौकशी होणे गरजेचे असल्याची मागणी विविध स्तरातून होत आहे.

सध्या या प्रकरणात नेमकी वस्तुस्थिती काय आहे, याबाबत अधिकृत भूमिका समोर आलेली नाही. मात्र, सोशल मीडियावर व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाल्यामुळे जनतेत संभ्रम आणि संताप दोन्ही भावना दिसून येत आहेत.
आता या आरोपांवर मंत्री बावनकुळे किंवा सरकारकडून काय प्रतिक्रिया येते, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.
बघा व्हिडिओची लिंक
https://www.facebook.com/share/v/1Arn17eEgJ/
टीप – वणी न्यूज टुडे कोणतीही पुष्टी करीत नाही


